रविवार, १९ एप्रिल, २०२६

बुवा बाबांच्या जाळ्यात स्त्रिया का फसतात ? (जरा वेगळा पैलू)

 

*ढोर ,गवार, पशु ,नारी ताडन के अधिकारी* हे मनुस्मृतीमध्ये लिहिले आहे. भारतीय समाजावर अनादी काळापासून मनुस्मृतीचा पगडा आहे. वर्णवादी रुढीपरंपरेचे मोठे भयानक भूत काही भारतीय लोकांच्या  मानगुटीवर


आजही बसले आहे .आणि विज्ञानवादी आधुनिक पिढी देखील त्याचे शिकार बनत चालली आहे. खरं पाहता स्त्रिया कितीही शिकल्या असल्या ,नोकरी करत असल्या ,घर सांभाळत असल्या ,कर्तव्यदक्ष गृहिणी असल्या तरी जुन्या पिढीने सांगून ठेवलेले व्रतवैकल्य पूर्णपणे सोडायला तयार नाहीत. धावपळीच्या दैनंदिन जीवनक्रमात देवाचं थोडं केलं तर काय बिघडते! थोडासा त्रास होईल परंतु समाधान मिळेल ह्या भाबड्या समजूती पोटी सुशिक्षित काही सुशिक्षित स्त्रिया देखील व्रतवैकल्य करतात.जुन्या विचारसरणीचे पुरस्कर्ते वयस्कर मंडळी लग्नानंतर स्त्रीने पिढ्या नी पिढ्या चालत असलेल्या रूढी परंपरा पार पाडाव्या म्हणून आग्रह धरतात .मोठ्यांचा मान ठेवावा म्हणून मनात नसतानाही कधी कधी श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा पाडली जाते.

तसे बघितले तर स्त्रिया फार हळव्या मनाच्या असतात.त्यांच विश्व  त्यांचा नवरा,मुलं ह्या भोवतीच फिरत असते. घरावर कोणतीही इडा -पिडा येऊ नये म्हणून त्या वैज्ञानिक दृष्ट्या अयोग्य असले तरी भोळ्या समजुतीने  हे करतात. घरात कुणाची ही तब्येत बिघडली , बिमारी आली आणि औषध उपचार करूनही आरोग्य सुधारत नसेल, दवाखान्याचा खर्च परवडत नसेल. घरातील कुणीही वाईट सवयीला बळी पडले असतील व त्यांचे भविष्य धोक्यात असेल त्यांच्यावर  उपचार सुरू असतील तरीही एखाद्या व्यक्तीच्या सांगण्यावरून दवाखान्यासोबतचा उपाय म्हणून बुवा -बाबांच्या दरबारी जाऊन अंधश्रद्धेला बळ पडतात.       महिला काहीही सहन करते पण नवऱ्याचा बाहेरखया ली पना,त्याचे दुसऱ्या स्त्री सोबत असलेले विवाहबाह्य संबंध कधीही सहन करू शकत नाही. अशा वेळी त्या मानसिक तणावातून जात असतात. ही बाब त्या कोणाला सांगूही शकत नाही कारण नवऱ्याची बदनामी होईल म्हणून. मग कोणीतरी बुवा- बाबांचा मार्ग सुचवतो. मग  त्या बुवां कडे जातात. तो महिलेला विश्वासात घेतो पूजा विधी केल्याने तुझा  नवरा तुझ्याजवळ येईल असे सांगतो.  काही महिलांना मुलं होत नाही किंवा नुसत्या मुलीचा जन्म होत आहे म्हणून घरचे व्यक्ती नेहमी तिलाच दोष देत असतात .ह्या आधुनिक युगात शिकलेल्या स्त्रियांना माहीत असतं मूल न होणे किंवा नुसत्या मुली  होण्यात तिचा एकटीचा दोष नाही परंतु  समाजाच्या दबावाखाली येऊन ,"मरता क्या न करता"या म्हणीप्रमाणे त्या बुवा बाबांच्या लैंगिक शोषणाला कधी कधी बळ पडतात हे त्यांना कळतच नाही. कारण तो बुवा महिलेला नशा देऊन तिचं शोषण करतो. महिला कितीही उच्चशिक्षित कर्तबगार असले किंवा कर्तव्यदक्ष  गृहिणी असली तरी काही पुरुषी अहंकार असणारे महिलांचा पदोपदी अपमान करतात . भोगवस्तू म्हणून तिच्याकडे बघतात.तिची फसवणूक करतात.

ह्या  आधुनिक युगातही पुरुषी अहंकाराचे वर्चस्व कमी झाले  नाही. म्हणूनच ऑफिसमध्ये सह कर्मचारी .वरिष्ठ अधिकारी,घरात  नवरा तिला कमी लेखत अपमान करून हीन  वागणूक देतो. त्यामुळे तिची सदस्य विवेक बुद्धी कामच करत नाही. अशा त्रासातून सुटका व्हावी म्हणून शेवटी भोंदू बाबांचा मार्ग अवलंबल्या जातो. तसे बघितले तर सर्वच पुरुष ह्या अशा वाईट मानसिकतेचे नसतात .परंतु इतके वर्ष  उलटून सुद्धा मनुस्मृतीचा प्रभाव अजूनही मानवी स्वभावातून पूर्णपणे नष्ट झाला नाही."नारी ताडणं की अधिकारी" हे आजही काही  पुरुषांच्या मनात आहे.म्हणूनच ते स्त्रियांचे शोषण करतात .त्यांचा अपमान करतात. अशा वेळी कोणीतर ह्यातून आपली ह्या शोषणातून सुटका करेल या खोट्या समजुतीने भोंदू -बाबांच्या जाळ्यात सापडतात.

 ह्या युगात आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्याची  चढाओढ निर्माण झाली आहे .स्वैराचार वाढत चालला आहे. कमी श्रमात ,कमी  वेळात श्रीमंत होण्याची अवास्तव इच्छा ,अपेक्षा काही महिलांमध्ये वाढत चालली आहे. त्यामुळे उच्च हव्यासापोटी सुशिक्षित महिला भविष्य बघण्याच्या नादात भोंदू बाबांच्या काळ्या कारनाम्याला बळी पडत आहेत.

*भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर*यांनी संविधानात अनुच्छेद 14 स्त्री पुरुष समानता,अनुच्छेद 15 लिंगभेद अमान्य, अनुच्छेद 16 संधीची समानता. कलम 38 ,39 ही माणसाच्या शोषण मुक्तीचे कलम लिहिले आहेत . ह्या कलमाचा जीवनात अंगीकार होण आवश्यक आहे.हे विश्व स्त्रिया वीणा चालणे अशक्य आहे . तेव्हा त्यांना कुस्करून चालणार नाही.परंतु अजूनही काही पुरुषी अहंकारी मानसिकता असलेल्यांनी  मनुस्मृतीचा पगडा पूर्णपणे  झूगारून दिला नाही.  

एकूणच जो पर्यंत स्त्रीयांना मानसन्मान आदराचे स्थान  पूर्णतः सुरक्षितता ,तिच्यावर अन्याय होणार नाही याची ग्वाही, संकटाच्या वेळी  समाज धावून येणारच आहे असा विश्वास स्त्रियांना वाटेल, तेव्हा आपोआपच अशा भोंदू बाबांच्या आमिषाला कुणीही  स्त्री बळी पडणार नाही. 


_अस्मिता राहुल बागडे

नागपूर 9422492383

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...