======================= शब्दशिल्प/धाराशिव_ आज दिनांक १८ जानेवारी २०२६ वार रविवार रोजी विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,शिंगोली ता. जि. धाराशिव शाळेतील पर्यवेक्षक श्री. रत्नाकर बाबुराव पाटील यांना अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई व मासिक वृत्तपत्र न्यायप्रभात यांच्या तर्फे अष्टपैलू राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार देण्यात आला.
सदरील मानाचा राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर साहेब {विश्वगुरू,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जेष्ठ साहित्यिक,विचारवंत, कलावंत}, अष्टपैलू संस्कृती कला अकादमीचे अध्यक्ष श्री. ह. भ. प. शिवाजी खैरे सर, {गायक,वादक,संपादक,कवी, लेखक}, प्रमुख अतिथी मा.प्रताप पाटील, {आय.सी.डी.एस.प्रकल्प अधिकारी, नाशिक}, ह.भ.प. सौ. अनुसया खैरे {सहसंपादक व कोषाध्यक्ष,अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई} यांच्या हस्ते देशस्थ देवज्ञ,सुवर्णकार समाज धर्मशाळा श्रीक्षेत्र आळंदी जि.पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आला.
सदरील राज्यस्तरीय साहित्यरत्न मानाचा पुरस्कार साहित्यिक,शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात आला. हा मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे स्नेह ग्रामविकास शिक्षण मंडळ,देवताळा ता.औसा जि. लातूर अध्यक्ष मा.बाबुराव चव्हाण, सचिव तथा माध्यमिक मुख्याध्यापक आण्णासाहेब चव्हाण, संस्थेचे सर्व पदाकारी, आदर्श प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सतिश कुंभार व समस्त कर्मचारी, विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक व विद्यार्थ्यांनी रत्नाकर पाटील सरांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा