मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम
त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा
मानव रूपात जन्माला आले
त्यांचा त्याग जाणून घ्यावा
अनेकदा वाचण्यात येते की, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र हे, भगवान विष्णूचा सातवा अवतार होते. माता कौसल्या व महा पुण्यवान राजा पिता दशरथ यांच्या पोटी प्रभूने जन्म घेतला. खरंच ते, माता आणि पिता किती पुण्यवान असावेत. ती विश्वात गाजून गेलेली अयोध्या नगरी धन्य झाली ही भारतभूमी धन्य झाली पित्याच्या वचनाचा पालन कर्ता आदर्श पुत्र, आदर्श राजा आणि आदर्श पती म्हणून ओळखले जाते.मर्यादा ठेवून कशाप्रकारे जीवन जगले पाहिजे हे प्रभू श्रीरामचंद्राच्या संपूर्ण जीवन चरित्रातून दिसून येते. म्हणतात ना की, नियतीच्या पुढे कोणाचे चालत नाही तसेच प्रभूच्या बाबतीत सुद्धा झाले. राज्याचा पुत्र असताना सुद्धा चौदा वर्षाचा वनवास पत्नी देवी सीता व बंधू लक्ष्मण सहीत हसत, हसत राजमहाल,राजथाट सोडून वनवासात निघून गेले.
प्रभू श्रीरामाच्या या महान त्यागातून आजच्या समाजाला खूप काही शिकवण मिळते. आजकाल बघितले तर समाजातील काही लोक धनसंपत्तीच्या मोहापायी एकमेकांना मारहाण करतात, एकमेकांचा जीव घेतात, एवढेच नाही तर सारी मर्यादा पार करतात अशा विकारी ,विचारी माणसांनी एकदातरी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्राना वाचायला शिकले पाहिजे. धन आणि दौलत कितीही असले तरी ते, शेवटपर्यंत टिकून राहत नाही मात्र इतरांच्या सुखासाठी स्वतः कशाप्रकारे त्याग करून जगले पाहिजे ही शिकवण प्रभूच्या जगण्यातून दिसून येते म्हणूनच म्हणतात की, 'त्यागा मधूनी पुण्य मिळे' आज याच महान त्यागातून प्रभूला वनवासात अनेक तपस्वी ऋषी, मुनी़ंचे आशीर्वाद मिळाले एवढेच नाही तर त्यांच्या पदस्पर्शाने जमीनीवर शिळा होऊन पडलेल्या सती अहिल्येचा उध्दार झाला. किती ते पुण्यवान राजा असावेत ज्यांची अनेक वर्षापासून तपस्वी ऋषीमुनींनी दर्शन घेण्यासाठी वाट बघत होते. त्यात अशी एक महा तपस्वी असलेली 'शबरी' होती अनेक वर्षापासून प्रभू येण्याची वाट बघत होती आणि दररोज आपल्या झोपडीच्या समोर अंगणातून फुलांची सजावट करत होती तिचे संपूर्ण आयुष्य रामनाम जप करण्यात गेले. जेव्हा, प्रभू श्रीरामचंद्र बंधू लक्ष्मण सहीत सीतेच्या शोधात निघाले होते तेव्हा, अचानक एक दिवस त्या महा तपस्वी शबरीच्या झोपडीजवळ पोहोचले असता.त्या मातेने प्रभूला ओळखले आणि माझ्या प्रभूला काहीतरी खाऊ घालण्यासाठी म्हणून बोरी तोडायला गेली. गोड बोरी असल्यास चाखून टोपलीत ठेवायची आणि आंबट बोरी असल्यास ती फेकून द्यायची त्या मातेने प्रभूचे स्वागत नुसते फुलांनीच केले नाही तर आपल्या अश्रूने ते पावन चरण धुतले आणि तिच्यातील अफाट भक्ती, विश्वास, स्नेह, त्याग, प्रामाणिकपणा बघून प्रभूने उस्ट्या बोरी मोठ्या आवडीने खाल्ले विचार करण्याची गोष्ट आहे जो माणूस सत्कर्माने स्वंयम प्रकाशित असतो त्याच्याजवळ कोणताही जात, धर्म, पंथ नसतो तर त्याच्यातील माणुसकी ही सर्वात श्रेष्ठ असते तो क्षण आणि ती माया आणि तो आदर आजच्या या भूतलावर राहणार्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला माणुसकी धर्माची शिकवण देणारा आहे.
रामनामाचा जप करती
रामनामात तल्लीन झाले
आदर्श, कीर्तीवंत राजाराम
तिन्ही लोक राममय झाले
ज्याच्या मनात सकारात्मक विचार असतात, सर्वाप्रती प्रेम असतो, आपुलकी असते, मर्यादा असते, माणुसकी धर्म असतो, त्याग असते,बलिदान असते, सत्य बोलण्याची ताकद असते, सत्याच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न असतो, मनात भक्ती असे, संघर्षाला गुरू मानतो, दया, क्षमा, शांती, नि:स्वार्थ भावना असते, इतरांप्रती सदभावना असते आणि व्यर्थ गोष्टींकडे जो लक्ष देत नाही अशा माणसावर खर्या अर्थाने प्रभूची कृपादृष्टी असते. आणि याच गुणांकडे बघून प्रभू त्यावर प्रसन्न होतात. प्रभू श्रीराम चंद्रानी राजा निषाद यांना आपला मित्र मानले, सोबतच बघितले तर पंढरपूरी राहणार्या विठूरायांनी सुद्धा संत चोखामेळा या महान भक्ताला आपलेसे करून घेतले कारण त्यांचे मन हे सदैव निर्मळ होते. ते आपले कर्म करताना क्षणभर सुद्धा ईश्वराला विसरले नाही म्हणून संत चोखामेळा म्हणतात की, 'टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची' त्यांच्यात ईश्वराप्रती किती भक्ती असेल. ..? की, प्रभूनी त्यांची जात धर्म बघितले नाही तर त्यांचे सकारात्मक विचार बघून त्यांच्यात एकरूप झाले आज सारा विश्व त्यांच्या नात्याला ओळखत आहे. प्रभू हा चरचरात वास करतो, पशू, पक्षात,झाडांझुडपात असतो, सर्वांमध्ये असतो मात्र आपण त्यांची महिमा ओळखत नाही. हिरवेगार झाडांवर वार करून झाडे तोडत असतो हे किती निर्दयीपणा म्हणावे...? खरंच ह्या निर्दयी माणसांवर प्रभूची कृपादृष्टी होईल...? रामनाम असे हे एक श्रेष्ठ नाव आहे की माळेतील एकसे आठ मणी जपल्यासारखे होते. रामनामाचा जप आणि गजर करणारे ऋषी मुनींनी रामायण नावाचा महान ग्रंथ लिहिला आज सारा विश्व वाचतो मात्र त्यातून प्रभू श्रीरामचा आदर्श घेत नाही ही आजची वास्तविकता आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाला ओळखण्यासाठी आधी त्यांना वाचणे गरजेचे आहे तेव्हाच ते कळत असतात. पण,आजचा माणूस मात्र व्यसनाधीन होऊन जगत आहे, खोट्याला साथ देऊन स्वतःला धोका देत आहे, संस्कृती तर कमीच झाली मात्र स्वार्थ कुटून भरलेला दिसून येतो. कटकारस्थ्ाान संपण्याचा नावच घेत नाही. आणि दीन, दुबळ्यांची हाक कोणी ऐकेना अशी आजची परिस्थिती निर्माण झालेली बघायला मिळत आहे. म्हणून आज माणूस माणसात दिसत नाही आणि माणुसकी राहिली नाही तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम कुठून मिळणार...? रामनामाचा जप करण्यासाठी मन तेवढे निर्मळ असावे लागते त्यालाच प्रभू श्रीराम मिळतात. असे सत्कर्म करणारे आत्मे होते म्हणून ते राममय झाले आणि भवसागर पार केले.
राम नाव घ्यावे मुखी
अन् सत्कर्म करावा
तेच होतील कर्म श्रेष्ठ
अन् रामाला तेथेच पहावा
मनुष्य जातीत जन्म घेऊन सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामानी आपले कर्म अवतार संपेपर्यंत करत राहिले आणि या भूतलावर राहणार्या सर्वाना माणुसकीचा संदेश देत राहिले, खूप शिकवण दिली, स्वतः ईश्वर असताना सुद्धा संघर्ष केले मात्र दु:ख देऊन कोणाला बोलले नाही ही शिकवण प्रभूची फार मोलाची आहे.आजचा समाज मात्र कुठे जात आहे कळतच नाही. म्हणून राम हे पवित्र नाव मुखात सदैव ठेवावे आणि आपले सत्कर्म चालू ठेवावे. मनुष्य प्राण्याला माणुसकीची आणि आदर्श व्यक्ती म्हणून कशाप्रकारचे बनले पाहिजे ही प्रभू रामाकडून मिळते.माणसं बरेच असतात पण, कधी काळी, माणसालाच 'देवमाणूस' म्हणून पुजले जाते हे फुकटच नाही. म्हणून राम हे एक महान नाव मुखात ठेवून माणसासारखे जगण्याचा प्रयत्न करावा.
- सौ.संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
मो. ७८२१८१६४८५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा