आज घळीले वऱ्हाडी बोलीभाषेत साहित्यिक लिखानात दर दिसाले भर पळत हाये. दरोज जुन्या नव्या साहित्यीकायचे नवनवीन पुस्तकं प्रकाशित होत हायेत. हे गोट मोठी आनंदाची हाये. झाड जर हिरवं होत असल त् ते भवीष्यात गह्यरा सावली देते. त्याले फुल बी लागतात अन् फळ बी येतात. पाखरायची आबादानी होते. असीच नवीन लेखकाईचा हातभार लागत असल्यानं वऱ्हाडी बोली फुलुन रायली हे महत्वाचं.
अलीकळेच उमरावतीच्या आबासाहेब कडू या जेष्ठ लेखकाची अस्सल वऱ्हाडी बोलीत असलेली 'गुवाहाटी एक्स्प्रेस व्हाया अमरावती' हे कादंबरी प्रकाशित झाली. हे कादंबरी वाचताखेपी भलतीच मज्या आली. गावाकळची गुयचट वऱ्हाडी बोली अन् तिच्यात बदलत्या काळानुसार नवीन आलेले शब्द, याचा पध्दतशीर ताळमेळ लेखकानं साधला हाये. हे या कादंबरीचं बलस्थान हाये.
गुवाहाटी एक्स्प्रेस या कादंबरीत साऱ्यात मेन पात्र हाये ते म्हंजे "मारोतीराव " हा गळी जीव लावून पक्षाच काम करनारा कार्यकर्ता. आपल्या नेत्याले निवळुन आनासाठी सारं गाव शिंगावर घेनारा. मालकाच्या आंदी साऱ्या गावाले उत्तरं देनारा. अन् साऱ्या गावची खबरबात ठुयनारा हा मारोतीराव वाचल्यावर असं वाटते का आपल्या बी गावात असाच मारोत्या हाये. तसं पायल त् असं क्यारेक्टर हे परत्येकच गावात रायते.
पयलमसुट मारोतीरावचं पात्र अस दिसते का थो येक गनेशरावचा कार्यकर्ता. जसा अकबराच्या दरबारात बिरबल असते डिक्टो तसाच. पन या मारोतीराव अन् आपला नेता गनेशरावच्या समंधात मिठाचा खळा पळते. दोघात पैसे खायाच्या कारनावरुन भिनसल्यावर मारोतीनं नेते अन् पक्ष दोनी बी सोळले. ईरोधी पक्षात प्रवेश केला पन घन्शामनं खर्चात भलतीच गपकनी देली. अन् पक्ष प्रवेशाच्या कारेक्रमात जेवनाच्या कारनानं बंबाट फोत्री केली. नाहाक घन्शामच्या पक्षात गेलो. अस म्हनून मारोती भल्लाच पस्ताई पळला. तो आपल्याच पक्षात वापस यासाठी आमदार देशमुख सायबाले भेटला. हे भेट त्याचा जिंनगीत कलाटनी देवून गेली.
बहिरमबाॅ साऱ्याईच्या नवसाले पावते. म्हनून पंचक्रोशीतले लोकं मोठ्या श्रध्देनं बहिरमबाॅच्या जत्रीले येतात. मारोतीनं बी आपली घरधनीन 'सुनिता' सहीत जत्रीत राहुटी मांडली अन् त्या राहूटीवर आमदार साहेब येक रोज राऊन गेले. या ईशयाची चौतर्फा चर्चा चालू झाली. मारोतीचं क्रेडीट वाडलं. राजकारणात दबदबा वाळला. नशिबानं अन् वदरच्या नेत्यानं साथ देली त नशीब पलटाले टाईम लागत नाई. तसच मारोतीच झालं.
आमदाराचा ईस्वादपात्र मानुस झाल्यानं मारोतीरावचं पक्षात वजन वाळल. लोक त्याईले मानसन्मान द्यायले लागले. ईथुनच कादंबरी रंजकतेच्या शिखरावर पोचते. घन्शाम अन् गनेशरावचा ईरोध चालू असतांनी मारोतीरावले आमदार साहेबाच्या मर्जीनं निवडनुकीचं तिखीट भेटते. अन् पठ्ठया निवडून बी येते. पुळे पुळे प्रगती करत मारोतीराव आमदार होतात. असा हा कादंबरीचा प्रवास पुळे सरकत सरकत जाते.
राजकारनी लोकाईच जीवन रेखाटतानी लेखकानं राजकारनी लोकायचे लेकरं बी कसे बिघळतात हे रोहनच्या पात्रातून दाखुन देलं. बिळी-काळी, शिगारेट अन् दारुच्या नांदी लागून राजकारनी लोकाईचे लेकरं स्वोताची जिनगी बरबाद करतात. अशातच लेकराच्या कायजीनं झुरनारी माय म्हनजे सुनिता हे पात्र येकदम संतुलीत वाटते. कथेतनी जवा शिरपतराव अन् रेखा या जोडप्याची एन्ट्री होते. तथुन ईनोदी किस्से वाचकाले कथेत गुतून ठेवतात. साळी घेण्याच्या नांदात दात पळतात, अन् मंग नवीन दात बसवन्याच्या नांदात साळी राहून जाते. असी कलागत या कादंबरीत पहायले भेटते.
खरं त् पुस्तकाले कोनाची प्रस्तावना न घेता कोनाची पाठराखन न घेता स्वलेखनीवर भरोसा ठेवून लेखक आबासाहेब कडू यायनं हे कादंबरी प्रकाशीत केली. बिना प्रस्तावनेच हे पयलच पुस्तक माया वाचनात आलं. लेखकाले वऱ्हाडी लेखनाचा चांगलाच बाज गवसला हाये. त्याईले बोलीभाषेची चांगलीच माईती हाये त्याचा फायदा त्याईनं करुन घेतला आहे. 'गुवाहाटी एक्स्प्रेस' व्हाया अमरावती या कादंबरीच्या माध्यमातून लेखकानं कादंबरी लिखानातली आपली तरबेजता सिध्द केली हाये. त्यासाठी त्याईच कौतूक व्हायालेच पायजे.
*प्रा. महादेव लुले (देवबाबू)*
अकोला
मो. 9923085311


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा