शनिवार, २७ डिसेंबर, २०२५

आंतरराष्ट्रीय दुसरे फुले फेस्टिवल २ सत्रात अध्यक्ष म्हणून अहमद शेख यांची निवड


संवेदनशील साहित्यिक विजय वडवेराव यांचा संकल्पनेतून साकारलेले हे दुसरे आंतरराष्ट्रीय पुणे फेस्टिवल २०२६

शब्दशिल्प/पुणे_पुणे येथे दि. १,२,३,४ जानेवारी२०२६ सलग चार दिवस चालणार आहे . आंतरराष्ट्रीय पुणे फेस्टिवल मध्ये अनेक सत्रात चालणाऱ्या कवी संमेलनात एका सत्राचे २तारखेला कवी अहमद पिरनसाहब शेख वसमत यांची निवड करण्यात आली आहे .

भारतभरातूनच नव्हे तर अनेक देशातून सुद्धा फुले प्रेमी साहित्यिक या चार दिवसात पुण्यामध्येदाखल होत आहेत चार दिवस चालणाऱ्या या सत्राची चूक व्यवस्था संयोजकांनी केलेली आहे . चारही दिवस नाश्ता भोजनासह प्रत्येक साहित्यिकांचा सन्मान चिन्ह सन्मान पत्र देऊन यथोचित गौरव करण्यात येणार आहे .


शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५

कवि आनंद राज आनंद ने रचा इतिहास


शब्दशिल्प/नागपुर_शहर के मशहूर उदघोषक, कवि, लेखक, समीक्षक, व्यंग्यकार, गायक, मोटिवेशनल स्पीकर कवि आनंद राज आनंद ने एक वर्ष में आठ पुस्तकों के लेखन एवं प्रकाशन के साथ शहर में एक नया इतिहास रच दिया। विदर्भ हिन्दी साहित्य संघ के उत्कर्ष हाॅल में हालही में उनकी चार पुस्तकों मौसम सुहाने नहीं हैं (ग़ज़ल संग्रह) समंदर के क़तरे (लघु-रचना संग्रह) जिंदगी के झरोखों से (लघुकथा संग्रह) एवं हम नहीं सुधरेंगे (व्यंग्य-संग्रह) का लोकार्पण किया गया! इस अवसर पर हास्य कवि सम्मेलन एवं संगीत-संध्या का आयोजन भी किया गया। सभी पुस्तकों का विमोचन हास्य कवि-सम्मेलन के लिए आमंत्रित सभी कवियों श्री नीरज व्यास (नागपुर) प्रोफेसर मनीष बाजपेयी (नागपुर ) सुश्री रजनी श्रीवास्तव (दिल्ली) मंजुश्री कारेमोरे (नागपुर) सतीश लाखाेटिया (नागपुर) विनोद विद्रोही (नागपुर) एवं जया धाबेकर, डायरेक्टर/बजरंगी एंटरटेनर्स के करकमलों से संपन्न हुआ। इस अवसर पर सभी कवियों ने अपनी रचनाओं से उपस्थित श्रोताओं को हंसा-हंसाकर लोटपोट कर दिया। शुरुआत में रंगारंग संगीत-संध्या आयोजित की गई जिसमें नागपुर शहर के जानेमाने आमंत्रित कलाकारों ने अपनी सुरीली  प्रस्तुतियों से सबको मंत्रमुग्ध कर दिया। 

इस अवसर पर कवि विनोद विद्रोही को "युवा गौरव प्रेरणा सम्मान" से सम्मानित भी किया गया। फुलहाऊस हाॅल में कार्यक्रम की भव्यता देखते ही बनती थी। सभी ने कार्यक्रम का भरपूर आनंद उठाया। कार्यक्रम का संयोजन अक्षर आनंद साहित्यिक संस्था एवं बजरंगी एंटरटेनर्स के संयुक्त तत्वावधान में किया गया। संपूर्ण कार्यक्रम का मंच-संचालन कवि/एंकर आनंद राज आनंद ने किया। उल्लेखनीय है कि इसी वर्ष आनंद राज की चार पुस्तकें सफर तन्हा,अच्छा नहीं लगता, वो इक लम्हा एवं जियो ज़िन्दगी जी भरके भी प्रकाशित हो चुकी हैं। कार्यक्रम की सफलतार्थ बजरंगी एंटरटेनर्स की डायरेक्टर जया धाबेकर जी ने अथक परिश्रम किया।

बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

नाताळ- प्रेम, करुणा आणि माणुसकीचा सण-मनिषा आनंदराव कांबळे





नाताळ (ख्रिसमस) हा दरवर्षी 25 डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या स्मरणार्थ जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिस्ती धर्मीयांसाठी हा अत्यंत पवित्र दिवस असला तरी नाताळाचा संदेश सर्व मानव जातीसाठी समान आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनातून प्रेम, अहिंसा आणि समानतेचा संदेश दिला .एकमेकांवर प्रेम करा हा त्यांचा संदेश आजही तितकाच अर्थपूर्ण आणि आवश्यक आहे. नाताळ सणांची मुळे करुणा, क्षमा, सेवा आणि त्याग या मूल्यांमध्ये रुजलेली आहेत .म्हणूनच नाताळ हा सण केवळ धार्मिक चौकटीत मर्यादित न राहता प्रेम ,शांती, करुणा आणि सोहार्द मांडणाऱ्या प्रत्येकासाठी सामाजिक आणि मानवी मूल्यांचा उत्सव बनतो. आणि धर्म, जात, पंत ,भाषा या भिंती पलीकडे जाऊन माणुसकीची नाते जपायला शिकवतो. त्या काळात सर्वत्र एक आनंदी वातावरण निर्माण होते. क्रिसमस ट्री सजवली जातात .घराघरात तारे लावले जातात .चर्चमध्ये प्रार्थना केली जाते .आणि लहान मुलां मध्ये आनंद, उत्सुकता निर्माण करणारे संताक्लॉज -भेटवस्तू देणे- घेणे, केक वाटणे, मिठाई बनवणे ,या सगळ्या गोष्टी नाताळचा आनंद द्विगुणीत करतात. येशू ख्रिस्ताचा जन्म हा इतिहासातील एक पवित्र क्षण आहे .गोठ्यात जन्मलेले बालक पुढे जगाला प्रेम, क्षमा, दया, शांती ,करुणा आणि त्यागाचा मार्ग दाखवते .आणि त्यांच्या विचाराने जगाची दिशा बदलते. त्यांनी दिलेली ही शिकवण आजही तितकीच जिवंत आहे. नाताळ आपल्याला शिकवतो की "खरे वैभव संपत्तीत नसून संवेदनशीलतेत तिथे आहे". भेटवस्तू देण्यापेक्षा मनापासून दिलेलं शब्द, थोडा वेळ ,आणि निखळ प्रेम ,अधिक मोलाचे असते.

*नाताळ कथेची उत्पत्ती*

या ग्रंथानुसार येशूचा जन्म बेथलेहेम मध्ये मेरी आणि योसेफ यांच्या पोटी झाला .ही घटना देवदूतानी सांगितली .आणि मेंढपाळ आणि ज्ञानी पुरुषांनी साक्षीदार म्हणून सांगितली. जन्म म्हणून प्रसिद्ध असलेली ही  कथा जगभरातील नाताळ उत्सवाचा पाया रचते

*नाताळ चा अर्थ*

ख्रिसमस म्हणजे-' ख्रिस्त - मास'. 

किंवा ' ख्रिस्ताचा मास ' याचा अर्थ ख्रिस्तासाठी केलेली विशेष प्रार्थना असा होतो.जो येशू ख्रिस्ताचा जन्माचा उत्सव आहे. तो जगाला प्रेम शांती आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी आला असे मानले जाते .म्हणूनच त्याला "देवाचा पुत्र "असे सुद्धा संबोधले जाते.

*येशू ख्रिस्तांचा जन्म*

नाताळ हा येशू ख्रिस्ताच्या जन्माचा स्मरण करणारा वार्षिक सण आहे .जो 25 डिसेंबर रोजी जगातील अब्जावधी लोकांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. येशूचा जन्म जरी गोठ्यात झाला असला तरी त्याच्या विचारांनी जगाची दिशा बदलली. 



*नाताळाचे मूल्ये*

येशूंचा जन्म साजरा करणारा, ख्रिश्चन परंपरेने नाताळ  हा सण प्रेम, आशा ,करुणा, मुक्ती या विषयांनी भरला आहे .जन्म कथेची सुरुवात गोठ्यात होती ज्यात नम्रता आणि जीवनाचे पावित्र्य या  सारख्या मूल्यावर भर देण्यात आला.

*मानवी संबंधाचा उत्सव*

अनेकांसाठी हे कुटुंब आणि मित्रांची जोडण्याच्या ,उत्सवाचा, परंपरांचा आनंद आणि ऋतूतील उबदार वातावरणाचा आनंद 

घेण्याची संधी आहे .सजावट, संगीत आणि सामायिक जेवनाचे आकर्षण ,धार्मिक सीमा ओलांडते. त्यामुळे नाताळ मानवी संबंधाचा उत्सव बनतो.

*नाताळ चे महत्व*

आजच्या स्पर्धेच्या व धावपळीच्या युगात माणूस एकाकी होत चालला आहे. अशा वेळी स्वतःकडे पाहायला आणि नात्यांना वेळ दयायला आणि संवेदनशील व्हायला नाताळ आपल्याला शिकवतो. "असण्यापेक्षा होणे महत्त्वाचे आहे".

*प्रेमाचा संदेश*

जगाला दिलेल्या मूल्या पैकीं प्रेम हा सर्वात मोठा संदेश आहे. आचरणात आणणे जरी कठीण असले तरीही नाताळ आपल्याला प्रेमाची जपवणूक करायला शिकवते" प्रेमाने जग जिंकता येते". असं म्हणतात ते उगीचच नव्हे.

*शांततेचा संदेश*

नाताळची शांतता केवळ चर्च, प्रार्थनागृहात मर्यादित न राहता ती समाजात, घराघरात ,नात्यात आणि प्रत्येकाच्या मनात पोहोचली पाहिजे .कारण आपले अंतकरण शांत असेल तरच बाह्य जग शांत होते.

*करुणा आणि सेवाभाव*

करूणा हीच खरी पूजा आहे. आणि सेवाभाव हाच खरा उत्सव आहे. भेटवस्तूपेक्षा गरजूसाठी उघडलेले मन अधिक मौल्यवान असते .भुकेलेला अन्न, गरजूंना कपडे , दुःखी माणसाला औषधे, हेच खरे उपहार आहे.

*नाताळ आणि सामाजिक  समरसता*

नाताळ हा कोणत्याही एका धर्मापुरता मर्यादित नाही .तर तो जात ,धर्म ,पंथ ,भाषा ,वर्ग या पलीकडे जाऊन एकमेकांना स्वीकारण्याचा ,समजून घेण्याचा, सण आहे .तो माणसाला- माणसाची जोडणारा उत्सव आहे.


*एक संकल्प*

या नाताळ सणाला आपण एक संकल्प करूया अंतर्मनाचा आवाज ऐकण्याचा, आतला माणूस जागा करण्याचा, मदतीचा हात देण्याचा, मतभेद असूनही माणुसकी जपण्याचा, प्रेमाचा दिवा हृदयात लावण्याचा. 

"नाताळच्या शुभदिनी एकप्रार्थना

हृदयातला सांताक्लॉज जागवू दे 

दया, क्षमा, प्रेम ,शांति ,करुणेचा 

उगम माणसाच्या मनात उगवू  दे"

                                     आमेन


नाताळा हा एक दिवस नसून एक विचार आहे. प्रेमाचा ,करुणेचा आणि शांततेचा. जेव्हा आपल्या मनात माणुसकीचा जन्म होतो तेव्हाच खऱ्या अर्थाने नाताळ साजरा होतो.


 शुभ नाताळ...




मनिषा आनंदराव कांबळे

Yawatmal

मंगळवार, १६ डिसेंबर, २०२५

सोशल मीडिया : व्यसन, विघात आणि वास्तव



लेखिका: श्रद्धा मंगेश कोल्हटकर (डगवार) 

अमरावती  mo. 8766540513


आज सोशल मीडिया हे केवळ करमणुकीचं साधन न राहता एक भयंकर व्यसन बनत चाललं आहे. हे व्यसन वय, जात, वर्ग काहीही पाहत नाही. एक महिन्याचं बाळ असो वा वयोवृद्ध व्यक्ती—सगळ्यांच्या आयुष्यात मोबाईल आणि सोशल मीडियाने आपलं स्थान निर्माण केलं आहे. घरात माणसं असूनही संवाद नाही, भावना नाहीत; प्रत्येक जण आपापल्या स्क्रीनमध्ये हरवलेला दिसतो.

सोशल मीडियाच्या आहारी जाऊन अनेकांनी आपले मौल्यवान प्राण गमावले आहेत, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. ऑनलाईन गेम्समुळे मुलांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. काही गेम्स इतके मानसिक दबाव निर्माण करतात की लहान मुलांचं बालपणच हिरावून घेतलं जातं. सतत मोबाईल वापरामुळे लहान मुलांमध्ये दृष्टीदोष, डोळ्यांचे आजार, मेंदूवरील दुष्परिणाम, ब्रेन फॅटीग, अटॅकसारख्या गंभीर समस्या वाढताना दिसत आहेत.

फोटोग्राफी आणि सोशल मीडियाच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचे प्रकार सर्रास घडत आहेत. फोटो, व्हिडीओ यांच्या गैरवापरामुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींवरही याचे गंभीर परिणाम दिसून येतात. त्यांना घरात पटत नाही, कुटुंबाशी संवाद तुटतो, पाहुण्यांशी बोलायची इच्छाही राहत नाही. त्यांच्या आयुष्याचं केंद्रबिंदू म्हणजे मोबाईल आणि सोशल मीडिया एवढंच उरलेलं आहे.

पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये जे आपुलकीचं वातावरण होतं, एकमेकांशी गप्पा, हसणं, भांडणं आणि त्यातून निर्माण होणारा गोडवा—तो आज हरवत चालला आहे. आज एकाच घरात राहूनही माणसं मानसिकदृष्ट्या एकमेकांपासून दूर जात आहेत. विचारांची देवाणघेवाण होत नाही, अनुभवांची वाटणी होत नाही.

आज अनेकांसाठी सोशल मीडिया हा जणू जीव की प्राण बनला आहे. मोबाईल हातात नसेल, नेटवर्क नसेल, तर माणूस अस्वस्थ होतो. एक वेळ श्वास घेणं थांबेल पण मोबाईल वापरणं थांबवणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मोबाईल हरवला तर आयुष्यच हरवल्यासारखं वाटतं—ही मानसिक गुलामगिरी अत्यंत धोकादायक आहे.

म्हणूनच आता वेळ आली आहे आत्मपरीक्षणाची. सोशल मीडियाचा वापर आवश्यक आहे, पण त्याचा अतिरेक आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला विनाशाकडे घेऊन जात आहे. मोबाईलपेक्षा माणसं महत्त्वाची आहेत, स्क्रीनपेक्षा नाती महत्त्वाची आहेत, हे पुन्हा एकदा लक्षात घेणं हीच काळाची गरज आहे.

आजच्या आधुनिक युगात सोशल मीडियाने आपल्या जीवनात अढळ स्थान निर्माण केले आहे. मोबाईल हातात घेताच जगभरातील घडामोडी, माहिती, ज्ञान आणि मनोरंजन काही क्षणांत आपल्या समोर उभं राहतं. त्यामुळे अनेकांच्या दृष्टीने सोशल मीडिया हे वरदान ठरत असलं, तरी त्याच्या दुसऱ्या बाजूकडे पाहिलं असता ते अनेक वेळा शापासारखं भासते. खरं तर सोशल मीडिया म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

एका बाजूने पाहिलं तर सोशल मीडियामुळे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लगेच मिळतं. शिक्षण, व्यवसाय, बँकिंग, आरोग्य, करिअर मार्गदर्शन अशा अनेक क्षेत्रांमध्ये सोशल मीडियाने माणसाला मोठी मदत केली आहे. दूर असलेली माणसं जवळ आली, संवाद सुलभ झाला आणि माहितीचा प्रसार झपाट्याने होऊ लागला. आपत्तीच्या काळात मदत पोहोचवणे, हरवलेल्या व्यक्ती शोधणे किंवा सामाजिक जनजागृती करणे यासाठी सोशल मीडिया उपयुक्त ठरतो.

परंतु याच सोशल मीडियाचा अतिरेक आज समाजासाठी घातक ठरताना दिसतो. वाढती गुन्हेगारी, फसवणूक, सायबर क्राईम, ऑनलाईन बँकिंग फ्रॉड यामागे सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. चुकीची माहिती, अफवा आणि वाईट प्रवृत्ती वेगाने पसरत असून त्याचा परिणाम तरुण पिढीवर विशेषतः होत आहे.

पूर्वी कुटुंबात एखादा वाद झाला, तर सून माहेरी पत्र पाठवायची. ते पत्र माहेरी पोहोचेपर्यंत आणि माहेरचे माणसं येईपर्यंत घरातला वाद अनेकदा मिटलेलाही असायचा. आज मात्र एका क्षणात मेसेज, फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर जातो आणि छोटा वाद मोठ्या संघर्षाचं रूप घेतो.

प्री-वेडिंग फोटोशूटसारख्या गोष्टींमुळे अनेकदा लग्न मोडल्याची उदाहरणं समोर येत आहेत. दिखावा, तुलना आणि प्रसिद्धीची हाव यामुळे नात्यांमधील पवित्रता कमी होत चालली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे एकाच घरात राहणारी कुटुंबातील माणसं प्रत्यक्ष बोलण्याऐवजी व्हॉट्सॲप ग्रुपवर संवाद साधतात. घरात असूनही संवादासाठी मोबाईलचा आधार घ्यावा लागतो, ही बाब निश्चितच विचार करायला लावणारी आहे.

म्हणूनच माझ्या दृष्टीने सोशल मीडिया हा उपयोगावर अवलंबून असलेला घटक असला, तरी त्याचा अति वापर समाजासाठी शाप ठरत आहे. योग्य मर्यादा, जबाबदारी आणि विवेक वापरला नाही, तर हे वरदान कधी शापात बदलेल हे कळणारही नाही. म्हणूनच सोशल मीडियाचा वापर करताना जागरूकता, संयम आणि समतोल राखणे ही काळाची गरज आहे.

ooo


सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

अविस्मरणीय नेपाळ सहल- सौ. प्रणोती हरीश कळमकर



                    अविस्मरणीय नेपाळ सहल

       नेपाळ  म्हणजे हिमालयीन सौंदर्य, प्राचीन मंदिरे आणि समृद्ध संस्कृतीचा अनुभव होय .निसर्गरम्य दर्‍या पर्यटकांना आकर्षित करतात .जगप्रसिद्ध एवरेस्ट ट्रेकिंगसाठी पर्वतारोहकांना बोलावतो. नेपाळमध्ये जाण्यासाठी पासपोर्ट लागत नाही .आधार कार्ड हवे असते .तिबेटी भाषेत  ने म्हणजे घर आणि पाल म्हणजे लोकर. लोकरीच्या विपुलतेमुळे या देशाला नेपाळ हे नाव प्राप्त झाले. भारत आणि नेपाळमधील मैत्रीपूर्ण संबंध आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अतिशय चांगले आहेत. या सर्व उद्देशानेच आम्ही संगम ट्रॅव्हल्सने नेपाळला भेट द्यायला निघालो. 

       सर्वप्रथम गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिर येथे दर्शन घेऊन सोनोली  या ठिकाणी भारत नेपाळ बॉर्डरला इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण केली आणि तिथून एशियन बुद्धा हॉटेल इथे पोहोचलो. त्या हॉटेलमध्ये पोहोचताच प्रत्येक पर्यटकाचे रुद्राक्षाच्या माळा घालून आणि टरबुजाचा ज्यूस देऊन स्वागत केल्याने सर्वच आनंदीत झाले. लगेच लुंबिनी येथे भगवान गौतम बुद्धांच्या जन्मस्थळाचे दर्शन घ्यायला गेलो. लुंबिनी हे गोरखपूर पासून ९५ किलोमीटरवर आहे. तराई प्रदेशातील महत्त्वाचे  तीर्थक्षेत्र होय. हे रूपं देही जिल्ह्यात आहे. जिथे इसवी सन पूर्व ५६३ मध्ये गौतम बुद्धांचा जन्म झाला होता येथे राणी मायादेवी यांनी सिद्धार्थ गौतम यांना जन्म दिला होता. इथल्या अशोक स्तंभावर शिलालेख कोरला गेला आहे .मायादेवी मंदिरात मूर्ती आहे .शेजारी एक तलाव आहे .भगवान गौतम बुद्ध जिथे साधना करायचंय तो बोधी वृक्ष आहे .बुद्धा पार्क मध्ये बुद्धाची भव्य अशी गोल्डन मूर्ती आहे. अतिशय सुखद आणि मनाला शांती देणारे हे स्थळ बघून मनाला अतिशय धन्य वाटले. 

      दुसर्‍या दिवशी पोखराच्या दिशेने निघालो. निसर्ग संपन्न, निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेला छोटासा पण सुंदर प्रदेश हा पर्वताच्या शिखर,शिखरावरील मंदिरे, मठ, जलप्रपाते इथे आहेत. याला नेपाळचा स्वर्ग असे म्हणतात. सर्वप्रथम विंध्यवासिनी मंदिराचे दर्शन घेतले .येथून अन्नपूर्णा रांगेचे विहंगम दृश्य दिसते. विंध्यवासिनी देवी हे पोखराचे संरक्षक दैवत मानले जाते. देवीस फॉल्स हा भूमिगत धबधबा आहे. हा अद्वितीय असून प्रकाशाचा एक बिंदू आला की प्रवाह अचानक गायब होतो .येथे हिमालयाच्या पर्वतांच्या विहंगमदृष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. हे सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते. नंतर गुप्तेश्वर महादेव गुहा या मंदिरात दर्शनाला जाताना खूप रोमांचकारी अनुभव आले. हे धार्मिक पर्यटन ठिकाण आहे .इथला धबधबा हा रहस्यमहिरीत्या गायब होतो. पाणी कोणत्याही धबधब्यात किंवा गुहेमध्ये न जाता एका डार्क होलमध्ये जाते .म्हणून ते रहस्यमय वाटते .नंतर आम्ही निघालो ताल  बाराही मंदिर .१८ व्या शतकात बांधलेले हे मंदिर चारही बाजूंनी तलावाने वेढलेले आहे. अतिशय सुंदर आणि आकर्षक स्थळ आहे. फेवा लेक मध्ये बोटिंगचा आनंद घेतला आणि  दुर्गादेवीच्या मंदिरात पोहोचलो चारही बाजूंनी तलावाच्या चारही बाजूंनी पहाडी व हिरवेगार वृक्ष असून  मध्ये तलाव आहे. अतिशय सुरेख दृश्य बघण्याचा आनंद लुटला. संध्याकाळी पोखर्याच्या अतिशय श्रीमंत मार्केटमध्ये भ्रमंती केली. 

       दुसर्‍या दिवशी पोखर्‍याहून मनोकामना देवीच्या दर्शनाला निघालो. मंदिराच्या दर्शनासाठी केबल कारने जावे लागते. हे अंतर २.८ किलोमीटर लांब आहे .हे १३२०  किलोमीटर उंचीवर हे मंदिर आहे. संपूर्ण गोरखाचे रमणीय दृश्य दिसते. हाय किंग ची सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे त्रिशूल नदीचे विस्मयकारक दृश्य मंदिराच्या परिसरातून मानसुळ पर्वत ,हिमाचल आणि अन्नपूर्णा पर्वतरांगाचे रोमांचक दृश्य आपण पाहू शकतो. हे गोरखा जिल्ह्याच्या आत येते. हे हिंदूंचे प्रसिद्ध मंदिर आहे .मनोकामना म्हणजे मनातील इच्छा पूर्ण करणारी देवी ही हिला समजण्यात येतात .हे देवी भगवतीचे पवित्र स्थान आहे .भक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे येतात अशी आख्यायिका आहे.



      या दर्शनानंतर आम्ही निघालो काठमांडू कडे. काठमांडू नेपाळची राजधानी आहे. सर्वात मोठे शहर होय.  येथील पशुपतिनाथाचे मंदिर हे बागमती नदीच्या दोन्ही काठावर पसरलेले आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग होय. युनेस्कोने १९७९ मध्ये या मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली. पशुपती नाथाचे चार मुखी शिवलिंग आहे. पशु म्हणजे जीव ,प्राणी आणि पती म्हणजे स्वामी. पशुपतिनाथाच्या मंदिरात कोणत्याही दिशेने दर्शन घेता येते. इथे काही लोकांनी रुद्राभिषेक काहींनी महामृत्युंजय अभिषेक केला. महत्त्वाच्या ज्योतिर्लिंगाला अभिषेक करण्याचा योग आल्यामुळे खूप समाधान व धन्य वाटले. ही बागमती नदी पुढे पवित्र गंगा नदीला सुद्धा मिळते. इथे मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती होते असे म्हणतात. यानंतर बुढा नीलकंठ ,भगवान विष्णूला समर्पित असलेलं १३ मीटर लांबीच्या पाण्याच्या टाकीत आहे. शिवपुरी टेकडीच्या प्रदेशात असलेलं ठिकाण होय. सर्वात मोठे दगडी कोरीव अशी ही मूर्ती होय. काठ मांडू इतिहासाचे कला संस्कृतीचे आणि अर्थव्यवस्थेचे केंद्र आहे. नंतर प्रसिद्ध बौद्ध स्तूप तसेच स्वयंभूनाथ स्तूप पाहिले. वीस किलोमीटर अंतरावरील डोलेश्वर महादेव मंदिर बघितले. हे श्री केदारनाथ मंदिराची प्रतिकृती आहे असे म्हणतात. इथूनच हिमालय पर्वतावरील रांगा जवळून बघण्यासाठी हेलिकॉप्टरने एक तास फिरण्याचा आनंद आमच्यापैकी काही भाग्यशाली पर्यटकांनी घेतला .तेथील फोटोग्राफ आणि वर्णन ऐकताना त्या स्वर्गीय सुखाचा आनंद आम्ही घेतला.

     नंतर दुसर्‍या दिवशी काठमांडूहून चीतवन नॅशनल पार्कला निघालो. तिथे पोहोचताच रात्री थारू या आदिवासी जमातींच्या सांस्कृतिक कार्यक्रम बघितला आणि आम्ही पण त्यात सहभागी झालो. आणि अद्वितीय आनंद लुटला. चितवन हे पहिले नेपाळमधील पहिले राष्ट्रीय उद्यान होय. १९७३ ला तराई प्रदेशातील हे उद्यान आहे .हे एकशिंगी गेंड्या करता प्रसिद्ध आहे. इथे वन्यजीवाच्या विविध प्रजाती उपलब्ध आहेत. जीपने  आम्ही जंगल सफारी केली आणि वनस्पती आणि प्राण्यांनी समृद्ध असलेले हे ठिकाण होय. हे रापति नदीच्या काठावर आहे.  पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतला. त्याचप्रमाणे सूर्योदयाचे मनमोहक दृश्य बघून तृप्त झालो. 



     नंतर आम्ही जनकपुर कडे निघालो. जनकपुर हे माता सीतेचे जन्मस्थान. जिथे राम आणि सीतेचा विवाह झाला होता तिथे दर्शन घेतले.जानकी मंदिर हे नेपाळमधील पॅगोडा शैलीने बांधलेले आहे. ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेले स्थळ आहे .धनुष्य सागर, गंगासागर परशुराम कुंड हे प्रसिद्ध सरोवर आहे .धनुष्य सागर इथे प्रभू रामचंद्रांनी विवाहाच्या वेळी वेळी शिव धनुष्य उचलला आणि तोडला ते ठिकाण होय. राम मंदिराचे सुद्धा दर्शन घेतले. या ठिकाणी ११५ सरोवर व कुंड आहेत .त्यावेळी मंदिर बनवायला ९ लाख रुपये लागले म्हणून जानकी मंदिरला नौलखा  मंदिर असे सुद्धा म्हणतात.

       दुसर्‍या दिवशी सकाळीच आमचा जनकपुरहून परतीचा प्रवास सुरू झाला.दुपारी १२ वाजता जनकपुर स्टेशनला पोहचलो.आणि ट्रेन सुटल्यानंतर दोन स्टेशन ट्रेन पुढे गेल्यानंतर कारीसाथ स्टेशनवर आमची ट्रेन बराच वेळ थांबली.चौकशी केल्यानंतर कळले की दोन डब्यामधील कपलिंग तुटल्यामुळे इंजिन चार डबे घेऊन पुढे निघून गेले.उरलेले आमचे डबे प्लॅटफॉर्म वरच राहिले.  त्यावेळेस आम्ही विषय हसण्यावर नेला. पण जेव्हा त्याचे गंभीर परिणाम काय झाले असते ते कळले तेव्हा दहा गेले आणि पाच राहिले.ट्रेनला स्पीड नसल्यामुळे सगळे सुखरूप होते.पशुपतीनाथची कृपा.दोन तासाच्या प्रयत्नानंतर ट्रेन पूर्ववत सुरू झाली.आणि आम्ही नागपूरला सहा तास उशीरा पोहचलो.अशी ही आमची नेपाळची अविस्मरणीय सहल होती.



-  सौ. प्रणोती हरीश कळमकर 

७५, स्वप्नशिल्प गुरुदेव नगर नंदनवन नागपूर 

९८३४२०९४५७ 

राकेश डाफळे यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचा 'कोकण रत्न' पुरस्कार जाहीर

 


राकेश डाफळे यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचा  ' कोकण रत्न' पुरस्कार जाहीर

      शब्दशिल्प/संगमेश्वर-  कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील निसर्गसौंदर्याने नटलेलं कळंबस्ते (मलदेवाडी) या छोट्याशा गावातील 'राकेश प्रभावती बुधाजी डाफळे' यांना सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील दखल घेऊन स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी नुकतीच कोकण रत्न पदवी पुरस्कारासाठी अधिकृत घोषणा केली आहे. राकेश डाफळे यांना हा पुरस्कार शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान शेजारी होणारा हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पत्रकार, संपादक मा. सचिन कळझुनकर सर उपस्थित राहणार आहेत.

      सामाजिक क्षेत्राची दखल घेऊन त्यांना 'महाराष्ट्र राज्य कोविड योद्धा पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे.

       साहित्य क्षेत्रातील भारतभूषण- राष्ट्रीय पुरस्कार, काव्यगौरव- राष्ट्रीय पुरस्कार  या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  राष्ट्रीय कवी संमेलन आणि आंतरराष्ट्रीय संमेलनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे.  साहित्यसंपदा आयोजित विश्व विक्रमी संमेलनात सहभाग घेतला होता याची दखल एबीपी माझा या वाहिनीने घेतली.  



रेडिओ पुणेरी आवाज या वाहिनीवर कविता, चारोळ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. २०२१ कवींच्या २०२१ कविता या विश्वविक्रमी महाकाव्यग्रंथात सहभाग आणि याचा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच अनेक राज्यस्तरीय कवी संमेलनात पुरस्कृत करण्यात आले आहे. त्यांना साहित्यिक समूहाच्या राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेत  आणि उपक्रमात २५० ते ३०० हून अधिक सन्मानपत्रांनी सन्मानित करण्यात आले आहे. 



        कवी 'राकेश प्रभावती बुधाजी डाफळे' यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मानाची पदवी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल साहित्यिक क्षेत्रात कौतुक होत असून हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

बुध्दगया एक ऐतिहासिक सहल -डाॅ खं र माळवे-खरमा

 बुध्दगया एक ऐतिहासिक सहल -डाॅ खं र माळवे-खरमा 


शब्दशिल्प/पुणे-भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पश्चिम अध्यक्ष आयु प्रकाश ओव्हाळ, सचिव दलितानंद थोरात, पर्यटन उपाध्यक्ष पी.के.पवार, ता.जुन्नर माजी अध्यक्ष राकेश डोळस यांनी आयोजन केले होते.सहल म्हटले की लहानथोरांना आनंदाची मेजवानी  मिळणे साहजिकच आहे.सध्याच्या काळात लांबच्या सहलीला जाणे म्हणजे 15 दिवसांची सहल खरं तर तारेवरची कसरत आहे कारण आपण सहलीला जाण्याच्या बातमीपत्र,घटना ऐकतो,शाळेतून सहसा कोणी विद्यार्थी पाठविणे जिकरीचे झाले आहे.तरी भारतीय बौध्द महासभा पुणे जिल्हा पश्चिम यांनी यशस्वीपणे सहल योजली,यांचे श्रेय आयोजकास जाते.एकून सहलीला आयु खंडू माळवे,सौ उषा माळवे,राजकुमार माळवे,बन्सी घायतडके,सौ वनिता घायतडके, बन्सी भोजणे,सिंधू साळवे,सचिन साळवे सौ सोनाली साळवे,सिंधू कडलाक,मारूती फुलपगार,रमेश लवांडे,संजय धोत्रे,सौ वैशाली डोळस,उदय डोळस,रत्नमाला डोळस,कुंदा फुलपगार, रोहिदास सोनवणे,जनाबाई सोनवणे,ताराबाई फुलपगार,प्रकाश कांबळे,सौ शोभा कांबळे,लालू कांबळे,सौ जयश्री कांबळे,उत्तम कांबळे,सौ वंदना कांबळे,शालिनी भालेराव,दिपक कांबळे,सौ चंद्रकला कांबळे,माणिक सावंत,दिपक नितनवरे,श्रीकांत गायकवाड, सौ वंदना गायकवाड,चंद्रसेन गोतारणे, शशिकांत निकाळजे,बाळू गायकवाड,गुलाब गजरमल,दसरथ गायकवाड,विलास यादव,लता कदम,किसन ओव्हाळ,बारकु ओव्हाळ,बबन ओव्हाळ,भिमराव वाघमारे एकून ५३ तसेच जेवणाची उत्तम सोय , आचारी मामा,निलेश ढमाले,उषाताई मोकळे, अधिक उपासक,उपासिका हजर होते.यातच दोन लहान मुलांचाही सामावेश असल्याने आनखिनच वातावरण सुखद वाटत होते. 



प्रवासात गाणी गोष्टीत रमबान झाले होते. माईक असल्याने अधिक रंगत आली होती १५ दिवस कसे गेले ते कळले नाही कारण पुणे ते दानापुर एक्स्प्रेसने प्रवास करीत मोगलसराई येथे उतरलो सारनाथ मुक्कामी पोहचलो तेथून बुध्दगयाकडे निघालो तेथिल प्रेक्षणिय स्थळे व येथिल संस्कृती दर्शन घेत मुक्कामी एक नवा अनुभव आला.जिल्हा राजगीर डु़ंगेश्वरी पर्वतावर जिथे भगवान गौतमबुद्ध यांनी कठोर तपश्चर्या केली,साधना केली जिथे जिथे मुक्काम केला येथिल अनुभव आनंदायक होता‌ राजगीर मुक्कामी कडाक्याची थंडी असतानाही जानवली नाही. नालंदा वैशाली नगर येथिल दर्शन घेत मुक्काम केला.केशरिया स्तूप दर्शन घेत कुशीनगर प्रवास दर्शन करीत नेपाळकडे रवाना झालो सकाळी संपुर्ण गौतमबुद्ध यांचे जन्मस्थान दर्शन घेत एक वेगळेच अनुभवले प्रत्यक्ष पहाणे व बोलणे यांचा साक्षात्कार झाला श्रावस्तीत प्रत्यक्ष पाहताना नव्या जुन्या बाबींची उजळणी होत होती.लखनौ तर गजबजलेले शहर डॉ बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन स्थळ म्हणजे अंतर्मुख करणारा परिसर आहे. होय नक्कीच सहलीचा आनंद द्विगुणित झाला एकाअर्थानेआल्या जीवनाचे सार्थक झाले असे सहलीला आलेल्यांच्या तोंडून येत होते तसेच सांगता सभारंभी प्रत्येकाने आपले मनोगत सांगताना  बहुतेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते.कारण सहलीला जाण्यासाठी ज्या सुविधा हव्यात अशी उत्तम सोय केली होती, होय  परतीचा प्रवासही उत्तम झाला १५ दिवस कसे गेले ते कळले सुद्धा नाही असा सुखमय पुण्यभुमीतील बुध्दगया भारतीय जनतेचे प्राणप्रतिष्ठा भूमी आहे

पुन्हा पुन्हा ऐतिहासिक स्थळे पाहण्याचा योग येवो हीच एक प्रार्थना


 -डाॅ खं र माळवे-खरमा

बुधवार, ३ डिसेंबर, २०२५

जयंती-हेमंत मुसरीफ पुणे

 


जयंती ..

ज्ञानप्राप्त शांतीलुप्त

हिंडलो मी दिशादाही

षड् रिपुंनी  ओतप्रोत

गुण दोषा  माजे दुही


पदवीलाभ कितीतरी

गर्दभासम ओझेवाही

मीठा वीण  चव नाही

अळणी ते भोजशाही


प्रकाश  आला अंतरी

गुरू वीण  दुजा नाही

लाभता  सम्यक मार्ग

चित्त चिंतामुक्त  राही 


गुरू  कृपा  छत्रचामर

कृपा दृष्टी भक्ता पाही

देव रूष्टता  गुरू तारी

गुरू रूष्टता कुणी नाही


कष्टलो  मी  दया घना

कृपा करी  त्राही त्राही

गुरु होई नाराज जसा

अंग होई  लाही लाही


दत्त जयंती शुभ दिन

कृतज्ञता  व्यक्त  होई

मोह पडे   गुरु  स्नेही

दूर न करी रे  निर्मोही



- हेमंत मुसरीफ पुणे 

Mo.  9730306996...

  www.kavyakusum.com

मंगळवार, २ डिसेंबर, २०२५

सद्गुरू दत्तात्रेय महाराज-रत्नाकर बाबुराव पाटील


 

सद्गुरू दत्तात्रेय महाराज

========================

अनुसया पोटी | जन्मले गोजिरे|

नाव ते साजिरे | दत्तात्रेय ||


पिता अत्री ऋषी  |तपस्वी आसक्त |

अवतारी भक्त | सद्गुरू ||


गाणगापूर ती | पवित्र नगरी |

सजली सुंदरी  | आकर्षक ||


अनुसया माता | पतिव्रता नारी |

भक्ती केली सारी |  तिर्थक्षेत्रा ||


दत्त गुरू माझे | दैवत ते छान |

दिले वरदान | कलियुगी ||


तिन शीरे शोभे | सहा कर साथ |

सोबती हो नाथ | पंथ सारी ||


दत्त दिगंबर | दैवत शोभते |

अवतारी होती | बालकेच ||


गाय कामधेनू | श्र्वान आहे संगती |

त्रिदेव रुप ती | शोभिवंत ||

=======================



रत्नाकर बाबुराव पाटील 

{पर्यवेक्षक} 

विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा

 शिंगोली ता.जि. धाराशिव                            

मो. ९४०३३९४८१८

दत्तजयंती माझ्यासाठी विशेष आहे..! - सौ. संगीता संतोष ठलाल

 



(४ डिसें. : दत्त जयंती विशेष)


दत्तजयंती माझ्यासाठी विशेष आहे..!

  गुरूर ब्रम्हा, गुरूर विष्णू,गुरूर देवो महेश्वरा गुरूर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः

दत्तजयंती च्या निमित्ताने सर्वांना खूप, खूप शुभेच्छा माझे पहिले गुरू माझे आईबाबा आहेत शाळेत शिक्षण देणारे माझे शिक्षक  गुरू आहेत,ज्यांनी समाजासाठी व देशासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले ते,सर्वं महा विभूती ते,माझे गुरू आहेत,समाजात वावरताना मला वेळोवेळी साथ देणारे व मला मार्गदर्शन करून प्रोत्साहन देणारे तेही माझे गुरू आहेत, पुस्तक व ग्रंथ माझे गुरू आहेत, सीमेवर राहून रात्रंदिवस लढा देणारे  सैनिक हेही माझे गुरूच आहेत, तिन्ही ऋतूमध्ये ठामपणे उभे राहून मला शुद्ध प्राणवायू देणारे हिरवेगार झाडे हेही माझे गुरू आहेत त्याच प्रमाणे जिकडे, तिकडे पसरलेला निसर्ग हा सुद्धा माझा गुरूच आहे या, माझ्या सर्वं गुरूंपुढे मी नतमस्तक होते व त्यांना कोटी, कोटी वंदन करते. गुरूची महिमा अपरंपार आहे. असे सारेच जण म्हणत असतात,गुरू शिवाय मार्ग नाही  म्हणून होऊन गेलेले थोर महा विभूती आपल्या गुरूंची  सुध्दा सदैव महिमा  गात होते.त्याच प्रमाणे दत्तगुरूची महिमा सर्वांनाच चांगल्याप्रकारे माहीतच आहे ते नव नाथांचे गुरू आहेत त्यातील पहिले नाथ म्हणजेच श्री मच्छिंद्रनाथ हे दत्ताचे पहिले शिष्य होत व नंतर सर्वं नवनाथ हे, शिष्य झाले. महाराष्ट्रात असलेल्या नवनाथा पैकी,श्री, मच्छिंद्रनाथ व श्री. कानिफनाथ ह्या,दोन नाथांच्या पवित्र समाधी स्थळी असलेल्या गडावर जाण्याचे व दर्शन घेण्याचे मला भाग्य लाभले. त्याच प्रमाणे या, पृथ्वीतलावर ती राहणारे अनेक लोक असतात कोणी ईश्वराला माणतात तर कोणी मानत नाही हा ज्यांचा,त्यांचा प्रश्न आहे उगाचच कोणाला नाव ठेवणे योग्य नाही. पण,मी मात्र ईश्वराला मानते. त्यांच्या प्रती माझ्या मनामध्ये जास्त नाही पण, थोडीफार श्रध्दा आहे.कारण,माझा जन्म एका आध्यात्मिक कुटुंबामध्ये झालेला आहे त्यामुळे लहानपणापासूनच मी माझ्या कुंटुबात होणारी पूजापाठ बघत आलेली आहे. माझ्या घरी हरिपाठ, रामायण वाचले जायचे सोबतच सकाळ, संध्याकाळ घरात आरती  केल्याशिवाय कोणीही जेवण करत नव्हते. कदाचित हेच माझ्यावरती संस्कार पडले असतील...मी, लहान असताना माझ्या आजोबाजवळ बसून ते, जेव्हा हरिपाठ वाचत असत तेव्हा मी आवर्जून हरिपाठ ऐकायची.जेव्हापासून मी लिहायला, वाचायला शिकली तेव्हापासून अभ्यासोबतच  व इतर पुस्तकाच्या बरोबरच मी हरिपाठ, रामायण आणि इतर पोथ्या आवडीने वाचायची. मला ते, वाचायला खूप आवडत असे. दत्त जयंती का..? म्हणून माझ्यासाठी विशेष आहे आज थोडक्यात का होईना दत्त जयंतीच्या निमित्ताने लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. 



      बरेच दिवसांपासून मला वाटत होते की, आपण "रामायण" वाचावं व पूर्ण वाचून झाल्यावर गोर, गरीबांना घरी बोलावून त्यांना दानधर्म करून जेवू घालावं,पाच लोकांचे हात धुवावं हे, माझ्या मनात बरेच दिवसांपासून चालू होते.  पण उशीरा का होईना तो, दिवस आणि ती वेळ खूप दिवसांनी आली. त्या, वर्षी आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी या गावी तीन वर्षे राहिलो.,माझे दोन्ही मुले खूप लहान होते. एक दिवस अचानक माझ्या पतीसोबत बोलताना रामायणाचा विषय माझ्या मुखातून अगदी सहजपणे बाहेर पडला मी,माझ्या मनातील रामायण वाचण्याच्या बाबतीत विचार सांगून टाकली. कदाचित ही,ईश्वराची कृपाच म्हणावे लागेल.. त्यांनीही होकार दिला आणि खरच योगायोग म्हणावे लागेल चार दिवसांनी  येणारा पुढे  श्रावण महिना होता. त्याच श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी घरी  छोटीशी पूजा मांडली व " गोस्वामी तुलसीदास" लिखित रामायण ठेवली.  सकाळी, सकाळी रामायण वाचणे होत नव्हते पण, संध्याकाळी मात्र पाच ते सहा वाजेपर्यंत एक घंटा रोज रामायण वाचत होती. नंतर आरती करून झाल्यावर गोमातेचे पूजन करून तीला नैवेद्य चालल्यावर जेवण करायची. एवढेच नाही तर रात्रो, इतर कोणतेही पुस्तक वाचून झाल्यावर कविता, लेख लिहायची. 

 "मुखी हरिनाम व हातात काम" हे दैनंदिन माझे चालूच होते.



       खरं सांगायचं म्हटलं तर.. माझ्या जीवनामध्ये असे, बरेच संकटे, अडचणी आले आणि निघूनही गेले, आजही येतात. पण, कुठेतरी वेळोवेळी ईश्वराची मला साथ मिळत होती आणि आजही मिळत आहे. असे,बरेजण म्हणत असतात की, माणूस घडण्यामागे बरेचजणांचा हात असतो पण, कुठेतरी एखादी ती शक्ती असते आपल्याला दिसत नाही पण,मात्र नेहमीच सोबतीला असते. कदाचित हे,खरे असू शकते. कारण, अंधश्रद्धा  माझ्या मध्ये मुळातच नाही. पण, स्वतः वरती विश्वास आहे,  नित्यनेमाने चालू असलेले प्रयत्न, मेहनत आणि ईश्वरावरती श्रध्दा आहे त्यामुळे थोडेफार तरी का होईना. आज जे काही मी बघत आहे आणि जे, काही लहान, लहान कार्य माझ्या हातून पार पडत आहेत. त्यासाठी अनेकाचे हातभार लागलेले आहेतच तेवढीच ईश्वराची साथ सुध्दा मिळाली आहे असे मी समजते.  बरेचदा ऐकण्यात,वाचण्यात आले आहे की, हे सर्वं घडत आहेत.  तो, ईश्वर कर्ता,करविता आहे आपण मात्र निमित्त मात्र आहोत. आपल्याकडून  जे काही करवून घेतो ही त्याची इच्छा असते मी, ह्या सर्वं गोष्टींना मानते.असं  करता, करता दैनंदिन रामायण वाचन सुरू असताना  पाच महिने पूर्ण झाले व  दुसऱ्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याला सुरूवात होणार होती.. त्याच महिन्यात सोळा तारखेला "दत्त जयंती" सुध्दा होती कदाचित ही सुद्धा ईश्वराची कृपाच म्हणावे लागेल... माझ्या मनातही तेच ठरले होते की, पूर्ण रामायण वाचून झाल्यावर दत्त जयंतीच्या दिवशीच  पाच लोकांचा,गोर, गरीबांना बोलावून त्यांना जेवू घालावं हेच ठरले होते. आणि योगायोगाने " दत्त जयंतीच्या"  दिवशीच  माझ्या मनातील  विचारांप्रमानेच घडून आले. माझ्या मोहल्यात सर्वं जाती, धर्माचे लोक मिळून, मिसळून राहत होते  त्या सर्वं   बंधू, भगिणींनी आपल्याच घरचा कार्यक्रम समजून मला खूप मोठे सहकार्य केले, बाहेर गावाहून येणाऱ्या सर्वं पाहुण्यांची व्यवस्था केली दत्तजयंती चा  .  पूजापाठ झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ उपस्थित असलेले सर्वं जणांनी घेतले हा, छोटासा कार्यक्रम  अगदी भक्तीमय वातावरणात पार पडला. दत्त जयंतीचा तो दिवस व त्या दिवशी मला आपुलकीने सहकार्य करणाऱ्या सर्वं माझ्या बंधू, भगिंणींना मी, माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत विसरू शकणार नाही. दरवर्षीच येणारी दत्त जयंती ही माझ्यासाठी विशेष आहे म्हणून एक धन्यवाद मी माझ्या जन्मदात्यांचे मानते त्याच बरोबर मला वेळोवेळी आजपर्यंत सहकार्य करणाऱ्याचे सुध्दा धन्यवाद मानते.  एक धन्यवाद ह्या निसर्गराचे सुध्दा मानते या पृथ्वीतलावर ती,  एवढा सुंदर जन्म देऊन  माझ्या हाती ही फुकटची नौकरी देऊन मला ही भूमिका पार पाडण्याची जबाबदारी दिल्याबद्दल.   जय दत्तगुरु,जय गुरुदेव.





    सौ. संगीता संतोष ठलाल

      मु. कुरखेडा जि. गडचिरोली

      Mo. ७८२१८१६४८५

सोमवार, १ डिसेंबर, २०२५

कहानी_यूज मी _डोली शाह

 


कहानी_यूज मी _डोली शाह

      

        चिपचिपाती गर्मी यूं ही परेशान कर रही थी । रात का सफर था ,  संतोष था कि  चलो कुछ थोड़ा खा पी कर आराम से सो जाएंगे, प्रातः सूरज की किरणों के साथ  तो घर पहुंच ही जाएंगे। स्टेशन में लाख ध्वनियों के बीच रेल में चढ़े ही थे कि मशीनी हवा ने दिलो  को तरोताजा कर दिया ।

          सभी अपनी -अपनी दुनिया में मस्त थे। लगभग  भोजन का वक्त हो ही चला था लोग  अपने-अपने थैले निकाल पेट पूजा की तैयारी में लगे पड़े थे।  इतने में सामने बैठी एक मोहतरमा कुछ लकड़ी जैसे हड्डियां चबा रही थी।  देखकर कुछ अजीब लगा।  तीरछी नज़रो से   देखा भी लेकिन वह भी यात्री थी आखिर! कुछ कहना शोभा नहीं देता।

       भोजन पानी से निवृत होकर मोहतरमा ने वहीं बैठक के  निचले हिस्से में अपनी थैली पटक दिया।  यहां तक की कागजी कपड़ों से ही हाथों को काम भी निपटा लिया।  उनकी कार्यवाहियां देख नजरे अपने आप में रोष प्रकट कर रही थी। इतने में मेरे मुंह से निकला " मैडम कुछ कदम आगे ही डस्टबिन है प्लीज वेस्ट मटेरियल उन में डाल दीजिए " ।

हां हां,  मैं डाल दूंगी ।

       यह सुनते ही मैं मौन हीं रह गई। मौनता में करीब घंटे बीत गये,  लेकिन जगह की वस्तु जगह में ही रह गई।  कुछ हल्की-हल्की गंध का संचार भी महसूस हो रहा था आखिर हो भी क्यों ना,  सुखी वस्तु हो तब तो उसमें तो लकड़ी जैसी हड्डी के टुकड़े तो अंडे के छिलके जो थे।  कुछ  सख्त स्वर में मैंने पुनः कहा --प्लीज़ मैडम अब तो उसे उसे डस्टबिन में डाल दीजिए! वरन् मैं कंप्लेंट कर दूंगी !

"मैंने कहा ना,  मैं डाल दूंगी, आपको इतनी टेंशन क्यों हो रही है ?" (कुछ चिड़चिड़ा सा स्वर आया)

     इतना सुनते ही मैं मौनता के साथ मन ही मन सोचती रही । इतनी सुंदर,  इतनी गोरा चुपड़ा बदन,  इतनी अच्छी अंग्रेजी और हरकतें,  दो कौड़ी के!

       इतने में काले  कोट वाले पर नजर पड़ते ही  मैंने शिकायत के तौर पर  उन्हें सब कुछ  मंद स्वर में कहा।

        मैडम वह थैला आप डस्टबिन में डाल दीजिए। काले कोट वाले साहब ने आदेश दिया।    

    उसके बाद भी वह कुछ अडी ही रही।  सभी के टिकट की जांच भी हो गई।

मैंने  पुनः कहा--- सर जी!

"अरे मैंडम ,  डस्टबिन ज्यादा दूर नहीं है ,आप पहले फेंक दीजिए।" काले कोट वाले साहब ने पुनः शखती से आदेश दिया।

     जानती है,  आप जैसे लोगों के कारण ही हमारे देश की प्रकृति का यह हशर हुआ है,  लोगों  को सांस लेने तक की शुद्ध हवा नहीं मिल पा रहा है । काले कोट वाले साहब ने व्यंग्य के स्वर में कहा ।

     अब तो मानो  उस थैली को छूना  मोहतरमा के स्वाभिमान पर करारा तमाचा लग  रहा था।   सर मैंने कहा ना ---"मैं फेंक दूंगी" !(गुस्से में आग बबूला )

    मैडम प्लीज, अभी फेंक दीजिए । पूरी हवा को प्रदूषित कर फिर उसे साफ करने की बात,  इससे बड़ी बेवकूफी और क्या होगी?  इतना कहते ही काले कोट वाले साहब मुस्कुरा कर  उनकी ओर निहारते ही रहे।  यही हाल तो गंगा का हुआ है , सारी गंदगी उसमें डालकर आज सफाई के सौ इंतजाम किए जा रहे हैं ।

      इतना सुनते ही  मोहतरमा  गुस्से से तम तमाते  हुए थैली को उठाकर डस्टबिन की ओर बढी ही थी।  काले कोट वाले साहब  के साथ सभी के चेहरे पर  हल्की सी मुस्कुराहट   छा गई...।

_ डोली शाह

निकट पी एच ई

पोस्ट -सुलतानी छोरा

जिला -हैलाकांदी

असम-788162

मोबाइल-9395726158

मेल-shahdolly777@gmail.com

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...