शब्दशिल्प/छत्रपती संभाजीनगर-मैत्री कट्टा कवी मनाचा साहित्यसमूहाचे चौथे राज्यस्तरीय कवी संमेलन दिनांक ०१/०२/२०२६ रोजी वार रविवार,हॉटेल रेड व्हेलवेट छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेले आहे. या कार्यक्रमाकरीता अध्यक्ष म्हणून आशा डांगे( शिक्षिका तथा सुप्रसिद्ध कवयित्री), उद्घाटक अनिल साखरे( मुख्याध्यापक) प्रमुख पाहुणे विजय पांचाळ( प्रसिद्ध कवी/ निवेदक), गिरीश जोशी( सुप्रसिद्ध गझलकार), संजय खाडे ( सुप्रसिद्ध कवी) लाभलेले आहेत. कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन, पुरस्कार गौरव सोहळा तसेच कवींचे कवीसंमेलन होणार आहे. जवळजवळ ५० कवींच्या विविध कवितांच्या मेजवानीचा आस्वाद या कार्यक्रमातून सर्वांना घेता येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सौ. अल्का साखरे- धोंडणे( मैत्रीकट्टा कवीमनाचा संस्थापिका/ अध्यक्षा, अर्जुन गायकवाड( कवी/ गझलकार), विजय दळवी( कवी) यांनी केलेलं असून जास्तीत जास्त साहित्यिकांनी संमेलनात भाग घ्यावा असे आवाहन संस्थापिका सौ.अल्का साखरे- धोंडणे यांनी केलेलं आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर
मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...
-
*ढोर ,गवार, पशु ,नारी ताडन के अधिकारी* हे मनुस्मृतीमध्ये लिहिले आहे. भारतीय समाजावर अनादी काळापासून मनुस्मृतीचा पगडा आहे. वर्णवादी रुढीपरं...
-
शब्दशिल्प/यवतमाळ_प्रख्यात साहित्यिक बाबाराव मडावी, आकांतकार यांना आदिवासी साहित्य परिषदेत "साहित्यरत्न पुरस्कार"देवून सपत्निक स...
-
शब्दशिल्प/पुणे_ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील लोकप्रिय रेडिओ वाहिनीवर पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि जनजागृती करीता विशेष काव्य मैफिल आय...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा