शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०२५

मै हर एक पल का शायर हूं : साहिर लुधियानवी-कलाम अहमद खान




(२५ आक्टो.: पुण्यतिथी विशेष  )         

मेरा फन, मेरी उम्मीदे आजसे तुमको अर्पण है

आजसे मेरे गीत तुम्हारे सुख और दु:ख का दर्पण है 

आपली प्रतीभा आणि अभिलाषा जगाला अर्पण करणार्‍या या कविचे काव्य  जन-सामान्याच्या सुख-दु:खाचा खरोखरच एक आरसा आहे. पीडित शोषितांच्या सुख-दु:खाशी समरस होऊन-

न मुंह छुपाके जिये हम,न सर झुकाके जिये

सितमगरो कि नजर से नजर मिलाके जिये

अन्यायाविरुद्ध लढण्यास असा महामंत्र देणारा एक महान शायर आणि काजल,गजल, कभी कभी, प्यासा,हमराज यासारख्या चित्रपटांना सुपरहिट करणारे गीत देणारा एक महान गीतकार-साहिर लुधियानवी.

साहिर लुधियानवी (अब्दुल हई) यांचा जन्म लुधियानाच्या एका सुखवस्तु जमीनदार  कुटुंबात १९२१ साली झाला. पतीच्या भोगविलासी स्वभावाला कंटाळून साहिरच्या आईने तलाक घेतला आणि साहिर स्वेच्छेने आईसोबत घराबाहेर पडला. सुरुवातीचे दिवस अत्यंत खडतर परिस्थितीत गेले. एकतर गरीबी आणि वरतून      बापाच्या क्रूर धमक्या. साहिरला कुठेच स्वस्थता मिळाली नाही. अपुरे शिक्षण, काही काळ टिकणार्‍या नोकर्‍या, विचित्र मानसिक परिस्थितीत साहिरच्या शायरीचा फुल फुलत होता-

हजार बर्क (बिजली) गिरे, लाख आंधिया उठे 

वो फूल खिलके रहेंगे, जो खिलने वाले है 

साहिरच साहित्य मोजकं पण मौलिक आहे. `गाता जाये बंजारा',‘परछाइयां’, `तल्खिया', आओ कि कोई ख्वाब बुने,’ हे चारही संग्रह फार गाजले. `आओ कि कोई ख्वाब बुने' या काव्यसंग्रहाला `सोवियत लँड नेहरु अवार्ड’, `उर्दू अ‍ॅकॅडमी अवार्ड',‘महाराष्ट्र स्टेट अवार्ड' मिळाले असून लुधियाना शासकीय महाविद्यालयात शिकताना १९४३ मध्ये प्रकाशित पहिल्याच `तल्खियां' काव्यसंग्रहाच्या आजपर्यंत ५० पेक्षा अधिक आवृत्या प्रकाशित झाल्या.

मनामनातील कलह, दुभंगणारे ऋणानुबंध, प्रेमसबंधातील स्वार्थपरता व ढोंगीपणा, शारीरिक पीपासेचे अप्राकृतिक रुप, टरफली नैतिकता, महानगरातील विखुरलेले जनजीवन, गर्दी आणि कोलाहलातील मानवाचे भयग्रस्त एकाकीपण, सर्व स्तरातील अविश्वास,युद्ध आणि संघर्ष, आदर्शहीनता, सामाजिक तथा राजनैतिक भ्रष्टाचाराला सहज स्वीकार करणारी व्यवस्था, सनातनी मूल्यांचा र्‍हास, गरजांच्या अपूर्ततेमुळे पलायनाची भावना, सामाजिक आणि आर्थिक विषमतेविरुद्ध विद्रोह इत्यादी अनेक विषय साहिरच्या काव्यातून अभिव्यक्त होताना दिसतात. 



  कोणत्याही कविची कविता ही त्याच्या जीवनानुभवातून निर्माण होते. त्या कविच्या निष्ठाही त्याच्या कवितेत व्यक्त होतात. (‘आकलन’-बाबुराव गायकवाड). साहिरने जे भोगले तेच काव्यात चित्रीत केले म्हणून साहिरची कविता वास्तव आणि हृदयस्पर्शी तर आहेच शिवाय आपल्या सहज आणि ओघवत्या काव्यसादरीकरणारे मनातील भावभावना सहजतेने व्यक्त करण्याच्या कलेने, सामान्याच्या नित्य बोलीभाषेतील शब्दाने नटलेली असल्याने आपले अक्षरत्व टिकवून आहे. 

दुनियाने तर्जुबात-ओ-हवादीस शक्ल मे 

जो कुछ मुझे दिया है वो लौटा रहा हुं मै

(या जगाने अनुभव आणि र्दुघटनेच्ता रुपात जे काही मला दिलं तेच मी काव्याच्या रुपाने जगाला परत करीत आहे.)



साहिरची समकालिन सुप्रसिद्ध हिंदी-उर्दू लेखिका अमृता प्रीतम आणि साहिर यांच्यात फार घनिष्ठ नि पवित्र मैत्री होत्री. आपल्या `तल्खियां' काव्यसंग्रहाची प्रस्तावना अमृता प्रीतमने लिहावी, अशी साहिरची मनोकामना होती. पण काही मानसिक अवस्थेतमुळे ती प्रस्तावना लिहू शकली नाही. साहिरच्या मृत्युनंतर तेराव्या आवृत्तीची प्रस्तावना लिहून तिने साहिरचं हे ऋण फेडलं. प्रस्तानेत ती लिहिते. `साहिर की शायरी लोगों की रगीं का हिस्सा बन चुकी है.'

साहिर सर्वांचा चाहता होता. त्याचे चारही हिंदी काव्यसंग्रह `स्टार पब्लिकेशन प्रा. लि.' ने प्रकाशित केले. या प्रकाशन संस्थेचे मालक व साहिरचे जवळचे मित्र श्री. अमरनाथजी साहिर यांच्याविषयी लिहितात ‘`अक्सर चिंतक और भावूक व्यक्ती गंभीर प्रकृती के होते है. लेकिन साहिर बहुतही हंसमुख और जिंदादिल व्यक्ती थे. शायरी को जनसाधारण में उन्होने जितना लोकप्रिय बनाया शायद ही कोई बना सके. ‘परछाईयां’ की  दीर्घ कविता और तलखियां की खुबसूरत रचनाओं से आज भारत और पाकीस्तान का पढा लिखा कोई भी व्यक्ती अपरिचित नहीं होगा.’’ 

याद आते है फजाओं में 

कितने दूर के और नजदीक के नाम

नाम तेरा जहां जहां पहुंचा 

साथ पहुंचा है इस दयार का नाम.

साहिरच्या सुरुवातीच्या काव्यावर पैâज अहमद पैâज आणि मजाज या शायर मंडळींचा प्रभाव विशेषत्वाने जाणवतो. ‘साहिर पैâजची नक्कल करतो’ असा आरोप पण साहिरवर लावल्या गेला. पण थोड्याच काळात साहिर काय आहे याची प्रचिती लोकांना आली. ‘कभी कभी, मेरी दरमांदा जवानी की तमन्नाओं के’ इत्यादी कविता लोकांना साहिरविषयी खूप काही सांगून जातात.


मै हर एक पल का शायर हूं

हर एक पल मेरी कहानी है

हर पल मेरी हस्ती है

हर एक पल मेरी जवानी है

हे गीत आजही जनसामान्यांच्या ओठांवर खेळत आहे. लुधियाना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिकताना साहिरने ताजमहालवर एक कविता लिहिली. यमुनेच्या काठावर वसलेला ताजमहल पाहून साहिर प्रेयसीला म्हणतो- ‘‘प्रिये, ताजमहल हे प्रीतीचं प्रतीक आहे. हे रमणीय स्थान तुला आवडतं. पण प्रिये तू मला इतर कुठेतरी भेटत जा.        ताजमहालची सुंदरता तू बघितली आहे. पण त्याच्या पायव्यात दडलेल्या श्रमिक-कलावंतांच्या हाडांचे सापळे तुला दिसत नाही. या जगात असंख्य लोकांनी प्रेम केलं. कोण म्हणतो की त्यांचे प्रेम पवित्र नव्हते?  पण प्रिये आपल्या प्रेमाची जाहिरातबाजी ते करू शकले नाही. कारण तेही माझ्यासारखेच गरीब होते.

एक शहनशाहने बनवाके हसीन ताजमहल

हम गरीबों की मुहब्बत का उडाया है मजाक

झोपडीत राहणार्‍याने महालाचे स्वप्न पाहूच नये पण प्रेमवीरांना कशाचीही पर्वा    नसते. तुम में हिम्मत है दुनिया से बगावत करलो 

वर्ना माँ-बाप जहां कहते है, शादी करलो

असे साहिरने तिला निक्षून सांगितले. पण ती सर्व बंधनांना झुगारून साहिरची न होता बेवफा झाली पण तरीही साहिरचं वैफल्यग्रस्त भग्न मन तिला धिकारत  नाही. 

अपनी तबाहियों का मुझे कोई गम नही

तुमने किसी के साथ मुहब्बत निभा तो दी.

प्रेमभंगाच्या विषाला पचवून साहिर आजन्म अविवाहितच राहिला. पण मजनुसारखा तोही मरुभूमीच्या धुळीत हरवला नाही तर त्याने आपल्या लेखणीची धार तीक्ष्ण केली ती पीडितांच्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी. 

आज से फन(प्रतिभा) का मतलब जंजीरे पिघलाना है

आज से मै शबनम के बदले अंगारे बरसाऊंगा

पुन्हा साहिरचा काव्यप्रवास सुरू झाला. प्रवासात त्याला भरल्या चौकात अब्रुु लुटलेल्या कुमारिकांचे नग्न शव मिळाले. तर कधी त्यांचा खुलेआम लिलाव. कधी पोट भरण्यासाठी देह विक्रय करणार्‍या ललना तर कधी तापाने सणसणत्या बाळाच्या  औषधोपचारासाठी सर्वस्व लुटविणारी माता याच पार्श्वभूमीवर ‘‘प्यासा’’ चित्रपटाची साहिरने रचलेली गाणी आजही आठवते.

ये कुचे, ये निलाम घर दिलकशीं के 

ये लुटते हुये कारवां जिंदगी के

कहां है कहां है वो मुहाफीज खुदी के

जिन्हे नाज है हिंद पर वो कहां है

(ज्यांना या भारत देशावर अभिमान आहे. कुठे आहे पावन संस्कृतीचे पोवाडे गाणारे धर्ममार्तंड लोकं ? बोलवा त्यांना. हे जीवनाचे लुटले जारणारे तांडे दाखवा त्यांना. दाखवा त्यांना निष्पाप कुमारिकांचे निस्तेज कुस्करलेले शव. हा अब्रुंचा खुलेआम लिलाव) स्त्री विषयी साहिरच्या मनात अपार श्रद्धा होती.

औरत ने मर्द को जनम दिया 

मर्द ने उसे बाजार दिया

हे गीतही साहिरच्याच लेखणीतून अवतरले. तसेच जश्ने-गालिब शताब्दी समारोहावर लिहिलेल्या कवितेच्या काही ओळी ही आठवतात-

गांधी हो के गालीब हो

इंसाफ की नजर में 

हम दोनों के कातील है

हम दोनोें के पुजारी है

जगाची रीतच अशी आहे की आम्हीच गांधी आणि गालीबचे पुजारी आहोंत आणि आम्हीच त्यांच्यावर गोळ्याच झाडतो. सांडणारे रक्त आपले असो की इतरांचे शेवटी ते मानवाचेच रक्त आहे. 

युद्ध पूर्वेला होवो अथवा पश्चिमेला

शेवटी विश्वशांतीचाच बळी जातो 

बॉम्बवर्षाव घरांवर होवो अथवा सीमेवर 

शेवटी विध्वंस अटळ आहे. 

विजयाचा दीपोस्तव असो वा पराजयाचा शोक शवटी मयतींवरच लढावे लागते. युद्ध काय समस्येचे निराकरण करणार ? अरे युद्ध हीच तर एक समस्या आहे. म्हणून साहिर लिहितो-

इसिलिए, ऐ शरीफ इंसानो 

जंग टलती रहे तो बेहतर है

आप और हम सभी के आंगन

में शमा जलती रहे तो बेहतर है.

अशा विश्वशांतीचा संपूर्ण जगाला संदेश देणारा हा महान शायर २६ आक्टो. १९८० रोजी स्वर्गवासी झाला. पण आजही साहिर काव्याच्या रुपाने अजरामर आहे. साहिरच्याच शब्दात सांगायचे झाल्यास - 

जिस्म की मौत कोई मौत नही होती

जिस्म मिट जाने से इंसान नही मर जाते



- कलाम अहमद खान

२५ डी. आदर्शनगर, उमरेड रोड, नागपूर

(मो.९६५७३४७६८८)

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२५

मराठी भाषेला वाहिलेला अवलिया : कलाम खान-- विजया मारोतकर

 

वाढदिवस  विशेष...



मराठी भाषेला वाहिलेला अवलिया : कलाम खान

- विजया मारोतकर


साहित्य क्षेत्रातील एक व्यासंगी व्यक्तिमत्त्व नजरेच्या टप्प्यात आले...आणि लगेच त्यांच्याकरीता आठवल्या या समर्पक ओळी.. 

     कोई तूफां से कह दो

     ना उलझो हमसे...

     हमने तो रुख मोडा है

     उठते हुये तूफानों का... 

खरंच, जगण्याची लढाई लढताना प्रत्येक वेळी हातात शस्त्रच घेण्याची गरज नसते; तर ज्यांच्याकडे शब्दांचे शस्त्र घेऊन, संकटांवर मात करून पुढे जाण्याचे सामर्थ्य असते, अशा व्यक्ती शब्दांच्या वलयातून आपल्या जगण्याच्या वाटा शोधण्याचा कायमच प्रयास करीत असतात. अर्थात हे सर्वांनाच शक्य होतं असं नाही; परंतु अफाट पसरलेल्या या जगात केवळ  शब्दांवर विश्वास ठेवून...उधाणलेल्या लाटांचे वादळ मनात पेलून...शब्दांच्याच आधारे 'शब्दशिल्प'च्या निर्मितीचा ध्यास मनात बाळगून नितांत शांततेने प्रशांत    महासागराकडे वाटचाल करण्याचे ध्येय बाळगणारा एक ध्येयवेडा लेखणीचा उपासक पाहिला मी.

सभोवतालच्या अनेक कथा, कविता घेऊन जगणारा एक समृद्ध लेखक,कवी पाहिला मी.. आणि हे व्यक्तिमत्त्व म्हणजे आपल्या वयाचे अर्धशतक पूर्ण करताना जगण्याच्या कॅनव्हासवर स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा उमटविणारे कवी आहेत कलाम अहमद  खान...!

      आपण सारे साहित्याचे वारकरी आहोत. साहित्याच्या वर्तुळात वावरत असताना अनेक साहित्यिक, कवी, लेखक आपल्या संपर्कात येतात.परिचय होतो.पुढे जातो. काही नाती पुढे जातात तर काही थांबून जातात तर काही सुटत जातात....काहींना आपणच वेळ देऊ शकत नाही तर काही आपल्याकडे स्वतःहूनच दुर्लक्ष करतात; असे एक ना अनेक अनुभव येत असतात परंतु आपण ज्यांना जास्त वेळ देऊ शकलो नाही, तरी त्यांनी मात्र आपल्याला  नितांत चांगल्या प्रकारे लक्षात ठेवलेले आहे; असे लक्षात येते. त्यावेळी त्या व्यक्तीप्रति वेगळाच आदरभाव निर्माण होतो. असेच  माझ्याकरता असलेले प्रतिभावंत साहित्यिक कलाम खान. यांना साधारणत: वीसेक वर्षापासून मी ओळखते. यवतमाळ येथे झालेल्या पाचव्या   झाडीबोली साहित्य संमेलनाप्रसंगी दोन दिवस आम्ही सोबत होतो. त्या संमेलनात त्यांचे पुस्तक स्टॉल होते. डॉ. संध्या पवार  यांच्यामुळे माझा त्यांच्याशी पहिला परिचय झाला. कलाम खान यांनी प्रकाशित केलेल्या डॉ.संध्या पवार यांच्या पुस्तकावर मी समीक्षा लिहिली. ती समीक्षा कलाम खान यांना खूपच भावली; त्यामुळे त्यांनी प्रकाशित केलेल्या काही पुस्तकांना मी प्रस्तावना लिहावी...असा आग्रह त्यांनी केला. माझ्या आठवणीप्रमाणे विजय गायकवाड यांचा 'भाकर' हा कथासंग्रह, कोमलकांता  बनसोड यांची 'गोधडी' ही कादंबरी, अन्य काही काव्यसंग्रह, नाट्य लेखन या पुस्तकांना मी प्रस्तावना दिलेली आहे.

     पुस्तक प्रकाशनाचा हा व्यवसाय खरोखर काटेरी वाट आहे; परंतु स्वतःतील प्रतिभेच्या आणि लोकांच्या विश्वासाच्या आधारे  कलाम खान यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. अनेक अडचणी आल्या परंतु घेतलेला वसा मात्र टाकला नाही. ही त्यांची जिद्द, चिकाटी, नम्रता, सालसपणा पाहून आज त्यांचा साराच सभोवताल अचंबित आहे. खरे तर आयुष्य जगण्याकरीता पैसा नितांत गरजेचा असतोच  असतो. तोच माणसाचे जगणे समृद्ध करत असतो. भौतिक सुखसोयी उपलब्ध करून देतो. परंतु गरजेपुरता पैसा असला  आणि स्वत:च्या मनासारखे जगता आले; तर तेही जगणे खरे श्रीमंत जगणे असते, हे कलाम खान यांनी सिद्ध केलेले आहे. आपल्या अडचणींचा कुठेही बाऊ न करता.. पुढ्यात आलेल्या जगण्यावर मात करत... जगण्याच्या वाटा शोधत, अविरत साहित्यसेवा   करीत राहिले. शब्दांप्रति त्यांची श्रद्धा नक्कीच विस्मित करते. त्यामुळे मला या ओळींचा उल्लेख करावासा वाटतो-

       अनंत आमुची ध्येयासक्ती...

       अन् अनंत आमुच्या आशा..

       किनारा.. तुला पामराला...

जीवनात अशी आशा जिवंत ठेवताना...महाप्रलयातही स्थिर राहणे  खरंच अशक्य असते...पण  ज्याला हे जमते त्याला या प्रलयानंतरही आशेच्या बीजाला अंकुर आल्याचे दिसतेच.कारण नंतर पालवी फुटतेच आणि जीवनाचा वृक्ष पुन्हा बहरेलंच...यावर त्यांचा विश्वास असतो. याच मान्दियाळीतील कलाम यांनी आपल्या महाविद्यालयीन काळातच भिवापूर येथे  'नवोदित साहित्य व सांस्कृतिक मंडळा'ची स्थापना केली. तेथूनच त्यांच्या शब्दशिल्पची सुरवात झाली. त्यानंतर नवोदितांचे साहित्य प्रकाशित व्हावे म्हणून आर. के. प्रकाशनाची निर्मिती केली. यामाध्यमातून शंभरच्यावर पुस्तके आजवर प्रकाशित केलीत. कलाम यांनी साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात भरीव कार्य केले. 'शब्दशिल्प' चे      संपादन करत वृत्तपत्राच्या जगामध्ये वाटचाल सुरू आहे. शब्दांनी माणसं जोडता येतात...जोडली जातात.नव्हे टिकतात आणि नुसतीच टिकत नाहीत तर त्यामुळे माणसाला माणसाच्या मनात घर बांधता येतं.यावर  त्यांचा नितांत विश्वास आहे. पुस्तकांच्या जगातून बाहेर येत कवी संमेलने, साहित्य संमेलने, प्रकाशनाचे कार्यक्रम असे अनेक साहित्यिक उपक्रमांतून विविध स्वरूपात स्वतःच्या उपस्थितीसह इतरांना सहभाग प्राप्त व्हावा; याकरता धडपडत राहण्याची त्यांची वृत्ती वाखाणण्यासारखी आहे.

   


    आपल्याच विश्वात मग्न असणार्‍या लोकांच्या दुनियेत दुसर्‍यांचा विचार करणारा असाही एखादा अवलिया आहे.हे जाणवते; असा शब्दवेडा नजरेस पडतो, तेव्हा ते या काळातील एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व अाहे; असे वाटल्याशिवाय राहत नाही. त्यांचं हे वेगळेपण अनेक माणसं जोडत गेलं.

      जोडलेली नातीच

      खरी नाती असतात 

      खर्‍या प्रेमामुळेच तर

      ती जुळलेली असतात 

ही खात्री पटली. जगण्याच्या रहाटगाडग्यात दिवस मावळतो  परंतु जाता जाता मला काय करता आले याचं भान असलेले कलाम खान आज 'दैनिक भास्कर'सारख्या लोकमान्य आणि वैभवशाली वृत्तपत्रात उपसंपादक पदावर कार्यरत आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. अनेक लोकांची पुस्तके प्रकाशित करणे, स्वतःचे शब्दशिल्प चालविणे आणि नोकरी करणे या सगळ्यांकरता त्यांना दिवसाचे २४ तास नक्कीच कमी पडताना दिसतात. परंतु त्या २४ तासांवर मात करत त्यांची सातत्याने सर्व धडपड सुरूच असते. याकरता लागणारी प्रचंड ऊर्जा मला माझ्या स्नेहीजनांकडूनच प्राप्त होते. त्यांचा स्नेह, जिव्हाळा हेच माझे भांडवल आहे. त्या बळावरच मी सारे किल्ले सर करत असतो, असे त्यांचे मानणे आहे. 

         मूलतः हिंदी भाषिक असूनही त्यांची मराठी शब्दकळा नितांत समृद्ध आहे. मराठी तसेच हिंदीतून त्यांची अनेक  पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.त्यांना अनेक काव्यपुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कविता हा त्यांच्या लेखनाचा मूळ पिंड असून त्यातल्या त्यात प्रेयसभाव हा त्यांच्या लेखनाचा आत्मा असल्याचे लक्षात येते. खरेच, जगण्याला प्रेमाची नितांत गरज आहे.कारण प्रेम हेच जीवनाचा पाया आहे. जगण्यात  प्रेमाचे संजीवन नसेल तर जगणे पुढे जाऊ शकत नाही. माणसाने माणसाशी प्रेमाने वागावे ही तत्त्वे सारेच सांगतात परंतु प्रत्यक्ष जगताना या गोष्टी बाजूलाच       सारल्याचे दिसून येतात. कवी कलाम खान मात्र आपल्या आयुष्यातून प्रेमाला कधीच वजा करत नाही तर या एकाच भांडवलावर अनेक नाती जोडत जातात. माणसं गोळा करत जातात. गोळा झालेल्या माणसांचे घट्ट कुंपण त्यांच्या जगण्याला सुरक्षित करतात; यावर त्यांचा विश्वास आहे, नव्हे तर ते किती सत्य आहे याचा पडताळा या त्यांच्या सुवर्णमहोत्सवी         वर्षानिमित्ताने लक्षात येतच आहे. त्यांच्या तीनही मुली  नितांत हुशार असून त्या आपल्या वडिलांचं नाव नक्कीच उज्ज्वल करतील; याची खात्री वाटते .



     मला स्वतःला मुली खूप आवडतात. आजच्या या  सामाजिक वावटळीत मुली सुरक्षित राहाव्यात, याकरिता माझी कायम धडपड सुरू असते. त्यामुळे कलाम खान    यांच्या तिन्ही मुली आपल्या वडिलांच्या कार्याला आयुष्यभर उजाळा देतील याची शंभर टक्के खात्री आहे. जगामध्ये सारं काही मिळतं परंतु प्रेम मिळत नाही आणि लेक म्हणजे तर प्रेमाचा सागर असते; याबाबतीत कलाम खान फार श्रीमंत आहेत. एक नव्हे तर, तीन तीन लेकी त्यांच्याकडे आहेत. आयुष्याच्या खडतर वाटेवरती पावलोपावली साथ देणारी सहृदयी पत्नी त्यांना लाभलेली आहे. तिने प्रत्येक पावलावर... आहे त्या परिस्थितीमध्ये दिवस काढत कलाम खान यांना साथ दिलेली आहे.त्यामुळेच ते अशी यथार्थ वाटचाल करू शकलेत. कलाम खान यांच्याकडे असलेली प्रतिभा आणि ऊर्जा याची जगाने योग्य दखल घेतली नाही; असे मला तरी वाटत राहते परंतु काळही जास्त काळ कुणाची परीक्षा पाहू शकत नाही. काळाला सामर्थ्यापुढे आणि सदैव संकटे झेलणार्‍या सराईत योद्धापुढे मान खाली घालावीच लागते. त्यानुसार आता काळ पूर्णतः त्यांच्या बाजूने उभा राहिलेला आहे.

पुढील वाटचाल ही अतिशय समृद्धपणे होत राहणार आहे. यात जराही शंका वाटत नाही. आज त्यांच्या आयुष्याचे अर्धशतक पूर्ण झालेले आहे. आयुष्याचा काळ व वेळ यांचा हिशोब केल्यास त्यांनी आपल्या आयुष्याच्या मानाने प्रचंड कार्य केलेले आहे, असे मला वाटते. ही ऊर्जितावस्था यापुढेही अशीच कायम राहो; नव्हे तर वृद्धिंगत होत राहो, अशी त्यांना मनोमन शुभेच्छा देते आणि थांबते.

         

  

   अध्यक्ष : 

भारतातील पहिले महिला 

ओबीसी साहित्य संमेलन, नागपूर

मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान,नागपूर 

 (मो.९८२३७०६५९०)

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५

कलमका कारीगर कलाम!-- प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’, नागपूर



 

(१० ऑक्टो. वाढदिवस विशेष)

एखाद्या गोष्टीचं वेड काय किंवा ध्यास काय यातील  झपाटलेपण व्यक्तीला कधीच स्वस्थ बसू देत नाही  कारण व्यक्तीच्या आत सुप्तावस्थेत असलेली सृजनशील प्रतिभा मूर्त रूपात बाहेर पडण्यासाठी नक्कीच धडपडत असते; अशी अस्वस्थ व्यक्ती एक-दोन नव्हे तर अनेक वाड्॰मयीन पातळ्यावर आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटत असेल तर त्यास सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वाचा दर्जा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. असाच हिंदी-मराठीतील प्रतिभावंत लेखक व कवी, साक्षेपी संपादक, अभ्यासू पत्रकार, वेचक प्रकाशक, सहृदयी गजलकार व सर्जक स्तंभलेखक म्हणून महाराष्ट्राच्या  साहित्यक्षेत्रात आपली नाममुद्रा नकसणारा कलाम अहमद खान याने आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षात नुकतेच पदार्पण केले आहे. यानिमित्ताने त्याच्या एकंदरीत जीवनप्रवासाला साहित्यिकदृष्ट्या अधोरेखित करण्यासाठी गौरवग्रंथाच्या निर्मितीचा हा अल्पसा प्रयत्न!

पंचेवीस वर्षापूर्वीचा म्हणजे तेव्हाचा पंचेवीशीतला तरुण, उमदा व अवलिया कलाम हा हिंदी भाषेबरोबर महाराष्ट्राच्या मराठी मातीशी, संस्कृतीशी इमान राखत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याच्या ईर्ष्येने आजही अविरतपणे धडपडताना दिसतो. भाषा केवळ संवादाचं साधनच नाही तर तो अमूल्य असा सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचविला जातो; तो भाषेमुळेच! संस्कार, संस्कृती, सभ्यता हे सगळे भाषेतच सामावले असतात; म्हणूनच भाषेचे वृद्धीकरण करणे समाजहिताचे असते. अशा विकासवादातून कलामने नोव्हेंबर १९९५ या वर्षी नवोदित साहित्य सांस्कृतिक मंडळ, भिवापूर (जि. नागपूर)ची स्थापना केली. काखेत शबनम बॅग लटकवून सायकलने फिरस्ती करीत भिवापूर, उमरेड, कुही तालुक्यातील साहित्यविषयक जाणिवा असलेल्या रसिक, वाचक व नवोदितांना सर्वप्रथम मंडळाच्या छत्राखाली एकत्रित केले. महाराष्ट्राच्या अनेक खेडेगावात पत्र व्यवहाराच्या माध्यमातून शाखा उघडल्या.    नवोदित व प्रथितयश साहित्यिकांच्या वैचारिक घुसळणीतून भाषिक मूल्यांचे पोषकतत्त्व बाहेर पडावे; या हेतुने कलाम अहमद खानने 'शब्दशिल्प' या अनियतकालिकाचे बीजारोपण केले. युवकांना       व्यसनापासून मुक्त करण्यासाठी व त्यांच्यात देशाभिमान जागविण्यासाठी काही वर्षे 'युवारत्न' हे मासिकही चालवले. विशेष दिनाचे औचित्य साधून अनेक 'विशेषांक' पण काढलेत.

१० डिसेंबर १९९५ ला कमला नेहरू महाविद्यालय   सक्करदरा, नागपूर येथे विसासंच्या विदर्भ साहित्य संमेलनात      कविवर्य नारायण सुर्वे यांच्या हस्ते 'शब्दशिल्प'च्या प्रथमांकाचे मोठ्या थाटात प्रकाशन झाले. माझ्या संदर्भात 'शब्दशिल्प'विषयी सांगायचे झाल्यास, पूर्वीचे अनियतकालिक आजच्या पाक्षिकाएवढेच प्रतिष्ठापित व प्रेरक होते. 'शब्दशिल्प'चे नामसंस्करण, मुखपृष्ठ, पहिल्या अंकाची मांडणी, त्यातील सजावट व साहित्याची निवड हे सर्व सोपस्कार माझ्याकडून पार पडल्याचा आनंद मला आजही विस्मित करतो. ह्याच प्रथमांकाच्या प्रकाशन सोहळ्याला मी सपत्नीक जातीने हजरही होतो. आता तेच 'शब्दशिल्प' आपल्या रजतमहोत्सवी वर्षात तर संपादक कलाम पन्नाशीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याच्या अनुषंगाने गौरवग्रंथाचे संपादन करण्याची मोठी जबाबदारी मित्रपरिवाराने पुन्हा माझ्यावर सोपवली; हाही एक योगायोगच म्हणावा लागेल.

२० ऑक्टोबर २००७ ला नामवंत साहित्यिकांच्या व     नवोदितांच्या पुस्तक प्रकाशनासाठी कलामने आर. के. प्रकाशनाची सुरुवात केली. आर. के. प्रकाशनाने आजवर सवलतीच्या दरात प्रकाशित ग्रंथांची शंभरी गाठली आहे. यात नव्या-जुन्यांचा मेळ साधून भाषिक मौलिकता जपली. यातील अनेक ग्रंथांना राज्यस्तरीय वाङ्मयीन पुरस्कार प्राप्त झाले. काही पुस्तकांची व काव्यसंग्रहाची विद्यापीठ स्तरावर दखल पण घेतली गेली. समाजसेविका व सुप्रसिद्ध लेखिका डॉ. संध्या पवार यांचे पहिले पुस्तक  'भविष्य तुमच्या हाती' हे याच आर.के. बॅनरखाली सर्वप्रथम  प्रकाशित झाले. या पुस्तकाला मुंबई येथे 'वाड्.मयसेवा पुरस्कार' प्राप्त झाल्याचे भाग्यही लाभले, तसेच प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त' यांचा 'ऊर्मी''   काव्यसंग्रह अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत होऊन सन् २०१६-१७ च्या शैक्षणिक वर्षात नागपूर विद्यापीठात तत्त्वज्ञान पारंगत (एम. फिल)च्या शोध प्रबंधासाठी पात्र ठरला. मा.माणिक वैद्य, सारिका कुर्वे यांच्यासारख्या इतरही कवी, लेखकांच्या ग्रंथांवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. अशाप्रकारे कलामने लिहू इच्छिणार्‍यांची प्रकाशनाद्वारे मराठी साहित्याची अतुट नाळ जोडली.  

कलाम अहमद खान याने महाराष्ट्रातील व देशातील मान्यवरांचे हस्ते पुस्तके प्रकाशित केलेली आहेत; हे विशेष! २० नोव्हें. २००२ ला विश्वविख्यात मल्ल व अभिनेता मा. दारासिंग यांचे हस्ते भोला हुडकी, मांढळ येथे कलामच्याच  'तमन्ना' काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. २५ डिसें. २००८ ला कवी 'विश्वसुत' यांच्या 'वेदना'  काव्यसंग्रहाचे विश्वकवी मा. सुधाकर गायधनी यांचे हस्ते प्रकाशन झाले. ५ नोव्हेंबर २००९ ला प्रभाकर तांडेकर 'प्रदत्त' यांच्या  'ऊर्मी' हा काव्यसंग्रह सुप्रसिद्ध कवी व मराठी चित्रपट गीतकार प्रा.फ.मुं. शिंदे यांचे हस्ते राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालय, कुही येथे प्रकाशित झाला. या व्यतिरिक्त प्रा.विजया मारोतकर, डॉ. हिरालाल मेश्राम, डॉ. राजन जयस्वाल, स्व. प्रा. डी. एन. तितरमारे, पत्रकार मा. पुरुषोत्तम भिसीकर, आमदार वसंतराव इटकेलवार, डॉ संध्या पवार, प्राचार्य गजानन मांडेकर, डॉ. मनोहर नरांजे या   नावलौकिक मिळविलेल्या  साहित्यिक, जनप्रतिनिधी, अभ्यासक व संशोधकांच्या हस्ते अनेक ग्रंथांचे लोकार्पण करण्यात आले आहे. कलामचा अशाप्रकारचा अथक कामाचा सपाटा व उच्चारलेल्या शब्दाचा आवाका प्रादेशिक सीमोल्लंघनाचे द्योतक आहे; हे त्याच्या चळवळ्या प्रवृत्तीवरून दिसून येते. 

प्रकाशित केलेली पुस्तके थैलीत भरून हा कलाम महाराष्ट्रातील साहित्य संमेलनात विक्रीला ठेवतो. साहित्यिकांची साहित्यकृती वाचकांपर्यंत पोहचवण्याचा व त्यातून थोडा फार वाटा मिळविण्याचा त्याचा आटापिटा अनेकदा परिहासाचा विषयही बनला. पण त्याने त्याची पर्वा केली नाही; उलट शब्दजागृतीच्या यज्ञकुंडास तेवतच ठेवले. प्रकाशनाच्या नावाखाली पैसा कमावण्यासाठी कराव्या लागणार्‍या क्ऌप्त्या त्याला अजूनही अवगत नाहीत. तरीही अत्यंत सचोटीनं व  पराकाष्ठेच्या निष्ठेनं हा व्यवसाय सांभाळण्याचे धाडस करतो आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी कथा, कविता उपयोगी पडत नाहीत; हे कळूनही कवीसंमेलने, साहित्य संमेलने, प्रकाशन सोहळे या धबडग्यात बिचारा कलाम वयाच्या पन्नाशीतही तितकाच तन्मयतेने व दृढ निश्चयाने  कृतीशील आहे. हाच ध्यास त्याचा श्वास आहे, हेच त्याच्या जीवनाचे प्रयोजनही आहे. प्रकाशनाच्या अल्पशा मिळकतीतून आपल्या कुटुंबाचा जेमतेम निर्वाह करतो. कुटुंबाचा भार वाढत गेल्यावर त्याची सतत आर्थिक कोंडी होऊ लागल्याने दै.भास्कर, सा. विदर्भ वतन यांसारख्या मुद्रण माध्यमात मध्यरात्रीपर्यंत आपली सेवा पुरवतो. जगण्याचे संतुलन राखताना त्याला अशातर्‍हेच्या कसरती कराव्या लागतात. तो आजही नागपूरला किरायाच्या घरातच राहतो. दळणवळणाच्या आधुनिक युगातही भेटीगाठीसाठी, कौटुंबिक व इतर कार्यक्रमासाठी केवळ सायकलचाच वापर करणे, ही त्याची    मजबुरी आहे. अशा खडतर जीवनानुभवाचा टप्पा पार करीत आपल्या अभावग्रस्त आयुष्याला  कुठेच चाचपडू दिले नाही वा परिस्थितीसमोर शरणागतीही पत्करली नाही. ध्येय माणसाला जगण्याची रीत व कृतार्थ जीवनाची हमी देत असते. म्हणूनच कलाम आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठामपणे, अभेद्यपणे उभा राहिला. कलाम हा परिस्थितीने गांजला असला तरी इतरांना साहित्यिक म्हणून ओळख देण्याची श्रीमंती त्याच्यात आहे.



संमेलन हे साहित्य, समाज, संस्कृतीच्या चिंतनाचे सर्वश्रेष्ठ व्यासपीठ आहे. अशा संमेलनातून मराठी भाषेचा जागर व्हावा, वाचनसंस्कृती वाढीस लागावी, विचारमंथन व्हावे, अर्थातच सांस्कृतिक उन्नयनाचा हेतू साध्य व्हावा; याच उद्देशाने संमेलने भरविली जातात. शब्दस्नेही कलामनेसुद्धा कवितांच्या परिपोषणासाठी काव्योत्सव साहित्य संमेलने, लोककला जीवंत ठेवण्यासाठी शाहिरी संमेलने, गुजरात भूकंपग्रस्तांना मदत म्हणून 'उनकी याद में' यांसारखी विदर्भस्तरीय संमेलने, ग्रामीण-शहरी तसेच डोंगर-दर्‍याखोर्‍यांच्या कुशीत घेतली आहेत. इतकेच नव्हे तर, अनेक काव्यस्पर्धा घेऊन राज्यस्तरीय नवप्रभा काव्यपुरस्कार, काव्यप्रेरणा पुरस्कार अशा कित्येक पुरस्कारांनी कवी-कवयित्रींना प्रोत्साहित केले आहे. यातून त्याचे साहित्यप्रेम व तळमळ सुद्धा स्पष्ट होते. कलामचे महाविद्यालयीन वयापासूनचे सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक अशा सृजनकळा इतरांच्या अभिव्यक्तीच्या व उज्ज्वल भविष्याच्या सूचन करणार्‍या आहेत. खरंच, व्यक्तीने आपल्या जीवनात एखादी कृतिशीलता अशी जोपासावी की, त्यात रमताना प्रत्येकच दिवस एक सोहळाच असेल! अशा स्वानंद सोहळयातून कलाम अविश्रांत व मन:युत मुसाफिरी करताना दिसतो.

इतरांचे विचार, भावना व अभिव्यक्तीला कोर्‍या कागदावर रेखाटून 'शब्दशिल्पा'त अंकित करणारा 'कलमचा कारीगर कलाम'ने इतरस्त्र गुंत्यात गुंतूनही हिंदी-मराठीतून मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. 'तमन्ना', 'प्रीतगंगेच्या तटावर', 'शतक प्रीत फुलांचे', 'सुरुवातीच्या  कविता'', '१११ हायकू', 'आभिसारिका', 'तेरा अहसास', ‘बिखरे मोती‘ व 'प्रेम पराग' असे ९ काव्यसंग्रह त्याच्या नावे जमा आहेत. ६ पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. संथ, सखल व सवृत्तीक अशा     सामाजिक अभिसरणाच्या त्याच्या कविता मानवी मूल्यावरील श्रद्धा प्रगट करतात. त्यात आर्त मनाची कोवळी व्यथाही दिसून येते.      कवितेतील शब्दकळा कधी प्रीतीचा गुलमोहर फुलवते; तर कधी उपेक्षितांच्या वेदनेवर फुंकर घालते;  कितीतरी समस्यांच्या मुळापर्यंत झिरपत जाते; भवतालच्या भयाण वास्तवतेचे दर्शनही घडवते. दै. निर्मल महाराष्ट्र, दै.लोकशाही वार्ता अशा दैनिकांतील स्तंभलेखनातून हिंदी-मराठी गायक-गायिका, अभिनेता-अभिनेत्री, संगीतकार,       गीतकार, चित्रपट दिग्दर्शक इ.च्या कलाविष्काराला दोन दशके रेखले आहे. सोबतच त्याने इतरही दैनिके, मासिके, पाक्षिके, साप्ताहिके, दिवाळी अंकातून लेख, कविता, जीवनपट, ललित, कथा, समीक्षण, पुस्तकपरिचय आदिंचेही विपुल लेखन केले आहे. त्याच्या साहित्याची दखल घेऊन 'भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आजाद' यांसारख्या पुरस्काराचा तो मानकरी ठरला आहे. अनेक वर्षे पत्रकारिता पण सांभाळली. आकाशवाणी व दूरदर्शनवरही साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. राज्यस्तरीय व अखिल भारतीय स्तरावर अनेक साहित्य संमेलनात आमंत्रित कवी म्हणून सहभाग नोंदविला आहे. यावरून कलामची साहित्यक्षेत्रातील गगनभरारी सुद्धा अनुपम अशीच प्रत्ययास येते.



माणूस जसजसा एखाद्या कार्यभागात समर्पित होत जातो; तसतशी त्याची तेजोवलयं वाढत जातात. त्या प्रकाशात कलामने आजच्या नामवंत व सुप्रसिद्ध लेखक, कवी, समीक्षकांना घडवले, जोपासले, वाढवले आणि साहित्यिक दर्जाही मिळवून दिला. मायमराठीच्या विकासाच्या व संवर्धनाच्या दृष्टीने कष्टणार्‍या या शब्दवेड्या कलामने जात, धर्म, भाषा, पंथ ह्या भेदाभेदीपल्याड जाऊन आपल्या सात्त्विक वृत्तीतून, सम्यक कृतीतून, मृदू वाणीतून व व्यासंगी लेखणीतून अख्ख्या महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींचा मोठा गोतावळा तयार केला. उधाणल्या वादळासारखं जगलेल्या या कलासक्त भाषाप्रेमीने प्रज्ञा, प्रतिभा व परिश्रम यांच्या बळावरच हा व्याप सांभाळलेला आहे. अशा अथक व कष्टप्रद महत्कार्यातून त्याने आपले मोठेपण सिद्ध केले आहे. अक्षय ऊर्जेचा स्त्रोत व उत्साहाचे प्रतीक असलेल्या कलामच्या साहित्य चळवळीतील  संघर्षतत्त्वाची दखल घेऊन विद्यापीठ व क्रमिक  पुस्तकातील    नामांकित कवी मा. अजीम नवाज राही व शिक्षणमहर्षी मा. घनश्यामजी धवड सर यांनी सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दिलेल्या शुभेच्छा जणू कलामच्या सृजनशीलतेला व उद्यमशीलतेला मिळालेली सकृत दर्शनी पावतीच होय; असे म्हणता येईल. कवी, लेखक, पत्रकार, प्राचार्य, प्राध्यापक, संपादक, वर्गमित्र, रसिकगण या  मान्यवरांनी  मानाचा मुजरा म्हणून  कलामचे ध्येयसक्त व्यक्तीचित्रण,  समग्र साहित्यदर्शन व भरविलेले साहित्य संमेलन  यांचा प्रासादिक, तरल व चित्रदर्शी भाषाशैलीतून योग्यरीतीने वेध घेतला आहे. शब्दप्रेमी, रसिक, वाचकांनीसुद्धा सकस अभिप्रायातून 'शब्दशिल्प'च्या वाड्.मयीन  मूल्यांची प्रशंसा केली आहे. यातून कलामचे साहित्यसंवेगी चरित्र जिवंतपणे  व उत्कटतेने उभे करण्यात यशस्वी झाल्याचे दिसते.

कलामच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त 'शब्दशिल्पी' या  गौरवग्रंथासाठी साहित्यिकांना, अभ्यासकांना व रसिकजनांना मी    केलेल्या आवाहनानुसर महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून विपुल साहित्य प्राप्त झाले आहे. कलामविषयी वाटणारे प्रेम, जिव्हाळा, आस्था हे कृतज्ञतेतून निपजले असल्याने भरभरून प्रतिसाद  मिळाला आणि त्या पूर्ततेचा असिम आनंद मिळाल्याचे मला खूप समाधान आहे. जसजसे साहित्य मिळाले त्या क्रमानुसारच समाविष्ट केले आहे. 'शब्दशिल्पी' हा गौरवग्रंथ केवळ वाचनीय नसून वाचक, रसिक,  साहित्यिकांंच्या विचारांना प्रेरणादायी ठरेल; असा विश्वास व्यक्त करतो. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या उत्साही व आनंदी वातावरणात कलामच्या सुवर्णमहोत्सवासोबतच त्याने कोरलेल्या ‘शब्दशिल्पा‘चे रजतमहोत्सव या सिद्धि प्राप्त प्रसंगांना एकाचवेळी  सार्थकी व अविस्मरणीय बनवणार्‍या सर्व मित्र-मैत्रिणींचे गौरवग्रंथाचा संपादक या नात्याने मन:पूर्वक आभार मानतो. तसेच साहित्यसेवाव्रती कलाम अहमद खानला सुवर्णमहोत्सवी वर्षात मुबारक प्रसंगी हार्दिक शुभेच्छा देतो व अल्लाहच्या कृपेने दीर्घायुरारोग्य लाभो; त्याच्या हातून निरंतर साहित्यसेवा घडो; अशीही प्रार्थना करतो. धन्यवाद!


- प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त’, नागपूर

  ५२-ब, साईनगर, दिघोरी नाका,              

 नागपूर-४४००३४

 (संवाद : ९४२१८०३४९८)

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

रोडरोमियो (लघुकथा)-कलाम अहमद खान



सिगारेटचा धूर हवेत सोडत बंटी म्हणाला,''नागेश देख,तेरा माल जा रहा है.ऽऽ नागेशने बाईकला कीक मारली व तो मंजूच्या स्कूटीच्या मागे लागला. शीतला माता मंदिर जवळ त्याने मंजूच्या स्कूटीपुढे आपली बाईक आणून मंजूला रस्त्याच्या साईडला होण्याचा इशारा केला. ''हाय मेरी जान कहां जा रही मेरा दिल चुराके,ऽऽअसे म्हणत त्याने तिचा गालगुच्छा घेतला. रागाने लाल झालेली मंजू त्याला म्हणाली,''बाजूला हो, मला कॉलेजला जायला उशीर होत आहे. पुन्हा माझी छेड़ काढली तर परिणाम वाईट होतील सांगून ठेवते. मंजूने दम भरला पण नागेशही पट्टीचा रोडरोमियो होता. त्याने जवळचा गुलाब तिच्या केसात खोवला. ''आय लव्ह यू मेरी जान!ऽऽ म्हणत भररस्त्यावर तिला किस केले. मंजू त्याच्या तावडीतून सुटण्याचा केवीलवाणा प्रयत्न करीत लोकांना मदतीसाठी याचना करू लागली.

नागेश ताजबाग रोडवरच्या बुलंद गेटजवळ पानठेल्यावर सिगरेट फुकत उभा होता. रस्त्याने जाणार्या कॉलेजच्या मुलींना पाहत नागेशची टोळी पानठेल्यावर नेहमी उभी राहायची. रस्त्याने ये-जा करणार्या मुलींचे अश्लील भाषेत वर्णन करून नागेश व त्याचे मित्र टांटिंग करायचे. नगरसेवकाचा मुलगा नागेश  गुंडप्रवृत्तीचा असल्याने परिसरात त्याचा दबदबा होता. चार-पाच वेळा प्रयत्न करूनही दहावी पास न होऊ शकलेला नागेश दिसायला जेमतेम पण स्वत:ला हीरोच समजायचा. नजरेत भरणार्या मुलीला रस्त्यात गाठणे, नको तिथे हात लावून विनयभंग करणे, शिवीगाळ करणे रोडरोमियो नागेशच्या अशा व्यवहाराला परिसरातील मुलीही कंटाळल्या होत्या. पण त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्याची कुणाचीही हिम्मत होत नव्हती.

सिगारेटचा धूर हवेत सोडत बंटी म्हणाला,''नागेश देख,तेरा माल जा रहा है.ऽऽ नागेशने बाईकला कीक मारली व तो मंजूच्या स्कूटीच्या मागे लागला. शीतला माता मंदिर जवळ त्याने मंजूच्या स्कूटीपुढे आपली बाईक आणून मंजूला रस्त्याच्या साईडला होण्याचा इशारा केला. ''हाय मेरी जान कहां जा रही मेरा दिल चुराके,ऽऽअसे म्हणत त्याने तिचा गालगुच्छा घेतला. रागाने लाल झालेली मंजू त्याला म्हणाली,''बाजूला हो, मला कॉलेजला जायला उशीर होत आहे. पुन्हा माझी छेड़ काढली तर परिणाम वाईट होतील सांगून ठेवते. मंजूने दम भरला पण नागेशही पट्टीचा रोडरोमियो होता. त्याने जवळचा गुलाब तिच्या केसात खोवला. ''आय लव्ह यू मेरी जान!ऽऽ म्हणत भररस्त्यावर तिला किस केले. मंजू त्याच्या तावडीतून सुटण्याचा केवीलवाणा प्रयत्न करीत लोकांना मदतीसाठी याचना करू लागली. दोघांचा खडा तमाशा पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती पण कोणीही पुढे धजावत नव्हता. नागेशने चायना चाकू काढून बघ्यांना धमकाविले,''तुम्हारे बाप की शादी है क्या सालो...चलो आगे बढो!ऽऽ असे म्हणताच क्षणातच बघ्यांनी काढता पाय घेतला. मंजू भीतीने थर थर कापत जागच्याजागीच उभी होती. नागेश मंजूला धमकावत म्हणाला, ''बता देना अपने बाप को. अपनच उसका जवाई बनेगा.ऽऽ असे म्हणत नागेशने बाईकला कीक मारली व तो सुसाट वेगाने दिघोरीकडे निघाला.

मागील दोन वर्षांपासून नागेश मंजूच्या मागे लागला होता. मंजू दिसायला सुंदर, साधीभोळी असली तरी अभ्यासात हुशार होती. इतर मुलींसारखं मुलांच्या नादी लागून तिला आपले आयुष्य बर्बाद करायचे नव्हते. म्हणून मंजूने नागेशला वारंवार नकार देऊनही तो मंजूचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. आज मात्र त्याची हिम्मत खूपच वाढली होती.भर रस्त्यावर त्याने मंजूचा विनयभंग केला होता.

मंजूने कॉलेजला न जाता तिच्या वडिलांना फोन करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. तिने वडिलांसोबत सक्करदरा पोलिस स्टेशन गाठले व नागेशच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली. पोलिसांनी नागेशवर गुन्हा दाखल करून सायंकाळी त्याला ताब्यात घेतले.

नागेश गजाआड झाल्याचे कळताच मंजूूने सुटकेचा श्वास सोडला. दुस-यांदा मंजूने नागेशची पोलिसात कम्प्लेन्ट करून त्याला गजाआड केले होते. पण नेहमीसारखा नागेश लगेच जमानतीवर सुटून आला व पुन्हा रोमियोगिरी करू लागला.

दस-याच्या दिवशी तर नागेशने कहरच केला. तो आपल्या टारगट मित्रांसोबत मंजूच्या घरी आला. चाकूचा धाक दाखवत तिच्या आई-वडिलांना व भावाला धमकावत त्याने मंजूचा हात पकडून तिच्या बोटात सोन्याची अंगठी घातली व जबरदस्ती तिला किस केले. तिच्या वडिलांच्या पुढे चाकू नाचवत धमकावत नागेश म्हणाला,''सुन बे बुड्ढे, आज मैंने तेरी लडकी से सगाई करली. अगले हफ्ते इसी दिन तेरी लडकी को लेने आऊंगा. अपनी लडकी को दुलहन बनाके सजाके तैयार रखना...चलो रे!ऽऽ म्हणत तो आपल्या टोळीसह मंजूच्या घरून निघाला....नागेशच्या धमकीने घाबरलेल्या मंजूच्या परिवाराने पुन्हा सक्करदरा पोलिस स्टेशन गाठले व नागेशच्या विरोधात तक्रार नोंदविली...पुन्हा पोलिसांनी नागेशला गजाआड केले....


आठ दिवसानंतर मंजू नेहमीसारखी तयार होऊन कॉलेजला जायला निघाली. तिने आपली स्कूटी गेट बाहेर काढली. तोच नागेश तिथे येऊन धडकला. ''ये मंजू, मैंने तेरे बापको समझाया था कि अपनी लडकी को दुलहन बनाके सजाके तैयार रखना , मैं लेने आऊंगा...देख मैं आगया.ऽऽ  म्हणत नागेशने मंजूचा हात पकडला व तिला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला. मंजू नागेशच्या अशा अश्लील व्यवहाराला कंटाळली होती. तिच्या अंगात दुर्गा संचारली. तिने हिम्मत एकवटून दोन-चार ठोसे नागेशच्या थोबाडीत देऊन  त्याला दिवसातच तारे दाखविले होते. दोन ठोस्यातच तिने त्याचे समोरचे दोन दात पाडले होते. कॉलेजमध्ये घेतलेले बॉक्सींगचे प्रशिक्षण इथे तिच्या कामी आले. तिच्या या रौद्र अवताराला पाहून नागेशही गांगरून गेला होता...रागाने लालबूंद झालेल्या मंजूने जवळच क्रिकेट खेळणा:या मुलांच्या त्रिफळ्यातील एक स्टम्प उचलला आणि नागेशच्या पायावर, पाठीवर एका मागोमाग एक वार करत त्याची मस्तीच जिरवून टाकली. नागेश मार खात असल्याचे पाहून आसपास असलेले त्याचे चमचे  तिकडच्या तिकडेच पसार झाले. नागेश मंजूच्या पाया पडून क्षमायाचना करू लागला,''मेरी बहना माफ कर...अब मैं किसी लडकी को नहीं छेडूंगा....बघ्यांची तोबा गर्दी जमली होती...कुणीतरी सूचना दिल्यामुळे घटनास्थळी पोलिसही दाखल झाले...पोलिसांनी नागेशला ताब्यात घेऊन त्याला मेडिकलला पा'विले...पोलिसांनी मंजूविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची कार्रवाई सुरू केली पण जमावाचा रोष पाहून त्यांनी काढता पाय घेतला...मंजूने रोडरोमियोची धुलाई करून अद्दल घडविल्यामुळे सर्वांनी तिचे कौतुक केले...त्या दिवसांपासून कॉलेजला जाणार्या मंजूला पाहून टांटिंग करणे तर दूरच नागेशच्या टोळीतील टारगट मुलं तिला पाहताच आपले तोंड लपवायचे.



-कलाम अहमद खान

आदर्शनगर, उमरेड रोड,नागपुर

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र...!- सौ.संगीता संतोष ठलाल



मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम 

त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा 

मानव रूपात जन्माला आले

त्यांचा त्याग जाणून घ्यावा

अनेकदा वाचण्यात येते की, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र हे, भगवान विष्णूचा सातवा अवतार होते.  माता कौसल्या व महा पुण्यवान राजा पिता दशरथ यांच्या पोटी प्रभूने जन्म घेतला. खरंच ते, माता आणि पिता किती पुण्यवान असावेत.  ती विश्वात गाजून गेलेली अयोध्या नगरी धन्य झाली ही भारतभूमी धन्य झाली पित्याच्या वचनाचा पालन कर्ता आदर्श पुत्र, आदर्श राजा आणि आदर्श पती म्हणून ओळखले जाते.मर्यादा ठेवून कशाप्रकारे जीवन जगले पाहिजे हे प्रभू    श्रीरामचंद्राच्या संपूर्ण जीवन चरित्रातून दिसून येते. म्हणतात ना की, नियतीच्या पुढे कोणाचे चालत नाही तसेच प्रभूच्या  बाबतीत सुद्धा  झाले. राज्याचा पुत्र असताना सुद्धा चौदा वर्षाचा वनवास  पत्नी  देवी सीता व बंधू लक्ष्मण सहीत हसत, हसत  राजमहाल,राजथाट सोडून वनवासात निघून गेले.



 प्रभू  श्रीरामाच्या या महान त्यागातून आजच्या समाजाला   खूप काही शिकवण  मिळते. आजकाल बघितले तर समाजातील काही  लोक धनसंपत्तीच्या मोहापायी एकमेकांना मारहाण करतात, एकमेकांचा जीव घेतात, एवढेच नाही तर सारी मर्यादा पार करतात अशा विकारी ,विचारी माणसांनी एकदातरी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्राना वाचायला शिकले पाहिजे. धन आणि दौलत कितीही असले तरी ते, शेवटपर्यंत टिकून राहत नाही मात्र इतरांच्या सुखासाठी स्वतः कशाप्रकारे त्याग करून जगले पाहिजे ही शिकवण प्रभूच्या जगण्यातून दिसून येते म्हणूनच म्हणतात की, 'त्यागा मधूनी पुण्य मिळे' आज याच महान त्यागातून प्रभूला वनवासात अनेक तपस्वी ऋषी, मुनी़ंचे आशीर्वाद मिळाले एवढेच नाही तर त्यांच्या पदस्पर्शाने जमीनीवर शिळा होऊन पडलेल्या सती अहिल्येचा उध्दार झाला. किती ते पुण्यवान राजा असावेत ज्यांची अनेक वर्षापासून  तपस्वी ऋषीमुनींनी दर्शन घेण्यासाठी वाट बघत होते. त्यात अशी एक महा तपस्वी असलेली 'शबरी' होती अनेक वर्षापासून प्रभू येण्याची वाट बघत होती आणि दररोज आपल्या झोपडीच्या समोर अंगणातून फुलांची सजावट करत होती तिचे संपूर्ण आयुष्य रामनाम जप करण्यात गेले.  जेव्हा, प्रभू श्रीरामचंद्र बंधू लक्ष्मण सहीत सीतेच्या शोधात निघाले होते तेव्हा,  अचानक एक दिवस त्या महा तपस्वी शबरीच्या झोपडीजवळ पोहोचले असता.त्या मातेने प्रभूला ओळखले आणि माझ्या प्रभूला काहीतरी  खाऊ घालण्यासाठी म्हणून बोरी तोडायला गेली. गोड बोरी असल्यास चाखून टोपलीत ठेवायची आणि आंबट बोरी असल्यास ती फेकून द्यायची त्या मातेने प्रभूचे स्वागत नुसते फुलांनीच केले नाही तर आपल्या अश्रूने ते पावन चरण धुतले आणि तिच्यातील अफाट भक्ती, विश्वास, स्नेह, त्याग, प्रामाणिकपणा बघून प्रभूने उस्ट्या बोरी  मोठ्या आवडीने खाल्ले विचार  करण्याची गोष्ट आहे जो माणूस सत्कर्माने  स्वंयम प्रकाशित असतो त्याच्याजवळ कोणताही जात, धर्म, पंथ नसतो तर त्याच्यातील माणुसकी ही सर्वात श्रेष्ठ असते तो क्षण आणि ती माया आणि तो आदर आजच्या या भूतलावर राहणार्‍या प्रत्येक मनुष्य प्राण्याला माणुसकी धर्माची शिकवण देणारा आहे. 

रामनामाचा जप करती 

रामनामात तल्लीन झाले 

आदर्श, कीर्तीवंत राजाराम

तिन्ही लोक राममय झाले



ज्याच्या मनात सकारात्मक विचार असतात, सर्वाप्रती प्रेम असतो, आपुलकी असते, मर्यादा असते, माणुसकी धर्म असतो, त्याग असते,बलिदान असते, सत्य बोलण्याची ताकद असते, सत्याच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न असतो, मनात भक्ती असे, संघर्षाला गुरू मानतो, दया, क्षमा, शांती, नि:स्वार्थ भावना असते, इतरांप्रती सदभावना असते आणि व्यर्थ गोष्टींकडे जो लक्ष देत नाही अशा माणसावर खर्‍या अर्थाने प्रभूची कृपादृष्टी असते. आणि याच गुणांकडे बघून प्रभू त्यावर प्रसन्न होतात. प्रभू श्रीराम चंद्रानी राजा निषाद यांना आपला मित्र मानले,  सोबतच बघितले तर पंढरपूरी राहणार्‍या  विठूरायांनी सुद्धा  संत चोखामेळा या महान भक्ताला आपलेसे करून घेतले कारण त्यांचे मन हे सदैव निर्मळ होते. ते आपले कर्म करताना क्षणभर सुद्धा ईश्वराला विसरले नाही म्हणून संत चोखामेळा म्हणतात की, 'टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची' त्यांच्यात ईश्वराप्रती किती भक्ती असेल. ..? की, प्रभूनी त्यांची जात धर्म बघितले नाही तर त्यांचे सकारात्मक विचार बघून त्यांच्यात एकरूप झाले आज सारा विश्व त्यांच्या नात्याला ओळखत आहे.  प्रभू हा चरचरात वास करतो, पशू, पक्षात,झाडांझुडपात असतो, सर्वांमध्ये असतो मात्र आपण त्यांची महिमा ओळखत नाही. हिरवेगार झाडांवर वार करून झाडे तोडत असतो हे किती निर्दयीपणा म्हणावे...? खरंच ह्या निर्दयी माणसांवर प्रभूची कृपादृष्टी होईल...?  रामनाम असे हे एक  श्रेष्ठ  नाव आहे की माळेतील एकसे आठ मणी जपल्यासारखे होते.  रामनामाचा जप आणि गजर करणारे ऋषी मुनींनी रामायण नावाचा महान ग्रंथ लिहिला आज सारा विश्व वाचतो मात्र त्यातून प्रभू श्रीरामचा आदर्श घेत नाही ही आजची वास्तविकता आहे.  मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाला ओळखण्यासाठी आधी त्यांना वाचणे गरजेचे आहे तेव्हाच ते कळत असतात. पण,आजचा माणूस मात्र व्यसनाधीन होऊन जगत आहे, खोट्याला साथ देऊन स्वतःला धोका देत आहे, संस्कृती तर कमीच झाली मात्र स्वार्थ कुटून भरलेला दिसून येतो. कटकारस्थ्ाान संपण्याचा नावच घेत नाही. आणि दीन, दुबळ्यांची हाक कोणी ऐकेना अशी आजची परिस्थिती निर्माण झालेली बघायला मिळत आहे. म्हणून आज माणूस माणसात दिसत नाही आणि माणुसकी राहिली नाही तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम कुठून मिळणार...? रामनामाचा जप करण्यासाठी मन तेवढे निर्मळ असावे लागते त्यालाच प्रभू श्रीराम मिळतात. असे सत्कर्म करणारे आत्मे होते म्हणून ते राममय झाले आणि भवसागर पार केले.

राम नाव घ्यावे मुखी 

अन् सत्कर्म करावा

तेच होतील कर्म श्रेष्ठ 

अन् रामाला तेथेच पहावा

मनुष्य जातीत जन्म घेऊन सुद्धा  मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामानी  आपले कर्म अवतार संपेपर्यंत करत राहिले आणि या भूतलावर राहणार्‍या सर्वाना माणुसकीचा संदेश देत राहिले, खूप शिकवण दिली, स्वतः ईश्वर असताना सुद्धा  संघर्ष केले मात्र दु:ख देऊन कोणाला बोलले नाही ही शिकवण प्रभूची  फार मोलाची आहे.आजचा समाज मात्र कुठे जात आहे कळतच नाही. म्हणून राम हे पवित्र नाव मुखात सदैव ठेवावे आणि आपले सत्कर्म चालू ठेवावे. मनुष्य प्राण्याला माणुसकीची आणि आदर्श व्यक्ती म्हणून कशाप्रकारचे बनले पाहिजे ही प्रभू रामाकडून मिळते.माणसं बरेच असतात पण, कधी काळी, माणसालाच 'देवमाणूस' म्हणून पुजले जाते हे फुकटच नाही. म्हणून राम हे एक महान नाव मुखात ठेवून माणसासारखे जगण्याचा प्रयत्न करावा.



- सौ.संगीता संतोष ठलाल

मु. कुरखेडा जि. गडचिरोली

मो. ७८२१८१६४८५


धम्मचक्र प्रर्वतन दिन-समतेचा नवा उषःकाल- संगीता बोरकर-बांबोळे




बौध्द परंपरेत विजयादशमीला धम्मचक्र प्रर्वतन दिन म्हणून विशेष महत्त्व दिले आहे. आणि हा दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. १४ ऑक्टोबर १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील दिक्षाभुमीवर लाखो अनुयायांसोबत बौध्द धर्माची दिक्षा घेतली होती. तेव्हापासून भारतीय समाजजीवनात नवा अध्याय सुरू झाला. हा दिवस सामाजिक समतेचा, बंधूभावाचा व मानवतेच्या मुल्यांचा दीपस्तंभ ठरला. आणि तोच दिवस म्हणजे विजयादशमीचा दिवस होता.

बाबासाहेबांनी आयुष्यभर अस्पृश्यता, विषमता आणि अन्याय विरूद्ध लढा दिला. हिंदु धर्मातील जातीव्यवस्था आणि असमानतेतून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी शेवटी बौध्द धर्म स्वीकारला. बौध्द धर्मात समता, करूणा, मैत्री आणि प्रज्ञेचा सुंदर संदेश आहे. 'मानवाने मानवाशी समता राखली पाहिजे' ही बाबासाहेबांची ठाम धारणा होती. त्यांच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा केवळ धार्मिक स्वीकार नव्हता, तर तो सामाजिक न्यायाचा आणि विचारस्वातंत्र्याचा मार्ग होता.

धम्मचक्र प्रर्वतन दिनाच्या दिवशी दरवर्षी लाखो अनुयायी दिक्षाभुमीवर एकत्र येतात. त्या दिवशी केवळ बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव होत नाही, तर बौध्द धर्माच्या मुल्यांची आठवण करून देत नवी प्रेरणा मिळते. समाजात बंधूभाव, प्रामाणिकपणा, कष्टाची गोडी आणि एकतेची भावना जागवण्याचे काम हा दिवस करतो. दिक्षाभुमीवर उभे राहून लाखो लोक बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करतात आणि आपल्या कृतींनी त्या विचारांना जिवंत ठेवण्याचा संकल्प करतात.आजच्या काळातही विषमता, अन्याय, भेदभाव यांचे आव्हान समाजासमोर उभे आहे. विज्ञान, पैसा, तंत्रज्ञान यांची झपाट्याने वाढ झाली आहे; पण माणसामाणसातील दरी अजूनही संपलेली नाही. अशा परिस्थितीत धम्मचक्र प्रर्वतन दिन आपल्या स्मरण करून देतो की खरी प्रगती फक्त साधनसंपत्ती आणि यंत्रांच्या वेगाने होत नाही, तर ती समता, बंधुता आणि न्याय यांच्या आधारावर घडते.

जर बाबासाहेब आजच्या घडीला आपल्यासमोर असते, तर त्यांनी नक्कीच धम्मकृतीची नवी दिशा दाखवली असती. ते सांगितले असते की बुद्धाचे धम्म केवळ ग्रंथात किंवा यत्रांमध्ये शोधायचा नाही, तर तो आपल्या कृतींमध्ये उतरवायचा आहे. पर्यावरण रक्षण, स्त्री-पुरुष समता, आर्थिक असमानतेविरुद्ध लढा, शिक्षणातील समान संधी, तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून मानवी विकास—या सर्वच क्षेत्रात धम्मकृती घडवणे आजची खरी गरज आहे. ‘समानतेवर आधारलेला समाज उभारल्याशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण राहते’ हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रखर आहे.


धम्मकृती म्हणजे केवळ उपदेश नव्हे; ती म्हणजे दररोजच्या आचारात, नात्यांमध्ये, कामधंद्यात समतेचा आणि करुणेचा प्रकाश पेरणे होय. बाबासाहेबांचा संदेश आपल्याला आवाहन करतो की जातीभेद, धर्मांधता आणि अन्यायाविरुद्ध लढा देताना आपण रागाने नव्हे तर प्रज्ञा, मैत्री आणि करुणेच्या भावनेने उभे राहावे. डिजिटल युगातील विषमता—शिक्षण, रोजगार, माहिती यामधील दरी—ही सुद्धा त्यांच्यासाठी लढ्याची नवीन भूमी असती.धम्मचक्र प्रर्वतन दिन हा केवळ एका धर्माचा दिवस नसून तो सामाजिक क्रांतीचा प्रारंभबिंदू आहे. सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा ऐतिहासिक दिवस आहे. बाबासाहेबांचे विचार आठवून आपण प्रत्येकाने मानवतेच्या मुल्यांवर चालत राहावे, हीच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी आणि त्यांच्या कार्याला पुढे नेणारी खरी कृती ठरेल. धम्मकृतीच्या या प्रवासात प्रत्येकाची जबाबदारी आहे—आपण कुठल्याही पदावर, कुठल्याही स्तरावर असलो तरी समतेच्या बिजांची पेरणी करणे हेच खरे धम्मकार्य ठरेल.

                                                                        



- संगीता बोरकर-बांबोळे 

गोंडपिपरी, जि. चंद्रपूर

मो. ९४०५७१८४६३

विजयादशमी : दृष्टप्रवृत्तीचा नाश करून मिळालेला विजय-- रमेश कृष्णराव लांजेवार




लंकापती रावन हे महान राजनितिज्ञ व पराक्रमी राजा होते म्हणूनच त्यांना लंकापती रावण संबोधले जायचे.परंतु त्यांच्यात काही दृष्ट व वाईट प्रवृत्ती होत्या.त्यांनी माता सीतेचे हरण करून राक्षसीप्रवृतीचा आगास केला. हा त्यांचा सर्वात मोठा गुन्हा होता आणि यातुनच लंकापती रावण परास्त होण्याला सुरूवात झाली.यानंतर रावणाने पुर्णपणे अधर्माचा मार्ग पत्करला अधर्माचा मार्ग सोडण्यासाठी देवी-देवता, आप्त-नातेवाईक, राजनैतिज्ञ गुरूसह अनेकांनी प्रयत्न केले. परंतु रावणाच्या अहंकारापुढे संपूर्ण प्रयत्न निष्फळ ठरले व सीतेला हस्तगत करण्याच्या जीद्दीने रावणाने आपल्याच संपूर्ण कुळाला युध्दाच्या खाईत लोटले व लंकापती रावण यांच्या सर्वनाशाची आकाशवाणी झाली.हळूहळू संपूर्ण मोठ-मोठे बलाढ्य शुरविर धाराशाही झाले.यात मुख्यत्वेकरून मेघनाथ, कुंभकर्णासारखे महाबलशाली यांनाही रावणाने मृत्यूच्या खाईत लोटले. त्याच प्रवृत्तीचा नाश करण्यासाठीच प्रभुश्रीरामचंद्र हे धरतीवर अवतरले व रावणाच्या वाईट प्रवृत्तीचा रामानी वध केला.

 विजयादशमी म्हणजे असत्याचारावर सत्याचा विजय, अशुध्दतेवर शुध्दतेचा विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय,अमानुषतेवर मानवतेचा विजय, निसर्गाचा होत असलेला ह्रास टिकवुन ठेवण्यासाठी वृक्षलागवड करणे हाही विजयच, म्हणजेच आत्म्यातील रावणाचे दहण करुन रामाने सांगितलेला सत्याचा मार्ग अवलंबने हाच खरा सण विजयादशमी  होय. राम हे आदर्शपुरुष त्यामुळेच भारताने नेहमी आदर्शाचीच भुमिका जोपासली आहे.तेव्हाच भारतात सर्व धर्म समभाव दिसून येतो. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतित सर्वात महत्वाचा आणि शुभ दिवस म्हणजे 'विजयादशमी' साडेतिन मुहुर्तापैकी एक असे या दिवसाला आगळेवेगळे महत्व आहे. घटस्थापनेपासुन तर दस-यापर्यत संपूर्ण भारतात उत्सहाचे,आनंदाचे व मांगल्याचे वातावरण आपल्याला पहायला मिळते व याच दिवसापासुन दिवाळीचा शंखनाद संपूर्ण भारतात गुंजतो. नवरात्र उत्सवामध्ये देवीची ९ दिवस आराधना करून नवरात्र उत्सव साजरा केला जातो व दशमीला म्हणजेच विजयादशमीला दसरा उत्सव मोठ्या थाटात भारतभर साजता केला जातो. हा दीवस म्हणजे असुरीशक्तीचा नाश व सत्याचा विजय मानले जाते. 



दशमीला प्रभुरामचंद्राने रावणाच्या वाईट प्रवृत्तीचा संहार करुण असुरीशक्तीला संपवुन मानवतेचे रक्षण केले. त्या निमित्यानेच विजयादशमी उत्सव साजरा केला जातो. याच दीवशी मॉ जगदंबेने अनेक राक्षसाचा वध करुण विजय प्राप्त केला. त्याच प्रमाणे पांडव अज्ञातवासात असतांना पांडवांनी 'शम्मीच्या' झाडावर लपविलेली शस्त्रे याच दीवशी काढण्यात आली व याच दीवशी रामाने रावणाच्या वाईट प्रवृत्तीचा वध करुन विजय प्राप्त केल्याच्या अनेक कथांमध्ये व पुराणांमध्ये आपल्याला पहायला मिळते. त्याच अनुशंगाने विजयादशमीला सोण्याच्या(आपट्याच्या)पाणाला तीतकेच अतुट महत्व आहे. सोण्याचे पान एकमेकांना देवुन आनंदोत्सव साजरा करतात व लहान-मोठ्यांना शुभेच्छा व आर्शिवाद देतात. त्याचप्रमाणे दसर्‍याच्या दिवशी सर्वसामान्य व शेतकरी आपल्या उपयोगात येणार्‍या संपूर्ण शस्त्रांची (साहित्याची)पुजा करतांना फुलांसोबत सोण्याचे पाणांनी पुजा अर्चना केली जाते. यावरुन आपण समजु शकतो कि, सोण्याच्या पाणाला विजयादशमीच्या दिवशी कीती आगळेवेगळे महत्व आहे. 

देशात वाढते प्रदुषण पहाता विजयादशमीचे औचित्य साधून प्रत्येकांनी वृक्षलागवडीकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.कारण प्रत्येक झाडात,फुलात,फळात, मुळात देवीदेवतांचा वास असतोच.त्यामुळे वृक्षलागवडीने देवीदेवतांचे दर्शन अवश्य होईल सोबतच सर्वांना शुध्द हवा, ऑक्सिजन मिळेल व संपूर्ण जीव-जंतुंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होईल.सोबतच गुरांना चारा व सावलीचा आनंद घेता येईल.अशाप्रकारे  सर्वत्र उत्साहाचे आणि मांगल्याचे वातावरण वृक्षलागवडीमुळे दिसून येईल.  दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!



- रमेश कृष्णराव लांजेवार

(स्वतंत्र पत्रकार),नागपूर

मो.नं.९९२१६९०७७९

बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

लघुकथा : लुकाछिपी_कलाम अहमद खान



मी नाही कोठे म्हणतो पण कामसूत्रही सोबत बसून पाहावं का दीर-भावजयनं ?... भाऊ जांगडबुत्ता जमला त्यांचा परशाचं. मले सांगत होता. अबे बंड्या, तू तर मोबाईलवर डुप्लिकेट व्हिडियो पायतेस. मी तर वयनीच्या आंघोळीची ओरीजनल व्हिडियो क्लीप बनवली. आपला दोस्त आहे तो, त्यानं दाखवलं मले.’’ बंडू उत्साहाने म्हणाला. 


रविवारची दुपार. अकरावित शिकणारा प्रकाश जेवण आटोपून आपल्या नेहमीच्या अड्ड्याकडे निघाला. तो मारुतीच्या देवळात आला. पिंपळाच्या सावलीत चबुतर्‍यावर बसला. सवयीप्रमाणे त्याने खिशातून टचस्क्रीन मोबाईल काढला. स्क्रीनवर बोट फिरवित इंटरनेट सर्विस वर क्लीक केले. लागोपाठ अनेक पोर्न साइट्स ओपन झाल्या. तो आवडीनुसार व्हीडियो क्लीप डाऊनलोड करू लागला. प्रकाश उर्फ पक्याचे समवयस्क मित्र गावच्या सीमेवर असलेल्या मारोतीच्या देवळाच्या परिसरात जमायचे. इथे ते अश्लील व्हिडियो क्लीप ब्लूटुथने एकदुसर्‍याच्या मोबाईलवर सेंट करायचे, हा त्यांचा फावल्या वेळेतील ठरलेला कार्यक्रम.

 '‘ओय पक्या !'‘ असा कुणीतरी आवाज दिल्याने मोबाईलमध्ये मान खुपसून बसलेल्या प्रकाशची तंद्री भंगली. त्याने मान वर करून आवाजाच्या दिशेने पाहिले. समोर बंडू उभा होता..

‘'अबे बंड्या, तू इथे कसा? पोलिसांनी पकडून नेलं होतं ना तुला. लवकरच आलास सुटून?‘‘

दहावित शिकणारा विद्यार्थी बंडू पक्याजवळ येऊन बसला. पक्या त्याला नुकतेच डाउनलोड केलेले व्हिडियो दाखवू लागला ... शीला की जवानी, प्यासी भाभी, मदमस्त पड़ोसन वगैरे वगैरे.... ‘'बंड्या, भाभी म्हणजे वहिणी, देवर म्हणजे दीर....दीर-भावजय खरंच असं करतात काय रे?'‘ पक्याने आणखी एक क्लीप डाऊनलोड करत प्रश्न केला.


‘‘मग काय, व्हिडियोत दाखवतात ते खोटं काय? परशाचं तर तसंच आहे. त्याचा भाऊ कामावर गेल्यावर दीर-भावजय दोघेही बसतात मोबाईल इचकत, मला दाखव मला दाखव म्हणत...’’


‘'त्यात काय बिघडलं. हासी-मजाक चालते दीर-भावजयत !’’


'मी नाही कोठे म्हणतो पण कामसूत्रही सोबत बसून पाहावं का दीर-भावजयनं ?... भाऊ जांगडबुत्ता जमला त्यांचा परशाचं. मले सांगत होता. अबे बंड्या, तू तर मोबाईलवर डुप्लिकेट व्हिडियो पायतेस. मी तर वयनीच्या आंघोळीची ओरीजनल व्हिडियो क्लीप बनवली. आपला दोस्त आहे तो, त्यानं दाखवलं मले.’’ बंडू उत्साहाने म्हणाला. 


‘'बॉडी मस्त आहे यार परशाच्या वहिणीची. समोर दिसली की नुसतं पाहावसं वाटतं.’’


’’परशाच्या वयनीची बॉडी सोड. आपल्या शाळेतच्या मुलींची व्हिडियो क्लीपच दाखवता तुले’’...असं म्हणत बंड्याने आपला मोबाईल ऑन केला. स्क्रीन वर बोट फिरवत मोहल्ल्यातील दोन-तीन मुलींची व्हिडियो क्लीप पक्याला दाखवत म्हणाला, ‘‘ही प्रियंका नववीची...ही शालू आठवीची... आणि ही अल्का आपली जान...हीनेच पोलिसात तक्रार दिली होती.’’


‘'बरोबर आहे तिचं. तू बळजबरी करशील तर ती चूपचापच राहील?’’


तोंडातील खर्रा पचकन थुकत बंडू म्हणाला, 'भोळा आहेस पक्या तू. अरे आपल्यापेक्षा मुलींनाच हे पाहिजे असते. पण त्या बोलून दाखवत नाही. इशारा समजावा लागतो. सांगतो तुला सर्व हकीकत...!’’

पाकीटातील सिगरेट काढून लायटरने पेटवत बंड्याने एक दम भरला व धूर पक्याच्या तोंडावर सोडला. पक्याने खोक् खोक् करत तोंड बाजूला केले. त्याची अवस्था पाहून बंड्या हसू लागाला.

'नाही जमायचं तुला... बच्चा आहेस अजून....तर ऐक सांगतो... बुक मागण्याच्या बहाण्याने मी गेलो होतो अल्काच्या घरी. तीचा बाप गेला होता कामावर. माय गेली होती बाजाराला. एकटीच होती अल्का घरी. संधी पाहून डाव साधला... पण तेवढ्यात तिची माय आली आणि पकडलं रंगेहाथ आम्हाला. अल्का चोरावर शिरजोर होत रडत-रडत बिलगली मायला. म्हणाली बंड्याने बळजबरी केली माझ्यावर... अल्काच्या मायनं हाणली माझ्या थोबाडावर पण निसटलो तिच्या तावडीतून....’’


‘‘पोलिस मारतात काय रे असं केल्यावर. तुरुंगात ठेवतात म्हणे बंद करून. असं मी ऐकलं आहे.’’ पक्या प्रश्नार्थक नजरेने बंडूकडे पाहत म्हणाला.


आपले ज्ञान पाजळत बंडू म्हणाला, ‘‘पक्या तुला सांगतो. जे वयस्क असतात त्यांनाच पोलिस पकडून नेतात, बाजीरावने बदळतात...’’


पक्या मधातच बोलला, ‘‘बाजीराव म्हणजे?‘‘


'अबे पक्या, तुले काहीच समजत नाही. बाजीराव म्हणजे पोलिसांचा बदळण्याचा खास पट्टा... आता पुढचं सांगू का नाही...’’ म्हणत बंड्या त्याचावर खेकसला.

‘‘बरं बरं सांग, बंडू भाऊ!’’ पक्या विनवणीच्या स्वरात बोलला.


बंडू सांगू लागला, ‘‘आपल्यालाही मोठ्यासारखं खेळता येते. त्यांना जेवढं समजते तेवढं आपल्याही समजते. आपण जर काहीही केलं तरी ठेवतात आपल्याला बाल सुधारगृहात.’’


पक्याने पुन्हा प्रश्न केला, ‘‘बाल सधारगृह म्हणजे?’’


बंड्या पक्वाच्या अज्ञानाची कीव करत त्याला म्हणाला, ’’बाल सुधारगृह म्हणजे आपल्या गावतील आश्रमशाळेसारखी शाळाच रे. फरक एवढाच की तिथले सर्व विद्यार्थी बाल गुन्हेगारच असतात. काही दिवस ठेवतात आणि सोडून देतात.’’ बंड्या कॉलर टाईट करत म्हणाला.


‘‘ये बंड्या, मला पटवून दे ना एखादी अ‍ॅटम, तुझ्या मोहल्ल्यातील सोनीया आवडली मला.’’


बंड्या पक्याला दम देत म्हणाला, ‘‘पक्या, सोनी आपला माल आहे. तिच्यावर लाईन मारायची नाही. दुसरे अ‍ॅटम शोधायचं. बच्चा आहेस तू. बाकी खेळ जमायचे नाही तुला. तू लहान पोराबरोबर लुकाछिपीच खेळ’’ असे म्हणत बंड्या घराकडे निघाला. पक्या पुन्हा खाली मान घालून मोबाईल इचकत बसला.


००

पक्या नेहमीसारखा मारोतीच्या देवळाकडे निघाला. पक्याच्या घराशेजारची लहान मुलं-मुली लुकाछिपी खेळत होते. पक्याला बंड्याचे शब्द आठवले. त्याला एक युक्ती सुचली. त्याला बंड्याला सांगायचे होते की आता तो बच्चा राहिला नाही. त्यालाही खेळता येतं.. पक्या लहान म्ाुलांत मिसळला व लुकाछिपीचा खेळ खेळू लागला. खेळता-खेळता पक्याने पाचवित शिकणार्‍या बालीला विश्वासात घेतले. आपण दोघं दूर असे लपून जाऊ की कुणी आपल्याला शोधू शकणार नाही. इतर मुलं-मुली इकडे तिकडे लपले. पक्याने बालीचा हाथ पकडला व तिला घरी आणले. पक्याचे आई-बाबा काही कामानिमित्त बाहेर गेले होते. पक्याच्या घरी आल्यावर बाली पक्याला म्हणाली, ‘‘प्रकाश दादा, आपण कुठे लपायचं ? ’’

  पक्याने दरवाजा बंद केला व बालीला कडेवर उचलून तिला मधल्या खोलीत असलेल्या बिछाण्यावर झोपवले. तो तिच्या बाजूला झोपला.

‘'आपण इथे लपायचं आणि वरून चादर पांघरून घेऊ म्हणजे कुणालाही दिसणार नाही.’’ असे म्हणत वरून चादर पांघरली. पक्या बालीला जवळ ओढून पटापट मुके घेऊ लागला.

‘'प्रकाश दादा, असे मुके का घेतोस? गाल आणि ओठ दुखतात ना.’’

‘‘अगं लाड करतोय तुझा. तुझे आई-बाबा नाही करत ?’’

‘‘करतात ना पण असे चावत नाहीत.’’

''आता गप्प राहायचं, ओरडायचं नाही’’ असे म्हणत पक्याने आपली इच्छापूर्ती केली...रडणार्‍या बालीला चॉकलेट देत म्हणाला, ’’आपण इथे जो खेळ खेळला ते कुणालाही सांगायचं नाही. कुणाला सांगीतलं तर तुझे आई-बाबा मरून जातील. असा नियम आहे खेळाचा. समजलीस. जा आता घरी.’’ असे म्हणून तिला घरी पाठवले. आपण खेळलेल्या खेळाची मोबाईलमध्ये रिकार्डिंग बरोबर झाली की नाही म्हणून त्याने खात्री करून घेतली व मोठा पराक्रम गाजविल्याच्या आविर्भावात तो बंड्याच्या घराकडे निघाला.....

   बाली घरी आली. तिची अवस्था पाहून आई शालिनीला संशय आला. तिने बालीला विश्वासात घेऊन विचारले तेव्हा बालीने रडत-रडत सर्व हकीकत कथन केली. हे ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचली. साधाभोळा दिसणारा, अभ्यासू असणारा गुरुजींचा एकुलता एक मुलगा असं काही करू शकतो यावर शालिनीचा विश्वासच बसेना; पण जळजळीत वास्तव तिच्या समोर होतं. मुलीला घेऊन शालिनीने गुरुजींच्या घरावर धावा बोलला पण घरी कुणीच नव्हते. शालिनीने पती श्यामला फोन करून ताबडतोब घरी यायला सांगीतले.

   श्याम घरी आला. शालीनीने सर्व हकीकत श्यामला सांगीतली. तिच्या दारात मोहल्ला जमा झाला होता. श्याम आणि शालिनीने मुलीला सोबत घेऊन पोलिस स्टेशन गाठले. पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी वरिष्ठांशी चर्चा करून, बालीची वैद्यकीय तपासणी करून प्रकाशवर बाल लैंगीक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल केला...पुढे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. वाईट संगत व मोबाईलच्या दुरुपयोगाने होतकरू हुशार विद्यार्थ्याचे भविष्य अंधकारमय झाले होते.



- कलाम अहमद खान

२५, डी, आदर्शनगर, उमरेड रोड, नागपूर-440024

मो.9657347688

-----------


खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...