शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

" आत्मसुद्धी तुन जीवनाचा उद्देश सफल व्हावं.".



 रमजान मुबारक 2026 *रोजा; नंबर 0 9 वा.

शुक्रवार दिनांक 27 -02-2026

विषय:- रोजा :-" आत्मसुद्धी तुन जीवनाचा उद्देश सफल व्हावं.".


पैगंबर मुहम्मद स्व.चे सहकारी, अबु हुरेरा (रजि )सांगतात  ,"!! रोजा एक प्रकारे गुन्हा न करण्याची  ढाल आहेत,"!!

 रोजाच्या स्थितीत तुम्ही कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी, गुन्हा  करुच शकत नाही,  ; गुन्हां - अपराध करण्याचे विचार सुध्दा करु शकत नाही,  तुमच्या बरोबर भांडणं - अपशब्द वापरत असेल तर, त्या व्यक्तीस सरळ सांगा  ,  " मै - रोजे- से - हुं "( मला उपवास आहेत,) तर समोरील व्यक्ती  अपशब्द- भांडण करणारा  गुन्हा करणार नाहीत,  हे जाणून ही त्याने अपशब्द वापरले तर ;  ती व्यक्ती फार मोठ्या पापांचे  भागिदार होईल."( हादिस : सहीह बुखारी हा.न.१८९४).

जीवन ईश्वराचे सर्वश्रेष्ठ वरदान आहे. जीवनाचा प्रत्येक क्षन अमूल्य आहे. गेलेला क्षण कोणत्याही परस्थिती पुन्हा कधीच मिळणार नाही. म्हणून प्रत्येक क्षण जगता आला पाहिजेत. प्रत्येक मनाव हा अल्लाह ईश्वरराचा प्रतिनिधित्व करतो. निर्मिक (अल्लाह ईश्वर )नें सृष्टीतील प्रत्येक अनु रेणूला देखील अस्तिव दिलं आहे. प्रत्येक अनु रेणू हा महत्वाचं आहेत.प्रत्येकाला काही नां काही उद्देश दिलेलं आहेत. ते एका विशिष्ट तत्वावर कार्यरत आहेत.

दिव्य कुर आन म्हणतं, " आम्ही मानवाला उत्तम आकार देवून निर्माण केलेले आहेत. "त्याला चांगले वाईट समजण्या साठी त्याला बुद्धी दिली, चांगलं वाईट पारखण्यासाठी क्षमता त्याच्या स्वभावात अंतर्भुत दिली,, त्याला आचार विचार करण्याचे स्वातंत्र्य दिलं, "

  जीवनरूपी विवेक बुद्धी ची परीक्षा आहेत की तो कोणता मार्ग स्वीकारतो. त्यासाठीच त्याला आम्ही मार्गदर्शनांची व्यवस्था दिव्य कुरआन हा ईश्वरी ग्रंथ पाठवून व प्रेषित पैगंबर च्या माध्यमातून त्यांच्या सफलतेसाठी सदाचार करण्यासाठी मार्गदर्शन मार्गदर्शक करण्यासाठी पाठवलं. जीवन सफल व्होवं म्हणून संपूर्ण व्यवस्था केली. हें त्यासाठी की या सर्व मार्गदर्शनाच्या प्रकाशात त्यानं प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या क्षमता व प्रतिभांचा सर्वत्कृस्ट उपयोग करून जीवन सफल करावं.

    नकळतपणे जें  चरस -गांजा -अफू च्या आहारी गेलेले असतील, दारु  पिऊन पडत असतील किंवा अनेक व्यसनांच्या आहारी गेलेले,  व्यसनाधीन ,त्यांच्यामुळे  घरात त्रस्त झालेल्या ,घरांची पैशाची राखरांगोळी केलेली - असेल, आशा बांधवांना, मित्रांना,रमजान महीना एक संधीच काळ चालून आलेला.   कुठल्याही खर्चाची गरज नाही, कुठल्याही  मोटीवहेशनल लिडर- - संमोहन तज्ञांची मदती शिवाय जडलेल्या घाणेरड्या व्यसनं सोडण्याची सुवर्ण संधी  सध्या  आलेली आहेत. मनापासून विचार करून इच्छा शक्ती निर्माण करण्याची .फक्त एकदा विचार करा . मनोमन तय्यार  व्हा...आज संधी उपलब्ध आहेत .        

    रमजान महिन्यातील अनिवार्य (फर्जं) केलेले पवित्र रोजे (उपवास) आहेत.  अल्लाह ( ईश्वर- भगवंत) ला संपूर्णपणे शरण जाणे, नितांत निष्ठा ठेउन सदाचाराने वागण्याची शपथ .त्यात एक चांगले काम हीं करू शकतात की  आहारी गेलेल्याजवळच्या मित्रांला या चांगल्या उपक्रमात सहभागी होण्यास आमंत्रित करू शकतात,  कारण अल्लाह (ईश्वर- परमेश्वर) हा कोणत्याही एका राष्ट्राचा किंवा धर्माचा नसुन ,  तो सर्व व्यापी सर्व जगाचा रब्बुल आलमीन आहेत,  

                 दिव्य कुरआन, ( सुरहा नं01 अल - फातिहा मध्ये), " जो सर्व सृष्टीचा पालनकर्ता आहे. "रुब आहेत.

     संत ज्ञानेश्वर महाराजांनीं, "  पसायदान " मध्ये,  "विश्वात्मक"असेच म्हणावे लागते, संपूर्ण सृष्टीचा  एकच रब( पालणकर्ता - भगवंत )आहे. हाच (ईश्वर) अल्लाह सृष्टीच्या आणि सृष्टीतील सर्व कणां- कणांचा निर्माता-  नियंता आहे.   



                  जर  पुन्हा नकळत  व्यसनांची आठवणी जाग्या झाल्या असतील तरी  पुन्हा वर्ष भर तुम्हाला आठवड्यातून दोन - तीन वेळा नफील( फायद्यासाठी ) रोजे ठेऊ शकतात.  बारा महिने विविध कारणांनी रोजे करत असतात . नफिल रोजे करण्याची पद्धत आहे . प्रेषीत मुहम्मद स्व.स्वतः सोमवारचा  व  गुरुवार व महीन्याच्या १४-१५-१६ तारखेलाही रोजा ठेवत. मुहर्रम च्या ९ वा, १० वा दिवस किंवा १०  व ११ व्या दिवशी ज्याला "  यौमें आशुराहा " चे रोजा आहे.   काही बंधू एक दिवसाआड ही रोजा करतात.

    नवसाचे हें रोजे असते, "नवस"  व्यक्त करतात  ,  नवस पुर्ण झाले तर   दोन - चार - दहा रोजे करून सत्कार्य करू, आपल्या इच्छेप्रमाणे मागणी करण्याची पध्दत आहे.  

काही कळत - नकळतपणे  चुका झाल्या असतील, चुकांच्या प्रायश्चित्त म्हणून किंवा स्वतः आत्मक्लेश म्हणून ही रोजा ठेवण्या बरोबरच  सदका (दान) गोरगरिबांना अन्न दान ,आर्थिक दान देण्याची.

जीवनरूपी हीं परीक्षा त्याच्या विवेकबुद्धीची परीक्षा आहेत की तो सत्यमार्ग स्वीकारतो की वाम मार्ग.??.  या सर्व मार्गदर्शन केलेल्या प्रकाशात सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये  संपूर्ण विचार करून जी व्यक्ती स्वतःला, त्याच्या निर्मिकला आणि जीवनाच्या महान उद्देशाला ओळखुन त्यानुसार आपल्या क्षमता व प्रतिभांचा सदुपयोग करते, तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने जीवनाचा उद्देश सार्थ करते.

तर अल्लाह ( परमेश्वर - भगवंत ) ला सृष्टीतील प्रत्येक  मानाव महत्वाचं आहे.  म्हणून  वाईट आचार विचार , राग - लोभ - मत्सर - अहंकार - मानसिकता याचं पुर्ण निर्मूलन करून जीवन सफल करावं.

नाहीं तर, " आणि त्या दिवशी ( कायमत - प्रलंयच्या- न्यायाच्या ) तुम्हाला दिलेल्या देणग्या बद्दल विचारले जाईल की, त्या (ईश्वर) अल्लाह च्या कृपा होत्या " काय केलं. ( दिव्य कुरआन 102 :8,).काय उत्तर द्याल.


(मित्रांनो लेख आवडला तर  मित्रांनां-  नातेवाईकांना जरूर पाठवा,  प्रतिक्रिया अवश्य कळवा.)



"इस्लाम समजून घेताना "

लेखन :- डॉ. सलीम शाहिदा सिकंदर शेख 

 बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना 

 श्रीरामपूर 

 जिल्हा :- अहमदनगर ( अहिल्यानगर,)

मोबाईल :- 9271640014.


गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०२६

तुम्ही स्वतः रोजा (उपवास ) करा ते तुमच्या साठी फायदेचे राहील, जर तुम्ही हें समजलात तर "

 


रमजान मुबारक 2026 रोजा नं. 8वा ,

 गुरुवार  दिनांक, 26-02-2026

रोजा :,!!'  तुम्हीं( स्वतः ) रोजा (उपवास ) करा ते तुमच्या साठी अधिक फायद्याचे आहेत , जर तुम्हीं हें समजलात तर !! ( दिव्य कुरआन 1 : 2 : 184).

  उन्हामध्ये रोजे  शारीरिक व मानसिक दृष्टीने खडतर परीक्षा घेणार,   अध्यात्मिक फायदे  मोजण्या पलीकडे  आहेत,  त्याबरोबर आरोग्य दायी फायदे तर अनेक हें जगातील अनेक देशात संशोधनातून सिद्ध केलेत. ,   रोजे ( उपवास ) होणार कसे??. प्रश्न -भरपूर असतात व असणार सुद्धा. उत्साहीं बंधूनी   चंद्र कोर बघून    वजन बघितली असतील -  शारीरिक तपासणी,   शुगर रेकॉर्ड, ब्लड प्रेशर, चरबी तपासून, थायरॉईड रिपोर्ट, विविध रिपोर्ट तपासून घेतले असतील,  मल्टिनेशन कंपनीचे  वजन(  weight reducing )कमी करण्याचं 100% गॅरंटी देणारे प्रॉडक्ट,   दहा पंधरा वर्षांपासून भारतात  फ्याड आलेलं  डाएटिंग, डाएट च, वेगवेगळे आहार तज्ञ वेगवेगळ्या प्रकारचे डाएट देतात कोणी दोन वेळा भरपूर जेवा मध्ये काहीच खाऊ नका, तर काही आहार तज्ञ सांगतात, दिवसभर ज्या कॅलरी (उषमांक ) लागतात, ते मोजून ठेवढे दिवसभर थोडं थोडं खा. असें भरपूर मजेशीर प्रयोग चालू असतात,त्यातूनच व्यवहार इस्पित.  बुद्धी मान व्यवसायिक  चैन सिस्टिम च्या अनेक स्किम्स... यातून साध्य काय??  रिझल्ट काय??. अनेकानां  पडलेलं प्रश्न -कोडं.

उत्तर  शोधता शोधता..शेवटी माथ्यावर हात मारणं...

  आज जमाना फास्टफूड , इन्स्टंट चविष्ट खाण्याचा, त्याचं नुकसान  कायिक पटीनें,( फॅट्स) चरबीचे अति प्रमाण,  चवी साठी मिठाचं जास्त प्रमाण,  शिजवण्याची पद्धती वेगळ्याच, त्यात सिनथेंटीक केमिकॅल चे प्रमाण  जास्त, असें म्हणतात, चवी साठी घातलेल अझीनो मोटो डुकराच्या चरबी व हाडानी बनवलेले असतं. आरोग्यासाठी घातक,   अर्थात आपल्याच शरीरावर, हृदय रोग, मधुमेह (डायबेटिस,) वजन वाढत, वजनांमुळे गुढग्यावर दवाब येऊन संधिवातचा , कमरेचा  व मनके, हाडंचा त्रास, वजन वाढलं   मधुमेह, ब्लड प्रेशर,  पुष्कळ आजरांना स्वतः  आमंत्रण देतात, 

जमाना इंटरनेट चा,आय टी करियर करणाऱ्या  इंजिनीरचं  14 तास कॉम्प्युटर समोरच  सतत काम  - मिटींगा , बॉस वारंवार मीटिंग साठी कॉल करतोय,   नवीनच खूळपट काढून   प्रॉब्लेमस उकरून काढतोय, असे अनेक प्रॉबलेम, नवीन फंडा वर्क फॉर हॉम  -घरामध्ये काम करणाऱ्या IT इंजिनीर घरी असून देखील पारखे, घरातील एका बंदिस्त खोलीत आडवं -तिडवं शरीर करून -खुर्चीवर काम , त्यांना सतत काहींना  इन्स्टंट चटपटीत खायची सवय,  त्यांची गरज असती नाईलाज असतो  म्हणून  जरा जास्तच फास्टफूड खातात. बहुतेक IT इंजिनीर  आपल्या कामाच्या व्यस्ततेमुळे गले लठ्ठ झालेले आपण बघतो, कारण फास्टफूड व शारीरिक हालचाल हा विषय च नाहीं. काम पुर्ण न झाल्याने येणार मानसिक आजार डिप्रेशन, 

लवकरच येणारे अलझायमर आजार..

       दैनंदिन  कामाच्या व्यस्तते मुळे  अपायकारक पद्धतीने केलेले अन्न पदार्थ खातोय,  खुरमुरीत  -चटपटीट -सटरबटर - जंक फूड खायची सवय लागलेली असते . आत्ताची भूक कशी घालवायची एवढंच डोक्यात असतं,  कसलेही पदार्थ खाऊन स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून   आजार लावून घेतो, या सगळ्याचा दुष्परिणाम म्हणजे पचन संस्था बघडलेली असते.  वारंवार बिघलेली असते म्हणून, bad cholesterol चे प्रमाण वाढल्या मुळे हृदय रोगाची शक्यता वाढलेली.



अमेरिकेत सतत 25 वर्ष झालेल्या विविध संशोधनातून हें सिद्ध झालं की उपवासातुन शरीर सर्वात अगोदर ऑटो (ऑटो )म्हणजे स्वतः फेजी ( fagy, )म्हणजे खाने.. अर्थातच स्वतः च स्वतःच्या खराब पेशी खाऊन टाकणं. म्हणजे आपलं शरीर नैसर्गिक रित्या आपल्या शरीरातील खराब बॅड उत्ती (डी एन अ ) पेशी हळू हळू खाऊन नवीन आरोग्यदायी पेशी तयार करत. याला ऑटो फेजी म्हणतात, यामुळे आपल्या शरीरातील कॅन्सर सारख्या पेशी हीं खाऊन टाकून नवीन पेशी तय्यार करते. अँटी इम्म्युन, अँटी कॅन्सर, अँटी दिसेस सेल तय्यार होतात.इम्युन सिस्टिमचे कार्य सुधारून कॅन्सर सेल फॉरमेशन थांबते फ्री रेडिकल चे दयामेज कमी करून इन्फलेमेटरी कंडिशन नियमित करते.सहा तासाच्या उपवासात शरीर सर्वात अगोदर ग्लुकोज ( शुगर )चा वापर करते म्हणून शरीरातील इन्सुलिन चे प्रमाण कमी होतं. आठ 8ते बारा (12) तसाच्या रोजा मुळे इन्सुलिन लेव्हल कमी होणं सुरू होऊन शरीरातील फॅट बर्निंग, ( जलन ) चालू होऊन आपली शुगर कमी होते. 12 -16 तासाच्या उपवास मध्ये इन्सुलिन रेजीजस्तन कमी होत जावून शरीरातील पेशी मसलस मधील चरबी जळून त्याला व्यस्थीत आकार येण्यास सुरुवात होऊन शुगर कमी होतं त्यामुळे मधुमेह खास टायप एक मधुमेही आजार कंट्रोल मध्ये राहतं. पुढे इन्सुलिन बरोबरच सॉल्ट ची मात्रा कमी कमी होऊन चरबी चे प्रमाण कमी होऊन बॅड  कॉलिस्टरोल चे प्रमाण कमी होत जावून ब्लड प्रेशर, रक्तदाब कमी होऊन हृदय रोग कमी होतात, ब्याड कोलेस्टरोल (bad cholesterol ) चे प्रमाण कमी होऊन हृदयाची क्षमता वाढते, स्ट्रोक्र,( कार्डीयक )हृदय रोग धोका कमी होण्यास मदत होते. ब्रेन दिरॉईड ने्युरोट्रॉफीक फॅक्टर BDNF प्रोटीन वाढून मेंदूची गती वाढून अलझायमर, डिप्रेशन Anxianty सारखे विकार कमी होतात.. सर्वात जास्त फायदा  फाट्टी लिव्हर अर्थात याकृत ला फायदा होतो.

  पचन संस्था ( digestive system ) व्यवस्थित होण्यास मदत होते, बहुतेक संशोधकानी विविध प्रयोग करून बघितलं तर त्यांच्या लक्षात आले,  12-14  तासाचे रोजा (उपवास )ठेवल्यास पचन संस्थेला काही प्रमाणात अराम भेटून  त्यामुळे शरीरात नैसर्गिक पणे आदिपोनेक्टिन हार्मोन्स  चे प्रमाण जास्त होते, आणि हेच Hormones हार्मोन्स अन्नातील पौष्टिक घटक पचविण्यास मदत करते.मेटाबॉलिझम ची गती वाढते. त्यामुळे कॅलरी बर्न करण्यास संधी मिळते.लॉंगीटीव्हिटी वाढ होतें, रोजा नें शरीराचे नैसर्गिक डेटॉक्स होतें.



                  जपान मध्ये एक नवीनच संशोधन जपान च्या शरीर शास्त्र चे संशोधक योशिनोरो ओसुनी "AUTO FEGO" चा " ऑटो फेजी "सिद्धांत मांडला, " ऑटो फॅगो "हा ग्रीक शब्द म्हणजेच "स्वतः ला खाऊन टाकणं " सतत उपाशी पोटी राहिल्याने शरीरातील नॉर्मल पेशी ह्या शरीरातील अतिरिक्त वाढलेल्या चरबी ( fats )ना स्वतः खाऊन टाकून नष्ट करतात, यालाच ऑटो फेगो म्हणतात. आपल्या शरीरातील घातक अपाय कारक पेशी cell ज्यामध्ये कॅन्सर सारख्या हीं कदाचित असू शकतात,  तर अशा पेशी ही नष्ट होतात. ही प्रक्रिया रामजानुल मुबारक रोज्या (सतत उपवास करण्यामुळे )मध्ये घडून येत असते. संशोधन तर आजच्या युगात झालं परुंतु याचे फायदे  अल्लाह( परमेश्वर भगवंत ) नें प्रेषित मुहम्मद स्व. यांनी 1450  वर्षां पूर्वीच सांगितलं होतं.

 मानवी कल्याण कारी संशोधन करणाऱ्या जपान च्या योशिनोरी ओसुनी यांना 2016 मध्ये नोबेल पारितोषिक देवून गौरव करण्यात आलं. ते गरजेचं हीं होतं.

             म्हणून  साथीनों आपल्या कामाचं योग्य नियोजन करून  आज आयती संधी आलेलीच आहेत म्हणून  लगातार तीस रोजा ( उपवास ) करण्याची संधी आलेली आहेत सतत  रोजे ठेवून आपलं इस्पित वजन कमीत कमी करून, आरोग्याचे बरेच फायदे होतात .  महिना भर तर संधी आहेत कारण मनुष्य हा सामूहिक गोष्टी नां जास्त प्राधान्य देत असतो, आशियाई मंडळी तर एक दुसऱ्याला बघून अनुकरण करतो,  एकमेकांना बघून पुढे पुढे जाण्याची ओढ स्पर्धा शर्यत लागलेली असते तर आजच्या रमजान च्या रोजा (उपवासा) ची स्पर्धेत भाग पार्टीसिपीट करून आपल्या शारीरिक क्षमता वाढविण्याच्या स्पर्धेत हीं बाजी मारणं किती फायद्याचं राहील. 

         नियोजन  वर्षेभरासाठी केलं, आठवड्यात एक रोजा (उपवास)  ठेवून, आपल्या भारतीय समाजात सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, एकादशी शिवरात्री चतुर्थी आपल्या श्रद्धा असलेल्या देवी देवता नुसार एक उपवासाच्या पद्धती आहेतच तर त्याचं व्यवस्थित नियोजन करून वजन कमी करून पुन्हा वाढणार नाहीत याची वर्षभर काळजी घेतली तर वजना बरोबर असंख्य आरोग्यदायी फायदे होतील .


              पैगंबर मुहम्मद स्व. हें स्वतः वर्षभर प्रत्येक महिन्यात सोमवार  व गुरुवार चा व महिन्यातील 13 व 14 वा रोजा (उपवास )करीत असत.काही बंधू हीं पैगंबर मुहम्मद स्व च्या सुन्नतचा आदर्श म्हणून असेच (रोजे उपवास ) ठेवतात.

दिव्य कुरआन सांगते, "पण तुम्ही स्वतः रोजा (उपवास ) करा ते तुमच्या साठी फायदेचे राहील, जर तुम्ही हें समजलात तर "

    

(मित्रांनो लेख आवडला तर मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा, त्यांनाही निश्चित फायदा होईल  - प्रतिक्रिया कळवा )



- डॉक्टर सलीम शाहिदा सिकंदर शेख 

बैतुशशिफा मल्टिस्पेसिलिटी हॉस्पिटल,

श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 

9271640014

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

रोजा इफ्तार हा खजूर नें करावं, कारण खजूर मध्ये बरकत आहेत !



पैगंबर मुहम्मद स्व. सांगतात, रोजा इफ्तार हा खजूर नें करावं, कारण खजूर मध्ये बारकत आहेत !  अगर खजूर नसेल तर पाणी पिऊन रोजा इफ्तार करा ". ( हादिस तिर्मिझी 0657).जगभरातील कोट्यावधी मुस्लिम रमजान महिन्यात आपला रोजा( उपवास )  "इफ्तार "( सोडताना ) करतांना खजूर खाऊन करतात. महिनाभर चालणाऱ्या रमजान मध्ये पहाटे पासून ते संध्याकाळ पर्यंत काहीही न खाता पिता निरंकारी राहून दिवसभर आत्मचिंतन करतात. रोजा सोडताना खजूर खातात. पैगंबर मुहम्मद स्व. यांनीच खजूर खाण्यास सांगितले.

खजूर खाण्यामागे फक्त्त श्रद्धा नाहीत तर आरोग्याची मोठी गुपित दडलेली आहेत, दिवसभर उपाशी राहिलेल्या शरीराला लगेंच ताकद  देण्यासाठी खजूर हें जगातील सर्वात उत्तम फळ मानले जाते.

खजूर ( फिनिक्स डेक्टिफिफेरा ) प्रामुख्याने इंग्रजीत '" डेट" date म्हणतात. प्रामुख्याने अरबस्थानात,आशियाई, आफ्रिका संबंधित फळ वर्गीय आहेत, अरब व आफ्रिका  उष्णता वातावरणातील मुख्य भरपूर उत्पन्न देणारं पीक आहेत, याला व्यापारी वास्तू म्हणून मान्यता आहेत.अन खास म्हणजे  व्यापार मोठया प्रमाणात होतो. याचे (1)मेडजूला, (2)डेंगलेत, (3)बराहीं, (4)जाहिदी, (5)हलवा व (6)आजवा खजूर असें विविध प्रकार आहेत. त्यामध्ये " आजवा " खजूर अख्या जगात लोकप्रिय आहेत. 


अरबस्थान, आफ्रिका, आशियाई व  जगात ' " "सुपर फूड " म्हणून जगात लोकप्रिय होत आहेत.

खजूर मधील पोषण मूल्य शंभर (100 ग्राम )ग्राम खजूर मध्ये,(1)Carbohydrate कार्बहैद्राते :- 75 मिली ग्राम,)(2) (शुगर साखर :- 63 मिली ग्राम )(3) वसा :- 0.2 मिली ग्राम, (4) calories उष्मान्क :- 277 किलो कॅलारी, (5),फायबर :-7 ग्राम आहेत (8)प्रोटीन :- 7 ग्राम (9) आयर्न 0.9 ग्राम ( 10) पोटॅशिअम :- 655 मिली ग्राम,इतर . मॅग्नेशिम, antioxidant अंतिऑक्सिदंत, फॉस्परस, झिंक, सल्फर, पोटॅशियम, नुरोजेणेरेटिव्ह, कॅलसियम, फ्लॅवोनोंइडस करोटीनाईस, फ्लेवोनोंएडस सारखी अँटीऑक्सिदंत,इत्यादी.

ब्रिटन मधील प्रसिद्ध आहार तज्ञ शहेंनाझ बशीर स्वतः रोजा ठेवून सांगतात, जेंव्हा आपण उपवास "इफ्तार " सोडतो, त्यावेळी आपल्या शरीराला सर्वात आधी  " ग्लुकोज "ची गरज असते. कारण त्यातूनच आपल्याला ताकत ( शक्ती ) मिळते " इतर कोणत्याही पदार्थाच्या तुलनेत खजूर मधील नैसर्गिक साखर आपल्या रक्तातील शुगर  लेव्हल लगेंच वाढवते. बाकीचे पदार्थ पचवायला व त्यातून ऊर्जा मिळायला वेळ लागतो.



शाहेनाझ बशीर यांच्या मते खजूरचं खरं गुपित हें आहेत की,साध्या साखरे बरोबरच शरीराला आवश्यक असलेले Carbohydrate कार्बहैद्राते हीं भरपूर प्रमाणे आहे. त्यामुळे शरीराला दिवसभर पुरेल इतकी ताकत हळूहळू मिळत राहाते इतर वेळी हीं बरेच लोकं दिवसभर त्यांच्या साठी हीं हें एक वरदानच आहेत. त्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 ( B6), व्हिटॅमिन (A ए ), आणि व्हिटॅमिन k कें सोबत भरपूर प्रमाणात आयरन ( iron ) त्यामुळे कमी वेळात शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मिळून थकवा लवकरच दूर होतो.

दिहैद्राशन ( Dehydration ) पासून खास बचाव खजूराची खास किमया :- सुखा मेवे सारखं असलेतरी शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास खुप मदत करते, कारण यात नैसर्गिकरित्या पोटॅशियम असल्यामुळे शरीरातील इलेक्ट्रॉलाईट बॅलन्स सांभाळून पाणी संपूर्ण पेशी पर्यत पोहचवण्यास मदत करते.  रोजा (उपवास )इफ्तार करतांना बहुतेक जन खजूर बरोबरच पाणी एकत्र घेतात म्हणून ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी हें उत्तम कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे बाहेरून वेगळे इलेक्ट्रॉलईट घेण्याची गरज भासत नसते.

बऱ्याच मंडळीणा वाटतं की रमजान मध्ये आपलं वजन कमी करू या,  परंतु इफ्तार मध्ये भरपूर खाल्लं तर उलटं वजन वाढू शकतो, म्हणून नियोजन करून खजूर 01, 03,05 विषम संख्येत खजूर खाऊन इफ्तार करून लगेच नमाज अदा करण्यासाठी जाताय  म्हणून त्या नमाजच्या हलचली मुळे चांगला व्यायाम होत असल्यामुळे शरीर खजुरातील फायबर ( तंतुमय पदार्थ ). पाचवायला सुरुवात करतो.

आहार तज्ञ शहेंनाझ बशीर सांगते, " खजूर खाल्यामुळे शरीराला एक सिग्नल मिळतं की अन्न पोटात गेलय आणि पचन हीं सुरू झालंय. " म्हणून नमाज अदा नंतर जेंव्हा आपण जेवायला बसतो तेंव्हा उगाचच जास्त खाण्याची इच्छा च होत नाहीं म्हणून आपलं वजन नियंत्रनात राहतं.

रोजा ठेवणाऱ्यानां प्रामुख्याने पोटाचा त्रास होण्याच प्रमाण बरेच असतं त्यामध्ये बध्यकोष्ठाता ( constipation. Indigestion, etc )पोट फुगल्या सारखं वाटतं, दिवसभर रिकाम असल्यामुळे आतड्याची हलचाल मंदावते. खजूर मध्ये भरपूर फायबर ( तंतुमय ) ( 7 सात ग्राम )पदार्थ असल्यामुळे पचना साठी उपयोग होतो, निरोगी राहण्यासाठी दिवसभर आहारात 30 ग्राम फायबर असनं गरजेचं आहे.

आहार तज्ञ शहेंनाझ बशीर सांगतात की खाजुरीला फक्त्त रोजा पुरतंच मर्यादित ठेवू नका आपण   दैनंदिन आयुष्यात दिवसाची सुरुवात हीं बिस्कीट व बेकरी पदार्थ नें करण्यापेक्षा  दोन -तीन खजूरीने करून बघावं नक्कीच त्याचे फायदे होतील.

धार्मिक कारणा व्यतिरिक्त आरोग्यासाठी हीं अधून मधून उपवास करणं लोकप्रिय होत आहेत.. आणि जर रमजान मध्ये ज्या प्रमाणे उपवास करतो त्याप्रमाणेच करावं. खजूर हा फायबर चा उत्तम नैसर्गिक श्रोत आहेत.

आहार तज्ञ शहेनाझ बशीर सांगतात, " खजूर आणि दुध एकत्र मिसळा त्यात थोडे दहीं आणि काजू घालून मिसळून प्यावे "

अरब लोकं खजूरला दूध दही रोटीसह कधी कधी लोणी आणि मासे बरोबर खातात. अरब लोकं खजूर मधील बी काढून त्यात लोणी ( मख्खन )भरून खातात.

" खजूर एक उत्तम अन्न आहेत जें अनेक आजारावर व महत्वाच्या गरजा पुर्ण करते "


(लेख आवडला तर आपल्या मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा. प्रतिक्रिया अवश्य कळवा )





लेखन :- डॉक्टर सलीम शाहिदा सिकंदर शेख 

बैतुशशिफा मल्टिस्पेसिलिटी दवाखाना 

श्रीरामपूर 

जिल्हा :- अहमदनगर (अहिल्यानगर )

मोबाईल :- 9271640014

सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

संत गाडगेबाबा : स्वच्छतेचे बादशहा-रत्नाकर बाबुराव पाटील

 


 महाराष्ट्र ही संताची पावन भुमि म्हणून ओळखली जाते.पुण्यभूमीत अनेक संत होऊन गेले. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव या संतानी समाजाला धार्मिक व आध्यात्मिक शिकवण दिली. कथा, कीर्तन, भारूड, अभंग, प्रवचन कार्यक्रमातून समाज प्रबोधन केले. तसेच संत गाडगेबाबा हे त्यापैकी एक महान संत होय. 

संत गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला. वडील झिंगराजी जानोरकर व आई सखुबाई या परीट समाजातील कुटुंबात झाला. आईने बाळाचे नाव डेबु ठेवले. डेबु लहान असताना वडील दारूच्या व्यसनात मरण पावले. आई डेबुला घेऊन माहेरी भावाकडे रहायला आली. डेबुचे आजोळ मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे. मामाकडे भरपूर गुरेढोरे व शेती होती. डेबु गुरांची देखभाल करू लागला, शेतातील सर्व कामे तो करायचा. सन १८९२ साली कुंता नावाच्या मुली बरोबर लहानपणी डेबुचे लग्न झाले. त्यांना चार मुली झाल्या.  मुलीच्या बारशाच्या वेळी मटणाचे जेवण देण्याच्या प्रथेला विरोध करून गोडधोड जेवण दिले होते.अंतर जातीय विवाहास मान्यता नव्हती. त्याकाळी अंतरजातिय विवाहाचे महत्त्व सांगितले. समाजातील जाचक अनिष्ट रूढी परंपरेचा विरोध केला. जात, धर्म, संप्रदाय यांचा समूळ नायनाट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. १ फेब्रुवारी १९०५ रोजी घरादाराचा त्याग करून संन्यास घेतला. साधी राहणी अंगीकार करून  झाडू, गोधडी, फाटके कपडे, हातात एक गाडगे घेऊन तीर्थयात्रा करु लागले. गोधडीबाबा, , चिंधीबाबा, गाडगेबाबा असी ओळख निर्माण झाली. हातात सतत खराटा घेऊन घाण दिसताच ते स्वतः झाडून स्वच्छ करायचे. गावोगावी जाऊन घाण दिसली की स्वत: गाव झाडून स्वच्छ करायचे. मिळेल खायचे. रात्री गावात कीर्तन करायचे.


 *गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला* 

हे भजन म्हणत. कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक न्याय, समता, बंधूंभाव या गोष्टीचे समाज प्रबोधन करायचे.अज्ञान,अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरेवर कठोर प्रहार करत. कीर्तनातून समाजिक कार्य, लोकजागृती करत. 

*चोरी करू नका,कर्ज काढू नका*, *व्यसन करू नका, देवा धर्माच्या नावाखाली कोंबडी बकरी कापू नका,जातीय भेदभाव मानू नका*. 

देव दगड धोंड्यात नसून देव माणसात आहे. 

*रंजल्या गांजल्याची सेवा करा, दीन दुबळ्याना मदत करा, अपंग व्यक्तींना सहारा द्या, आंधळ्याचे डोळे बना*. 

सतत तीर्थाटन करून गावोगावी जाऊन स्वच्छता कराची. दिली कोणी भाकरी भाजी आवडीने खायची. अंतरायला जमिन व पांगरायला आभाळ. गाडग्यात भोजन करायचे. स्वतः अडाणी असून जगाला साक्षर करण्याचे महान स्वप्न  बाळगून होते. गावात रोगराई येऊ नये म्हणून गाव स्वच्छ करण्याचा महामंत्र जगाला  दिला. ते स्वतः घाण स्वच्छ करायचे मग अनुयायी त्यांचे पाहून काम करायचे. गाडगेबाबा यांच्या करणी आणि कथणी मध्ये अंतर नव्हता. निस्वार्थी भाव मनात ठेवून कुटल्या ही फळाची अपेक्षा न करता सतत काम करत. अस्वच्छता, अस्पृश्यता समाजातील कलंक आहे. तो स्वच्छतेच्या रूपाने धुऊन टाका. धर्म, जात कर्मकांड,यज्ञ,जप,तप, जादूटोणा विरोधात संघर्ष केला. देव देवळात नाही तर माणसाच्या हृदयात आहे. गावात सार्वजनिक स्वच्छता ठेवा, 

*जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे*.



 सतत स्वच्छतेचे महत्त्व जगाला दाखवून देणारे स्वच्छतेचे बादशहा होते. समाज प्रबोधन, समाज जागृतीचे अनमोल कार्य हाती घेऊन महान समाजसुधारक व संत म्हणून ओळख निर्माण केली. धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोई, गोशाळा, शाळा, कॉलेज, वसतिगृहे बांधून समाजाची सेवा केली. अशा संत शिरोमणी गाडगेबाबांचे योगदान पाहून महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने 

*संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान* सुरु केले. निर्मल ग्राम नावाने पुरस्कार ठेवले. स्वतः अडाणी असून जगाला शिक्षणाचे धडे दिले. गाडगेबाबांनी दशसुत्री सांगून समाजाला बहुमोल संदेश दिला.

 *भुकेल्यांना अन्न ,तहानलेल्यांना पाणी,उघड्यानागड्यांना कपडे, बेकारांना रोजगार,बेघरांना आसरा, मुक्या प्राण्यांना अभय,गरीब तरूण तरुणीचे लग्न,दु:खी निराशांना हिंमत,गोरगरिबांना शिक्षण,अंध,पंगू,रोगींना औषधोपचार, गरीबांना शिक्षणासाठी मदत*.

असा महान युगप्रवर्तक स्वच्छतेचा बादशहा संत गाडगेबाबा यांच्या नावाने अमरावती नगरीत विद्यापीठ आहे. या महान संत, समाज सेवकांचा मृत्यू २० डिसेंबर १९५६ ला अमरावती येथे झाला. संत गाडगेबाबा त्यांच्या कार्याने अमर आहेत. अशा स्वच्छतेच्या महान बादशहास कोटी कोटी प्रणाम. 

=======================

रत्नाकर बाबुराव पाटील          

 {सहशिक्षक}

 विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा, 

शिंगोली ता. जि. धाराशिव

कर्मयोगी संत गाडगेबाबा एक थोर समाजसुधारक-प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,

 


कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या आज असलेल्या दि.23 फेब्रुवारी 2026 रोजी असलेल्या 150 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥
             डेबूजी झिंगराजी जाणोरकर (संत गाडगेबाबा) यांचा ​जन्म २३ फेब्रुवारी १८७६ ला शेंडगाव,ता.अंजनगाव सुर्जी,जि.अमरावती येथे अतिशय गरीब कुटुंबात झाला.​त्यांच्या आईचे नाव सखूबाई आणि वडिलांचे नाव झिंगराजी जाणोरकर होते.​डेबूजींचे बालपण अत्यंत कष्टात आणि गरिबीत गेले. ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे दारूच्या व्यसनामुळे निधन झाले.​त्यानंतर त्यांची आई त्यांना घेऊन माहेरी म्हणजे मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे आपल्या भावाकडे (मामाकडे) राहायला गेली.​मामाची शेती मोठी होती, त्यामुळे लहानपणापासूनच डेबू शेतीची कामे,गुरे राखणे,नांगरणी करणे यात मग्न असे.त्यांना कामाची आणि स्वच्छतेची प्रचंड ओढ होती.​त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही, परंतु कामातूनच त्यांनी जीवनाचे खूप मोठे धडे गिरवले.अनिष्ट रूढी,अंधश्रद्धा आणि कर्जबाजारीपणा यांचे दुष्परिणाम त्यांनी जवळून पाहिले होते.लहानग्या डेबूचा निसर्गाशी संवाद चालत असे .लहानपणी डेबू अत्यंत संवेदनशील आणि शांत स्वभावाचे होते. ते इतरांच्या तुलनेत खेळण्यापेक्षा निसर्गात रमण्यात अधिक वेळ घालवायचे. झाडे, पशू-पक्षी यांच्याशी ते एकांतात बोलत असत. त्यांच्या या निसर्गाशी जोडलेल्या वृत्तीतूनच त्यांच्यातील भविष्यातील सद्भावना आणि भूतदया यांचे मूळ दिसून येते.डेबूला लहानपणापासूनच अंधश्रद्धा आणि रूढी अजिबात आवडत नसत. त्यांच्या गावात एकदा एका व्यक्तीने देवाचा कोप झाल्याचे सांगून लोकांना घाबरवले होते. तेव्हा लहानग्या डेबूने धाडसाने लोकांना सांगितले की, "देव कोणावरही कोप करत नाही, हे केवळ लोकांचे अज्ञान आहे." त्यांच्या या विचारांमुळे लोक चकित झाले होते. हा प्रसंग त्यांनी पुढे केलेल्या प्रबोधनाच्या वृत्तीची पहिली झलक दाखवतो. ​डेबूची आई त्यांना खूप जपायची. एके दिवशी आईने त्यांच्यासाठी विशेष आवडीची भाकरी बनवली होती. डेबू भाकर खायला बसले असताना, त्यांच्या घराबाहेर एक भुकेलेला भिकारी आला. त्या भिकाऱ्याची भूक पाहून डेबूने स्वतःच्या ताटातील ती आवडती भाकर त्याला देऊन टाकली आणि स्वतः फक्त मीठ-भाकरी खाल्ली. हा प्रसंग त्यांची निःस्वार्थी वृत्ती आणि दानशूरता दर्शवतो.​ डेबूला त्यांचे मामा चंद्रभान यांनी वाढवले होते. मामा नेहमी त्यांना कष्ट आणि साफसफाईचे महत्त्व शिकवत असत. मामेभावांबरोबर शेतात काम करताना, डेबू फक्त स्वतःचे काम न करता, आजूबाजूच्या सार्वजनिक जागांची साफसफाई करण्यातही आनंद मानत असत. इतरांना मदत करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे, हे त्यांनी लहानपणीच आत्मसात केले. याच सवयीतून पुढे त्यांचे कीर्तनातून स्वच्छता करण्याचे कार्य सुरू झाले.​हे सर्व प्रसंग दर्शवतात की, गाडगेबाबांच्या बालपणातच त्यांच्यातील समाजसुधारक, सत्यनिष्ठ आणि करुणावान व्यक्तीची बीजे रोवली गेली होती.
        सम -​१८९२ मध्ये त्यांचा विवाह कुंताबाईंशी झाला, त्यांना एक मुलगा व दोन मुली होत्या.
मात्र, त्यांचे मन संसारात फार काळ रमले नाही. दि.​१फेब्रुवारी १९०५ रोजी त्यांनी घरदार सोडून जनसेवेसाठी संन्यास स्वीकारला.हातात एक गाडगे  आणि झाडू घेऊन त्यांनी गावोगावी फिरून स्वच्छतेचा आणि समाजसुधारणेचा प्रसार केला.
    संत गाडगेबाबांचा​ मृत्यू दि.२० डिसेंबर १९५६. वलगाव येथे पेढी नदीच्या काठावर झाला.वयाच्या ८० व्या वर्षी या महान संताने जगाचा निरोप घेतला. अमरावती येथे गाडगेनगरमध्ये त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.
         ​संत गाडगेबाबा हे एक थोर समाजसुधारक,कीर्तनकार आणि संत होते. त्यांचे सामाजिक कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आणि बहुआयामी होते. त्यांनी आपल्या कृतीतून आणि कीर्तनातून समाजाला स्वच्छता, शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व पटवून दिले.​ त्यांनी  लोकशिक्षण ​स्वच्छतेची शिकवण दिली .गाडगेबाबा स्वतः हातात झाडू घेऊन गावोगावी फिरत आणि रस्ते, गटारे व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करत. त्यांनी लोकांना उपदेश करण्याऐवजी स्वतः कृती करून दाखविली. 'देव दगडाच्या मूर्तीत नाही, तर माणसाच्या सेवेत आहे' हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले.​त्यांनी लोकांना श्रमाचे महत्त्व पटवून दिले आणि सामुदायिक श्रमदानातून गावे स्वच्छ करण्याची प्रेरणा दिली.शिक्षण प्रसार ​शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.गाडगेबाबांनी शिक्षणाला सर्वांत मोठे दान मानले. 'शिक्षणाशिवाय माणसाचे जीवन व्यर्थ आहे' असा त्यांचा ठाम विश्वास होता.


          ​ संत गाडगेबाबांनी समाजातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात अनेक धर्मशाळा, वसतिगृहे आणि शाळा स्थापन केल्या.शिक्षणासाठी पैसा त्यांनी आपल्या कीर्तनातून मिळालेला पैसा स्वतःसाठी न वापरता, या शिक्षण संस्थांच्या उभारणीसाठी आणि गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी खर्च केला. त्यांनी कर्मकांड, रूढीवाद आणि अंधश्रद्धांवर आपल्या कीर्तनातून कठोर टीका केली.त्यांचे कीर्तन हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम होते.ते लोकांना साध्या आणि सोप्या भाषेत जीवन जगण्याची योग्य दिशा दाखवत असत.त्यांनी दारू आणि इतर व्यसनांचे दुष्परिणाम लोकांना समजावून सांगून व्यसनमुक्तीसाठी फार मोठे कार्य केले. त्यांनी जात-पात न मानता सर्वसामान्य गरीब, दुबळे आणि पीडित लोकांची निःस्वार्थ सेवा केली. त्यांच्यासाठी धर्मशाळा उभारल्या.
          संत गाडगेबाबांनी केवळ माणसांवरच नाही, तर पशुपक्ष्यांवरही दया दाखवण्यास शिकवले. त्यांचे कार्य हे समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे, कृतिशील आणि मानवतेवर आधारित होते. म्हणूनच त्यांना 'बंडखोर संत' आणि 'समाजसुधारणेचे अग्रदूत' मानले जाते. संत गाडगेबाबांनी कीर्तनातून प्रबोधन केले पण त्यांच्या​कीर्तनाची पद्धत अत्यंत विलक्षण, अनोखी आणि लोकशिक्षणावर आधारित होती. ते कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करीत असत. त्यांच्या कीर्तनाची काही प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे ​बाबांचे कीर्तन अत्यंत साध्या आणि सहज भाषेत, विशेषतः वऱ्हाडी बोलीत असायचे, ज्यामुळे सामान्य लोकांना ते लगेच समजत असे.​त्यांच्या भाषेत ग्रामीण जीवनातील उपमा, म्हणी आणि उदाहरणे असत.स्वच्छता, शिक्षण, स्वावलंबन त्यांच्या कीर्तनाचा गाभा होता.​त्यांच्या कीर्तनाचा मुख्य विषय स्वच्छता, शिक्षण आणि स्वावलंबन हा होता."देवळात देव नाही, देव माणसात आहे," असा स्पष्ट विचार कीर्तनातून जनसामान्यांना सांगत होते . परोपकार, गोरगरिबांची सेवा आणि लोकसेवा करण्यावर ते जोर देत.अंधश्रद्धांवर थेट प्रहार करीत.​ते अंधश्रद्धा, रूढी-परंपरा,कर्मकांड, जनावरांचा बळी देणे (बोकड कापणे) आणि फसव्या गुरुंवर थेट आणि कठोर टीका करीत असत.​देव विकत मिळतो का? देव अंग धुतो का? असे प्रश्न विचारून ते लोकांच्या विवेकबुद्धीला आव्हान देत.​त्यांच्या कीर्तनाच्या सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी केवळ "गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला" ​या भजनाचा उपयोग ते लोकांना उपदेशाचा अर्थ मनावर ठसवण्यासाठी करीत असत.​बाबांची कीर्तनपद्धत संवादात्मक होती.ते श्रोत्यांना थेट प्रश्न विचारून उत्तरे घेत असत (उदा. देव किती? श्रीखंड चांगले की बोकड?). यामुळे श्रोते कीर्तनात सक्रियपणे सामील होत असत.​ते सर्व श्रोत्यांना हात वर करून टाळ्यांच्या तालावर भजन म्हणायला लावत, ज्यामुळे लोकांमध्ये उत्साह निर्माण होई.केवळ देवाची भक्ती न करता, समाजाची सेवा करणे आणि शिक्षण घेणे हेच खरे 'देव' असल्याची शिकवण त्यांनी दिली.


संत गाडगेबाबांचे कीर्तन हे केवळ धार्मिक अनुष्ठान नव्हते, तर ते समाजसुधारणा, लोकशिक्षण आणि विवेकवादाचे एक प्रभावी माध्यम होते. संत गाडगेबाबा हे एक महान समाजसुधारक होते. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान आणि अस्वच्छतेवर प्रहार केला. त्यांच्या कीर्तनातील मुख्य विचार खालीलप्रमाणे आहेत . स्वच्छतेचे महत्त्व (शरीर आणि परिसर)​गाडगेबाबांच्या मते, 'स्वच्छता हाच खरा धर्म आहे'. ते नेहमी म्हणायचे की, जिथे स्वच्छता असते तिथेच देव वास करतो. केवळ मन शुद्ध असून चालणार नाही, तर आपला परिसर आणि शरीरही स्वच्छ असायला हवे.शिक्षण हेच प्रगतीचे साधन ​त्यांनी शिक्षणावर सर्वाधिक भर दिला.गरिबांनी आपल्या मुलाबाळांना पोटाला चिमटा काढून का होईना, पण शाळेत पाठवले पाहिजे, असे ते आग्रहाने सांगत. "शिक्षण घेतल्याशिवाय माणसाचे डोळे उघडणार नाहीत," असा त्यांचा ठाम विश्वास होता.​देव दगडात नसून माणसात आहे: दगडाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवण्यापेक्षा भुकेलेल्या माणसाला अन्न द्या, असे ते सांगत.​प्राणीहत्या बंद करा: देवाच्या नावाने दिला जाणारा प्राण्यांचा बळी हा क्रूरपणा आहे, असे त्यांचे मत होते. अंगात येणे, भूतबाधा किंवा भविष्य पाहणे यांसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, असा संदेश त्यांनी दिला.व्यसनमुक्ती आणि सदाचार ​व्यसनामुळे माणसाचा आणि त्याच्या कुटुंबाचा नाश होतो. त्यामुळे दारू, गांजा आणि इतर व्यसनांपासून दूर राहण्याचा उपदेश त्यांनी दिला. चोरी न करणे, खोटे न बोलणे आणि इतरांना मदत करणे यालाच त्यांनी खरा धर्म मानले.सण-उत्सव, लग्नकार्य किंवा मृताच्या नावे केल्या जाणाऱ्या जेवणावळींसाठी कर्ज काढू नका. अवाजवी खर्च टाळून साधेपणाने जगण्यावर त्यांचा भर होता.हे त्यांचे तत्त्वज्ञान आज आचरणात आणण्याची गरज आहे.
        ​
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
अभंगकार व साहित्यिक
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
 अमरावती . ८०८७ ७४८६०९
                  ​

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

झाडीपट्टी रंगभूमीचे नटसम्राट पद्मश्री डॉ. परशुराम खुणे _डॉ. राजकुमार मुसणे

!! वाढदिवस विशेष !!

पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या चार जिल्ह्याच्या झाडीपट्टी रंगभूमीला विशेष महत्त्व आहे. वनराईने संपन्न असलेला, निसर्ग सौंदर्याने नटलेला, धान पिकामुळे सुपीकतेने भरलेला हा भूभाग नाट्य क्षेत्रासाठी ही अत्यंत अनुकूल आहे. आजही मल्टिमीडिया च्या काळात साधारणता ५५नाट्य कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक गावात नाट्यप्रयोग होतो. कुरुड सारख्या गावात आजही एकाच रात्री आठ नाट्यप्रयोग होतात. सामाजिक कौटुंबिक विविध विषयावरील नाटकाद्वारे ग्रामीण भागातील रसिक प्रेक्षकांचे रंजन व प्रबोधन केले जाते.पाच हजार कलावंतांच्या उदरनिर्वाहाची सोय करणारी आणि सत्तर करोडपेक्षाही अधिक आर्थिक उलाढाल करणारी वैभवसंपन्न रंगभूमी म्हणून झाडीपट्टीकडे पाहिले जाते. विठ्ठल पाकलवार,ग.रा.वडपल्लीवर, डॉ.परशुराम खुणे,डॉ.शेखर डोंगरे, डॉ.अनिरुद्ध वनकर, सदानंद बोरकर, प्रल्हाद मेश्राम, युवराज गोंगले यांच्या प्रमाणेच खुणे असंख्य रंगकर्मीनी झाडीपट्टी रंगभूमीचे क्षेत्र विस्तारले.डॉ.खुणे यांनी अभिनयाच्या जोरावर आपला रसिक प्रेक्षकवर्ग तयार केला, ही जमेची बाजू आहे.



अत्यंत ग्रामीण भागातील गुरनोलीच्या गल्लीतल्या निष्ठेने रंग देवतेची आराधना करणाऱ्या समर्पित कलावंतांचा दिल्लीत झालेला सत्कार भूषणावह स्वरूपाचाच.

दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात २०२३  एका शानदार सोहळ्यात विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीवरील रसिकप्रिय कलाकार व झाडीपट्टीतील दादा कोंडके म्हणून ओळखले जाणारे डॉ. परशुराम खुणे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. हा खरे तर झाडीपट्टी रंगभूमीचा सन्मानच होता.

डॉ. खुणे हे गडचिरोली जिल्ह्यच्या कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील रहिवासी आहेत. त्यांनी कला क्षेत्रात पाच हजाराहून अधिक कार्यक्रमांमध्ये ८०० वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ते गेल्या पन्नास वर्षापासून झाडीपट्टीच्या भव्य रंगभूमीचे रसिकप्रिय  नट आहेत. आजपर्यंत झाडीपट्टीच्या रंगभूमीवर त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. विशेषतः झाडीपट्टीतील सोंगाड्या तथा ज्यूनियर दादा कोंडके अशीही त्यांची ख्याती आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात लीलया पदार्पण करणारे परशुराम खुणे हे विलक्षण व्यक्तिमत्व आहे.ते पंधरा वर्षे गुरनोलीचे सरपंच व पाच वर्षे उपसरपंच होते. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री  पुरस्कार त्यांनी झाडीपट्टीतील सर्व रसिक प्रेक्षकांना समर्पित केला. सतत कार्यमग्न, मनमिळावू तडजोड वृत्तीचे, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक, कलाप्रेमी दूरदृष्टीचे असे त्यांचे व्यक्तिमत्व इतरांना प्रभावित करणारे आहे. 

भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाचा बहुमान त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच झाडीपट्टी कलावंतांना प्राप्त झाल्याचा आनंद रसिक प्रेक्षक अभ्यासकांना निश्चितच आहे. 

झाडीपट्टी रंगभूमीचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंत विनोदाचे बादशहा, मागील पाच दशकांपासून झाडीपट्टी रंगभूमीवर आपल्या अभिनय क्षमतेने नाममुद्रा कोरणारे, रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेले नटसम्राट म्हणजेच डॉ. परशुराम खुणे होय. गडचिरोली जिल्ह्यातील गुरनोली येथे २२ फेब्रुवारी १९५२ ला जन्मास आलेल्या या कलावंताने झाडीपट्टीतील विविध भागात नाट्यप्रयोगाबरोबरच कर्तुत्वाने आपली उंची राज्य, राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवली आहे. सधन शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या परशुराम खुणे यांनी वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतरही नाट्य क्षेत्रातच अधिक रस ओतला आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरात असलेली अंधश्रद्धा नष्ट व्हावी यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यही त्यांनी सामाजिक भान ठेवत केलेले आहे. 

नुकतेच महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित शेतकरी अभ्यास  युरोप दौऱ्यात सहभागी झाले आहेत. स्विझर्लंड , पॅरिस यासारख्या भागातील शेतकऱ्यांच्या वैभव संपन्नतेचे अवलोकन करीत आहेत.विविध सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने त्यांनी ठसा उमटवला आहे. ग्रामीण झाडीपट्टीतील प्रेक्षकांना त्यांच्याच शैलीत प्रगटीकरण करीत अढळ स्थान पद्मश्री डॉ. खुणे यांनी निर्माण केले आहे.

डॉ. परशुराम खुणे यांनी कॉमेडी ,सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक, धार्मिक, ज्वलंत विषयावरील अशा विविध अंगी नाटकात 

 वेगवेगळ्या भूमिका साकारले आहेत. त्यात प्रामुख्याने चरित्रप्रधान व विनोदी  भूमिकांना रसिकांनी कायम स्मरणात ठेवले आहे. म्हणूनच झाडीपट्टीचा दादा कोंडके असे नामाभिधान अथवा ओळख या नाट्य कलावंतांच्या अष्टपैलू कर्तृत्वामुळे प्राप्त झाली आहे.गावातील सांस्कृतिक वातावरण व घरची कौटुंबिक पार्श्वभूमी यामुळे दंडारीतून हौशी कलावंत म्हणून त्यांना नाट्य क्षेत्रात पदार्पण केले.नवरगाव येथे शिक्षण घेत असताना बालाजी पाटील बोरकर यांच्या व्यंकटेश प्रासादिक नाट्य मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी १६ जानेवारीला नाटके होत असत. बालाजी पाटील बोरकर, सुधाकर जोशी, जयमातला शिलेदार या दिग्गजांच्या सहवासात परशुराम खुणे यांच्या अभिनय क्षमतेला तेज प्राप्त झाले. 'तंट्या भिल्ल 'या नाटकात त्यांना ऐनवेळी सोन्या या मुलाचे पात्र साकारण्याची संधी मिळाली आणि डॉ. जोशी, पुष्पा पवार, वसंत पवार यासारख्या श्रेष्ठ कलावंतांच्या सोबतीने अभिनयाची चुणूक दाखवता आली.'लग्नाची बेडी 'या नाटकातील हॉटेल मॅनेजरची त्यांची भूमिका विशेष गाजली. या विनोदी भूमिकेतील वैशिष्ट्यपूर्ण संवाद व देहबोलीच्या  अभिनयामुळे  चित्रकार धनंजय नाकाडे आणि बालाजी पाटील बोरकर यांनी त्यांना विनोदी कलावंत म्हणून नावारूपास आणले. पुढे व्यंकटेश प्रसादिक मंडळाच्या विविध विनोदी भूमिका करण्याची संधी परशुराम खुणे यांना प्राप्त झाली. प्रामुख्याने' दिवा जळू दे सारी रात' या नाटकातील मदन या भूमिकेने त्यांना लौकिक प्राप्त झाला. येळकोट मल्हार मधील खाशाबा, सिंहाचा  छावा मधील शंकर, लग्नाची बेडी मधील अवधूत , तंट्या भिल्ल मधील जेलर यासारख्या भूमिका परशुराम खुणे यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय क्षमतेने गाजविल्या आणि रसिकप्रिय ठरल्या.स्वर्गातील स्वारी मध्ये भद्राक्ष ,एकच प्याला मधील तळीराम, लावणी भूलली अभंगाला मधील गणप्या या भूमिका आजही झाडीपट्टीतील प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. सातशे पेक्षाही अधिक प्रयोग झालेले लोकप्रिय नाटक 'मरीमाईचा भुत्या' मधील वनरक्षक ,एक नार तीन बेजार मधील बहिरा ,नाथ हा माझा मधील बारक्या, मी बायको तुझ्या नवऱ्याची मधील दिनू असे अनेक पात्रे त्यांनी जिवंत साकारली.धनंजय नाकाडे यांनी म्हणूनच एकूण त्यांचीअभिनयक्षमता पाहून झाडीपट्टीचा सोंगाड्या ज्युनिअर दादा कोंडके ही पदवी त्यांना बहाल केली.  किंबहुना त्यांनी दिलेला भेट स्वरूपातील कोट व शाबासकीची थाप पुढील वाटचालीस प्रेरणादायी ठरली.



सडपातळ शरीरयष्टी, प्रसन्न मुद्रा, भारदस्त आवाज, जबरदस्त पाठांतर व परफेक्ट टाइमिंग यामुळे त्यांच्या भूमिका अजरामर  ठरल्या.डॉ. परशुराम खुणे यांनी अभिनय करताना कधीच कोणाची नक्कल  केली नाही. सभोवतालचे इरसाल नमुने नेहाळत त्यांच्या स्वाभाविक बोलण्यातील संवाद हेरून त्याचा पालपद म्हणून उपयोग करत प्रेक्षकांना हसविण्यात त्यांचा हातखंडा होता. किंबहुना इतर कलावंतांना सुद्धा कुणाचे नक्कल न करतां आपले वेगळेपण सिद्ध करण्याची सक्त ताकीद देतात.


सतत पंधरा वर्षे ते सरपंच म्हणून गुरनोलीच्या राजकारणात सक्रिय राहिले पाच वर्षे उपसरपंच  म्हणून कार्य करत त्याने गावाचाही कायापालट केला. त्यांच्या एकूण कर्तृत्वामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ पुरस्कार, कला गौरव, जादूगर पुरस्कार, स्मिता स्मृती पुरस्कार, झाडीबोली साहित्य परिषदेचा पुरस्कार ,झाडीपट्टी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद, अखिल भारतीय  अकादमीचे अध्यक्ष, कलाभूमी पुरस्कार, जिल्हा गौरव पुरस्कार, छोटा गंधर्व स्मृति नाट्य पुरस्कार, ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवांकित करण्यात आले आहे. निरंतर झाडीपट्टी रंगभूमीची आराधना करणाऱ्या समर्पित कलावंतांची या पुरस्कारामुळे त्याच्या कार्याची योग्य दखल घेतली गेली.

नाट्य क्षेत्राबरोबरच त्यांनी 'रंग माझा वेगळा' पहिले पाऊल जीवनाचे निबंध यासारख्या चित्रपटात ही भूमिका केल्या परंतु नाटक आणि चित्रपटांमध्ये त्यांना खूप फरक जाणवतो चित्रपटापेक्षा नाटकांमध्ये प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर जिवंतअभिनय करताना अधिक आनंद  समाधान मिळते, ते व्यक्त करतात. झाडीपट्टी रंगभूमी संपन्न व समृद्ध करणारे जेष्ठ रंगकर्मी डॉ. परशुराम खुणे हे आता अमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहेत त्यांचा एकूणच कलाप्रवास ऐतिहासिक व प्रेरणादायी स्वरूपाचा आहे. त्यांच्या एकूणच कार्यकर्तृत्वाला सलाम. या निमित्ताने डॉ. परशुराम खुणे यांना दीर्घआयुरारोग्य लाभो, हीच वाढदिवसाच्या निमित्ताने सदिच्छा..!


डॉ. राजकुमार मुसणे, गडचिरोली 

9423639532

रोजा :-!!" सेहरी :- याच देही याच अनुभव किती विलक्षण असेल अनुभवा.

 


रमजान मुबारक 2026 रोजा नं. 04,

 रविवार दिनांक 22 - 02- 2026

हजरत अनस बिन मालिक रजि. प्रेषितांचे मित्र ( सहाबा ) सांगतात,  आम्हाला प्रेषित मुहम्मद स्व. नी सांगितलं , " तुम्ही सेहरी खात चला, तुम्हाला त्या खाण्याने बरकत आहेत ( सहीह बुखारी ह. नं. 1923)." पुढे पैगंबर मुहम्मद स. सांगतात, " सेहरी खाना इबादत ( उपासना - प्रार्थना ) आहेत.

सकाळी (ब्राह्म वेळा ) पहाटे  4-30 ला उठून सूर्योदया पूर्वी कष्टाच्या ( हलाल )कमाई नें आणलेल्या अन्न धान्या नें सकाळी अन्न ग्रहण करणं.म्हणजे सेहरी करणं.

जैद बिन साबित रजि.  पैगंबरांचे मित्र सांगतात, " आम्ही प्रेषिता स.बरोबर रोजा ची सेहरी करून , आम्ही नंतर सकाळची फर्जं (फजर )नमाज अदा केली आहेत. "

 एक म्हण फार प्रसिद्ध आहेत , सकाळचा नास्ता ( ब्रेक फास्ट )राजा ( बादशाह ) सारखा खाणं  अर्थातच पोट भरून करणे   :,  दुपारचं नेहारी (लंच )सामान्य लोकां प्रमाणे अर्थात थोडं कमी प्रमाणे, व रात्रीच जेवण ( डिनर )भिकाऱ्या सारखं अर्थात थोडं फार खाल्लं ".


जगात उपवासची प्रथा वेगवेगळी असतात . हिंदू मध्ये चतुर्थी- एकादशी, शिवरात्र - कोणी मंगळवारी, सोमवार, गुरुवार, शुक्रवार  शनिवार, आपल्या मानलेल्या विविध देवी देवतांच्या वारावर उपवास ठेवतात. काही उपवास प्रोटीन युक्त आहार व चहा पाणी घेऊन करतात तर काही निरंकारी ( काहीच नाहीं खाता पिता ) करतात. फक्त पोटभर खात नाहीत नंतर सध्याकाळी  चंद्र दर्शन झाल्यावर रात्री पोटभर जेवन करून उपवास सोडतात.   जैन व मारवाड भागातील राजस्थानी समाज उपवास  दोन,  तीन तर काही अपल्या आरोग्याला पेलवल, शारीरिक परिस्थिती बघून दिवस भर अन्न पाणी काहीच न घेता संध्याकाळी 24 तासात फक्त्त एक ग्लास दूध- पाणी घेऊन पुढे उपवास चालू ठेवतात किंवा सोडतात व काही दृढ निच्छिय महामानव संथरा व्रत मध्ये महानिर्वाण पावतात.असो.

काही हौशी लोकं  ज्यांना हेल्थ कॉनशियस ( शरीराला जपणारे ) मंडळी हें वजन कमी करण्यासाठी काही नवनवीन फंडे चे प्रयोग करत असतात.

बाजारात मल्टिनॅशनल कंपनी पुष्कळ आलेल्या आहेत त्या आपल्या ग्राहकांना वजन कमी करणं व वाढविण्यासाठी नवीन नवीन प्रयोग करीत असतात.

इस्लाम मध्ये सकाळी" सेहरी " करून संध्याकाळी सूर्यास्ता नंतर लागलीच"  इफ्तार "(सोडतात ) . जवळ जवळ 12-ते 13 तासांचा रोजा असतो परुंतु काही देशात रोजे 20-20 तासांचे व कॅनडा देशात 20 तासांचे  आहेत.

आपल्या कुवतीप्रमाणे अन्न ची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे,  गरजेचं सुद्धा आहेत तीस (30) दिवस उत्साह,  उत्सपूर्तता,  स्टॅमिना हा टिकला  पाहिजे.  अन्नाच्या प्रत्येक गोष्टी कडे लक्ष दिले गेले पाहिजे दिवस भर थकवा जाणवू नये म्हणून संतुलित पोषण युक्त आहार गरजेचे आहे. शरीर निरोगी राहिले पाहिजे,  आज फेब्रुवारी  हलकी हलकी थंडी संपून उन्हाळा ची सुरुवात झाली आहेत,अजून त्या ऋतू मान सहन करण्यासाठी सवय झालेली नाहीत, सवय होईस्तर त्रास हा होणारच असतो. म्हणून संतुलित व पोषण युक्त आहारासाठी कडघान्य, ओट्स, अंडी, मटन, मासे, दुध, दही, व्हिटॅमिन युक्त, प्रोटीन युक्त, कार्बहैद्राड, मिनरल्स आहार घेणं फार गरजेचे आहेत,  शिजवून घेतलेलं पदार्थ जास्त महत्वाचं आहेत, ज्यांना जास्त प्राधान्य द्यावा, 

सेहरी नंतर दोनतीन तासात शरीरातील पाणी लघवीद्वारे हळू हळू मोकळं होतं. दुपारी एक दोन नंतर  डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते,  इलेक्ट्रॉलाईटची पातळी कमी होण्याची कधी कधी शक्यता असतं तर मिठा चं प्रमाण व पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणं गरजेचं असतं 

सध्याच्या काळातील  फास्ट फूड च्या नादी न लागलेलं बरं. काही काहीच कंपनी आपल्या प्रॉडक्ट ला चांगली मागणी यावी व प्रॉडक्ट रुचकर व स्वादिष्ट होवं म्हणून त्या मध्ये चवी साठीच सिनथेठीक पदार्थांचा वापर जास्त प्रमाणात केलेला असतो. म्हणून  आपल्या शारीरिक व मानसिक व आर्थिक परिस्थिती नुसार नियोजन करून आपल्या शरीराची काळजी जरूर घावी.

कामगार कष्टकरी मंडळी आपल्या दिवस भराच्या कमाईनें आणलेल्या अन्न  कुटंबाबरोबर चटणी भाकरी सेहरी किती अविस्मरणीय अनुभव असेल ना??.

दोन चार रोजे (उपवास ) ठेवून  याचं देही याच अनुभव किती विलक्षण असेल..

(मित्रांनो लेख आवडला तर आपल्या नातेवाईक व मित्रांना जरूर पाठवा, कृपया आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.)



लेखक :डॉक्टर सलीम सईदा सिकंदर शेख 

बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना.

मिल्लतनगर.

श्रीरामपूर 

जिल्हा :-अहमदनगर 

मोबाईल नं. 9271640014

 🌷🌷👍👍👌👍👍🌷🌷

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

रोजा :- गरीबीची जाणीव करून देणारा पर्व म्हणजेच "रोजा "

 


रमजान मुबारक 2026 

रोजा नंबर 03 वा,

शनिवार दि.21-02-2026 


" हे बांधवांनों ! तुमच्यावर( साठी ) रोजा ( उपवास ) रोजे विहित - अनिवार्य (फर्ज) करण्यात आलेले आहेत ,  ज्याप्रमाणे तुमच्या पुर्वीच्या होऊन गेलेल्या पैगंबरांच्या काळाच्या अनुयायांना ही(  विहित )अनिवार्य   (फर्ज ) करण्यात आले होतें . हें याचसाठी की, तुम्हीं सदाचरणी बनावे ( व्हावे ). अपेक्षा आहे की, याद्वारे तुमच्यामधे अल्लाहा (परमेश्वर) चे भय बाळगण्याचे गुण निर्माण होईल., ( पवित्र कुर'आन  सुरहा नं. 02, आ. नं. 182 ) :,# :, उपवासाचे काही ठराविक दिवसांचे रोजे आहेत ,   जर यदाकदाचित तुमच्यापैकी कोणी आजारी असेल अथवा प्रवासात असेल तर ,  त्याने ईतर दिवसांत त्यांनी राहून ( सुटलेल्या ) गेलेल्या रोजाची संख्या पुर्ण  करावी  . आणि ज्यांना उपवास करताना अतिशय कठीण प्रयास -त्रास कष्ट  करावे लागत असतील तर , त्यांनी त्या एका उपवासाच्या बदल्यात एका गरीब माणसाला जेवन द्यावे. आणि जो कोणी आवश्यकतेपेक्षा हीं जास्त चांगलं कार्य करेल ,  तर  ते  कार्य  अधिक च चांगलेच आहेत. परंतु   तुम्हीं स्वतः उपवास कराच , ते तुमच्या साठी अधिक चांगलेच आहेत. ( पवित्र कुरआन सूरहा नं. 2,आ. नं. 184 ) अल्लाहा तुमच्याशी सौम्य व्यवहार करु इच्छितो  ,   कठोरपणे व्यवहार करू इच्छित नाही. म्हणुन तुम्हाला अशी पध्दती दाखवली जात आहे की, त्यामुळे रोजा पुर्ण करावेत आणि  पवित्र कुर आन रमजान महिन्यात अवतीर्ण( उतरण्यात ) तुमच्याच मार्गदर्शना(कुरआन) साठी तुम्हाला गौरविण्यात साठीच आले आहेत.अल्लाह ( परमेश्वर ) तुम्हाला सन्मार्ग दाखवण्यासाठी पवित्र कुर आन मार्गदर्शन साठी पाठवला आहेत म्हणून त्याबद्दल अल्लाहाच्या महिन्यांची अभिव्यक्ती स्विकार करा, त्याची स्तुती करा व अल्लाह ( परमेश्वर ) कृतज्ञ राहा. ( पवित्र कुरआन - पारा १, सुरहा नं .२,आ.१८५ ).



    " सौम्य " या अरबी शब्दावरून " रोजा" - उपवास -  हा अर्थ. त्यासाठी सकाळी ५ :०० वाजता भोर पहाटेपासून ते सुर्यास्तापर्यंत (संध्याकाळी ६:४८ पर्यंत) अन्न व पाणी एकदम( वर्ज्य) बंद . पिण्याच्या व खाण्याच्या सर्व गोष्टी बंद.    दिवसभर  वाईट कृत्ये, विचारांपासून विभक्त राहुन अल्लाहा (परमेश्वर) ची उपासना -आराधना -चिंतन - मनन करून, उपाशी राहणं .

पहाटेच्या ४-० वाजता उठून,  कष्टाच्या   "हलाल" कमाईच्या पैशांनी आणलेल्या अन्न  सकाळी रोजा साठी" सेहरी" करून(खाण्याच्या विधीला अरबी शब्दाला  '"सेहरी "   म्हणतात. ). सेहरी करणं फार गरजेचे आहे, वैद्यकीय दृष्टिकोनातून सकाळी नाश्ता करणं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.  सुबह  राजा ( बादशाह ) जैसा नाश्ता करणा, दुपहर  आम आदमी जैसा खाना खाने का  और रात में गरीबी जैसा डिनर करणा, जी म्हण प्रसिद्ध आहेत. असो.

वैद्यकीय भाषेत  दिवसभर  शरीराला पोषक आहार घेणे आवश्यक असते. 

ज्यांना मधुमेह - रक्तदाब - हृदयविकार - थाईराईड - इत्यादी आजार आहे त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच दैनंदिन औषधे सकाळी घेऊन व मधुमेहीं रोजा रूग्णांनी आपल्या इन्सुलिन च्या डोस( मात्रा ) रोजच्याप्रमाणे  मोठा डोस न घेता थोडा कमी प्रमाणात  घ्यावं. कारण काही काही मधुमेहीं रोजा ठेवणाऱ्या रूग्णांना दिवसातून तीन वेळा इन्सुलिन चे डोसेस घेणे गरजेचे असते अशा मधुमेह रूग्णांनी रोजा  फार काळजी पुर्वक करावेत. जे  आजारपणामुळे अशक्त झालेले असेल, आशा बंधु - भगीनींनी रोजे फार काळजी पूर्वकच करावेत, जरी इच्छा असेल तर शक्यतो नियोजन करावे. उत्साहाच्या भरात किंवा कोणाच्याही चुकीच्या सल्ल्यानुसार निर्णय घेऊ नये,  व्यवस्थितरित्या आपल्या डॉक्टर व घरातील मंडळींबरोबर चर्चा -सल्ला मसलत करूनच  शक्यतो निर्णय घेणं आवश्यक आहे. अल्लाह ( परमेश्वर ) नें  सवलत दिलेली आहेत.

                इस्लाम मधे कोणत्याही गोष्टीसाठी अतिरेकी भुमिका बिलकुल नसती व नाहीतच. प्रत्येक गोष्टीचे पर्याय उपलब्ध आहेत. चांगले व योग्य पर्याय उपलब्ध आहेत.  कोणत्याही प्रकारचे आरोग्याला नुकसान होईल अशी कोणतीही अतिरेकी भुमिका बिलकुल नाही व नव्हती व नाहीत सुद्धा.  हे लक्षात घेण्याची गरज आहे.   आरोग्याच्या दृष्टीने व्यवस्थित राहील असा आहार घेऊनच सेहरी घेऊन ( उपवास )रोजा ला सुरूवात केली तर स्वतःबरोबर घरातील इतर सदस्य देखील आनंदाने रोजा चा आनंद घेऊ शकतील असो.


 रोजा ठेवणाऱ्या च्या अंतर्मनातील इच्छानुसार  "रोजा" उपवासाची तयारी करणं फारच महत्वाचं असतं.

   हजरत अबू हु्रेरा रजि. सांगतात की," आम्हाला पैगंबर मुहम्मद स. नीं सांगितलं की,सेहरी खाना सबाब ( पुण्य ) आहेत. ".

   सेहरी न करता दिवसभर उपाशीपोटी राहणे यामुळे रोजा चे पुन्य (सबाब) शुन्य टक्केच राहील. 

रोजा साठी खालीलप्रमाणे गोष्टींची नियमावली पाळावी लागेल, 

फक्त उपाशीपोटी म्हणजे रोजा ठेवणं नव्हे ,अल्लाहा (ईश्वरा) च्या आदेशानुसार  ज्या वाईट भावना - प्रवृत्ती- सवयी ,आचार-विचार, मनातील वाईट सवयीं,  साठवून ठेवलेले द्वेष - मत्सर - कटुता - अश्लिल विचार - अश्लिल चाळे करत आसाल तर ते सोडुन देणे, अश्लिल फोटो-व्हिडिओज,- पोस्टर्स, हें  बघणे सर्व सोडून देणं. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्ती  समाजाला त्रास होईल आशा कृत्य - सवयी- विचार सोडून देणं, आपल्याकडून  कोणालाही किंचितही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेणे. एवढी मनाची पुर्ण तयारी करून ,दिवसभर  उपासना ने राहणं म्हणजे  ,ईच्छा-  शक्तिवर - संयमावर किती परीक्षा दिली असं वाटतं. 

    पैगंबर मुहम्मद स्व. म्हणतात की," कयामत (प्रलयंकाळ)च्या दिवशी जन्नतुल फिरदौस (स्वर्ग) मध्ये  एक "रययान"नावाचे प्रवेश द्वार आहेत, त्या प्रवेशद्वारातून फक्त रोजा( पवास )करणाऱ्यांचेच   ( स्वागत केले)  प्रवेश दिले जाईल (हादिस :- सहीह बुखारी .नं.१८९६ ).



     जगात प्रत्येक शहरात -खेड्यात - कुठे ना कुठे काही परिस्थिती  उद्भवत असते, सामाजिक बहिष्काराची , आर्थिक परिस्थिती,दुष्काळी परिस्थिती,भुकंपाची परिस्थिती, महापुराची परीस्थिती, असा अनेक भीषण परिस्थितीत खुप लोक उपाशी पोटी राहतात.  खुप ठिकाणी भुकबळी पडलेले असताना दिसतात ,  काही काही   भुकेले तर आपल्या आजूबाजूला  असतात परंतु त्यांच्या स्वाभिमानी परिस्थिती नुसार भिक मागु शकत नाहीत,    भिकारी रस्त्यावर कधी पासून उपाशी आहेत अन्ना पाण्याविना किती व्याकुळ  असेल,  पीडित,अनाथ, निराधार, दुष्काळग्रस्त,संकटग्रस्त  हें आपलेच बंधू कसे उपाशी राहत असतील.या सर्व परिस्थिती चा आढावा आपण खरंच करून बघितलं तर.. कसं कसं वाटतं.. विचार करून करून.

भुक ही जात नाही तर परिस्थिती आहे यामुळे जाती -:पातीच्या भिंती तोडून कोणताही मनुष्य किती हीं निर्दयी असला तरी मनाच्या एका तरी कप्यात परोपकारी वृत्तीची भावना उत्पन्न होतेच आणि  अल्लाह (परमेश्वर - भगवंताला) ला रोजा तुन हेच अपेक्षित आहे. हेच खरं  अंतिम सत्य इस्लाम ला मान्य आहेत.हेच अल्लाह ( परमेश्वर ईश्वर भगवंत )पवित्र कुर आन, पैगंबर मुहम्मद स्व.रमजान मधील रोजा उपवावातून संदेश देण्याचा  उद्देश आहेत की.दुसऱ्यांना जगण्याची प्रेरणा  व बरोबर घेऊन चला.,जगा आणि जगु द्या  ( क्रमशः).

(मित्रांनो,  लेख आपणास आवडल्यास  कोणताही बदल  न करता आपल्या मित्रांना आवश्य पाठवा.  प्रतिक्रिया अवश्य कळवा).



  डॉ. सलीम  सिकंदर शेख

 बैतुशशिफा मल्टिस्पेसिलिटी हॉस्पिटल.

मिल्लतनगर 

श्रीरामपूर

मोबाईल :-  9271640014


समाज सुधारणेचा परिवर्तनशील दीपस्तंभ - संत सेवालाल महाराज


भारतीय संत परंपरेत अनेक संतांनी जगाला दिशा देण्याचे काम केले आहे . जगामध्ये जेव्हा- जेव्हा अन्याय ,अंधश्रद्धा विषमता ,याचे ढग जमलेले असतात. माणूस- माणसापासून दूर गेलेला असतो .विचारांचे महायुद्ध सुरू होते.तेव्हा महापुरुषाच्या रूपात संत जन्मा येऊन अंधाऱ्या वस्तीत जाऊन लोकांच्या मनामध्ये दीप  प्रज्वलित करून झोपलेल्या समाजाला जागे करण्याचे काम करत असतात. असाच एक करुणेचा सूर्य उगवून नवी दिशा दाखवणाऱे ,समाज सुधारणेचा परिवर्तनशिल दीपस्तंभ असणारे तेजस्वी नाव म्हणजे संत सेवालाल महाराज आहे.संत सेवालाल महाराज हे केवळ एका समाजाचे आराध्य दैवत नव्हते. तर ते समतेचे जिवंत तत्त्वज्ञान होते. त्यांनी बंजारा समाजात स्वाभिमानाची ज्योत

पेटवली .अज्ञान ,व्यसनाधीनता आणि सामाजिक रूढी परंपरा यात अडकलेल्या जनतेला त्यांनी सत्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या शिकवणीत करुणा होती .आणि विचारात परिवर्तनाची शक्ती होती. संत सेवालाल महाराजांचे कार्य केवळ धार्मिक उपदेशापुरते मर्यादित नव्हते .तर ते सामाजिक क्रांतीचे शांत, संयमी आणि प्रभावी रूप होते . "सेवा हीच सर्वोच्च साधना " हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता  जो समाजाला नवा अर्थ देणारा ठरला. त्यांनी निसर्गपूजेचा संदेश देत माणूस आणि निसर्ग यांची नाते अधिक सुदृढ केले. माणसा माणसातील भेदभाव नष्ट करून समाजाला एकत्र आणण्यासाठी एकात्मतेची  शिकवण दिली.

हृदयात करूणा आणि ओठावर सत्य ठेवून परंपरेच्या नावाखाली चालत आलेल्या चुकीच्या जात-पात रुढी वर प्रहार करून लोकांच्या मनातील अंधार  दूर करण्याचा त्यांनी अहोरात्र प्रयत्न केला. बाह्य चमत्कारापेक्षा स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवण्याचा मूलमंत्र दिला.  त्यांनी शिकवले की नशीब ही गोष्ट प्रयत्ना पुढे लहान असते. कष्ट प्रामाणिकपणा आणि सत्य आचरण यामुळे जीवनाला नवी दिशा मिळते.स्वतःला बदला समाज आपोआप बदलेल .अशी लोकांना शिकवण दिली . माणूस मोठा हा त्यांच्या जन्माने नाही तर कर्तुत्वाने होतो. हे त्यांनी  आपल्या आचरणातून सिद्ध केले.बंजारा समाज भटकंतीतून स्थैर्याकडे येत असताना अनेक सामाजिक अडचणी, अंधश्रद्धा, विस्कळीतपणा यातून मार्ग काढत त्यांनी समाजाला जागवले.

"तूच  तमारो जीवन रो शिल्पकार छे." किंवा तूच आपरो जिंदगानी रो घडणार छे ". याचा अर्थ असा की माणसाचे जीवन हे त्याच्या स्वतःच्या कर्तुत्वावर उभे असते .



तोच त्याच्या जीवनाचा शिल्पकार असतो. दुसरा इतर कोणी येऊन त्याचे भविष्य घडवत नाही. आपल्या विचारांनी कष्टाने आणि सत्य आचरणाने   आपण स्वतःच स्वतःचे जीवन घडवत असतो.असा उपदेशही त्यांनी जगाला केला .

तुमच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य ,अंधार दूर करायचा  असेल तर स्वतःच्या अंतकरणातील दीप जागवावा लागेल याचे महत्त्व पटवून दिले. "एक व्हा, सत्याचा मार्ग धरा, मेहनतीने जगा". दुसऱ्याला दोष घालत बसण्यापेक्षा स्वतःला घडवणे महत्त्वाचे आहे .हाच त्यांच्या संदेश होता .

जीवन घडवताना तीन गोष्टी त्यांनी अधोरेखित केले 

१.सत्य - खोटेपणाने नव्हे तर प्रामाणिकपणे जगात उभे रहा.

 २.सेवा -  समाजाशी  नाळ जुळवा, स्वतःबरोबर इतरांचाही विचार करा .

३.मेहनत - कष्टशिवाय कोणतेही स्वप्न साकार होत नाही .

हा संदेश वैयक्तिक प्रगतीसाठी नाही तर सामूहिक उन्नतीसाठी आहे .प्रत्येक व्यक्ती  जेव्हा स्वतःचे जीवन घडविले .तेव्हा समाज आपोआप सक्षम होईल असे त्यांचे म्हणणे होते .



"झूठ मत बोलो, चोरी मत करो, मेहनत खाओ."

खोटे बोलू नका .चोरी करू नका कष्टाची कमाई  खा .या वचनातून समाजाला सत्य , श्रम आणि सदाचाराचा संदेश दिला.

त्यांची जयंती साजरी करताना त्यांच्या विचारांचे अनुकरण करून आपणही आपल्या अंतकरणातील दीप प्रज्वलित करून समतेचा संदेश समाजात पेरुया . हीच संत सेवालाल महाराजांच्या जयंतीची खरी प्रेरणा ठरेल.. जय सेवालाल. 


मनिषा कांबळे यवतमाळ

श्री सिद्ध चक्र महा मंडल विधान का आयोजन होगा दिनांक 22 फरवरी से 3 मार्च 2026 तक

 


    शब्दशिल्प/कोटा  (राज) -आर के पुरम स्थित जंगल वाले बाबा मुनि चिन्मय सागर जी महाराज की मंगल प्रेरणा से निर्मित श्री 1008  मुनिसुब्रतनाथ दिगंबर जैन त्रिकाल चौबीसी में  जी परम पूज्या गणिनी आर्यिका श्री 105 विभाश्री माताजी ससंघ (13 पिच्छी) के पावन सानिध्य में श्री सिद्ध चक्र महा मंडल विधान का आयोजन होगा। मंदिर समिति के अध्यक्ष अंकित जैन ने जानकारी देते हुए बताया कि दिनांक 22 फरवरी से 3 मार्च तक भव्य अनुपम सिद्धों  की आराधना के लिए  श्री सिद्ध चक्र महामंडल विधान का आयोजन भक्ति भाव और श्रद्धा के साथ गुरु मां विभा श्री माता  के पावन सानिध्य में किया जाएगा।



मंदिर समिति के महामंत्री अनुज गोधा कार्याध्यक्ष प्रकाश सेठिया ने बताया कि दिनांक  22 फरवरी रविवार को प्रातःकाल मंगल अभिषेक और शांतिधारा के बाद विशाल घटयात्रा गाजेबाजे के साथ मंदिर परिसर से निकाली जायेगी। उसके बाद मंडप उद्घाटन मंडप शुद्धि ध्वजारोहण के बाद मंगल प्रवचन होगे।   दोपहर इंद्र इंद्राणीयो  की मेंहदी शाम गुरु भक्ति एवं आरती होगी।मंदिर समिति के कोषाध्यक्ष ज्ञान चंद जैन संयोजक पदम जैन ने बताया कि विधान मांगलिक क्रियाएं पंडित जितेन्द्र शास्त्री पंडित रविंद्र शास्त्री पंडित स्वतंत्र  जैन करवाएंगे। संगीत की मधुर ध्वनियां बिखेरने धर्मप्राण पिडावा से हरीश जैन एवंड पार्टी आयेगे।मंदिर समिति के प्रचार प्रसार मंत्री पारस जैन "पार्श्वमणि" एवं उपाध्यक्ष  लोकेश बरमुंडा ने जानकारी देते हुवे बताया कि समापन के दिन दिनांक 3 मार्च मंगल वार को मंगलाचरण मंगलाअष्ट शांति धारा नित्य पूजन के बाद विश्व में शांति की मंगल कामना से विश्व शांति महायज्ञ का आयोजन गुरु मां विभा श्री माता जी  ससंघ के पावन सानिध्य में किया जाएगा। 


उसके बाद गजरथ गाजे बाजे ओर बग्घियां ओर इंद्र इंद्राणीया सहित विशाल शोभा यात्रा मंदिर परिसर से निकाली जायेगी।समिति के निदेशक विनोद जैन टोरडी ने जानकारी देते हुवे  बताया कि श्री सिद्ध चक्र  महा मंडल विधान भव्यता के साथ संपन्न करने के लिए मंदिर के सामने एक विशाल पांडाल  बनाया गया है जिसकी सजावट देखते ही बनती है।          

 प्रस्तुति                  

पारस जैन "पार्श्वमणि" 

पत्रकार कोटा 9414764980

जीवन भर की धर्म साधना का नाम है दीक्षा

 


(श्रीमति मनोरमा जैन अजमेरा बूंदी का जीवन परिचय)

 आर्यिका १०५ वासपूज्य मति माता नाम मिला

गुरु माँ गणनी आर्यिका स्वस्ति भूषण

शब्दशिल्प/बाड़ा पदमपुरा(जयपुर)-एक होता है शास्त्र को पढ़ना और एक होता है शास्त्र को जीना और सारे शास्त्रो का सार है जीव अलग है पुद्गल अलग है, और धर्म का सार है इसकी साधना करना। जीव अन्य है पुद्गल अन्य है, यह बात चाहे श्लोक के द्वारा कही जाये या गाथा, ६५ कविता या गद्य रूप में सार तो यहीं है। चारों अनुयोग भी यही शिक्षा दे रहे है कि संसार से  मोह हटाकर आत्मा की ओर ध्यान दिया जाये। आत्म साधना अध्यात्मिक जीवन इसी को कहा जाता है।

   सारे शास्त्रों का सार है आत्मा को जानकर, कषाय से पापो से राग द्वेष, मोह से अपनी आत्मा को बचाया जाये।  मन आत्म भावना  में लगे और इन्द्रिया संयम में रहे।  आते हुये कर्मों को रोकना। जाते हुये कर्मों का बड़े से बड़ा दरवाजा खोलना । यही प्रक्रिया, उत्तम साधना मोक्ष का रास्ता है।

   बूंदी निवासी श्रीमति मनोरमा देवी उन्ही धर्मात्मा की श्रेणी में आती है, जो घर में रहकर, भक्ति और आत्मसाधना मे हर क्षण व्यतीत करती थी। तीनो अष्टान्हिका, तीनो सोलहकारण दशलक्षण जहाजपुर आकर रहती थी। प्रातः ४ बजे उठकर जिनकी सामायिक पाठ आदि की किया प्रारंभ हो जाती थी। सर्दी हो गर्मी बारिश वे किसी से भी प्रभावित नही होती थी। कमरे में अकेली रहे या किसी के साथ, कोई चर्चा नहीं, कोई बातचीत नहीं, किसी से कुछ कहना नहीं, कोई शिकायत नहीं करना। कभी कोई चीज नहीं मांगी । उनके पास सामान केवल दो थैले मे होता था, एक उनके कपड़े, जो कि धोकर शुद्ध करके अलग पेकिट मे रखती थी कि, एक दूसरे से टच न हो। दूसरे में पूजा की किताबे और ढेर सारी सामग्री। बस इतना ही उनका परिग्रह देखा था।

   जब जहाजपुर मे रहती थी तब सुबह से ११ बजे तक पाठ पूजा करना, उसके बाद आहार देना। पश्चात सभी कहते थे पहले भोजन करलो, तब ये कहती कि मेरी जाप बाकी रह गई है  मैं बाद में खालूँगी। खाने में कोई नखरे नहीं, कोई इच्छा नहीं, जो मिले शांति से खालेती। जाप पूरी करने ही खाती थी। दोपहर में जाकर देखो फिर हाथ मे या तो किताब या फिर माला मिलती थी। कभी किसी से बात करते नहीं देखा जब में २०१३ में बूंदी गई थी । ठीक

११ बजे मंदिर आती थी. ३-४ बजे तक अकेले मंदिर में बैठकर पूजा पाठ जाप करती शाम को जाकर भोजन करती थी। मैंने पूछा ऐसा क्यो, बोले घर के काम टाइम लग जाता है। इन्हें भूखा रहना स्वीकार था, पर इनका धर्म ध्यान छूट जाये ये स्वीकार नहीं था। गृहस्थी मे रहकर ऐसा कोई करे तो शायद घर वाले परेशान हो जाते है। पर ये कभी शिकायत नहीं करती थी।  दिनांक ५ फरवरी २०२६ को पता चला कि इसकी आहार नली में ट्?युमर है डॉक्टर  ने ऑपरेशन में लिए बोल दिया था।  श्रीमति मनोरमा जी ने कहा मैं मुंह में नली नही डलवाऊँगी, और आहार पानी छोड़ दिया। ४ उपवास करके ये मेरे पास पदमपुरा आई। मैंने कह दिया अब में वापस नहीं जाऊँगी, मुझे समाधि दे दो। आजीवन अन्न जल का त्याग इन्होने  आत्मशक्ति के साथ त्याग किया। राष्ट्रीय माडिया प्रभारी पारस जैन 'पार्श्वमणि' पत्रकार ने जानकारी देते हुवे बताया  कि परम पूज्य चारित्र चक्रवाती आचार्य शांतिसागर जी महाराज की परम्परा के पंचम पट्टाचार्य परम पूज्य आचार्य वर्धमान सागर जी महाराज एवं पूज्य  गणिनी आर्यिका स्वस्ति भूषण माताजी तथा गणिनी आर्यिका  सरस्वती माताजी के पावन सत्संग-सानिध्य में  धर्मनिष्ठा एवं श्रद्धामयी बहन मनोरमा देवी अजमेरा बूंदी की  क्षुल्लिका दीक्षा ग्रहण करवाई थी।



    यह मंगलमय दीक्षा समारोह पावन अतिशय क्षेत्र पदमपुरा में सम्पन्न हुआ था , जहाँ संघ के करकमलों से उन्हें  क्षुल्लिका १०५ वासपूज्य मति माताजी’ के नाम से दीक्षित किया गया। आज आचार्य श्री ने सम्पूर्ण संघ के सानिध्य में 'आर्यिका दीक्षा' भी दे दी।

यह क्षण सम्पूर्ण बून्दी जैन समाज के लिए अत्यंत गौरव, आनंद और आध्यात्मिक प्रेरणा का विषय है। उनका यह त्याग, तप और संयम का पावन मार्ग समस्त समाज के लिए अनुकरणीय एवं प्रेरणादायक रहेगा।

   समस्त बून्दी जैन समाज की आर्यिका १०५ वासपूज्य मति माताजी सल्लेखना समाधी की ओर अग्रसर है। अनुमोदना, अनुमोदना, अनुमोदना।

संकलन कर्ता 

पारस जैन 'पार्श्वमणि' 

पत्रकार कोटा मो. ९४१४७६४९८०

----------------------


गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

फ्युरियस ड्रॅगन : वैचारिक विद्रोहाचा संयमी आविष्कार -डॉ फुला बागूल



चाळीसगाव येथील ज्येष्ठ कवी साहेबराव मोरे यांचा "फ्युरियस ड्रॅगन"  हा काव्यसंग्रह चाळीसगाव येथील शब्द संवाद प्रकाशनाने 2011 मध्ये प्रकाशित केला .

काव्यसंग्रहाचे नाव इंग्रजी असले तरी या कवितेतून निळ्या जाणिवांचा विधायक विद्रोह अधोरेखित होत असल्याचे प्रस्तावनेतून डॉ .भगवान ठाकूर यांनी म्हटले आहे .

.प्रस्तुत संग्रहात 51 कविता आहेत .


'वेदनेचा हुंकार फ्युरियस ड्रॅगन रूपाने संवेदन जाणीव होऊन प्रकटला' असे कवीने प्रारंभी म्हटले आहे .

कवीची विद्रोही भूमिका , खरे तर ती विधायक अधिक आहे ती 'ड्रॅगन प्रतिज्ञा' या पहिल्याच कवितेतून उमटली आहे, कवी यात म्हणतो,

 "मुंगीस साखर आणि माणसाला पाण्यापासून वंचित ठेवून / तडफडून मारण्याची प्रस्थापित परंपरा / समूळ नष्ट करण्या मी सदैव प्रयत्नशील राहीन"( पृ .१)

कवी यालाच मानव पूजा म्हणतो .

मानव मुक्तीचे उद्गाता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेंचा कवी पाईक आहे कवीला जाती तोडून समाज जोडायचा आहे जी संस्कृती अमानवी आहे ती कवी नाकारतो .सर्वच देश बांधव मला बांधव मानत नाही ही खंत देखील कवी व्यक्त करतो .

'प्रकाश पेरली वाट' या कवितेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा कृतज्ञता भाव व्यक्त झाला आहे .माणसांना माणूस पण बहाल केल्याबद्दलची ही कृतज्ञता आहे

"माझं जगणं कुणासाठी कशासाठी?"  या कवितेतून कवी आपला जीवन दृष्टिकोन स्पष्ट करतो -

" मानवतेचा मार्ग दाखवण्यासाठी/ सत्शीलाचा शांती मार्ग दाखवण्यासाठी / प्रस्थापितांना वठणीवर आणण्यासाठी / प्रशासनरुपी जिवाणू विषाणूस कर्तव्यदक्षतेची लस टोचण्यासाठी"(३)

डॉक्टर बाबासाहेबांच्या या शिलेदाराची लाईन ऑफ थिंकिंग स्पष्ट आहे .जे जे अमंगल आहे ते ते नष्ट करण्यासाठी मी जगेन ही ती विचार धारा आहे . भवतु सब्ब मंगलम या बौद्ध तत्त्वज्ञानाशी ही संलग्नता आहे .

प्रशासनातले जंतू वंचितांना न्याय देत नाहीत . भ्रष्टाचाराने ते व्याप्त आहेत . त्यांच्या शून्य कार्यक्षमतेमुळे वंचितांना हक्कांच्या  परिघाबाहेर राहावे लागते . कवी त्यांना कार्यतत्पर करण्यासाठी जगणार आहे .

प्रशासनास कवी पुन्हा

 जबाबदार धरत म्हणतो की, 

"बेजबाबदार प्रशासनाचे आच्छादन / 

हरामखोर नराधमांचे करते रक्षण"(४)

मुंबईच्या दंगलीवरही कवी भाष्य करतो .

अद्वैत कवितेतून प्रतीकात्मकता झळकते .

" अनीतीचा असभ्य सोपान / 

आलिशान नीतीची सिडी / 

नतभ्रष्ट वाळवी "(६) ही ती प्रतिकात्मकता आहे .

परंपरेने आम्हांवर आमच्या भगिनींवर अत्याचार होत गेले .

तुम्ही कुंटणखाने जोपासले त्यात आमच्या भगिनी पोटुशा राहत गेल्या . देवदासी देखील आमच्याच . आम्ही समतासूर्याचे वंशज आहोत . आम्ही बुद्धिष्ट का झालो याचे उत्तर कवी असे देतो -

"स्वातंत्र्य समता बंधुत्व शिलालेखाच्या / स्वप्नपूर्ती स्तव आम्हास बुद्धिस्ट व्हायचं / सामाजिक समतेस्तव आम्हास /बुद्धिष्ट व्हायचं"(७/८)

याच कवितेत  प्रस्थापितांना आवाहन करतो की -

"भोंगळ्या संस्कृतीला बेगड/ चिकटवण्यापेक्षा दिशा बदलवा"(८)

डॉक्टर बाबासाहेब यांच्यानंतरची पिढी त्यांच्या विचारांवर चालत नाही हे बघून कवी लिहितो

" तू माणसातला माणूस जागवलास / तुझ्या मागे त्याच माणसाने / माणुसकी पुरून / समता गाडून थडगे उभारले /

 सत्ताधारी पक्षाचा  तुकडा चघळतांना / तुझ्या स्वप्नांची पायमल्ली करत आहेत / पंच शीलाच गलबत ह्यांच्या भडवेगिरी मुळे / आजही /

 समता किनारा गाठू शकलं नाही "( पृ .११/१२)

हा स्वजनांच्या कृतघ्नतेवरील आक्रमक संताप आहे . डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर  न चालणाऱ्या स्वार्थी वृत्तीच्या स्वजनांवर ही परखड टीका आहे त्यातून क्रोध आणि खंत व्यक्त झाली आहे .

राज्यकर्तेच गुंड असल्याची शंका गुंड कवितेत व्यक्त होते . ध्यासवेडा , शांतिदूत , प्रजासत्ताकाचा पुरस्कर्ता , अशी कवीची भूमिका सौदा कवितेत येते .

कलावंतीनीच्या भांगेतला सिंदूर ही  उपमा एका विशिष्ट विकृत संस्कृतीसाठी कवीने योजली आहे . " क्रांती "ही कविता देखील याच आशयाची आहे .

मायभूमीच्या मुक्तीसाठी जे खपले ते देशद्रोही म्हणून गणले गेल्याची खंत फ्रिडम फायटर कवितेत येते,

"मनुवादी झेरॉक्स पिलावळ / ई-मेलने येत आहे / आरक्षित झोनच्या सीमारेषेवर प्रिंट व्हायच्या आत / वळ चणीतले हत्यार परजून घ्या"( पृ .२४)

अशा शब्दात प्रस्थापितांचे कावे उघड करून स्वजनांना सावध करण्याचे ,त्यांच्यात विद्रोहाचे बीज पेरण्याचे कार्य कवी येथे करतो .

भ्रष्ट फायदा अनिष्ट वायदा /

 मतांचा जोगवा सत्तेस्तव फायदा /

 झुंड निघाली देश विकण्या / 

सत्तेची झुल परदेश जाण्या / 

देऊन जीव घेण्या भुलथापा  देशी/

स्विस बँकेची लॉकर भरलीत विदेशी/"(२५))ही वास्तवता लुटारू कवितेत कवी मांडतो ही कविता मुळीच कालबाह्य झालेली नाही .साधारण पंधरा वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली ही कविता व त्यात वर्णित देशस्थिती  आजही बदलली आहे असे वाटत नाही .




"अस्वस्थ वास्तव"  या कवितेतून साहित्य संमेलनाचे वास्तव मांडले आहे. तेथील परिसंवाद, कथाकथन, काव्यसंमेलनं, निमंत्रित वक्ते व त्यांचा थाटमाट या गोष्टी सामान्यांच्या व्यथावेदनांपासून पुष्कळ लांब असतात .वक्ते कोरडा गहिवर काढतात .नवोदित फक्त उष्ट्या पत्रावळी गोळा करण्यासाठी असतात .सर्व प्रकारचा मलिदा आणि मानसन्मान प्रस्थापितांनाच मिळतो हे साहित्य क्षेत्रातले वास्तव ही कविता मांडते .

कवी आया बहिणींना रखेल म्हणून ठेवणाऱ्या बदफैली वृत्तीच्या लोकांचा , सोफेस्टिकेटेड सौदागरांचा ,लोकशाही तुडवणाऱ्या बाहुबली नेत्यांचा , इतिहासाला बदनाम करणाऱ्या संशोधकांचा , संस्कृतीच्या नावाखाली माणसांना नागवणाऱ्या धर्म मार्तंडांचा आणि वेदांचाही निषेध "थुंकतो आम्ही"  या कवितेत  करतो .

"धर्मांधतेचा वनवा " या कवितेला गौतम बुद्धाची मूर्ती उद्ध्वस्त करण्यात आल्याच्या घटनेची प्रेरणा आहे .

स्वातंत्र्याची अमुक अमुक वर्षे ओलांडल्यानंतरही सुरक्षेची गरज देशवासीयांना वाटते हा लेखाजोखा स्वातंत्र्याचा कवीने मांडला आहे .


बुद्धी भ्रष्ट बहुजन नेतृत्वाचा बुरखा फाडणारी 'आता 'ही कविता आहे .बाबांचा कायदा हाती घेऊन हैदोस घालणाऱ्यांना कवी अजिबात पाठीशी घालत नाही . हे या कवीचेही वेगळेपण आहे

"भरकट" या कवितेत रस्ते व त्यांची स्थिती , रस्त्यांच्या वृत्ती प्रवृत्ती अतिशय मार्मिकपणे येते .शहरी रस्ते , राजधानीचे रस्ते ,हम रस्ते असे रस्त्यांचे प्रकार आणि रस्त्यांच्या प्रवृत्ती कवी निर्देशित करतो .कवितेच्या शेवटी महत्त्वाचे विधान कवी करतो -

"रस्त्यांचा रस्त्यांवरचा भरोसा उडालेला /

 सेमी गुरुकुलातील द्रोणाचार्यांसारखा"( पृ .३१)आधुनिक शिक्षण प्रणाली. त्यात कावळ्यांच्या छत्र्यासारख्या उगवलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा व एकूणच तेथील शैक्षणिक परिस्थिती यावर मार्मिक भाष्य करणाऱ्या या ओळी आहेत

"राजद्रोही"  या कवितेला काही पैलू आहेत .

त्यातला एक पैलू म्हणजे ऊसतोड शेतमजूर स्त्री चा नादान मुलगा झोपडीत असताना भाजतो .झोपडीची आग विझवण्यासाठी तराळाची पत्नी विहिरीवरच्या ब्राह्मणाला पाणी मागते ते तो देत नाही .यातलं कारुण्य कसे वर्णावे ?

दहशतवाद किंवा विद्रोह हा देशाशीयांच्याच संवेदन शुन्यतेमुळे जन्मला आहे हा कवीने मांडलेता सिद्धांत हा दुसरा पैलू ! तर कवितेच्या शेवटी येणारा तिसरा पैलू लोकमान्य टिळकांनी केलेले विधान . एकूण कविता लक्षणीय आहे .

भ्रष्ट निवडणुका  ,भ्रष्ट लोकशाही , गुणशून्य नेतृत्व , याचा परिणाम म्हणून' कुबेरा हाती सत्तेची नाडी ' असा आपल्या लोकशाहीचा एकूण परिपाक कवी मांडतो .

कवितेत कवी देशाची स्थिती मांडतो

" ज्ञानगंगेची सूत्रे निरक्षरा हाती / शासनाची नाडी दलाला हाती /

 कलावंत धनिकांचे गुलाम /

 बुद्धिजीवींना संस्था सम्राटांचे लगाम/"(३७) अत्यंत मार्मिकपणे कवीने हे निरीक्षण नोंदवले आहे . देश स्थिती आज सुद्धा यापेक्षा वेगळी नाही .



नोकरीच्या जाहिरातीत कशा कशाला प्राधान्य दिलेली असते आजपर्यंत अशी एकही जाहिरात आली नाही की ज्याच्यामध्ये माणूस जातीस प्राधान्य असे लिहिले असेल ."प्रतीक्षा"  कवितेत आलेला हा आशय विचार करण्यास प्रवृत्त करणारा आहे

"घातक चष्मा"  या कवितेत ऑफिस टू ऑफिस राबणाऱ्या विद्वानांचं काय करायचं ?हा अतिशय भेदक प्रश्न कवी उपस्थित करतो.

वेश्येने दिलेल्या उत्तरांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न "अर्थासाठी" या कवितेत येतो, तो विषण्ण करतो .

" मॅनमेड पाऊस" ही या संग्रहातील सर्वोत्कृष्ट कविता आहे . पाऊस जर माणूस राहिला असता तर त्यांनेही गरिबांवर अन्याय केला असता असा या कवितेचा सार आहे .रसिकांनी ही कविता मुळाबरहुकूम वाचावी .

"क्रांतीज्योत"  कवितेत कवी सखीला आपल्या सदैव वंचित वस्तीत येण्यापूर्वी काय काय करून ये हे सांगतो .

शेवटी तो म्हणतो ,

"यायचेच तर होण्या ये रक्तिमा / 

नको येऊस होऊन प्रियतमा/"( पृ ४९)

घरटे प्रस्थापित व्यवस्थेने उद्ध्वस्त केल्यावर या स्थलांतरितांना कुठे कुठे आणि कशा कशा अवस्थेत राहावे लागते त्याचे वर्णन " घरटं"  या कवितेमध्ये येते .

या देशातील दलित, गरीब, शोषित ,वंचित यांना कधीही लक्झरी लाईफ मिळाले नाही .


कवी लिहितो -

"निंबोणीच्या झाडामागे/ कधीच  चंद्र झोपी गेल्याचं आठवत नाही /

 कातर वेळेपर्यंत कणसं कुठून काट्या बणग्यांनी लदबदलेल्या कुशीत / भुकेने कासावीस पोटात /

 खूपणार्या डोळ्यात डोळ्यात कसली झोप?"(५३)

स्वातंत्र्यदिनाने वंचितांच्या झोळीत काहीही टाकले नाही .त्यांची वंचना दूर झाली नाही .भलेही लाल किल्ल्यावरून कितीही घोषणा झाल्या असोत .

" १५ ऑगस्ट?  या कवितेत कवी म्हणतो -

" ज्यांच्या श्रमात सूर्य भिजवण्याचं सामर्थ्य आहे/ 

त्यांच्या  बाहूत फडकावा तिरंगा"(५६)

अब्राहम लिंकनच्या धर्तीवर कवी साहेबराव मोरे यांनी 'मास्तर त्याला चक्रव्यूह भेदायला शिकवा  'ही फार मार्मिक  कविता लिहिली आहे .

समाज वास्तव , शालेय वास्तव  ,प्रशासनाची दृष्टी ,बालकांचे बदललेले मानसशास्त्र ,मूल्य व्यवस्थेचा ऱ्हास असे अनेक पैलू या कवितेला आहेत .


अशा रीतीने "फ्युरीयस ड्रॅगन"  हा काव्यसंग्रह समाज स्थितीवर मार्मिक भाष्य करतो . वंचितांच्या वेदनेने कळवळतो . माया मावल्यांच्या अत्याचाराने तो क्रोधित होतो . इतिहासाच्या अन्यायाने विषण्ण होतो .व्यवस्थेला संयमाने जाब विचारतो .

स्वजनांच्या कृतघ्नतेला उघडे पाडतो . डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी बांधिलकी मानत इतरांनाही अशी बांधिलकी मानण्याचा आग्रह धरतो .स्वातंत्र्याचा लेखाजोखा मांडतो . काही ठिकाणी भयानक संतापलेला पौराणिक प्राणी ( फ्युरियस ड्रॅगन ) होऊन चवताळत प्रस्थापितांना धारेवर धरतो .

काही दोष स्थळे या कवितेत अशी आहेत -

प्रमाण लेखनाकडे कवीचे दुर्लक्ष झाले आहे .

काही चुकीचे शब्द कवितेत येतात .त्यामुळे तेथे अर्थ अनाकलनीय होतात .दोन कवितांचा अपवाद सोडल्यास संपूर्ण संग्रह मुक्तछंदात आहे .प्रयोगांचे वैविध्य आढळत नाही .बहुसंख्य कवितांच्या प्रेरणा या नैमित्तिक  आहेत .अर्थात कवीचा हा पहिलाच काव्यसंग्रह असल्याने त्या स्वाभाविकही ठरतात . तथापि ही कविता वंचितांच्या साहित्य प्रवाहात एक लक्षणीय कविता आहे एवढे मात्र निश्चित .

- - - - - - - - - - - - - - 



समीक्षण : डॉ.फुला बागुल.

-६८ / श्रृतकीर्ती / पित्रेश्वर कॉलनी / शिरपूर मो. 9420605208/9822934874

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...