सोमवार, २६ जानेवारी, २०२६

जीवनमान उन्नती : भूतकाळाचे प्रतिध्वनी आणि शाश्वत, सक्षम भविष्यासाठी दृष्टी” या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न

 


शब्दशिल्प/मुंबई_निर्मला निकेतन संस्था – कॉलेज ऑफ होम सायन्स, निर्मला निकेतन (स्वायत्त), मुंबई (NAAC पुनर्मान्यताप्राप्त A+ श्रेणी) येथे १६ व १७ जानेवारी २०२६ रोजी “जीवनमान उन्नती : भूतकाळाचे प्रतिध्वनी आणि शाश्वत, सक्षम भविष्यासाठी दृष्टी” या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न झाली. शाश्वतता, लवचिकता व मानवी कल्याण या विषयांवर सखोल चर्चा करण्यासाठी देश-विदेशातील अभ्यासक, संशोधक, धोरणकर्ते, उद्योग प्रतिनिधी व विद्यार्थी सहभागी झाले.

परिषदेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रा. (डॉ.) अरुण डी. सावंत, संचालक, वेस्ट टू एनर्जी रिसर्च टेक्नॉलॉजी कौन्सिल (WTERT-इंडिया), माजी प्र-कुलगुरू, मुंबई विद्यापीठ व माजी कुलगुरू, राजस्थान विद्यापीठ, जयपूर यांच्या हस्ते झाले. समारोप सत्रात फादर डॉ. जॉन रोज एस.जे., संचालक व माहिती तंत्रज्ञान प्राध्यापक, झेवियर इन्स्टिट्यूट उपस्थित होते, तर राष्ट्रीय कीर्तीचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी गेस्ट ऑफ ऑनर म्हणून मानसिक आरोग्याचे जीवनमान उन्नतीतील महत्त्व अधोरेखित केले.

या परिषदेत अमेरिका, युनायटेड किंगडम, मॉरिशस, बांगलादेश, इथिओपिया, व्हिएतनाम व फ्रान्स या सात देशांतील तसेच भारतातील १७ राज्यांमधील (आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, मणिपूर, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड व महाराष्ट्र) २०० हून अधिक प्रतिनिधींनी ऑनलाइन व प्रत्यक्ष पद्धतीने सक्रिय सहभाग घेतला.

परिषदेला डॉ. साब्रिना डी. रामसामी-इरानाह (मॉरिशस), प्रा. डॉ. अर्चना हेगडे (ईस्ट कॅरोलिना विद्यापीठ, अमेरिका), प्रा. (डॉ.) हेमराज बी. चंदालिया (जसलोक रुग्णालय, मुंबई), डॉ. ससिकुमार एन. मेनन (TDM लॅब, मुंबई), समग्र आरोग्य तज्ज्ञ मिकी मेहता, डॉ. इंग हायब्रेक्ट्स (IARC–WHO, फ्रान्स) तसेच आर्च्रोमा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व जागतिक प्रमुख श्री. अंजनी प्रसाद यांच्या सहभागामुळे विशेष उंची लाभली.

संस्थेच्या व्यवस्थापन अध्यक्ष सिस्टर फिलोमेना सिक्वेरा, उपाध्यक्ष सिस्टर सबीना गोंसाल्विस, व्यवस्थापक सिस्टर नोएला डायस व सल्लागार समिती सदस्य यांच्या नेतृत्वामुळे परिषदेला भक्कम पाठबळ मिळाले. प्राचार्या व अध्यक्षा डॉ. आशा मॅथ्यू यांच्या मार्गदर्शनाखाली NAAC-IQAC गुणवत्ता निकषांचे पालन करण्यात आले. परिषद संयोजिका प्रा. डॉ. कामिनी रेगे, सह-संयोजक डॉ. रितू मधन व श्रीमती वृंदा उदैवर यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद प्रभावी आंतरशाखीय मंच ठरली. जीवनमान ही संकल्पना केवळ आर्थिक नसून त्यात आरोग्य, सामाजिक समता, लैंगिक न्याय, सांस्कृतिक सातत्य, पर्यावरणीय शाश्वतता व नैतिक प्रशासन यांचा समावेश असल्याचे अधोरेखित झाले. सर्व चर्चा संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी (SDGs) सुसंगत होत्या.

परिषदेत आठहून अधिक मुख्य भाषणे, तीन पूर्णसत्रे, तीन समांतर तांत्रिक सत्रे, पॅनल चर्चा व ऑनलाइन व प्रत्यक्ष अशा १२४ संशोधन निबंधांचे सादरीकरण करण्यात आले. हवामान बदल, पर्यावरणीय शाश्वतता, सार्वजनिक व मानसिक आरोग्य, लिंग व सामाजिक न्याय, तंत्रज्ञानातील नवकल्पना व सामाजिक-आर्थिक विषमता या विषयांवर चर्चा झाली आणि उत्कृष्ट संशोधनासाठी १० बेस्ट रिसर्च पेपर पुरस्कार प्रदान करण्यात आले.



या यशस्वी आयोजनासाठी श्रीयापती बिल्डर्स (प्लॅटिनम प्रायोजक), भारत दफ्तरी फाउंडेशन, युनियन बँक, सेंट्रल बँक (गोल्ड प्रायोजक) तसेच मॅरिको लिमिटेड, द होल ट्रुथ फूड्स, बिर्ला फर्टिलिटी इन्स्टिट्यूट, नुट्रोवा, टेरापी, शिवानी सायंटिफिक इंडस्ट्रीज, क्यूवेअर्स, इनबॉडी, टपरवेअर/कुर्ती (आसिया), एलआयसी, आदित्य बिर्ला ग्रुप, झायडेक्स इंडस्ट्रीज, रोसारी बायोटेक आणि इंडियन टेक्निकल टेक्सटाईल असोसिएशन (ITTA) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

समारोपप्रसंगी आयोजकांनी ही परिषद आंतरशाखीय संशोधन, जागतिक सहकार्य व सामूहिक शैक्षणिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरल्याचे नमूद केले. या दोन दिवसांच्या चर्चांमधून निर्माण झालेली ज्ञानसंपदा व भागीदारी भविष्यातील संशोधन, धोरणनिर्मिती व शाश्वत, समावेशक आणि सक्षम जागतिक भविष्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

मुंबईच्या रंगमंचावर मध्य भारतातील आवाज: अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६

 


शब्दशिल्प/मुंबई_मुंबईतील सोमय्या विद्याविहार विद्यापीठाद्वारे आयोजित 'अफसाना – द सोमय्या स्टोरीटेलिंग फेस्टिव्हल २०२६' हा महोत्सव या वर्षी विशेषतः मध्य भारताच्या कथाकथन परंपरेला समर्पित आहे.

मुंबईतील विद्या विहार कॅम्पसमधील विद्यापीठात ३०-३१ जानेवारी रोजी होणाऱ्या या महोत्सवात मध्य प्रदेश आणि आसपासच्या प्रदेशांतील लोककथा, आदिवासी कथा आणि ऐतिहासिक आठवणी राष्ट्रीय स्तरावर सादर केल्या जातील.

'बिंदू: केंद्रित रूपके' ( bindu: centered metaphores) ही या महोत्सवाची संकल्पना, मुख्य प्रवाहातील आणि उपेक्षित आवाजांमधील संवाद दर्शवते. लोककला आणि समकालीन कला प्रकार, इतिहास आणि कल्पनाशक्ती, तसेच मौखिक आणि आधुनिक कथाकथन हे सर्व एकाच रंगमंचावर सादर केले जाईल.

अफसाना हे जंगल, नद्या, गावे, किल्ले आणि आदिवासी जीवनातून उगम पावणाऱ्या कथांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. या कथा पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत आणि आजही त्या आपल्या सांस्कृतिक ओळखीला आकार देत आहेत.

या वर्षी, 'अफसाना – द सोमय्या स्टोरीटेलिंग फेस्टिव्हल २०२६' मध्ये विशेषतः मध्य प्रदेशातील पारंपरिक कला, साहित्य आणि कथाकथनाच्या परंपरांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील कलाकार संजय महाजन आणि त्यांचा संघ, उज्जैन आणि माळवा प्रदेशाच्या सांस्कृतिक परंपरांशी घनिष्ठपणे जोडलेली राजा भर्थारी कथा आणि गणगौर नृत्य सादर करतील.

मोनिका गुप्ता – “इन्स्पेक्टर मातादीन ऑन द मून”, ही प्रसिद्ध हिंदी व्यंग्यकार हरिशंकर परसाई यांच्या प्रसिद्ध कथेवर आधारित एक सादरीकरण आहे, जे मध्य प्रदेशाची साहित्यिक परंपरा समकालीन रंगमंचावर आणते.

राणा प्रताप सेंगर – दास्तान-ए-राज कपूर, ज्यामध्ये भारतीय सिनेमाच्या या महान कथाकाराचा प्रवास पारंपरिक कथाकथनाच्या शैलीत सादर केला जाईल, आणि त्याद्वारे कथन व स्मृतीची परंपरा जिवंत केली जाईल. कथाकथन आणि स्मृतीची परंपरा जिवंत ठेवत.


• इंदोरशी संबंधित कथक कलाकार डॉ. टीना तांबे नवरस आणि रसनायिकांवर आधारित नृत्य सादर करतील.

• गीतांजली वाणी –  नर्मदेच वरदान या कथेच अभिवाचन करतील.

• कृतिका – बैगा आणि वाघ (बैगांच्या मौखिक परंपरांवर आधारित)

बनवारी लाल – माळवा प्रदेशाच्या पारंपरिक दाबू छपाई कलेवर एक विशेष कार्यशाळा, जी सहभागींना नैसर्गिक रंग, ब्लॉक प्रिंटिंग आणि लोकवस्त्र परंपरांची ओळख करून देईल.

पंकज पाटील – मध्य प्रदेशातील गोंड कलेवर आधारित एक कार्यशाळा, जिथे सहभागींना आदिवासी चिन्हे, रंगांची भाषा आणि कथनात्मक चित्रकलेच्या अद्वितीय परंपरेबद्दल शिकायला मिळेल.

याव्यतिरिक्त, या महोत्सवात अक्षय गांधी, रोशेल पोटकर, महमूद फारुकी, डॉ. उल्का मयूर, फिओना फर्नांडिस, नारायण परशुराम, महक मिर्झा प्रभू आणि वैशाली श्रॉफ यांच्यासह देशभरातील समकालीन कथाकार आणि सांस्कृतिक कलावंत सहभागी होणार आहेत.

महोत्सवाच्या अध्यक्षा अमृता सोमय्या यांच्या मतानुसार, “भारतीय ज्ञान परंपरेचा एक मोठा भाग आपल्या मौखिक कथांमध्ये सामावलेला आहे.”

सोमय्या विद्याविहार विद्यापीठ अशा कार्यक्रमांसाठी एक व्यासपीठ आणि मान्यता प्रदान करते, ज्यामुळे हे आवाज थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात आणि एक चैतन्यपूर्ण संवाद साधला जातो.”

उत्सव संचालिका यामिनी दंड शाह यांनी सर्व कलाप्रेमींना आमंत्रित करताना सांगितले की, “कार्यशाळा, थेट सादरीकरण, ओपन-माइक सत्रे आणि कलाकृतींच्या माध्यमातून, ‘अफसाना’ प्रेक्षकांना केवळ श्रोत्यांऐवजी कथाकथनाच्या प्रक्रियेतील सक्रिय सहभागींमध्ये रूपांतरित करते.”

अफसाना – सोमय्या कथाकथन महोत्सव २०२६ हा केवळ कथा ऐकण्याचा कार्यक्रम नाही, तर पुस्तकांमध्ये नोंदवण्यापूर्वी आवाजांमध्ये जिवंत असलेल्या भारताचा अनुभव घेण्याची एक संधी आहे.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://afsana.somaiya.edu/en/ येथे विनामूल्य नोंदणी करा.



" कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्तीसाठी जिद्द व स्वातंत्र्य महत्वाचे- मा.दिलीपबाबू इंगोले

 


 
शिक्षक साहित्य संमेलनात जयदीप सोनखासकर यांनी मा. दिलीपबाबू इंगोलेंशी साधला मुक्तसंवाद "      

    " मा.दिलीपबाबू इंगोले यांचा मुक्तसंवाद 

      ऐकून रसिक झाले मंत्रमुग्ध "

"  साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले यांनी 

साधला रसिकांमधून मुक्तसंवाद "


शब्दशिल्प/अमरावती_ महाराष्ट्र शासनाचा अत्यंत मानाचा समजला जाणारा 'शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार' प्राप्त,श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कोषाध्यक्ष, समाजसेवी मा.दिलीपबाबू इंगोले यांच्याशी क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबाबत मातोश्री विमलाबाई देशमुख साहित्य नगरी श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे नुकत्याच संपन्न झालेल्या नवव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात शिक्षक साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.जयदीप सोनखासकर यांनी मुक्तसंवाद साधला. 

         जयदीप सोनखासकर यांनी बालपणापासून तर आजच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्षपदापर्यंतचा पूर्ण प्रवास मा.दिलीपबाबू इंगोले यांना प्रश्नाच्या रूपात विचारल्यानंतर मा.दिलीपबाबू इंगोले यांनी त्यांच्या प्रश्नाची अतिशय समर्पक उत्तरे देऊन खेळीमेळीच्या आणि आनंददायी वातावरणात मुक्तसंवाद साधला.

        आपण या मानाच्या क्रीडा पुरस्कारापर्यंत कसे पोहोचू शकले ? या जयदीप 

सोनखासकर यांनी 

विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरा प्रसंगी मुक्तसंवाद साधताना मा.दिलीपबाबू म्हणाले की, "कुटुंबाचा पाठिंबा आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

       कोणत्याही क्षेत्रात यशप्राप्तीसाठी कशाची आवश्यकता आहे? असे जयदीप सोनखासकर यांनी विचारले असता मा.दिलीपबाबू इंगोले म्हणाले की,"कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्तीसाठी जिद्द, सातत्य,शिस्त महत्त्वाची असते."

        जयदीप सोनखासकर यांनी, "आजच्या तरुण खेळाडूंना काय सांगाल ?" असा प्रश्न  विचारला असता मा. दिलीपबाबूंनी सांगितले की, "शॉर्टकटने यश मिळत नाही. मैदानात घाम गाळल्याशिवाय यशाची चव चाखता येत नाही. अपयशाने खचून न जाता जिद्दीने पुन्हा उभे राहणे हाच खिलाडूवृत्तीचा खरा विजय आहे."

       आपण श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कोषाध्यक्ष आहात.या संस्थेच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यामागे आपली प्रेरणा काय होती?" , ​"शिक्षण क्षेत्रातील आर्थिक व्यवस्थापन इतर क्षेत्रांपेक्षा कसे वेगळे वाटते?" , ​"संस्थेचा वार्षिक अर्थसंकल्प (Budget) तयार करताना आपण कोणत्या मुख्य गोष्टींना प्राधान्य देता?","निधीचा (Funds) विनियोग शैक्षणिक गुणवत्तेसाठी योग्य प्रकारे होत आहे, हे तुम्ही कसे निश्चित करता?", ​"संस्थेला मिळणाऱ्या देणग्या किंवा सरकारी अनुदानाचे व्यवस्थापन करताना तुमच्यासमोर कोणती आव्हाने येतात? या जयदीप सोनखासकर यांनी विचारलेल्या कोषाध्यक्ष पदासंबंधीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना मा.दिलीपबाबू इंगोले यांनी अतिशय समर्पक आणि मुद्देसूद मुक्तसंवाद साधला. मा.दिलीप बाबूंची उत्तरे ऐकून रसिक वर्ग मंत्रमुग्ध झाला होता.

     मा.दिलीपबाबू इंगोले यांच्याशी त्यांच्या सामाजिक कार्याविषयी जयदीप सोनखासकर यांनी साधलेला मुक्तसंवादही वैशिष्ट्यपूर्ण राहिला.विदर्भात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या दुःखद असून युवा शेतकऱ्यांना शेतीपूरक जोडधंदे करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.



      मुक्तसंवादाच्या अंतिम टप्प्यावर प्रश्न विचारण्यासाठी मा.सोनखासकर यांनी रसिकांना जेव्हा आवाहन केले,तेव्हा रसिकांमधून एक प्रश्न मा.दिलीप बाबूंना विचारण्यात आला.  साहित्यिक शिवसेवक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले रसिकांमधून प्रश्न विचारताना म्हणाले की ,"श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या शाळा महाविद्यालयातून आदर्श विद्यार्थ्यातून आदर्श नागरिक घडले पाहिजे,मानवता धर्माचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे हे डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे स्वप्न साकार होताना आपल्याला दिसत आहे का ? यासाठी संस्था  शाळा - महाविद्यालयातून कोणकोणते प्रकल्प आणि उपक्रम राबवित आहे ?" शिवसेवक प्रा.बुंदेले यांच्या या प्रश्नाचे उत्तर देताना मा.दिलीप बाबूंनी अतिशय उत्तम आणि समाधानकारक मुक्तसंवाद साधला.

        या  मुक्तसंवाद कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संमेलनाध्यक्ष डॉ.गणेश चव्हाण,प्राचार्य डॉ. विनय राऊत,प्रा.डॉ.पृथ्वीराज सिंह राजपूत,अभंगकार प्रा.अरुण बुंदेले,मा.शरदचंद्र बिडकर,प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे होते.सभागृह श्रोत्यांनी खचाखच भरले होते.

         कार्यक्रमाचे संचलन प्रा. डॉ.मंदा नांदुरकर तर आभार गजेंद्र पाथरे यांनी मानले. साधला.

        या  मुक्तसंवाद कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संमेलनाध्यक्ष डॉ.गणेश चव्हाण,प्राचार्य डॉ. विनय राऊत,प्रा.डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत,

अभंगकार प्रा.अरुण बुंदेले,मा.शरदचंद्र बिडकर,प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे होते.सभागृह श्रोत्यांनी खचाखच भरले होते.

         कार्यक्रमाचे संचलन प्रा. डॉ.मंदा नांदुरकर तर आभार गजेंद्र पाथरे यांनी मानले.

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

*कविता मनामनातं रुजत गेल्या*

 


*कविता मनामनातं रुजत गेल्या*

     (कविसंमेलन,पनवेल,जि.रायगड)

🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹

*****************************

...नानाभाऊ माळी


कोकण म्हटलं सृष्टी सौंदर्याची खान दिसते.हिरवाईचा अनोखा अविष्कार

मनाला उत्साह भरत असतो. हिवाळ्यात ऊबदार पण थोडं दमट ही वातावरण असतं. अशा कोकणातील पनवेल सारख्या ठिकाणी प्रसिद्ध कवी नागनाथजी डोलारे सरांनी आग्रहाचे आमंत्रण देऊन बोलावले होते.प्रेमळ आग्रहामुळे जाणं भाग होत.कोकण भूमीत मन रमून गेलं होतं!तेथील अनुभव डोळस करून गेलेत.त्याविषयी खूप काही 🙏.......


       ......काही प्रसंग,घटना अशा असतात की त्याचा आघात त्वरित होतो.मानसिक होतो.शारीरिक होतो.त्याचा थेट संबंध मनात सुप्तपणे कार्यरत असलेल्या संवेदनेशी येतो.मनुष्य संवेदनशील असल्यामुळे त्याच्या मनावर एखाद्या घटनेचा खोलवर परिणाम होतो. घटना आकस्मिक घडून जाते.कधी नियोजित घटत असते.काही व्यक्तींवर त्याचा परिणाम  जलद गतीने होतो.व्यक्ती कधी वेदनेने तळमळते,हळहळते तर कधी दुःखी होते.कधी हर्ष होतो.घटनेची प्रतिक्रिया तात्काळ येते.संवेदना जागृत असणाऱ्या व्यक्तींच्या मनावर त्याचा दुरगामी परिणाम होत असतो. 



               लेखक,कविंच्या भावना अत्यंत संवेदनशील असतात.त्यांच्या प्रतिक्रियेचा उमाळा मुखातून, शब्दातून व्यक्त होत असतो.विषय अंतःकरणातून उसळी घेत असतो!मनात विचारांच्या प्रचंड उंच लाटा उसळी घेऊ लागतात. दबलेल्या भावनांची प्रचंड लाट काठावर आदळू लागते.शब्द जन्म घेऊ लागतात. भावनेचा बंदिस्त उमाळा शब्दात उतरू लागतो.तिलाचं *कविता* म्हणतात.कधी *कथाही* म्हणतात.व्यक्तीच्या मनात आंतरिक द्वंद्वं उफाळून येत असतं.कवी-लेखक त्या घटनेचां साक्षीदार होऊन जिवंत शब्दांचं धुमसत सत्य समोर ठेवत असतात.आंतरिक उफाळून आलेल्या संवेदनशील भावनांना शब्दरूप दिल्यावर कवितेचां आत्मा शब्द *स्फ़ोट* होतो.


                 कविता कल्पना अन घटनांचं विस्तारित प्रतिबिंबरूप असतं. प्राचीन काळापासून सामाजिक दरी वाढत गेली.त्यात धार्मिक अन जातीयवादी समस्या मूळ होत्या अन आहेत देखील.शोषक वर्ग शोषितांच्या मानगुटीवर बसून शोषण करीत राहिला.जसा सुप्त, तप्त लव्हारस पृथ्वी गर्भातून उफाळून वर यावा तसा शोषितांचा प्रचंड यातनानीं दबलेला आवाज एकमुखी आला होता.एकत्र येऊन न्याय हक्क मागू लागला होता. 'मानवाने मानवासारखे जगू देण्याची' हक्काची मागणी करू लागला होता. जातीयेतेच्या प्रचंड जोखंडात आवळलेलें एक होऊन मानगुटीवरील जोखंड प्रचंड ताकदीने फेकून दिले होते.त्यात पिडा होती, दुःख होतं. यातना होत्या.'माणसानें मानसासारखे' जगू देण्याची हक्काची मागणी केली होती.पृथ्वीतून लालभडक तप्त लाव्हारस आतून गुदमरून उफाळून वर यावा तशी  पिडीत,शोषित,अत्याचारग्रस्त शूद्रादिशूद्र यांनी सामानतेचा आवाज बुलंद केला होता.भारतभर एकत्र येऊन धार्मिक दंभाचार विरुद्ध ठाम उभे राहिले *तिथे वास्तव, दाहक कविता जन्माला आली होती!*


         विस्तवावर चालणाऱ्या,अखंड चटके सहन करणाऱ्यांचा विस्फोट कवितेतून जिवंत होत आहेत.छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,माय रमाई यांच्या जीवन संघर्षाची कहाणी  ज्वलंत कविता आहेत.....१८ जानेवारी २०२६ रोजी पनवेल येथे कोकण मराठी साहित्य परिषद अन पंचशील तरुण मंडळ सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध साहित्यिक, कवी नागनाथ डोलारे सर यांच्या  *मानवतेचे सिंहासन अन लावण्य लेणी* या दोन पुस्तकांचे प्रकाशन,साहित्यिक पुरस्कार अन कवी संमेलन आयोजित केलें होते.मानवतेचे सिंहासन मधून कवी नागनाथ डोलारे सरांच्या कवितेतून पदोपदी संघर्ष दिसून येतो. जाती संघर्षाची तीव्र वेदना त्यांच्या कवितेतून दिसून येते.तर लावण्य लेणीतून,चारोळीसंग्रहातून प्रेमाचीं उत्तम सांगड घातलेली आहे.



                      साहित्यिक पुरस्कार प्रदान करतांना कवी नागनाथ डोलारे सरांच्या चेहऱ्यावर विशेष कृतज्ञता भाव प्रकट झालेले दिसत होते. आम्हाला देखील राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारतांना आदर्श जीवन मूल्यांच दर्शन होतांना दिसत होतं.जगण्याचा अर्थ त्या पुरस्कारात दडलेला दिसला.आदर्श मूल्य डोळ्यासमोरून तरळून जात होती.पुरस्कार स्वीकारतांना राज्यघटनेचे शिल्पकार दिसत होते. राजश्री छत्रपती शाहू महाराज दिसत होते.सत्यशोधक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले दिसत होते. मानवतेचे पूजारी दिसत होते.मनुष्यधर्म पाळणे हाचं खरा धर्म दिसत होता.आदरणीय डोलारे सर परोपकारावर विश्वास ठेवणारे खरे विचारवंत असल्याने समोर आदर्श ठेवून आमच्या हृदयात जाऊन बसले. थोर विचारवंत श्री.शिवदास महाजन सरांच्या सामाजिक दायित्वाची ही ओळख होती.


                    पुरस्कार सोहळ्यानंतर कविसंमेलनातून जीवन दृष्टी देणाऱ्या अनेक कवितांनी प्रत्येक रसिक अन कविमनाच्या हृदयावर राज्य करीत राहिल्या.कविता शोषितांचा हुंकार बनून हिंडत राहिली.अंतरात्म्याला भिडत राहिली.कवी आपल्या अपत्याकडून जातीव्यवस्थेवर प्रहार करीत राहिले.मानवतेच्या पुजारीची हाक देत राहिले.कविता समरसता, सद्भाव, समानता, शिक्षण, संविधान या तत्वानां आपल्या कुशीत घेऊन हिंडत राहिली.कविता असमानतेच्या बिजाला शोधत राहिली. माणसाला मिळालेला हक्क, अधिकार यावर वास्तव भाष्य करीत राहिली. विषमतेवर प्रहार करीत राहिली. कवी दाहकतेच वास्तव दर्शन घडवून नव्या दमाच्या कविता सादर करून होत राहिल्या.संमेलनास उपस्थित रसिकजनांना डोळस करीत राहिल्या. कविता डोळे, कान अन अंतरात्म्यात घुसत राहिली.नजर देत राहिली. समाजाच्या उन्नतीसाठी शब्द कवितेतून वाहात राहिले.पनवेलच्या या अनोख्या काव्य संमेलनातून ज्ञान घेत सर्वचं उपस्थितांनी उगवणाऱ्या उद्याच्या नव्या सूर्याकडे वाटचाल सुरु केली आहे!समतेची, सद्भावाची, समरसतेची, नैसर्गिक मिळालेल्या हक्कांची, संविधानाने दिलेल्या अधिकाराचीं वाटचाल सुरु झाली आहे!

🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹

****************************

... नानाभाऊ माळी 

हडपसर, पुणे-४११०२८

मो.नं-९९२३०७६५००

दिनांक -२१ जानेवारी २०२६

nanabhaumali.blogspot.com

मैत्री कट्टा कवीमनाचा साहित्य समूह महाराष्ट्र आयोजित चौथे राज्यस्तरीय कवीसंमेलन १ फेब्रुवारीला

शब्दशिल्प/छत्रपती संभाजीनगर-मैत्री कट्टा कवी मनाचा साहित्यसमूहाचे चौथे राज्यस्तरीय कवी संमेलन दिनांक ०१/०२/२०२६ रोजी वार रविवार,हॉटेल रेड व्हेलवेट छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेले आहे. या कार्यक्रमाकरीता अध्यक्ष म्हणून आशा डांगे( शिक्षिका तथा सुप्रसिद्ध कवयित्री), उद्घाटक अनिल साखरे( मुख्याध्यापक) प्रमुख पाहुणे विजय पांचाळ( प्रसिद्ध कवी/ निवेदक), गिरीश जोशी( सुप्रसिद्ध गझलकार), संजय खाडे ( सुप्रसिद्ध कवी) लाभलेले आहेत. कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन, पुरस्कार गौरव सोहळा तसेच कवींचे कवीसंमेलन होणार आहे. जवळजवळ ५० कवींच्या विविध कवितांच्या मेजवानीचा आस्वाद या कार्यक्रमातून सर्वांना घेता येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सौ. अल्का साखरे- धोंडणे( मैत्रीकट्टा कवीमनाचा संस्थापिका/ अध्यक्षा, अर्जुन गायकवाड( कवी/ गझलकार), विजय दळवी( कवी) यांनी केलेलं असून जास्तीत जास्त साहित्यिकांनी संमेलनात भाग घ्यावा असे आवाहन संस्थापिका सौ.अल्का साखरे- धोंडणे यांनी केलेलं आहे.

मंगळवार, २० जानेवारी, २०२६

संध्या डाहेलकर यांना डॉ. सिंधुताई सपकाळ सन्मान

 


 शब्दशिल्प/मूर्तिजापुर  :  श्री संत गाडगेबाबा यांच्या दश सूत्री संदेशांना आपले उदिष्ट मानून कार्य करणाऱ्या संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठान च्या ध्येय धोरणाने प्रेरित होऊन संस़्थेच्या उपक्रमांतर्गत तहानलेल्यांना पाणी आणि भुकेल्या्ना अन्न या बाबांच्या संदेशानुसार भुके दीन दुबळे , गरिब गरजू अंध पंंगूंना सदावर्ताप्रमाने दर आलेल्यांना  दररोज निशुल्क भोजन देणाऱ्या संध्या अनिल डाहेलकर यांच्या सेवाव्रताची दखल घेऊन त्यांना 'डॉ. सिंधुताई सपकाळ नारी प्रेरणा पुरस्कारा'ने कानशिवणी येथील राज्यस्तरीय साहित्य संमेलनात सन्मानित करण्यात आले.

     कलाविष्कार साहित्य, सांस्कृतिक संस्थेच्या वतीने तिसऱ्या राज्यस्तरीय साहित्य संम्मेलनाचे उद्घाटन प्रा.डॉ.चिंतामण कांबळे यांनी केले. डॉ. प्रा. संतोष हुशे या संमेलनाचे अध्यक्ष होते. कानशिवणीतील एकलव्य शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या संमेलनात गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त गझलनवाज पं. भिमराव पांजाळे यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत  डॉ. सिंधुताई सपकाळ नारी प्रेरणा पुरस्कार देऊन संध्या अनिल डाहेलकर यांचा गौरव करण्यात आला. 

   सुपरिचित साहित्यिक , समाजसेवक अनिल  डाहेलकर अर्धांगिनी सौ. संध्या डाहेलकर ह्या गेल्या चार वर्षांपासून मेस द्वारे विद्यार्थी विद्यार्थ्यांना अल्प दरात टिफिन सेवा आणि आता या वर्षी पासून भरपेट बसून शिवाश्रय मेस हाटेल च्या माध्यमातून रुचकर जेवन देत असून सोबतच गरीब गरजू  दीन दुबळ्यांना आनंदाने जेवू घालत आहेत.

सोमवार, १९ जानेवारी, २०२६

पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते - मनिषा कांबळे*

शब्दशिल्प/यवतमाल_विसावा सोशल फाउंडेशन नागपूर  व इंटरनॅशनल रिसर्च पब्लिकेशन ऑफ बिझनेस मॅनेजमेंट प्रस्तुत नॅशनल सोशल अँड एज्युकेशन परिषद नागपूर पुरस्कार सन्मान सोहळा नुकताच शनि. दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी दुपारी दोन वाजता विदर्भ हिंदी साहित्य मधुरम सभागृह श्री  फत्तेचंद मोर  हिंदी भवन राशी राणी चौक वर्धा रोड नागपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

विविध क्षेत्रातील उत्तुंग नवीन क्षितिज निर्माण करून आपल्या क्षेत्रात अलौकिक कार्य करणाऱ्या विभूतींचा सन्मान  सोहळा  आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला चित्रपट, मालिका टीव्ही कलाकार सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेतील शास्त्री भूमिकेत असलेले श्री सुनील गोडबोले. श्री रामरतनजी हाडगे प्रसिद्ध उद्योजक नागपूर, मा. उज्वला रोडगे अभिनेत्री नागपूर ,मा. रवींद्र दिघोरे. समाजसेवक नागपूर ,मा. मनिषा कांबळे साहित्यिका यवतमाळ. प्राध्यापक डॉक्टर संजय हर्षे समाजसेवक ब्रह्मपुरी, स्वाती तरडे अध्यक्ष विशाखा फाउंडेशन नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय पुरस्कारांचे आयोजन समृद्धी प्रकाशनची संचालक डॉ. बी .एन.खरात.सिंधुदुर्ग. यांनी केले होते .

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मनिषा कांबळे यांनी म्हटलं की पुरस्कार हे जगण्याला प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते .याप्रसंगी आयोजक बी. एन .खरात सर यांच्या कार्याचे खूप  अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले. कारण स्वतःसाठी तर सारे जगतात पण जी माणसे समाजासाठी ,इतरांच्या सुखासाठी जगतात, इतरांना मोठी करता ती माणसे जगात मोठी होत असतात आणि ही माणसे फक्त इतिहासच नाही तर लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करतात. बी. एन. खरात सर सुद्धा अशेच एक व्यक्तिमत्व आहे जे  आपल्या समाजकार्याच्या माध्यमातून इतरांसाठी  नेहमी कार्यरत असतात. लोकांना मंच उपलब्ध करून देण्याची काम करतात. भारत आणि भारताबाहेर सुद्धा त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहे .थायलंड दुबई ,मलेशिया ,श्रीलंका अशा अनेक ठिकाणी त्यांनी कवी संमेलन आणि पुरस्काराचे आयोजन केले आहे .त्यामुळे अनेक लोकांना आपल्या कामाची पोचपावती मिळाली. आणि प्रेरणा मिळाली. नागपूर सारख्या ठिकाणी हा कार्यक्रमाचे आयोजन करून देशभरातून येणाऱ्या ८०  लोकांना  वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . हा सोहळा अतिशय मोठ्या उत्साहात  पार पडला गेला .  भव्य स्वरूपात  कार्यक्रम घेतल्याबद्दल आयोजक डॉ. बी एन  खरात  सर यांचे सर्वत्र  कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

गुवाहाटी एक्स्प्रेस हे कादंबरी म्हंजे आजच्या राजकारनाचे वास्तव रुप


       आज घळीले वऱ्हाडी बोलीभाषेत साहित्यिक लिखानात दर दिसाले भर पळत हाये. दरोज जुन्या नव्या साहित्यीकायचे नवनवीन पुस्तकं प्रकाशित होत हायेत. हे गोट मोठी आनंदाची हाये. झाड जर हिरवं होत असल त् ते भवीष्यात गह्यरा सावली देते. त्याले फुल बी लागतात अन् फळ बी येतात. पाखरायची आबादानी होते. असीच नवीन लेखकाईचा हातभार लागत असल्यानं वऱ्हाडी बोली फुलुन रायली हे महत्वाचं. 

      अलीकळेच उमरावतीच्या आबासाहेब कडू या जेष्ठ लेखकाची अस्सल वऱ्हाडी बोलीत असलेली 'गुवाहाटी एक्स्प्रेस व्हाया अमरावती' हे कादंबरी प्रकाशित झाली. हे कादंबरी वाचताखेपी भलतीच मज्या आली. गावाकळची गुयचट वऱ्हाडी बोली अन् तिच्यात बदलत्या काळानुसार नवीन आलेले शब्द, याचा पध्दतशीर ताळमेळ लेखकानं साधला हाये. हे या कादंबरीचं बलस्थान हाये. 

      गुवाहाटी एक्स्प्रेस या कादंबरीत साऱ्यात मेन पात्र हाये ते म्हंजे "मारोतीराव "  हा गळी जीव लावून पक्षाच काम करनारा कार्यकर्ता. आपल्या नेत्याले निवळुन आनासाठी सारं गाव शिंगावर घेनारा. मालकाच्या आंदी साऱ्या गावाले उत्तरं देनारा. अन् साऱ्या गावची खबरबात ठुयनारा हा मारोतीराव वाचल्यावर असं वाटते का आपल्या बी गावात असाच मारोत्या हाये. तसं पायल त् असं क्यारेक्टर हे परत्येकच गावात रायते.

       पयलमसुट मारोतीरावचं पात्र अस दिसते का थो येक गनेशरावचा कार्यकर्ता. जसा अकबराच्या दरबारात बिरबल असते डिक्टो तसाच. पन या मारोतीराव अन् आपला नेता गनेशरावच्या समंधात मिठाचा खळा पळते. दोघात पैसे खायाच्या कारनावरुन भिनसल्यावर मारोतीनं नेते अन् पक्ष दोनी बी सोळले. ईरोधी पक्षात प्रवेश केला पन घन्शामनं खर्चात भलतीच गपकनी देली. अन् पक्ष प्रवेशाच्या कारेक्रमात जेवनाच्या कारनानं बंबाट फोत्री केली. नाहाक घन्शामच्या पक्षात गेलो. अस म्हनून मारोती भल्लाच पस्ताई पळला. तो आपल्याच पक्षात वापस यासाठी आमदार देशमुख सायबाले भेटला. हे भेट त्याचा जिंनगीत कलाटनी देवून गेली. 

         बहिरमबाॅ साऱ्याईच्या नवसाले पावते. म्हनून पंचक्रोशीतले लोकं मोठ्या श्रध्देनं बहिरमबाॅच्या जत्रीले येतात. मारोतीनं बी आपली घरधनीन 'सुनिता' सहीत जत्रीत राहुटी मांडली अन् त्या राहूटीवर आमदार साहेब येक रोज राऊन गेले. या ईशयाची चौतर्फा चर्चा चालू झाली. मारोतीचं क्रेडीट वाडलं. राजकारणात दबदबा वाळला. नशिबानं अन् वदरच्या नेत्यानं साथ देली त नशीब पलटाले टाईम लागत नाई. तसच मारोतीच झालं.  



       आमदाराचा ईस्वादपात्र मानुस झाल्यानं मारोतीरावचं पक्षात वजन वाळल. लोक त्याईले मानसन्मान द्यायले लागले. ईथुनच कादंबरी रंजकतेच्या शिखरावर पोचते. घन्शाम अन् गनेशरावचा ईरोध चालू असतांनी मारोतीरावले आमदार साहेबाच्या मर्जीनं निवडनुकीचं तिखीट भेटते. अन् पठ्ठया निवडून बी येते. पुळे पुळे प्रगती करत मारोतीराव आमदार होतात. असा हा कादंबरीचा प्रवास पुळे सरकत सरकत जाते. 

       राजकारनी लोकाईच जीवन रेखाटतानी लेखकानं राजकारनी लोकायचे लेकरं बी कसे बिघळतात हे रोहनच्या पात्रातून दाखुन देलं. बिळी-काळी, शिगारेट अन् दारुच्या नांदी लागून राजकारनी लोकाईचे लेकरं स्वोताची जिनगी बरबाद करतात. अशातच लेकराच्या कायजीनं झुरनारी माय म्हनजे सुनिता हे पात्र येकदम संतुलीत वाटते. कथेतनी जवा शिरपतराव अन् रेखा या जोडप्याची एन्ट्री होते. तथुन ईनोदी किस्से वाचकाले कथेत गुतून ठेवतात. साळी घेण्याच्या नांदात दात पळतात, अन् मंग नवीन दात बसवन्याच्या नांदात साळी राहून जाते. असी कलागत या कादंबरीत पहायले भेटते.

       खरं त् पुस्तकाले कोनाची प्रस्तावना न घेता कोनाची पाठराखन न घेता स्वलेखनीवर भरोसा ठेवून लेखक आबासाहेब कडू यायनं हे कादंबरी प्रकाशीत केली. बिना प्रस्तावनेच हे पयलच पुस्तक माया वाचनात आलं. लेखकाले वऱ्हाडी लेखनाचा चांगलाच बाज गवसला हाये. त्याईले बोलीभाषेची चांगलीच माईती हाये त्याचा फायदा त्याईनं करुन घेतला आहे. 'गुवाहाटी एक्स्प्रेस' व्हाया अमरावती या कादंबरीच्या माध्यमातून लेखकानं कादंबरी लिखानातली आपली तरबेजता सिध्द केली हाये. त्यासाठी त्याईच कौतूक व्हायालेच पायजे. 

  

*प्रा. महादेव लुले (देवबाबू)*

 अकोला 

मो. 9923085311

पनवेलमध्ये रंगला साहित्याचा जागर; रघुनाथराव ढोक यांचा विशेष सन्मान


​ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ डोलारे यांच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात गौरव

​शब्दशिल्प/नवी पनवेल_कोकण मराठी साहित्य परिषद (शाखा पनवेल) आणि पंचशील तरुण मंडळ (सावरगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रघुनाथराव ढोक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ श्रीपती डोलारे यांच्या 'मानवतेचे सिंहासन' आणि 'लावण्यलेणी' या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी हा सन्मान सोहळा पार पडला.

​मान्यवरांची मांदियाळी

​कार्यक्रमाचे अध्यक्षपद को.म.सा.प.चे विश्वस्त आणि रायगड भूषण मा. प्रा. एल. बी. पाटील यांनी भूषवले. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा न्यायाधीश मा. डॉ. यशवंत चावरे, विद्रोही कवी मा. प्रा. राहुल तागडे, ह्युमन राईट्स ॲक्ट इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निवृत्त न्यायाधीश मा. शिवदास महाजन, आणि माजी शिक्षण सहसंचालक मा. रोहिदास पोटे यांसारखी दिग्गज मंडळी उपस्थित होती.

​प्रगल्भ विचारांचा सन्मान

​रघुनाथराव ढोक यांनी समाजाप्रती दाखवलेली बांधिलकी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करताना मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले. 'मानवतेचे सिंहासन' या पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणेच, मानवता जपणारी माणसे समाजात निर्माण होणे गरजेचे आहे आणि रघुनाथराव ढोक हे त्यापैकीच एक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.



​कार्यक्रमाचे स्वरूप

​या सोहळ्यात पुस्तक प्रकाशनासोबतच एक खुले कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात विविध कवींनी आपल्या कवितांमधून सामाजिक वास्तवावर भाष्य केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन मा. हरिश्चंद्र फडके यांनी केले. या सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी ज्येष्ठ साहित्यिक ॲड. सुनिता जोशी, मा. नागनाथ डोलारे, अर्चना डोलारे आणि सुभाष कुरणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

​रघुनाथराव ढोक यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, हा गौरव त्यांच्या भावी वाटचालीस प्रेरणा देणारा ठरेल, अशा शुभेच्छा यावेळी उपस्थित जनसमुदायाने दिल्या.

ताटातूट" : मानवी जाणिवांचा वैश्विक कल्लोळ दाखविणारा कथासंग्रह.

 


सामाजिक बांधीलकी आणि मानवतेला सर्वस्व समर्पित करून लेखन करणारे अहिल्यानगरचे आंबेडकरी विचारांचे लेखक आदर्श शिक्षक आयु. गोकुळ गायकवाड यांचा ताटातूट कथासंग्रह परीक्षणासाठी मिळाला.  सदरच्या कथासंग्रहाला लेखक पंडित कांबळे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. सोलापूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर या चार जिल्ह्यांच्या सीमेवरील एका अतिशय दुर्गम खेड्यामध्ये लेखकाचे जन्मस्थान आणि जडणघडण काळ असल्यामुळे सदरच्या कथासंग्रहात अवतीभवतीच्या बोलीभाषेचा कमी अधिक फरकाने प्रभाव आणि परिणाम दिसून येतो. आंबेडकरी विचारांमुळे भवताली घडून येणारा बदल, सूक्ष्म परीक्षणाच्या नोंदी, निष्कर्ष, संवाद कौशल्ये, पात्रांची निवड, पात्रांची भारदस्त ओळख, वातावरणनिर्मिती, कथानक, कथाबीज, सुत्रबध्दता, भाष्य, कथेची सुरूवात, मध्य, शेवट, लक्षवेधी परिवर्तनवादी भूमिका, हे बलस्थाने आणि तत्व कथासंग्रहात शेवटपर्यंत लेखकाने पालन केले आहे. 

स्वानुभवातून, स्वयंप्रेरणेतून लेखकाने प्रस्तूत केलेल्या कथा वाचनीय आणि आस्वादक, संवादक, प्रवाही विचारांच्या   आहेत.

मुखपृष्ठावरील चित्र विषयानुरूप समर्पित आहे. डॉ. सारीपुत्र तुपेरे यांचा मलपृष्ठावरील मजकूर देखील उत्तम आहे.

एकूण पंधरा कथांचा समावेश सदरच्या कथासंग्रहात केलेला आहे.

'पान्हा' या कथेतून मातृत्व शक्ती किती प्रेमळ अंत:करणाने आणि वैश्विक करूणेने भरलेली असते.‌ याचा प्रत्तय सीताबाई या पात्राच्या माध्यमातून संवाद साधत लेखक वाचकांना करून देतो.

'राही' या कथेतील विधवा, निपुत्रिक स्त्री संपूर्ण आयुष्यात एकटी राहण्याचा निर्णय का घेते ? यासाठी वाचकांना कथासंग्रह वाचावा लागेल. राहीच्या व्यक्तीमत्वाचे सुरेख वर्णन लेखकाने बोलक्या भाषेतून केले आहे.

६५_७० वर्षांची, साडेचार फूट उंची, खैराच्या लाकडासारखे काटक दणकट पाय, सडपातळ बांधा, तीक्ष्ण नजर, रूंद कपाळ, दातवान चोळून काळेकुट्ट झालेले दात, अंगात चोळी, काटापदराची दंड घातलेली नऊवारी साडी. रंग काळाकुट्ट, केस पांढरेशुभ्र सहा सात इंच लांबीचे, त्याचा लिंबा एवढा बुचुडा, कमरेला पिशवी त्या पिशवीत अंबाडीच्या काटकीत खोचून ठेवलेली सुई आणि वरून दोरा गुंडाळलेला, तसेच बिब्बा, नाचकांड, चिनी मातीची तपकिरी ची डब्बी, हा सराजम, सर्वांगाचा तपकिरी सारखा कुबट वास. असं एकटा जीव सदाशिव, दुर्मिळातील दुर्मिळ व्यक्तीमत्व म्हणजे एक वयोवृद्ध राही !

(पृ.२३)

वरील शब्द शैलीतून राही पात्राचे केलेले वर्णन वाचकांच्या मनात स्थान निर्माण करणारे ठरते. स्त्री केंद्री वर्तुळातील कथा आहे. स्त्री जीवनावर भाष्य करणारी कथा आहे. मनुवादी लादलेल्या संस्कृतीला नाकारणारी बंडखोर, निर्भिड स्त्री यात रेखाटली आहे.  जगण्याचे संदर्भ स्वतंत्रपणे अधोरेखित करणारी स्त्री नायिका या कथेतून सकारात्मक दृष्टिकोन वाचकांना देऊन जाते. स्वाभिमानाने जगणाऱ्या स्त्रीचा मृत्यू देखील तिच्या पतीच्या घरी होतो. हा स्वाभिमान आणि निर्भिडपणे व्यवस्थेसमोर जगण्याचे मनोधैर्य, शीलाधार, उच्च नैतिक अवस्था या कथेतून उत्तम संवाद साधत लेखकाने गुणविशेष प्रस्तुत केले आहेत.

'विठोबा' या कथेतून स्त्री केंद्री वर्तुळातील शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले आहे.

"मला सांगा ? तुमाला कागुद वाचता येतो का ?"

"नाय बा !"

"लिव्हता येतोय ?"

"नाय !"

"म्हणून म्हणते आपल्या लेकरांना असं आपल्यावानी अडानी नगं ठेवायचं आपण एडं नाही पण अडाणी हायत का नाही ?"

(पृ.३०)

वरील वाक्यातून संवाद माध्यमातून मुलीच्या शिक्षणाचा ध्यास घेणारे पालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून समाजात निर्माण झाले. १९५६ पासून आजपर्यंत विविध क्षेत्रात मुलींची आघाडी दिसून येते. या प्रगतीचे श्रेय बुध्द, फुले शाहू, आंबेडकर यांच्या कार्याला आहे. कारण वैचारिक वांझ मानसिकतेला चिरफाड करण्याचे सामर्थ्य ज्ञानात आहे. संदर्भ आणि नोंदी, पुराव्यात आहे. हा संशोधनाचा दृष्टिकोन रुजविण्यासाठी महापुरुषांनी सर्वस्व अर्पण केले. त्यामुळे आज स्त्रिया उच्च पदस्थ आणि स्थिरस्थावर आयुष्य स्वाभिमानाने जगत आहेत. ताराचे लग्न झाल्यावर मात्र मुलाच्या लग्नप्रसंगी काय अडचण निर्माण होते ? हे जाणून घेण्यासाठी वाचकांना कथासंग्रह वाचावा लागेल.

'बनवाबनवी' ही कथा देखील स्त्री केंद्री जगण्यावर भाष्य करणारी आहे. कोंडाबाई आणि दगडाबाई या दोन बहिणींची कथा आहे. माणूस मेल्यावर किती औपचारिकतेचा मुखवट्याआड मानवी प्रवृत्ती स्वतःला लपवते. याची जाणीव या कथेतून होते.

'सरपंच' या कथेतून घातक राजकारणात कोण बळी पडतो ? याचे उत्तर लेखकाने संवाद माध्यमातून दिले आहे.

मोलमजूरी करणारी अडाणी पारू ग्रामपंचायतचा कारभार करु शकेल का ? संविधानाने आम्हाला अनेक अधिकार दिले आहेत. पण खरचं त्या अधिकाराचा आम्हाला वापर करायला मिळतो आहे का ? प्रत्येक गावचे भाऊ, दादा, काका, नाना, पिढ्यानपिढ्या गावावर अधिसत्ता गाजवत आहेत. आम्हाला सत्ता कधी मिळेल ? राजकीय आरक्षण मिळून आमचा काय फायदा झाला ? 

(पृ.४१)

वरील वाक्यातील प्रश्न वाचकांना अंतर्मुख करणारे ठरतात.

राजकीय वर्तुळातील गढूळ, अनैतिकतेचे राजकीय डावपेच माणसाला माणूस म्हणून जगू देत नाही. हा ज्वलंत प्रश्न आज देखील समाजासमोर आहे. ईव्हीएम मशीन घोटाळा संपुर्ण देशात माहिती आहे. ज्याची सत्ता ते वाट्टेल ते घडवून आणू शकतात. हे देखील संपूर्ण देशात माहिती आहे. विचारवंतांसमोर अनेक आव्हाने देणारा वैचारिक आणीबाणीचा काळ देशात सध्या सुरू आहे. संघर्ष माणसाला जिवंत ठेवतो. या संघर्षात घडणारे आणि विवेकनिष्ठ असून विकले गेलेले लोक ही शोकांतिका या देशाची आहे. गटातटात विभागलेला समाज आज देखील बुध्द आणि आंबेडकरी तत्वाने भारावलेला असला तरी वर्तणुकीत आंबेडकरी विचार जगणारे फार कमी लोक दिसतात. हे मूल्यमापन जगण्याचे संदर्भ देत या कथेतून लेखकाने मांडले आहे. लेखनशैली साधी, सोपी, आशयसंपन्न, उल्लेखनीय, कौतुकास्पद आहे.



'ताटातूट' या कथेतून माय लेकरांची ताटातूट कोणत्या कारणाने होते ? याविषयी स्वानुभवातून, स्वयंप्रेरणेतुन मांडलेल्या संवेदना वाचकांना अंतर्मुख करतात.

स्त्री केंद्री वर्तुळातील निर्णय आणि मनोधैर्य दाखविणारी कथा मनाच्या लाजीरवाण्या अवस्थेतून पुढे जाते. याविषयी लेखकाचा पात्रांच्या माध्यमातून संवाद समर्पक ठरतो.

‘नवस’ ही कथा देखील स्त्री केंद्री जगण्यावर भाष्य करणारी आहे.

“लक्ष्ये !”

“कोण हाय ?”

“मी बानी हाय ! चल ना शाळेला जायला उशीर होतोय ?”

(पृ.५३)

वरील वाक्यातून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

“नवस हा अघोरी प्रकार आहे ? देवाचा नवस फेडण्यासाठी आपल्या निष्पाप लेकीचा बळी देणार आहात का ?....

(पृ.५८)

समाजातील अनिष्ट रूढी, परंपरेविषयी जागृत करणारा शिक्षणाचा प्रवाह आणि मानवीजीवनाकडे बघण्याचा पिढ्यानपिढ्या संकुचित विचार आणि दृष्टिकोन या कथेतून डोकावतो.

‘तहान’ या कथेतून पिण्याच्या पाण्यासाठी नायकाचा संघर्ष अंतर्मुख करणारा ठरतो.

“आमिष” या कथेतून सखाराम या शेतकरी व्यक्तीच्या जीवनात आलेले आमिष आणि त्यामुळे घडत गेलेले बदल किती जीवघेणे ठरतात याचे विदारक वर्णन केले आहे. बेरोजगारी, अंधश्रद्धा यांचा समाजावर पगडा हे विचार देखील लक्षवेधी ठरतात.

‘बकुळा’ या कथेतील स्त्री वादी जीवनावर भाष्य करणारा निर्भीड विचार वाचकांना अंतर्मुख करणारा ठरतो. सावकाराच्या समोर बकुळाचे मनोधैर्य आणि स्वतःच्या लग्नाचा स्वतः निर्णय घेण्याची क्षमता, लादलेले विचार झुगारण्याची क्षमता कौतुकास्पद ठरते.

‘स्वाभिमानी भाऊराव’ या कथेतून भाऊराव आणि ताराबाई यांनी मुलासाठी केलेले कष्ट आणि मुलगा नोकरी करणारा असला तरी कर्जाच्या ओझ्यामुळे जीव देणारा बाप हे समाजातील अनुभव लेखकाने मांडले आहेत. 

‘उचल’ या कथेतून ऊसतोडीची उचल घेऊन कर्ज मिटविणे हा जनाचा विचार नामदेवलाही पटत होता हा विषय घेऊन मांडलेली कथा सरतेशेवटी काय परिणाम सादर करते यासाठी वाचकांना कथासंग्रह वाचावा लागेल. 

‘शिकाऱ्या’ ही कथा खूप सुंदर आणि आशयघन आहे.

“आरं तो आमच्या गिरलगावचा शिकाऱ्या हाय. लय बेणं वाईट हाय ! साडेतीन फूटच उंचीचा, सडपातळ बांधा, असलेला. नाकशार, मिशाचे आकडे, गोरापान, ठेंगणा गडी पण नागासारखा चपळ, वाऱ्याच्या वेगाने धावणारा, त्याचं काळीज वाघाचं. तर पाय काळविटासारखे राकट अन् मजबूत हायती.‌ बालाघाट डोंगराच्या रांगेतील, सुतरमाळ, चांभारमाळ, बागाचा ओढा, आंब्याचा माळ, झिरीपदरा, बेलेश्वरदरी, काकरवाडी, या साऱ्या शिवाराचा तो राखणदार हाय.‌ शिवारातील पशुपक्षी त्याला पाहून चळचळ कापतात. 

(पृ.९१)

वरील वाक्यातून शिकाऱ्याची ओळख वाचकांना होते.

‘चंद्रा’ या कथेतून जिद्दी, धाडसी, आधुनिक विचारांच्या चंद्रासमोर काय आव्हाने उभे राहतात. यासाठी वाचकांना कथासंग्रह वाचावा लागेल.

‘एकदा मुंबई बघायचीच’ या कथेतून मुंबईत जगण्याठी आव्हान स्वीकार करणारे व्यक्ती आणि त्यांचा संघर्ष, आंबेडकरी विचारांसोबत जुळलेली नाळ आणि शिरपाच्या डोळ्यातील अश्रू वाचकांना अंतर्मुख करणारे ठरतात.

संपुर्ण कथासंग्रह वाचनीय, आस्वादक, संवादक आहे. 

लेखकाला पुढील लेखनासाठी शुभेच्छा देते आणि साहित्य कृतीचे स्वागत करते.

▪️ लेखक: गोकुळ गायकवाड

▪️ पृष्ठे : ११२

▪️ किंमत: २०० रुपये

समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर 




▪️ *परीक्षण* : प्रज्ञा हंसराज बागुल 

                         दिग्रस जि यवतमाळ

                   मोबा : ७५५९१७७६०५

सामाजिक अवगुणांवर संयमाने व्यक्त होणारी कविता: 'स्पर्शिका'

स्पर्शिका' हा सुदर्शन सीताराम पनतोडे,नागपूर यांचा पहिलाच  मराठी-हिंदी-उर्दू भाषेतील मिश्र कवितांचा कवितासंग्रह आहे.यामध्ये एकूण ४७ मराठी भाषेतील व १८ हिंदी व उर्दू  भाषेतील रचनांचा समावेश आहे. यात कौटुंबिक, सामाजीक आशयाच्या भावनिक स्वरुपाच्या रचना आहेत. मोजक्या व प्रभावी शब्दात,सयंमाने व्यक्त होण्याचा या कवितेचा स्थायीभाव आहे. तसेच सामाजीक विषमता,भेदभाव,मानवातील गुण-अवगुणावर परखडपणे भाष्य करते. यातील पहिली रचना 'ओनामा' ही विषमताच्छादित व्यवस्थेवर सयंतपणे प्रहार करणारी आहे. समाजात आपल्याला श्रीमंत-गरीब,उच्च-निचता हा भेदभाव दर्शविते. येथे मानवाच्या जीवनाशी सुप्तपणे कसा खेळ खेळल्या जातो ?,याचे विवेचन आहे. पण कवी या खेळातील प्रतिस्पर्धी खेळाडूला धिरगंभीरपणे आवाहन देतांना दिसतो. 

" प्रारंभ मी केला, खेळ तू खेळावा

डावपेच वापरावे,पण खेळ पूर्ण करावा


प्रारंभ मी केला,शेवटही मीच करणार

फेकलेल्या छद्मी डावपेचाला,उत्तरही मीच देणार!"

(ओनामा) 

             साम,दाम,दंड,भेद या नितीवर मुठभरांचे बहुसंख्यांकावर चाललेल्या कुरघोडीला चिंतनशीलतेतून,सजग व सकस कृतीतून शह दिला पाहिजे. हा रडीचा डाव आम्ही हाणून पाडला पाहिजे,असे कवी सुचवितात.ज्या प्रमाणे एखाद्या खेळात जाणून-बुजून प्रतिस्पर्ध्याला हरविण्यासाठी कुटनितीचा अवलंब केला जातो. तसाच डाव  मानवी जिवनातही खेळला जात आहे. त्याला कुठेतरी प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने निडरपणाने समोर आलं पाहिजे, असे कविला वाटते. दुसरी रचना 'स्थितप्रज्ञ' मानवी जीवनातील आंतर्द्वंद्वावर आधारीत आहे. चित्त,मन एकाग्र करून ,मनावर विजय मिळवून  षड्विकारावर नियंत्रण मिळविले तर मानवाला दु:खमुक्त जीवन जगता येते. सर्व प्रकारच्या वासनेवर विजय मिळविता येतो.हा आंतरीक लढा आपण ध्यान साधनेद्वारा जिंकू शकतो, असा विश्वास कवी येथे व्यक्त करतांना दिसतात. 'कृतघ्न' ही रचना शोषितांवर,वंचितांवर झालेल्या अन्यायाची साक्ष देते. काही दिवसापुर्वी आमच्या जीवन जगण्याच्या मार्गावर काही अनाहूत लोकांचा पहारा होता,जणू त्यांनी आमची कोंडीच केली होती.स्वातंत्र्यावर,न्यायावर अंकुश लावला होता. एकूणच साध्याभोळ्या विशिष्ट लोकांच्या सभोवती उत्कर्ष खुंटविणारे,दडपशाहीचे 'वर्तुळ' आखले गेले होते. त्यातून जर आम्ही यशस्वीपणे बाहेर पडण्याचा प्रयत्न केला की,लगेच आरडाओरड व्हायची. गावकुसाबाहेरच्या लोकांनी गावात येणे, हे काहींना मान्यच नव्हते . हा इतिहास आम्हाला सहजासहजी विसरता येणार नाही. विशिष्ट लोकांच्या मानेवर रूढी,परंपरांचं , जाती-धर्माचं, वर्णाचं ,अनिष्ट रीती-रिवाजाचं जोखड लादून बंदिस्त केल्या गेलं होतं. हे वास्तव विसरणे शक्य नाही. काही लोकांनी नानाविध भाककथांचा इतिहास रचला आणि त्याचा सर्वत्र उदोउदो सुरू झाला. परंतु दुसरीकडे आमचा इतिहास वास्तवावर आधारलेला असतांना त्याला विविध राजवटीत राजाश्रयात नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु आम्ही आमचा इतिहास आमच्या लेखनीने पुन्हा जागविला पाहिजे. कवी पनतोडे आपल्या मुक्तछंदातील कवितेतून हळूनच मनुवादी व्यवस्थेवर आसूड ओढतांना दिसतात. हे करीत असतांना त्यांची कविता कठोर शब्दात आगपाखड करीत नाही. ती शांतपणे व्यक्त होते. आपला विचार,आशावाद, भावभावना ती शोषित समाजापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतांना दिसते.‌ त्याला जागविण्याचा प्रयत्न करते. त्यांची कविता मानवाच्या चंचल मनाविरुद्धचा लढा सुद्धा सकसपणे लढायला शिकविते. हे करीत असतांना ते शब्द मात्र तोलून मापून वापरतात.आपले हीत कशात आहे ? हे धिरगंभीरतेने समाजमनाला समजावून सांगते. मोजक्या शब्दात त्यांची कविता अधिक आशय मांडून जाते. ही त्यांच्या कवितेची जमेची बाजू म्हणता येईल. 

    


    कवी इतरांना भेदभाव विसरून बंधुभाव जपण्याचे आवाहन करतांना दिसतात. किती दिवस हा भेदभाव जपणार आहात? असा मार्मीक प्रश्नही ते करतात. 

"एका कळपाचा मी,इतरांना करू कबंध

बंधुभाव म्हणता,मग कसा करू स्नेहबंध


कल्पना नव्हे विश्वास तयांचा,निर्माण होतील समता बंध

ये बाहेरी कळप सोडूनी,निर्माण करू सेतूबंध !"

(कवडसा)

                      समता,स्वातंत्र्य,बंधुभाव,न्याय या संवैधानिक मूल्यांची आपण जपणूक केली पाहिजे. बुद्ध,फुले,शाहू,आंबेडकरांच्या विचारांवर आधारीत वैचारीक लढा देणे गरजेचे आहे. आम्ही मैत्रीचा,बंधुभावाचा एक हात पुढे केला आहे. इतरांनीही आपला कळप सोडून, शिवाशिवेचा विचार त्यागून पुढे आले पाहिजे. तरच एकोपा निर्माण करता येईल. हा समतेचा,बंधुभावाचा, उदारमतवादाचा विचार कविची कविता समाजाला देऊ पाहते आहे. त्यामुळे विषमता नष्ट होण्यास मदत होऊ शकते. ही निर्मळ मनाची हाक आहे. 'व्याजस्तुती' या रचनेत कवी इतरांना अनेक रास्त प्रश्न विचारतांना दिसतात. तुम्ही तेच ते गढूळ विचार पुन्हा रुजवणार का?की निर्मळ मनाने शेजारधर्म पाळणार आहात ? एक पाऊल पुढे टाकून कवी समाजमनाला नवा परिवर्तनवादी विचार देण्याचा प्रयत्न आपल्या कवितेद्वारे  करतांना दिसतात. एकूणच हा विचार भारतराष्ट्र नवनिर्माणाच्या, नवा इतिहास घडविण्याच्या, जपण्याच्या  दृष्टीने कौतुकास्पद वाटतो. पनतोडे यांची कविता चिंतनशीलतेतून, डोळसपणातून,सकस सामाजीक जाणीवेतून, अनुभवातून,अभ्यासातून जन्माला आलेली आहे. 

         कविची कविता सामाजीक व चळवळीतील फुटीरतावादावर सुद्धा तितक्याच तन्मयतेने व्यक्त होतांना दिसते. चळवळीच्या आंतरीक परिस्थितीवर डोळसपणे भाष्य करतांना दिसते. चळवळीतील आंतरीक दुफळी ही समाजाच्या, चळवळीच्या -हासाला कारण ठरते आहे. हे वास्तव सहजतेने मांडून जाते. 


"कधी कळणार,सरणार हे नाट्य फाटाफुटीचे

आहे ते आहे ज्वलंत हे नाट्य हरघडीचे

सांगितली एकी आणि करतो आपण बेकी

दुरावलो तर खेळवतील पुन्हा एकीबेकी !"(मर्मभेद)


          'संधी' या कवितेतून हत्ती आणि मुंगी यांच्या गुणधर्माचे उदाहरणाद्वारे बहुसंख्य आणि अल्पसंख्य,श्रीमंत-गरीब यांच्यामधील विषमता अधोरेखीत करून हत्तीने मुंगीला कधिच कमजोर समजू नये. संधी मिळाली की, ती तिच्या हुशारीने  हत्तीलाही जायबंद करू शकते. असा मार्मीक इशाराही ते देतात.चिरेबंद वाडा आणि झोपडीतील विषमतेचं वास्तव चित्रण विद्यार्थी व शिक्षकांच्या संवादातून मार्मीकपणे उभं करतात. मानवाने जीवन जगत असतांना अहंकारात कोणत्याही नियमाचे उल्लंघन करणे जीवावर बेतू शकते. असा सल्लाही ते द्यायला विसरत नाहीत. अलिकडे वाढते विविध प्रदुषण मानवी जीवनाला लागलेली कीड आहे,आरोग्यास धोका निर्माण करणारी आहे. अनेक आजारांना निमंत्रण देणारी अनावश्यक बाब आहे. हे ओळखून त्याला वेळीच आळा घातला पाहिजे. असेही ते सुचवितात. समाजमाध्यमावर अनेक लोक चुकीच्या पद्धीने व्यक्त होत असतात. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते. त्यापेक्षा आपसात वैचारीक समज ,संवाद वाढविणे गरजेचे असल्याचेही कवी सुचवितात. यासाठी आपण महामानवांचे विचार,शब्द अमलात आणले पाहिजे. ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतील. असा ठाम विश्वास कविंना आहे . 'कधीतरी' या कवितेतून कवी हक्क,अधिकाराबरोबरच कर्तव्याचीही जाणीव लोकांनी ठेवली पाहिजे. असे सुचीत करतात.

         हिंदी भाषेतील 'अभिलाषा और मै.' या कवितेतून त्यांच्या सम्यक इच्छा,आशा, आकांक्षा, मनिषा व्यक्त करतात. त्या म्हणजे - सद्गुण बाळगणे,सद्भाव जागवणे,सर्व जीवांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापीत करणे,स्वयंप्रकाशित होणे,पंचशीलेचे आचरण करणे इत्यादी. 'कालचक्र' या कवितेत माणसं कशी बदलत चालली आहेत? त्याचा मानवी जीवनावर काय विपरीत परिणाम होऊ शकतो? तेव्हा सर्वांनी सावध असणे गरजेचे आहे. त्यासाठी सूचक उदाहरण ते देऊन म्हणतात....

"हवाओं का रूख अब बदलने लगा है

इन्सान-इन्सान से अब घबराने लगा है!

दूर न रहो, अब इस ज्वाला से

चिंगारी से शोला, अब उगलने लगा है!"


            मन हे नित्य इकडून तिकडे सैरभैर धावत असते.त्यामुळे अनेक विकारी विचार मनात येतात. त्याचेवर नियंत्रण मिळविणे गरजेचे असल्याचे मत ते 'झरोखा' या कवितेतून व्यक्त करतात. बहिणाबाई चौधरी म्हणतात...'मन वढाय वढाय,जसं उभ्या पिकातलं ढोर' . मन एका मोकळ्या सुटलेल्या जनावराप्रमाणे आहे.ते सर्वत्र सैराटपणे हुंदळत असते .त्याचप्रमाणे मनात असंख्य इच्छा उत्पन्न होतात,वासना निर्माण होतात. यापासून माणूस दु:खी होत जातो. बुद्धाने सुचीत केल्याप्रमाणे आपणाला मनावर विजय मिळविता आला पाहिजे. तरच आपण कुशल कर्म करू शकू. कुशल कर्माने जीवन सुखमय होवू शकते. असा ठाम विश्वास कविला वाटतो. 

         एकूणच कवी सुदर्शन पनतोडे यांची कविता विभिन्न अंगाने वाचकांसाठी मार्गदर्शक ठरते. या कवितेतून जीवनानुभव व्यक्त होतो. सजग सामाजीक जाणीवा व्यक्त होतात. विविध प्रकारच्या विषमतेवर,अनुचित बाबींवर, भेदा-भेदावर, राजकारणावर ,आपसातील फुटीरतेवर , मानवी अवगुणावर प्रखर भाष्य करते.तसेच जीवन जगण्याच्या चुकीच्या पद्धतीवरही बोट ठेवते. वैचारीक आंधळेपणावर, अधुपणावर सकस शब्दातून यशस्वीपणे प्रहार करते. कुठे ती कान धरते तर कुठे योग्य दिशा दाखविते. शब्द योजन शैली,कवितेची मांडणी कौतुकास्पद आहे. कवितेचे सौंदर्य वाढविणारी आहे.तिच्यात कुठेही फारसा विद्रोह जाणवत नाही.परंतु आपलं म्हणनं ती शांतपणे मांडून जाते. समाजाला जागृत करण्याचं काम त्यांची कविता करू इच्छिते. याबद्दल कविचे अभिनंदनच केले पाहिजे.कवी उच्चशिक्षीत आहेत. त्यांनी भारत सरकारच्या सेवेत असतांना विविध प्रदेशात आकाशवानी, दुरदर्शनवर ,प्रकाशन विभागात काम केले आहे. त्यामुळे त्यांची भाषा सौम्य जाणवते. 

'स्पर्शिका' या कवितासंग्रहाला प्रख्यात कवी,गझलकार  हृदय चक्रधर सरांची समर्पक व न्यायसंगत अशी प्रस्तावना लाभलेली आहे. हा कवितासंग्रह अनेक महत्वाच्या मुद्यांना स्पर्श करतांना दिसतो. सदर कवितासंग्रह शब्दशिल्प प्रकाशन,नागपूर यांनी छापून प्रकाशीत केलेला आहे. प्रा.नरेंद्र ल.माटे यांनी साकारलेले मुखपृष्ठ सुबक व आशयसंपन्न असेच आहे. कवितासंग्रहाचा आंतर बाह्य दर्जा उत्तम आहे. प्रत्येक रचनेबरोबर रेखाटलेले रेखाटन साजेसे,आशयसंपन्न, सुरेख व कवितासंग्रहाचे आकर्षण व सौंदर्य वाढविणारे आहे.एकूणच 'स्पर्शिका' ही साहित्यकृती दर्जेदार आहे. असेच म्हणावे लागेल.

पुढील लेखनासाठी पनतोडे यांना हार्दिक शुभेच्छा .


अरुण हरिभाऊजी विघ्ने

रोहणा,आर्वी,जि.वर्धा

____

✍️ कवितासंग्रहाचे नाव: 'स्पर्शिका'

✍️कविचे नाव :सुदर्शन सीताराम पनतोडे

✍️प्रकाशक :शब्दशिल्प प्रकाशन,नागपूर

✍️प्रस्तावना : प्रा.हृदय चक्रधर,नागपूर

✍️पृष्ठसंख्या : १२६

✍️ मूल्य : १८५/- रुपये

रविवार, १८ जानेवारी, २०२६

नॅशनल सोशल अँड एज्युकेशन परिषद सन्मान सोहळयात मनिषा कांबळे यांचा सत्कार

 


शब्दशिल्प/यवतमाळ_विसावा सोशल फाउंडेशन नागपूर  व इंटरनॅशनल रिसर्च पब्लिकेशन ऑफ बिझनेस मॅनेजमेंट प्रस्तुत नॅशनल सोशल अँड एज्युकेशन परिषद नागपूर पुरस्कार सन्मान सोहळा नुकताच शनि. दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी दुपारी दोन वाजता विदर्भ हिंदी साहित्य मधुरम सभागृह श्री  फत्तेचंद मोर  हिंदी भवन राशी राणी चौक वर्धा रोड नागपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

विविध क्षेत्रातील उत्तुंग नवीन क्षितिज निर्माण करून आपल्या क्षेत्रात अलौकिक कार्य करणाऱ्या विभूतींचा सन्मान  सोहळा  आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला चित्रपट मालिका टीव्ही कलाकार सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेतील शास्त्री भूमिकेत असलेले श्री सुनील गोडबोले. श्री रामरतनजी हाडगे प्रसिद्ध उद्योजक नागपूर, मा. उज्वला रोडगे अभिनेत्री नागपूर ,मा. रवींद्र दिघोरे. समाजसेवक नागपूर ,मा. मनिषा कांबळे साहित्यिका यवतमाळ. प्राध्यापक डॉक्टर संजय हर्षे समाजसेवक ब्रह्मपुरी, स्वाती तरडे अध्यक्ष विशाखा फाउंडेशन नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय पुरस्कारांचे आयोजन समृद्धी प्रकाशनची संचालक डॉ. बी .एन.खरात.सिंधुदुर्ग. यांनी केले होते . या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या साहित्यिका मनिषा कांबळे यवतमाळ यांना इंडियन प्राईम स्टार पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

मनिषा कांबळे यांनी आपल्या वयाच्या चौदाव्या वर्षापासून आपल्या लिखाणाला सुरुवात केलेली आहे. कला, साहित्य, नाट्य ,सांस्कृतिक ,सामाजिक इत्यादी क्षेत्रांमध्ये त्यांचे भरीव योगदान आहे. ' सूर्याचा सूर्य' हा काव्यसंग्रह प्रकाशित असून आगामी प्रकाशन ' जगत आहोत' हे ( दीर्घ काव्य) आहे. गेल्या 22 वर्षांमध्ये त्या साहित्यिक या क्षेत्रामध्ये कार्यरत असून अनेक वर्तमानपत्र, आणि साहित्य ग्रुप मध्ये त्यांचे नियमित लिखाण सुरू असते. आजवर त्यांना अनेक जिल्हास्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. अल्पवयातील असलेली त्यांच्या या कार्याची धग अतिशय वाखाण्याजोगी असून येणाऱ्या नव्या तरुण पिढीला प्रेरणा आणि मार्ग दाखवणारी आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजक.. डॉक्टर बी. एन. खरात सर (सिंधुदुर्ग) यांनी इंडियन प्राईम स्टार पुरस्काराने, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मेडल, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन. अभिनेते सुनील गोडबोले यांच्या मुख्य उपस्थितीत गौरविण्यात आले. 

आपल्या  यशाचे श्रेय त्या आपल्या परिवाराला देतात. या पुरस्काराप्रसंगी अनेक मान्यवरांनी मनिषा कांबळे यांचे कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे.

रा.से.यो. शिबीराचे थाटात ऊद्घाटन

 


शब्दशिल्प/कुही _ येथील राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीराचे ग्राम अंबाडी येथे ऊद् घाटन संपन्न झाले. जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेखीका डाॅ.संध्या पवार नागपूर या ऊद् घाटक होत्या. अध्यक्षस्थानी ग्रा.वि.शि.मं.चे सचिव श्री जी.एन.धवड होते तर प्रमुख उपस्थितीत ग्रा. वि.शि.मं.चे अध्यक्ष श्री एच जी नागमोते, कोषाध्यक्ष श्री डि डि जेठे, सरपंच योगेश गोरले, ऊपसरपंच पुरूषोत्तम पाचबुधे, पो.पा.सरलाताई हजारे, ग्रा.पं.सदस्य ईश्वरजी निनावे , जेष्ठ प्राध्यापक डाॅ. कटमुसरे मंचावर ऊपस्थीत होते.

        प्रारंभी रा.से.यो. ध्वजाचे मान्यवर पाहूण्यांचे हस्ते ध्वजारोहन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. 

      राष्ट्रपिता म.गांधी, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

        प्रास्ताविक व पाहूण्यांचा परीचय कार्यक्रम अधिकारी डाॅ.सौ.मिनाक्षी  झाडे यांनी करून दिला.

       माणूसकी, आपुलकी, जिव्हाळा व जाणिव ही ग्रामीण लोकसंस्कृतीची ओळख असून रा.से.यो. ही माणूस निर्माण करणारी प्रयोगशाळा आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाला आयाम देणारे विविध संस्कार अशा शिबीरातून घडतात. 

 व्यसनमुक्त जीवनशैलीचे अनुकरण जीवनासोबत जोपासा  असे मोलाचे मार्गदर्शन ऊद् घाटन प्रसंगी डाॅ.संध्या पवार यांनी केले.

     सरपंच योगेश गोरले, पो.पा.सौ.सरलाताई हजारे यांनी समयोचित मार्गदर्शन केले. 

          या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, कार्यालयीन कर्मचारी, ग्रामस्थ यांची मोठ्या प्रमाणात ऊपस्थीती होती.

       ऊद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन कु.श्रुती तलवारे हीने तर आभारप्रदर्शन कु.साक्षी लांजेवार या विद्यार्थीनीने केले.

           राष्ट्र गीताने ऊद्घाटन सोहळ्याची सांगता झाली.

सातत्य आणि पुनरावृत्ती महत्त्वाची : मा. प्रदीपजी चामले

शब्दशिल्प/गडचांदूर : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला तयारी करताना जाहिरात आली म्हणून अर्ज केला आणि अर्ज केला म्हणून परीक्षा देत आहोत. अशाने यशस्वी होता येत नाही तर दैनंदिन वेळापत्रक बनवणे व त्याचे काटेकोरपणे पालन करणे महत्त्वाचे आहे. तद्वतच अभ्यासक्रम नीट समजून मागील प्रश्नपत्रिका सोडवा, दररोज चालू घडामोडी अवश्य वाचा,मॉक टेस्ट द्या व  विश्लेषण करा. अभ्यासात सातत्य आणि पुनरावृत्ती महत्त्वाचीअसल्याचे प्रतिपादन टाटा समूह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे कार्यरत मा. प्रदीप चामले यांनी केले.

 ते युगचेतना ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचालित प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर येथे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंती प्रित्यर्थ आयोजित युवाचेतना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. पुढे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना मा. प्रदीपजी चामले यांनी प्रयत्न, सातत्य व आशा” ही प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय या तत्त्वांच्या आधारे विद्यार्थ्यांमध्ये परिश्रमशीलता व शिस्त विकसित करत आहे.सातत्यपूर्ण अध्ययन प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्याची प्रक्रिया मात्र गतिमान झाली पाहिजे.

प्रतिकूल परिस्थितीतही आशावादी दृष्टिकोन राखण्याचे संस्कार या माध्यमातून दिले जातात ही गोष्ट महत्त्वाची आहे. गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दृढ केला जातो. या मूल्यांच्या बळावर हे महाविद्यालय प्रशासकीय सेवेसाठी सक्षम व जबाबदार अधिकारी घडविण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत ते स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी मात्र प्रचंड परिश्रम घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कष्टाची तयारी ठेवा असा उपदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना केला. यावेळी मा.अरविंद मुसणे महाविद्यालयाचे प्राचार्य,सर्व प्राध्यापक तथा शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. दुर्गावती खुबाळकर यांनी तर उपस्थिताचे आभार यश ताकसांडे यांनी मानले.

डॉ मंजु गुप्ता की 16 वीं कृति सृजन के स्वर ( सुविचार -संग्रह ) का ऑनलाइन लोकार्पण

 


शब्दशिल्प/ नवी मुंबई_वरिष्ठ नागरिक मंच ,छत्तीसगढ़ की काव्य गोष्ठी में साहित्यकार , यशस्विनी डॉ मंजु गुप्ता की 16 वीं कृति सृजन के स्वर ( सुविचार -संग्रह ) का ऑनलाइन लोकार्पण किया गया ।

राष्ट्रीय वरिष्ठ नागरिक मंच की छत्तीसगढ़ इकाई का नियमित काव्य गोष्ठी का आदरणीय नरेश नाज़ संस्थापक , के मार्ग दर्शन में तथा राजेन्द्र राज निगम  जी , राष्ट्रीय उपाध्यक्ष की सलाह से श्रीमती अनीता झा अध्यक्ष छत्तीसगढ़ इकाई , के द्वारा आभासी (on line) आयोजन  को किया  गया . काव्य गोष्ठी के मुख्य अतिथि वरिष्ठ नागरिक मंच की तमिलनाडु इकाई के अध्यक्ष श्री एस महालिंगम जी की अध्यक्षता में ! कार्यक्रम का शुभारंभ डा. मंजू गुप्ता जी मुंबई इकाई से स्वरचित सरस्वती वंदना से आरंभ किया साथ ही छत्तीसगढ़ मंच गौरवान्वित जब डा मंजु की 16 वीं  पुस्तक का “सृजन के स्वर “ सुविचार -  संग्रह प्रकाशित हुआ ।जिसका लोकार्पण छत्तीसगढ़ इकाई मंच से किया गया ।उन्होंने इसी कृति से  वंदेमातरम्  विषय पर सुविचार सुना कर देश भक्ति , देश प्रेम का ओजस्वी भाव जगाया। जिससे वन्देमातरम् का नारा मंच पर गूँज गया।



नए वर्ष पर सार्थक रचनायें पढ़ी गई सभी रचनाकारों की रचनाएँ वीडियो द्वारा प्रस्तुत है ! सुनिएगा अपने विचार दीजिएगा 

इनके साथ ही निम्नानुसार प्रमुख अतिथि उपस्थित रहे :-   - श्री सुनील दत्त मिश्रा ,श्रीमती मृणालिका ओझा,श्रीमती सिंधु झा ,सुश्री मंजू गुप्ता ,श्रीमती अपराजिता शर्मा ,श्री पल्लवी झा ,श्री शारदेन्दु झा आदि 

- साहित्य मनीषियों ने काव्य गोष्ठी में उपस्थित रहकर कार्यक्रम को गौरवान्वित किया ।डॉ मंजु गुप्ता ने सुविचार के 180 विविध विषयों के बारे में संक्षिप्त जानकारी दी। श्रीमती अनीता झा ने सभी साहित्यकारों का एवं मुख्य अतिथि श्री एस मलालिंगम जी का स्वागत किया , मुख्य अतिथि महोदय ने अपने विचार व्यक्त किये !कि उन्हें वरिष्ठ नागरिक  मंच के साहित्यकारों के साथ मंच साझा करना बहुत अच्छा लगता है |उन्होंने आगे बताया कि  देश के दक्षिण में स्थित राज्यों मे भले ही सरकार के स्तर पर प्रयास अपर्याप्त है किंतु निजी तौर पर हिंदी सीखने एवं सिखाने के प्रयास जारी है तथा जारी रहेंगे |

रा. व.ना.मंच छत्तीसगढ़ की अध्यक्ष श्रीमती अनीता झा जी ने अपनी रचना की सरस प्रस्तुति दिये ।कार्यक्रम का समापन शारदेंदु झा के द्वारा आभार व्यक्त करने के उपरांत किया गया. 

कृष्णा कुंभारे यांच्या ३ कविता



*मोहरली आमराई*

शिशिरात पानगळ
        करपली जाई जुई
ऋतू वसंत रानात
        मोहरली आमराई! 
नवी पालवी फांदीत
        कंठ कोकीळेस फुटे
नवी नवेली ती नार
        वाण संक्रातीचं लुटे! 
स्वर  पंचम  कानात
       उष्ण वाहतील झळा
रक्तवर्णी  पळसांची
       किती सुंदर ती कळा! 
तीळ तीळ ते जाळते
       काळ्या ढेकलात ऊनं
फांदीवर नांदलेली
       लोळे मातीतून पानं! 
तेजाळल्या उन्हातळी
       वारा घेईल गिरकी
उंच आकाशात धूळ
       पळे थोडीशी तिरकी
ओठ  चोखतील  उद्या
       पाडा आली गोड कोय
सांजवाती  निलनभी
       उडे बगळ्यांची ओळ! 
जर्द पिवळ्या फुलांचा
       शोभे  खुलून  गजरा
आंबा मोहरून येता
       रोखे तारुण्य नजरा! 

कवी- कृष्णा कुंभारे 
वरुड ,जि .अमरावती.
____________
*वाण संक्रांतीचे*

सौभाग्याचं वाण
         संक्रांतीच्या दारी
नेसे अंगी शालू
        सुवासिनी भारी! 

सौभाग्याचं नाव
       घेता खूप लाजे
श्रीश्री झाले माझ्या
       हृदयाचे राजे! 

तोडूनिया बंध
       गाठले सासर
वाण पदराला
       माहेराची सर! 

गुलाबी गालात
       चांदण्यांची छबी
लक्ष्मी उंबऱ्यात
       आनंदात उभी! 

नको वाळवंट
        सासरच्या दारी
मोगऱ्याच्या गंध
        गजरा सवारी! 

तिळ तिळ चढे
       सूर्य नारायण
सुख सोहळ्यात
       घडो पारायण! 

भाळावरी सदा
       राहो शुभ टिळा
मंगल सुत्रात
       शोभिवंत गळा! 

आनंदात यावा
       संक्रांतीचा सणं
मैत्रिणींना मिळो
       पदरात वाणं! 

कवी- कृष्णा कुंभारे 
वरुड, जि .अमरावती.
_______
*आठवणी पाऊस*

जरी अधीर अधर
प्रिये नजर बोलली 
क्षण एक कटाक्षात
दर्दी हृदये सोलली!

तुझी श्रीमंत जवानी 
हृदयांचं करे पाणी 
तुझा पैंजणी निनाद 
देतो मज आठवणी!

बट कुरळ्या केसांची 
गाली झुलती नागिण 
तुझा हसरा चेहरा 
भासे शरद चांदणं!

रुंजी घालती भ्रमर 
अंगी तारुण्य संभार
क्षण परागी सेवाया 
भृंगे होतात सवार!

मार्गी मयुरी चालता
किती पडले मोहात 
कोणी खुडले सुमन
केला स्वप्नांचा घात !

जणू स्वर्गाची अप्सरा 
आली उतरुन खाली 
रुप पाहता भाळून 
वाट रोखतो मवाली!

नको उत्तान शृंगार 
थोडी मर्यादा असावी 
साडी चोळी पदरात 
नारी सोज्वळ दिसावी!

  *कृष्णा कुंभारे* 
वरुड, जि. अमरावती*

सौ. मनीषा सोन्नेकर/सोनकांबळे यांच्या ३ कविता

 

महाराणा प्रताप

महाराणा प्रताप होते 

मेवाडचे राजा महान 

मेवाडची होती खरी शान 


ओळख आज जगी

महाराणा प्रताप यांची 

गाजवुनी पराक्रम 

लढले मुघल बादशहा 

अकबराच्या जंगी 


आपले राज्य आणि 

लोकांच्या संरक्षणासाठी 

मुघल शक्तीला दिली झुंज 

प्रजेच्या हितासाठी 


घोडा चेतक प्रतीक पराक्रमाचे 

महाराणा प्रताप हे नाव 

एका शूरवीराचे 


नांदविली राज्यात 

सामंजस्य नि एकी 

जपली आपल्या राज्याची 

परंपरा नि संस्कृती 


महाराणा प्रताप यांच्या

कर्तृत्वाची ठेवण

मनी साठवावी देशवासियांनी

स्मरावी वीर राजाची कहाणी


सौ. मनीषा सोन्नेकर/सोनकांबळे 

देगलूर. 9960028899

____

२

जंगलतोड नको

नका करू जंगलतोड 

नको झाडांची तोडमोड

जंगलामुळेच वाढे 

शान वसुंधरेची

चला काळजी घेऊ

घनदाट जंगलाची 


हिरवेशार जंगल करी 

हवा नियंत्रित नि शुद्धीकरण 

जर केली जंगलतोड

तर प्राण्यांचे होईल हो मरण


तऱ्हेतऱ्हेची झाडे,फुले,

वनस्पती,प्राणी, पक्ष्यांचे

रम्य अधिवास ते जंगल 


पर्यावरणाचा मुख्य घटक

जलचक्राचे योग्य नियमन

मातीची धूप हवामान शुद्धता

सर्व अवलंबून जंगलावर


नैसर्गिक स्रोताचा मूळ खजिना

ऑक्सिजन, औषधी वनस्पती

प्रकारचे लाकूड मानवाला पुरवितात

जंगलेच मानवाचे खरे मित्र ठरतात

सौ. मनिषा सोन्नेकर / सोनकांबळे 

9960028899

देगलूर.

_____

३

मनोगत वसुंधरेचे 

मी वसुंधरा माझा आदर करा 

माझे संरक्षण करा 

माझे संवर्धन करा

माझ्यावर भरभरून प्रेम करा 


जर तोडाल वेली, वृक्ष

दिसेल पृथ्वी राक्षस

हिरवा शालू ठेवा पांघरून 

पृथ्वीवर

नाही दिसणार ती भकास


मला जर सुरक्षित ठेवाल

तर मी देईन शुद्ध हवा,

भरपूर ऑक्सिजन 

मग सुखी राहील मानवी जीवन


किती तो गाड्यांचा धूर

पर्यावरणाचा उडला हो नूर

प्रदूषण नका निर्माण करू

नका वसुंधरेला नष्ट करू


घ्या माझी काळजी 

तरच वाढतील झाडे,

वेली, फळे, फुले 

घरे बांधण्यासाठी 

मोकळे नका करू जंगल


सौ. मनीषा सोन्नेकर/ सोनकांबळे

9960028899

देगलूर.

सुनील बावणे - निल यांना विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार प्रदान

 


शब्दशिल्प/चंद्रपुर_कवी, गझलकार सुनील बावणे - निल यांच्या स्याडा कोटसा भरते या झाडीबोलीत काव्यसंग्रहाला नवोदित साहित्य लेखन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. दिनांक १४ जानेवारी २०२६ ला नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाच्या आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मान. सुनील कुमार लवटे, नागपूर विद्यापीठ कुलगुरू मान. मनाली क्षीरसागर , मान. मिलिंद जोशी सर पुणे, नि. न्या. विकास शिरपूरकर सर, विश्वस्त मान. रवींद्र ठाकरे, वि.सा. संघाचे अध्यक्ष प्रदीपजी दाते,  उपाध्यक्ष मान. राजेंद्र डोळके, सरचिटणीस मान. विलास मानेकर आणि उपस्थित सर्व साहित्यिक मान्यवर यांच्या उपस्थितीत सुनील बावणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

विदर्भ साहित्य संघाच्या नामांकीत पुरस्कारापैकी हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या झाडीबोलीतील कविता व गझल लिखनाला आणखीनच नवचैतन्य निर्माण होईल असे मत कवी लेखक गझलकार सुनील बावणे यांनी व्यक्त केले आहे.

 यापूर्वीही त्यांना अनेक साहित्य मंचाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.  सुनील बावणे हे एका गाव खेडे वायगांव ( तु.) इथून आपली साहित्यिक आवड जोपासत, बल्लारपूर पेपर मिल येथे कामगार असून कामगार क्षेत्रात काम करत असताना सुद्धा साहित्याची आवड जोपासत प्रमाण मराठी भाषेसोबतच झाडीबोलीतील लिखाण करणारे लेखक म्हणून त्यांची साहित्य क्षेत्रात ओळख आहे. त्यांच्या या नावीन्यपूर्ण लिखाणासाठी आजपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नुकताच त्यांचे जन्म गावी जय हिंद फाउंडेशन आणि जगन्नाथ बाबा महाविद्यालय तसेच गावकऱ्यांच्या आयोजित एका स्नेह मिलन कार्यक्रमांमध्ये त्यांच्या या साहित्य कृतीचा सन्मान म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या साहित्य सेवेसाठी कामगार क्षेत्रातून, रसिक, मित्र वर्गातून आप्त परिवाराकडून त्यांच्या समोरील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले आहे.

रत्नाकर पाटील अष्टपैलू राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

 


=======================                                  शब्दशिल्प/धाराशिव_ आज दिनांक १८ जानेवारी २०२६ वार रविवार रोजी विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,शिंगोली ता. जि. धाराशिव शाळेतील पर्यवेक्षक श्री. रत्नाकर बाबुराव पाटील यांना अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई व मासिक वृत्तपत्र न्यायप्रभात यांच्या तर्फे अष्टपैलू राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार देण्यात आला.

 सदरील मानाचा राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर साहेब {विश्वगुरू,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जेष्ठ साहित्यिक,विचारवंत, कलावंत}, अष्टपैलू संस्कृती कला अकादमीचे अध्यक्ष श्री. ह. भ. प. शिवाजी खैरे सर, {गायक,वादक,संपादक,कवी, लेखक}, प्रमुख अतिथी मा.प्रताप पाटील, {आय.सी.डी.एस.प्रकल्प अधिकारी, नाशिक}, ह.भ.प. सौ. अनुसया खैरे {सहसंपादक व कोषाध्यक्ष,अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई} यांच्या हस्ते देशस्थ देवज्ञ,सुवर्णकार समाज धर्मशाळा श्रीक्षेत्र आळंदी जि.पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आला.

सदरील राज्यस्तरीय साहित्यरत्न मानाचा पुरस्कार साहित्यिक,शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात आला. हा मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे स्नेह ग्रामविकास शिक्षण मंडळ,देवताळा ता.औसा जि. लातूर अध्यक्ष मा.बाबुराव चव्हाण, सचिव तथा माध्यमिक मुख्याध्यापक आण्णासाहेब चव्हाण, संस्थेचे सर्व पदाकारी, आदर्श प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सतिश कुंभार व समस्त कर्मचारी, विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक व विद्यार्थ्यांनी रत्नाकर पाटील सरांचे अभिनंदन केले आहे.

शनिवार, १७ जानेवारी, २०२६

डॉ. मंजु गुप्त श्रीमती सुमनलता सिंघल स्मृति सम्मान - 2025 तथा बाल साहित्य विभूषण से सम्मानित

 


शब्दशिल्प/ नवी मुंबई_नवी मुंबई की वरिष्ठ साहित्यकार , शिक्षिका, कवयित्री, योगप्रशिक्षिका डॉ. मंजु गुप्त  को  श्रीनाथद्वारा में उनकी 16  कृतियों  हेतु   श्रीमती सुमनलता सिंघल   स्मृति सम्मान - 2025 तथा बाल साहित्य विभूषण से पुरस्कृत।

हिंदी सेवी साहित्यिक संस्था साहित्य मंडल, नाथद्वारा, राजस्थान द्वारा डॉ.मंजु गुप्त को श्रीमती सुमनलता सिंघल  स्मृति सम्मान 2025 तथा 2100 रूपये की राशि प्रदान करके राष्ट्रीय बाल साहित्य विभूषण सम्मान  , कंठाहार , शॉल , श्रीफल , मेवाड़ी पगड़ी , उत्तरी श्री ,नगद राशि और  प्रभु श्रीनाथद्वारा जी की छवि से विभूषित किया गया। इससे पूर्व भी विविध साहित्यिक , सामाजिक  और सरकारी संस्थानों द्वारा पुरस्कार , सम्मान मिले। 

श्री अंजीव रावत अंजुम ने संचालन करके डॉ मंजु गुप्त का गौरवशाली परिचय पढा। 

आ. श्री श्याम प्रकाश देवपुरा जी ने डॉ मंजु गुप्ता के गुप्ता का शुद्ध हिंदी गुप्त बताया । तभी उन्होंने उनके कथन  गुप्त को स्वीकार किया। अंग्रेजी भाषा के कारण गुप्ता बन गया । वह शुद्ध हिंदी भाषा को लिखने - पढ़ने के पक्षधर है।

आ. डॉ मंजु गुप्त ने साहित्यमण्डल के  आयोजक आ. श्यामपुरा जी के संग में उन की   टीम की  गतिशीलता , कर्मठता को नमन करके अभिनन्दन किया।

श्री भगवती प्रसाद जी देवपुरा स्मृति एवं राष्ट्रीय बाल साहित्य समारोह 5,6,7 जनवरी 2026 साहित्य मंडल श्रीनाथ द्वारा हिंदी भाषा के पुरोधा श्री भगवती प्रसाद जी देवपुरा जिन्होंने मातृभाषा हिंदी को राष्ट्रभाषा का सम्मान दिलाने के लिए अपना पूरा जीवन माँ भारती के सेवा में समर्पित कर दिया, जिन्होंने साहित्य कला और संस्कृतिकी त्रिवेणी  को पुनः जीवित  करने तन -मन  -धन से साहित्यिक संस्था  साहित्य मंडल , श्रीनाथद्वारा राजस्थान के लिए अपना संपूर्ण जीवन समर्पित कर दिया ।ऐसे हिंदी पुरोधा कि  द्वादश  पुण्य तिथि  पर तीन दिवसीय साहित्य एवं सांस्कृतिक समारोह आयोजित  किया गया । जिसमें पूरे भारतवर्ष से 11 राज्य  के 125 साहित्यकारों ने सहभागिता की।

डॉ मंजु गुप्त ने  साहित्य मंडल और शुभचिंतको  का आभार व्यक्त करते हुए कहा कि  हर सम्मान मानव की ऊर्जा को बढ़ाता है और भव्य पुरस्कार मिलने से समाज के प्रति और जिम्मेदारी बढ़ गई है। समाज और नई पीढ़ी के मूल्य हित  में बेहतर से बेहतर कृतियाँ गुनेगी।  डॉ मंजु गुप्त को सम्मानित किये जाने पर स्थानीय साहित्यकारों  , मित्रों , रिश्तेदारों और उनके गुरुओं और सोशल मीडिया के मंचों ने अपार हर्ष जताके बधाई दी।

समरसता का महापर्व मकर संक्रांति पर लें संकल्प

 


आलेख

मकरसंक्रांति का सामाजिक , धार्मिक , खगोलीय, ऐतिहासिक , आध्यात्मिक, पौराणिक  और भौगोलिक महत्व है ।  कहावत भी संक्रांति आए ठंड भगाए। ऋतु परिवर्तन संकेत मिलता है। सूरज देव का महापर्व है। जो हर प्राणी को सकारात्मक ऊर्जा , मन के नकारात्मक अँधेरे को दूर करके गति , स्वास्थ्य , ज्ञान का प्रकाश देता है।


युग - युग से पौष - माघ की  भारत में  सर्द शीत  में

चारों दिशाओं में जन - मन इस पर्व को  मनाते हैं।

निसर्ग का उत्सव मकर संक्रांति है।सूरज मकर राशि में जाके उत्तर दिशा में सरकता  जाता है।

यही काल  उत्तरायण कहलाता  है।मकर से 6 माह तक सूर्य उत्तरायण में रहते है। मैंने गंगा सागर की यात्रा की । बंगाल की खाड़ी में आकर माँ गंगा का संगम होता है  । इसलिए यहाँ का खारा जल मैया गंगा की वजह से हल्का खारा है क्योंकि मुझे इस जल को पीकर स्वाद का अनुभव करके यथार्थ को जाना । हर सागर , महासागर का जल खारा होता है। कनाडा के पैसिफिक महासागर का स्वच्छ जल पीया तो उसका पानी नमक की तरह था।इसी पर्व पर इसके पावन तट पर 10 लाख से अधिक श्रद्धालु पितरों का तर्पण यहाँ पर करते  हैं । नर विष्णु सहस्रनाम का पाठ करके मोक्ष को प्राप्त कर सकता है।मांगलिक, शुभ कार्य की शुरुवात कर सकते हैं ।

तभी दूरदर्शी भीष्म ने  मोक्ष  हेतु इसी दिन 

प्रकाशमय मृत्यु का  वरण किया।

दक्षिण भारत में इसे पोंगल , पश्चिम में उत्तरायण ,

पूर्व में माघविदू , पंजाब में लोहड़ी  के रूप में मनाते हैं।

खेती के इस पर्व  पर लहलहाती फसलों को  किसान   खलिहानों में परिश्रम की पकी  फसलों को लाता है। इसी खुशी में पंजाब , हरियाणा , हिमाचल प्रदेश में संक्रांति की पूर्व संध्या पर लोहड़ी पर्व को मनाते हैं ।

घोर चिल्ला जाड़े में ठिठुरते , उत्साहित  हजारों नर - नारी , युवा , बाल - बूढ़े  संत , साधु , महात्मा ,पावन हिम नदियों , गंगा , गंगा सागर , यमुना , ,गोमती, सरयू , संगम और नर्मदा आदि पावन तीर्थ  नदियों  में लोग हाथों में हाथ लें सगे - संबंधियों की नाम की आस्था की  डुबकियाँ लगा के स्नान करते है।

मन - तन का मैल धो के पापों का विसर्जन करते  हैं । श्रद्धालु घाटों पे सजे घाटियों  , पंडाओं   के मंडपों पर जाके चंदन का तिलक लगवा के  गुड की भेली , तिल के लड्डूओं, पापड़ , खिचड़ी , अर्थ , चौदह वस्तुओं का दान कर पुण्यार्जन कमाते  हैं । कम्बल , धन , रेवड़ी ,गुड़  चावल , दाल घी और तिल आदि का दान करके महा पुण्यफल पाने की लालसा होती   है और बड़ों का आशीर्वाद लेना चाहिए ।  सूरज की तरह सब गुण को अपने भीतर लाएँ । सूर्य का उदय   - अस्त पूरे भारत में  अलग समय में होता है।शुभ मुहूर्त  समय में पूजा करनी चाहिए। 


 यह पर्व धार्मिक प्रवृति का मानव में उदय हो के सन्मार्ग पर चलने की प्रेरणा देता है। 

विभिन्न ज़ाति .  संप्रदायों , धर्म , लिंग , वर्ण , नस्ल के लोगों के लिए आस्था की ये  परोपकारी नदियाँ 

ऊँच - नीच , अमीर - गरीब . लैंगिकता का भेद- भाव न कर के  विश्व की ऐक्य मानव जाति  की समरसता , सद्भाव , सामाजिकता को दर्शाती हैं।

इस दिन से  तिल - तिल दिन  बढ़के रातें छोटी होने लगती है। 

  साकारात्मक ऊर्जा , स्वास्थ्य से भरे तिल- गुड लड्डू खिचड़ी पोष्टिक , स्वास्थवर्धक है। लड्डू में   नेह की मिठास भरी होती है। जो दरकते रिश्तों में आत्मीयता प्रेम को  ला के संबंधों को जोड़ता है। हमारे जमाने में माँ तिल लड्डुओं में सोने - चाँदी का सिक्का रख करते गुप्त दान भी करती थी । हल्दी - कुंकुम की रस्म अदा Back सुहागिनें अखंड सुहाग की सलामती की दुआ करती हैं।

 मैदानों , छतों पर रंग - बिरंगी आशाएं लिए  उल्लासित पतंग को उड़ानें मन को आनंदित कर देती है।सूर्य स्नान से विटामिन ड़ी भी मिल जाता है  ।

सूत्रधार के हाथों में होती इन पतंगों की डोर।जो हस्ती - मस्ती जानती हैं ।ये ख़ाक में मिलने से पहले हौसलों की उड़ानों से जी - जान से आसमान  को छूती है। जिन्दगी भी इसी की बने  मिसाल ।मकर संक्रांति में छतों पर जाकर कई पीढ़ी अपने बच्चों के संग पतंग उड़ाती हुए देख सकते हैं। हम  ग्लोबल  मकर सक्रांति पर संकल्प करें  कि पतंग ऐसे उड़ाएं  कि पतंग का माझा  बेजुबान पक्षी  को शारीरिक क्षति न पहुँचाएँ। वे जख्मी हो जाते हैं । इनके लिए उपचार केंद्र भी हों। हर साल चीनी मांझे से  बाइक सवार बच्चे  - बड़े भी चपेट में आ जाते हैं जिनसे वे जख्मी हो जाते हैं। कितनों की गर्दन आदि कटने से मौत भी हर साल हो जाती हे।  यह पावन पर्व सामाजिक समरसता , सद्भाव को तो लाता है । ऐसे पतंगबाजी का खेल   आनंद  से खेलें लेकिन रंग में भंग न पड़े।  इंसान किसी  भी प्राणी को माझे से हानि न पहुँचाए। प्रकृति , प्रभु सूर्य देव , धरती  और अन्नदाता किसानों को हम कृतज्ञता प्रदान करें । सांस्कृतिक एकता के इस पर्व पर जीवन में हम इनकी तरह संतुलन बनाएँ।

 - डॉ मंजु गुप्ता 

वाशी , नवी मुंबई .

भंडारा जिल्हा कारागृह येथे महिला पतंजली तर्फे योग शिबिर हळदी कुंकू कार्यक्रम

 


शब्दशिल्प/भंडारा_जिल्हा कारागृह येथे बंदिस्त असलेल्या महिलांसाठी पाच दिवसीय योग शिबिराचे आयोजन महिला पतंजली योग समिती तर्फे घेण्यात आले. शिबिराचे नियोजन महिला पतंजली जिल्हा प्रभारी डॉ. वैशाली गिरीपुंजे यांनी केले. योग शिबिर  रजनी बालपांडे, ज्योती पटले,आशा यांनी घेतले. त्याचप्रमाणे योग शिबिराचे समापन बंदिस्त महिलांना हळदीकुंकू तसेच वाण देऊन  करण्यात आले .

त्याचप्रमाणे कारागृहात कार्यरत असलेल्या महिलां कर्मचाऱ्यांना देखील हळदीकुंकू आणि वाण देऊन मकर संक्रांतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन आणि नियोजन महिला पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी डॉ.वैशाली गिऱ्हेपुंजे यांनी केले. सोबत महिला पतंजली महामंत्री अनिता खेडीकर आणि डॉ.वैदेही गिऱ्हेपुंजे, कृष्णाजी खेडीकर यांची विशेष उपस्थिती होती.

  कार्यक्रमासाठी  मुख्य तुरुंग अधीक्षक जगताप सर,सहाय्यक तुरुंग अधीक्षक आडे सर यांनी संपूर्ण सहकार्य केले.



कवी मनातील जाणीव जिवंत व प्रवाही असणे आवश्यक " _कवीसंमेलनाध्यक्ष प्रा.अरुण बुंदेले

  


" शिक्षक साहित्य संमेलनातील कवीसंमेलन रंगले 

शब्दशिल्प/अमरावती_ " कवी स्वतःच्या मनात निर्माण होणाऱ्या उद्रेकाला थोपवू शकत नाही.त्या उद्रेकातूनच त्याची कविता आकारास येते,तसाच काव्य हा मनात निर्माण होणारा सहजोद्रेकच असतो. ही 

कवी मनातील जाणीव जिवंत व प्रवाही असावी लागते.त्यातून जे काव्य निर्माण होतं ते अक्षर वाड्मय ठरतं."असे विचार परिवर्तनवादी अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण 

बाबारावजी बुंदेले यांनी कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून व्यक्त केले.

               ते श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय,अमरावती येथील  मातोश्री विमलाबाई देशमुख साहित्य नगरी येथे ११ जाने. २०२६ ला संपन्न झालेल्या ९ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनातील कवीसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होते.

      करा मतदान' या अभंगाचे गायन करून लोकशाहीचा जागर करताना

कवीसंमेलनाध्यक्ष अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले अध्यक्षीय अभंगात म्हणतात की,

ध्यानात ठेऊ या । दिन मतदान ।। 

करू या सन्मान । लोकशाही ।।

टाळू नका कोणी । मतदान करा ।।

लोकशाही करा । बळकट ।। .६  ।।

      ' रुसवे फुगवे ' या कवितेत कवी जयदीप सोनखासकर म्हणतात की,

" सत्ता नेहमी खुर्चीवर रुसते ।

नेता अन्  कार्यकर्ता बकाल ॥

मात्र सुंदरी रोज खुणावते । करण्या दुसऱ्याला कंगाल ॥"

            कवीसंमेलनाच्या प्रमुख अतिथी कवयित्री डॉ.अनघा सोमवंशी  सोनखासकर मातीचे मोल सांगताना म्हणतात की,

    "माही जमीन जमीन ।

     अन्न देते ती खायला ॥

     तहानलेल्या जीवाला ।

     पाणी देते ती प्यायला ॥

            कवीसंमेलनाच्या प्रमुख अतिथी कवयित्री अंजली वारकरी म्हणतात,

" टॅबलेट, कॅप्सूल,

हाय लय जादूगर ॥

नावं गावं माह्य इसरला,

होठी रायते औषध खंडीभर ॥"


             कवी प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे 'राजकारन'या कवितेत राजकारणाच वास्तव सांगताना म्हणतात की,

" मजा करते नेते,जनतेचे व्हते मरनं ॥

लयच गंद हाय राजे हो, भारतातलं राजकारन ॥ "


         कवयित्री प्रियंका गिरी म्हणतात की,

" केव्हापासून शोधत आहे ।

घर माझे मी घरात माझ्या ॥

अजूनही सापडले नाही ।

किती गेल्या हयात माझ्या ॥ "

     कवयित्री  छाया पाथरे 'वृक्ष आमचे सोयरे' या निसर्ग कवितेत म्हणतात की,

"वृक्ष सर्व छाया देती ।

फळे फुले अन्न ही देती ॥

वृक्ष सर्वा पोषण करती ।   

वृक्ष आमचे सोयरे ती ॥ "

        कवयित्री प्रा.सुशीला मळसणे 'कविता' या कवितेत म्हणतात की,

"प्रत्येकाने बोलावी कविता । प्रत्येकाने गावी कविता ॥

प्रत्येकाने सोसावी कविता । भावनांच्या तळातून ॥"

              कवयित्री डॉ.मंदा माणिकराव नांदुरकर' दूरचा डोंगर ' या कवितेत रानात आईचे दर्शन कसे घडले हे सांगताना म्हणतात की,

उन्हाच्या मिठीत । शोधते सावली ॥

रानाच्या घरात । मायचं गावली ॥

.              कवी कैलास जानराव कापडे ' माय ' या कवितेत आईच्या कष्टाचं मोल सांगताना म्हणतात की,

"रोज रोज वावरात माय वेचे सरपणं ॥

मायच्या कष्टाले ग इथं नाही मोलपणं ॥"

           कवयित्री डॉ. नेहा विनोद भटकर 'आयुष्याच्या या

 वळणावर'या कवितेत म्हणतात की ,

"साद घालण्या आकाशीच्या निळाईला ॥

कवेत घ्याया चांदण्यांच्या धवल खळीला ॥"

         कवयित्री सौ.प्रतिक्षा हेमंतगणगणे(होले)

'भाऊसाहेब'या कवितेत म्हणतात की,

"जगाचा पोशिंदा  शेतकऱ्यांसाठी सदा आपण झटले ॥

दिल्लीत पहिले कृषी प्रदर्शन घडविले ॥"

      कवी श्याम चौकडे ' मग हानु काय टकल्यात ' या प्रबोधनपर कवितेत म्हणतात की ,

"जिथ तिथ का? राजा ।

प्लास्टिक पन्नी फेकतो ।

एकदा नाही सांगत ।

दहा वेळा रे सांगतो ।

 मग हानू काय टकल्यात ॥"

       कवयित्री सौ.रंजना कराळे, 

' ऋतू शीत हा' या निसर्ग कवितेत म्हणतात की,

" फूलपाखरू कधी काढते फुलराणीची खोडी ॥

अंगी मखमल लेवुन चाखी स्वर्णफुलांची गोडी ॥"

            कवयित्री डॉ.निर्मला पुंडलिकराव भामोदे ,"भ्रूण कन्येचा टाहो " या कवितेत स्त्रीभ्रूणाचे मनोगत व्यक्त करताना म्हणतात की,

"मुलगा वंशाचा दिवा तर,

 मुलगी ही आहे पणती ॥

उजळते ती दोन्ही कुळे, 

नसे कर्तृत्वाला गणती ll "

       कवयित्री सौ.आरती नागपुरे ' शिक्षकी व्यथा या 'वास्तववादी कवितेत म्हणतात की,

 " शिक्षकांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह 

अन खुळ्या प्रयोगांचं, वाहू लागल वारं

शिक्षण व्यवस्थेमधील हे नवं 

कुत्रे मोजन्याचं तर, खुळंच न्यार.. 

      तसेच या कवी संमेलनामध्ये चारुदत्त मेहरे, पुष्पा अतकरे , राजेंद्र भटकर, सिम्रेला देशमुख, शीतल राऊत, प्रा.अर्चना पोटे,साहेबराव बांबल,कैलास पवार ,प्रा.डॉ. विना राऊत,सुरेंद्रनाथ वाडेकर ,लीना नाथे ,संदीप देशमुख, गजेंद्र पाथरे,राणी नागपूरे ,विशाल देशमुख,अर्चना गुल्हाने ,प्रदीप घुनागे यांनी आपल्या कवितांचे दमदारपणे सादरीकरण केले.

        या कवीसंमेलनाला संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.गणेश चव्हाण,प्राचार्य डॉ.विनय राऊत राज्याध्यक्ष मा.जयदीप सोनखासकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

            या कवीसंमेलनाचे बहारदार संचलन प्राचार्य डॉ. अतुल ठाकरे व प्रियंका गिरी यांनी केले तर आभार गजेंद्र पाथरे यांनी मानले.कवी संमेलनाला बहुसंख्य रसिक वर्ग उपस्थित होता.

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...