शुक्रवार, १६ जानेवारी, २०२६

नवीन पनवेलमध्ये १८ जानेवारीला राज्यस्तरीय साहित्य सोहळा व पुस्तक प्रकाशन

सत्यशोधक विवाहकर्ते रघुनाथ ढोक यांचा सन्मान 

लावण्यलेणी या पुस्तकाचे प्रकाशन 

​शब्दशिल्प/पनवेल (प्रतिनिधी): मराठी साहित्य परिषद (शाखा पनवेल) आणि पंचशील तरुण मंडळ (सावरगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी एका भव्य राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक आयु. नागनाथ श्रीपती डोलारे यांच्या 'मानवतेचे सिंहासन लावण्यलेणी' या पुस्तकाचे प्रकाशन आणि राज्यस्तरीय खुले कविसंमेलन संपन्न होणार आहे.

हा सोहळा नवीन पनवेल येथील सेक्टर-१८ मधील के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता सुरू होईल. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य व लेखक मा. भगवान माळी यांच्या हस्ते होणार असून, पुस्तक प्रकाशन मा. प्रा. डॉ. सुनील कांबळे आणि ज्येष्ठ साहित्यिका मा. अॅड. सुनिता जोशी यांच्या शुभहस्ते पार पडेल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यरत्न, रायगड भूषण मा. प्रा. एल. बी. पाटील (विश्वस्त, कोमसाप) भूषविणार आहेत.

​राज्यभरातील मान्यवरांचा सत्कार

याप्रसंगी महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने माजी जिल्हा न्यायाधीश मा. डॉ. यशवंत चावरे, विद्रोही कवी मा. प्रा. राहुल तागडे, माजी न्यायाधीश मा. शिवदास महाजन, आणि माजी शिक्षण सहसंचालक मा. रोहिदास पोटे हे प्रमुख अतिथी व भाष्यकार म्हणून मार्गदर्शन करतील. तसेच तेलंगणा, नागपूर, पुणे, लातूर, सातारा अशा विविध जिल्ह्यांतील १४ पेक्षा जास्त समाजधुरिणांचा आणि साहित्यिकांचा गौरव केला जाणार आहे.

​दुसऱ्या सत्रात रंगणार कविसंमेलन

दुपारच्या सत्रात राज्यस्तरीय खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवयित्री व समीक्षक मा. प्रा. सुजाता राऊत असणार आहेत. या कविसंमेलनात राज्यातील नामवंत कवी आपल्या कविता सादर करतील.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. हरिश्चंद्र फडके करणार असून आभार प्रदर्शन मा. काशिनाथ जाधव मानतील. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोमसाप पनवेल शाखेचे अध्यक्ष मा. सुभाष कुडके, उपाध्यक्ष मा. नागनाथ डोलारे, सचिव मा. विजय गायकर व अर्चना डोलारे विशेष परिश्रम घेत आहेत. या साहित्य मेळाव्यास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

​_________

​विषय: मानवतेचे सिंहासन, लावण्यलेणी पुस्तक प्रकाशन व कविसंमेलन.

​स्थळ: के. आ. बांठिया विद्यालय सभागृह, सेक्टर १८, नवीन पनवेल.

​वेळ: सकाळी ११:०० ते संध्याकाळी ६:००.

​विशेष आकर्षण: राज्यभरातील साहित्यिकांचा सत्कार आणि राज्यस्तरीय कविसंमेलन.

संक्रांतीचा सण_प्रतिभा सुनील मावलकर

संक्रांतीचा सण आला की 'तिळ गुळ घ्या आणि गोडगोड बोला' मग सुहासिनीची हळदी कुंकवाची जय्यत तयारी सुरू होते.

वस्तु काय आणायच्या, कोणाकोणाला बोलवायचं ग्रुपमध्ये करायचं का .या सर्वोची लिस्ट तयार व्हायची आणि प्रत्येक सखी आपापले मत मांडायची  एक म्हणते ही वस्तु ,दुसरी सखी म्हणायची देवाच्या पोथ्या वाटल्या तर ! तिसरी म्हणाली नाही ग,बाई,! 

पहिल्या सारख्या बायका वाचन कुठे करतात.आता तर त्या टि.व्हि.सीरीयल, व्हाट्अप मध्ये येवढ्या व्यस्त असतात की आता त्यांना पोथ्या, पुराणे वाचायला वेळच मिळत नाही.बर, जाऊं दे सर्व मिळून एकच वस्तु आणायची कि जी स्वयंपाकघरात उपयुक्त पडेल.ठरल,तर मग या एकमेकींच्या चर्चा, चर्चो, संवाद, हळदी कुंकवाचे आयोजन हे सर्व संक्रांतीचा सण आला की......असाच  कल्होळ "आशा" च्याही मनात चालू असायचा तिची सुध्दा धावपड सुरू व्हायची.

घराची साफसफाई डेकोरेशन तर अगदी उत्कृष्ट करायची.तिने टाकलेल्या रांगोळीने तर दरवाजा ऊठुन दिसायचा.तिचे उखाणे तर एक- एक यमक जुळवून तयार असायचे.

आजीच्या काळातील मोठं मोठे उखाणे तर आशाच्या तोंड पाठ असायचे.उखाणे स्पर्धांमधील प्रथम क्रमांक तिचा ठरलेलाच असायचा आजुबाजूच्या मैत्रीणी म्हणायच्या, 

काय, बाई! तू तर उखाणे घेण्यात पटाईत आहे.. तुझ्यासारखे आम्हाला थोडी काही सांगता येणार.

 आशा बिचारी काही न बोलता फक्त हसत असायची.पण म्हणतात ना,   "सटवीच अक्षर आणि ब्रम्हाची रेख"कधीच चुकत नाही. दैव काही वेगळेच घेऊन आले. त्या वर्षाचा संक्रांतीचा सण तिच्या करीता काळ ठरला. अगदी संक्रांतीच्या सणाच्या दिवशीच तीच्या कपाळाचे कुंकु पुसल्या गेले.आशाच्या आनंदाचे दुःखात रूपांतर झाले. आता तिच्या जीवनातील पेटलेला वणवा न विझणारा होता.जुन्या आठवणी, प्रसंग आठवले की तीला असह्य वेदना व्हायच्या. असा आशाचा चेहरा बघून आपोआप मुखातून ओळी बाहेर पडायच्या 

   " माझ्या काळजाची तार आज शिणली 

      कशी नशीबाने थट्टा आज मांडली "!

नशीबाने झालेल्या विडंबनात्मक किंवा भावनिक चढउतारामुळे आशाच्या जीवनात  आलेल्या दुःखाने मन व्याकूळ होते आणि निशब्द अवस्थेत............. मनातील भावना व्यक्त होतात 

   " आशा सारख्या निरागस स्त्रीलाच का

दुःख .... परमेश्वरा हाच का तुझा न्याय!!

                         प्रतिभा सुनील मावलकर 

                           अकोला.       

                          9604157094

संक्रांत_प्रदीप मनोहर पाटील

 


सण उत्सव म्हणजे आनंद, सुख शांती कुटुंब घर परिसरातील सारी मानव जात यांचा सोहळा. मग तो आनंदाचा दिवस असेल, एखादा समारंभ असेल किंवा मग सण. भारतीय संस्कृतीत येणारा प्रत्येक सण, उत्सव हा आपल्या शरीरासोबतच मनाचे सुद्धा आरोग्य जपत असतो. भारत देश हा प्राचीन काळापासून कृषीप्रधान असल्याने सर्व सण उत्सवांची रचना ही बदलत्या ऋतूप्रमाणे केली आहे. नव्हे तशीच अभ्यास केल्या अंती दिसते. मराठी वर्ष्यातील पहिला सण हा मकर संक्रात. मकर संक्रांती हा भारतातील एक प्रमुख सण असून तो निसर्ग, पीक, आणि परिवर्तनाचा उत्सव मानला जातो. दरवर्षी १४ जानेवारीला साजरा केला जाणारा मकर संक्रांती हा सौर सण आहे. सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो, त्याचं स्वागत या सणाने केलं जातं. मकर संक्रांती हा सण नवीन पीक, निसर्गाच्या चक्रात बदल, आणि मानवतेचा संदेश घेऊन येतो.असंच म्हटलं जातं. आपल्या संस्कृतीतील एक महत्वाचा सण म्हणून ओळखला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे करतात.  दिवस आधी भोगी आणि एक दिवस नंतर किंक्रांत साजरी केली जाते. सूर्य हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी साजरा होणारा एक महत्त्वाचा सण. या दिवशी तिळगुळ वाटून 'तीळगूळ घ्या आणि गोड बोला' असे म्हणून नात्यातील कटुता विसरून नवीन सुरुवात केली जाते. हा सण उत्तरायण सुरू झाल्याचे प्रतीक असून, या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, दानधर्म करणे आणि काळे कपडे घालणे (उष्णता शोषण्यासाठी) यांसारख्या परंपरा पाळल्या जातात, विविध खेळ आपल्या आपल्या प्रांत गणिक लहान मोठी मंडळी खेळ खेळत हसत खेळत साजरा करतात.  नात्यात कधीही कटुता येऊ नये किंवा आली असेल तर ती कटुता या सणा पासून विसरून जातं आनंद प्रेम जीवनात यावा म्हणून साजरा होणारा उत्सव. त्याचं प्रमाणे या.पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या जवळ येऊ लागतो. पृथ्वी अन सौर मालेतील ग्रह आपला मार्गक्रमण करतं असतात. पृथ्वी च्या अधिक जवळ येण्या सुरवात काळ आज पासून सुरु होतो. भ्रम्हांड मधील सदैव अविरत सुरु राहणारी ही प्रक्रिया. त्यातून सकाळ, दुपार, संध्याकाळ, ऊन, सावली, रात्र, दिवस, साल, महिना, वर्ष, सौर माळेतीत ग्रह फिरण्याच्या स्थिती वरून सारं सारं चक्र सुरु असतं. त्यावरच निसर्ग चक्र सुद्धा अवलंबुन असतं. निसर्ग चक्रात पावसाळा सम्पुन हिवाळा सुरु झालेला असतो. हिवाळ्यातील पिकं रान हिरवाई नं नटलेलं असतं. जमिनीत असलेलं ओलं ओलाव्यात पिकं जन्माला आलेली असतात. त्या पिकांना अन मानवाला सृष्टी मधील साऱ्या प्राणिमात्र यांना सूचना देण्याचा दिवस म्हणजे हा. सूर्य पृथ्वी च्या जवळ येण्याची सुरवात आज पासून झालीय. वर्ष भराची संक्रमण अवस्था त्या अवस्थेचा पहिला दिवस. आता हिवाळा हळूहळू लवकर संपेल अन उन्हाळ्या कडं आता वाटचालीस सुरवात होईल हाच संदेश या दिवशीचा असंच माझं मत. हिवाळ्याचा या शेवटचा उत्सव होळी येण्याकडं वाटचालीस सुरवात होळी आली की पूर्ण हिवाळा सम्पुन उन्हाळा सुरवातीचा पहिला दिवस होळी असं मी मानतो. त्या दिवसा कडं वाटचालीस सुरवात. तीळ गुळ हिवाळ्यात अंगात तेलकट पणा असावा उष्णता टिकून राहावी. प्रोटीन युक्त अंग सदृढ राहावं म्हणून तीळ गुळ खाद्य पदार्थ. खाऊन तन्दुरुस्त राहावं. अंगात साठवणूक करून ठेवली की उन्हाळा चाहूल लागली आता. तर उन्हाळ्यात सूर्य किरणं अंग भाजतील म्हणून अंग आतून सक्षम राहावं म्हणून असं खावं असंच मला वाटतं. सृष्टी मधील पिकं हिरवी झालीय त्याचं कोवळ्या पिकांच्या पानं, फुलं, कणसं, हुरडा, भाजून खाण्यास सुरवात होण्याचा पण हा काळ असंच वाटतं. पुढे असं कोवळे ऊन सावली खेळ आणि कोवळ्या पिकांच्या पानं फुलांचा कणसांचा आस्वाद पुढे उन्हाळा सुरु होई पर्यंत चा हा काळ. सुरवात आज पासून गोडधोड बनवतं हसत, खेळत आनंद मनात शरीरात भरतं. सण उत्साहात साजरा करतं.  सुरवात पर्व. या सह संक्रांत हि या दिवशी संक्रांती देवीने संकारसूर राक्षसाचा वध करून लोकांना मुक्त केले, अशी कथा आहे. यामुळे हा दिवस साजरा केला जातो. सण हा संक्रांत देवीच्या रूपात साजरा केला जातो. अध्यात्मिक भावना त्यात आहे. इतिहास, भूगोल, त्यात खगोल अभ्यास करतं. सृष्टी हि माता आहे. सृष्टी माता म्हणजे संक्रात विविध अंग अन रंग घेऊन पृथ्वी वर अवतार म्हणजे संक्रांत. पंचांग निसर्ग सौर चक्र यात सृष्टी माता रूप म्हणजे संक्रात असंच प्रदीपचं सांगणं. जीव निर्माण करतं जीवांना खायला देणारी सुख, दुःख ऊन, थंड,गरम, पाऊस पिकं पाणी याचं दर्शन देणारी माता सारं येणारं भविष्य वर्तवणारी माता ती संक्रात. 


सृष्टी चक्रात सौर मालेत सूर्य हा महत्वाचा ग्रह. या ग्रहच्या चालीवरून सारं चक्र सुरु असतं. त्याची चाल आज पहिल्या फिरतांनाच्या संक्रमन अवस्थेत दिवस. या दिवशी पृथ्वी वरील जीव जीवन सृष्टी निर्मिती सृष्टी माता सारं सांगते. सृष्टी मातेचे अनेक रूप त्यातील एक जीव रूप संक्रात. त्या मातेचं पूजन संक्रात रूपात करतं.   हा सण साजरा करतात असंच मी म्हणतो. तसेच मानव जीव जीवन प्रणालीत आपापसातील वाद विसरून, प्रेम आणि सौहार्द वाढवण्यासाठी हा साजरा करतात धर्म अन निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असंच वाटतं. संक्रात देवी ने धार्मिक कथेत किक्रासूर राक्षस मारला म्हणून क्रिक्रांत दुसऱ्या दिवशी साजरा करतात. असो धार्मिक तेत विविध अंग देऊन सण साजरा करण्याची पारंपरिक रूढी परम्परा वर नमूद केल्या प्रमाणे. निसर्गचक्र, सौरचक्र, भ्रम्हांड भ्रमण, जीव जीवन, ऋतुचक्र, याचा अभ्यास करून वार, तिथी, पंचांग म्हणजे हेच चक्रावर कथन. या नुसार संक्रात, होळी, दिवाळी, पाडवा सृष्टी तील विविध साऱ्या चक्राच्या मार्गक्रमण नुसार धार्मिक अध्यात्मिक अंगातून विविध देव, देवी, देवता, ह्या म्हणजे निसर्ग चक्रातील फिरवणाऱ्या सांगणाऱ्या ग्रह, तारे जीव सृष्टी ह्याच सारी पंचतत्व घटक साऱ्या पशु पक्षी प्राणी मात्रा सह सारी सृष्टी माता म्हणजे विविध सणाला विविध रूप घेऊन येणारा उत्सव. प्रत्येक सण याला विविध अंग अन निसर्ग चक्र सह विविध भ्रम्हांड मालेतील सारं दर्शवणारं काहीतरी असतं प्रत्येक सणाला. असंच माझं ठाम मत आहे. आज सृष्टी माता पूजन संक्रांत म्हणून करूयात आणि निसर्ग आणि सौर चक्र काय सांगतं ते पंचांग सांगणारी सृष्टी माता संक्रात साजरी करूयात.



प्रदीप मनोहर पाटील

गणपूर ता. चोपडा

जिल्हा. जळगाव

मो. 9922238055

" शिक्षक साहित्य संमेलन म्हणजे शिक्षकांमधून साहित्यिक घडविणारा विचारमंच "- प्राचार्य डॉ.विनय राऊत

 


 दोन दिवसीय ९ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोपीय सत्कार समारंभ संपन्न

शब्दशिल्प/अमरावती_  बी.एड.चा अभ्यासक्रम हा केवळ पुस्तकी ज्ञान मिळवण्याचा काळ नसून तो खऱ्या अर्थाने ' आदर्श शिक्षक' घडण्याचा काळ असतो.जयदीप सोनखासकर यांनी निर्माण केलेलं हे शिक्षक साहित्य संमेलन  विचारपीठ वैचारिक देवाणघेवाणीचा मोठा विचारमंच आहे.विद्यार्थांच्या सृजनशीलतेचा विकास येथे आलेल्या साहित्यिक शिक्षकांमधून होऊ शकतो.या संमेलनात सहभागी झालेले अनेक शिक्षक स्वतः लेखक, कवी किंवा नाटककार आहेत. शिक्षक साहित्य संमेलन म्हणजे शिक्षकांमधून साहित्यिक घडविणारा विचारमंच आहे .या शिक्षक साहित्य संमेलनातील चर्चासत्रे,एकपात्री प्रयोग,मुक्त संवाद, कथाकथन,ग्रंथदिंडी, परिसंवाद आणि कवीसंमेलने हे सर्वच कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलेले आहेत. पूर्णपणे यशस्वी झाले असे मला वाटते ."असे विचार प्राचार्य डॉ. विनय राऊत यांनी व्यक्त केले.

      ते  मातोश्री विमलाबाई देशमुख साहित्य नगरी श्री.शिवाजी शिक्षण महाविद्यालय,अमरावती येथे

दि ११ जानेवारी २०२६ ला संपन्न झालेल्या ९ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या समारोपीय सत्कार समारंभाच्या अध्यक्ष पदावरून विचार व्यक्त करीत होते.

       समारोपीय सत्राच्या पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विनय राऊत (श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय, अमरावती) तर प्रमुख अतिथी संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.गणेश चव्हाण,प्रा.डॉ.पृथ्वीराजसिंह राजपूत, संघर्ष सावरकर, मा.जयदीप सोनखासकर, प्रा.अरुण बुंदेले,मा.शरदचंद्र बिडकर,प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे,प्रा.किशोर क्षत्रीय होते.

         अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन राज्याध्यक्ष जयदीप सोनखासकर, राजेंद्र भटकर , गजेंद्र पाथरे यांनी स्वागत केले .

            या सत्कार समारंभात लोकनेते, साहित्यिक, संपादक, निसर्गवासी भाई प्रभाकरराव सावरकर स्मृती राज्यस्तरीय शिक्षक साहित्यरत्न पुरस्कार प्रा.प्रतीक पाथरे व मा. शिवा काळे यांना सन्मानपूर्वक देण्यात आला.

          याप्रसंगी अनेक गुणवंत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख अतिथी संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.गणेश चव्हाण,प्रा.डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत,संघर्ष सावरकर यांनी मनोगत व्यक्त केले.शिक्षक साहित्य संघाचे राज्याध्यक्ष मा.जयदीप सोनखासकर यांनी ठराव वाचन केले.

     या कार्यक्रमाचे संचलन प्रा.डॉ.मदाताई नांदुरकर तर आभार सुरेश मडावी यांनी मानले.

मानसी शेंडे हीची आव्हान शिबिराकरीता निवड

 


शब्दशिल्प/कुही - येथील राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालयातील कु.मानसी शेंडे या विद्यार्थीनीची राज्य स्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीराकरीता रा.तु.म.ना.वि.नागपूरचे राष्ट्रीय सेवा योजना पथकात निवड झाली असून दि. 17 /1/26 ते दि. 24/1/26 या कालावधीत प्रस्तुत आयोजन डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे संपन्न होत आहे. 

     महाराष्ट्रातील चोवीस विद्यापीठातील एकूण सहाशे विद्यार्थी स्वयंसेवकांचा यात सहभाग असणार आहे. 

     रा.तु.म.ना.वि.ना.चे ग्रामीण विभागातील महाविद्यालयातून मानसीची निवड झाल्याने संस्थेचे सचिव श्री जी.एन.धवड  ,अध्यक्ष  श्री एच. जी.नागमोते, प्राचार्य गजानन मांडेकर यांचेसह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी,कार्यालयीन कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले

मी पाहिलेलं विद्यार्थी अधिवेशन-प्रा.डॉ.गायत्री कुकडे

 


२०२६ ची सुरुवात माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली. महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा विभागांतर्गत बारामती (पुणे) येथे तिसरे पाचदिवसीय विद्यार्थी करिअर संसद अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात माझ्या महाविद्यालयातील ११ विद्यार्थी पदाधिकारी व २ समन्वयक सहभागी झाले होते.

संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व सुनियोजित होते. मुलींसाठी व मुलांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था, तसेच शिक्षक व शिक्षिकांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली होती.

दि. ३ जानेवारी रोजी अधिवेशनाचे उद्घाटन उच्च शिक्षण संचालक मा. श्री. शैलेंद्र देवळणकर यांच्या हस्ते पार पडले. त्याच दिवशी सेंटर ऑफ एक्सलन्स महाविद्यालयांचा पुरस्कार वितरण समारंभही आयोजित करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मार्गदर्शक तज्ज्ञांची व्याख्याने घेण्यात आली. प्रत्येक व्याख्यानात विषय मांडल्यानंतर प्रश्नोत्तरांची संधी देण्यात येत असल्यामुळे विद्यार्थी संपूर्ण वेळ सजग व सक्रिय होते.

याच कालावधीत प्राध्यापकांसाठी पाचदिवसीय AI Teacher Faculty Induction Program (FDP) आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून विद्यार्थ्यांची व प्राध्यापकांची स्वतंत्र सत्रे सुरू होती. या पाच दिवसांत प्राध्यापक व विद्यार्थी प्रामुख्याने जेवणाच्या वेळी किंवा रात्रीच एकमेकांना भेटत होते.

प्राध्यापक म्हणजे केवळ शिक्षक नसून त्यांच्या मागे एक संवेदनशील माणूस आहे आणि सोबत आणलेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारीही त्यांच्यावर आहे, याची जाणीव प्रत्येक प्राध्यापकाला या अधिवेशनात प्रकर्षाने होत होती. विद्यार्थ्यांना पाहताच प्राध्यापक आत्मीयतेने त्यांची विचारपूस करत होते. कधी विद्यार्थी उत्साहात असत, तर कधी काहींना बौद्धिक सत्रे व तेथील कडक शिस्त अवघड वाटत होती. तरीही “दिलेलं कार्य पूर्ण करायचंच” ही मानसिकता निर्माण करून शिक्षक विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवसासाठी तयार करत होते. एखादा विद्यार्थी आपल्या ओळखीचा शिक्षक दिसताच समस्यांची यादीच मांडायचा; पण शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक बाजू समजून घेतल्या आणि गरज भासल्यास त्या समस्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या. विद्यार्थ्यांचे जेवण वेळेवर झाले आहे का, कोणी आजारी आहे का, त्यांना औषधोपचार मिळतात का, नव्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्यांना मानसिक आधार देणे, विशेषतः मुलींच्या अनेक खाजगी व संवेदनशील समस्यांचे निराकरण करणे—अशा असंख्य जबाबदाऱ्या शिक्षकांवर होत्या.



याच दरम्यान एक प्रसंग घडला. संध्याकाळी सांस्कृतिक सत्र सुरू असताना एका विद्यार्थिनीची प्रकृती अचानक बिघडली. इतर विद्यार्थिनींनी तत्काळ महिला शिक्षिकांना फोन केला. ती विद्यार्थिनी खूप घाबरलेली होती व रडत होती. शिक्षिका येईपर्यंत ती कुणाचेही ऐकत नव्हती. तिच्या महाविद्यालयाच्या शिक्षिका जवळ येताच ती त्यांना पाहून अधिकच ढसाढसा रडू लागली. रात्रीचे साडेअकरा वाजले होते. दिवसभराच्या कामामुळे शिक्षिकाही अत्यंत थकल्या होत्या; तरीही त्यांनी परिस्थिती अत्यंत शांतपणे हाताळली. विद्यार्थिनीला आत्मीयतेने समजावून तिला शांत करण्यात आले. तोपर्यंत स्वयंसेविकांनी ॲम्बुलन्स बोलावली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रात्रीचे दीड वाजले होते. इतक्यावरच कार्य थांबले नाही. विद्यार्थिनी अजूनही घाबरलेली असल्यामुळे त्या शिक्षिकेने तिला स्वतःजवळ दिलेल्या खोलीमध्ये दोघी शिक्षकांच्या मध्ये झोपवीले.

या एका प्रसंगातून मला एका शिक्षिकेमधील आई दिसली. ती स्वतः आपल्या मुलांपासून पाच दिवस दूर होती; परंतु जबाबदारी ही प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या नात्यांतून आपले कर्तव्य पार पाडण्यास प्रेरित करते—हे या अधिवेशनात पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

००००००

गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

{व-हाडी कथा} तमाशा....सु.पुं.अढाऊकर

 



" अय बाल्या कुठ चाल्ला बे!"

" माया हातात काय हाय सुभ्या?"

" टमरेट."

" मंग मी कुठ चाल्लो असनं सांग."

" परसाकळे."

" तरी भैताळबेलन्या मले पुसत कुठ चाल्ला म्हनून. वाह! बे वाह! लेका."

" मी येवू काय?"

" आली असनं त ये... पन् पानी नाह्यी पूरनं गांडगोटा करा लागनं."

" गोटे दुपारी लै गरम होतेत लेका. तुले मालूम नाही काय आपल्या व-हाडात सूर्य किती आग ओकते त."

" मंग बाभूयीचा पाला घे."

" बाभूय काहाले काटा घुसाले. पयसाचे पानं घेयेनं ना ऊन्हायातही थंन्डेगार लागतेत."

" त्वाली मर्जी लेका. चल मंग पटपट पाय ऊचलं मले नेटावर आली."

दोघही लवनात जावून बसतात. 

" बाल्या एक ईचारू काय रे."

" एक काहाले दोन ईचार. गोदरी काहाले असते त अथिसा जे ईचार आचार आदान परदान होतेत तसे ईचार संसदेतही होत नसतीन लेका. बरं बोल  काय ईचारत होता त."

" काबे बाल्या लेका तमाशा काहाले म्हनतेत बे."

" कामून रे.पाहाले गेल्ता काय?"

" म्या त कवा लेका पाह्यलाच नाही कसा असते त.. म्हनूनत तुले ईचारून राह्यलो न लेका."

" बरं ठिक हाय आईक  मंग 

तमाशा म्हन्जे कला-लोककला. तमाशा म्हण्जे कलेवर जगणारी गरीब पोटं. तमाशा म्हन्जे नाची, नाचा,मावशी,तुणतुणे वाजवणारा, ढोलकी वाजवनारा, कढ - हलगी वाजवनारा... तमाशात गण, गौळण, लावनी,बतावनी अन वग अशा पाच परकारच्या अंगानं तमाशा पूरा होते .सतराव्या शतकात तमाशा हे लोककला ऊदयास आली. तमाशाच्या आंधी मुरळी- वाघ्या, गोंधळ,जागरण,बळीराजा, महासुभा, जोतीबा, दशावतार, पोतराज,बहुरूपी, वासूदेवाची गानी असे लोककला परकार लैच गाजत होते."

"बरं मले सांग तमाशात नेमक काय चालते."

" तमाशाचे फड असतेत.  त्या फडात नाची,नाच्या, ढोलकी, तुणतुणे,कढे ,झांझ, हलगी अन नाचीच्या पायात घुंगरचाळ सर्वात आंधी गन म्हतल्या जाते म्हनजे गनपतीच गानं, मंग गवळन म्हतल्या जाते, मंग लावनीवर नाची पायात घुंगरचाळ बांधून बेभान होवून  नाचते. तीचे डोयाचे ईशारे, मंग मानीचे कंबरीचे लचके पडतात लोक पागल होतेत फेट्यासह पैसे ऊळोतात. मंग हजरजबाबी बतावनी अन् आखरीले वग म्हनून तमाशाची शेवट केला जाते."

" तमाशा कोन्च्या गावात भरते."

 "महाराष्ट्रात बंबाट तमाशा फड हायेत काळू-बाळूचा तमाशा फड,रघूविर खेडकर, मंगला बनसोडे, दत्ता महाडिक, चंद्रकांत ढवळीपूरकर ययचे फड लयच नावाजेल हायेत. यात्रेत कनाती, पर्दे बांधून टिकट ईकरी करून ययचा हा तमाशा चालते अन् पेटभरो गुजरान चालते. शायर बशीर मोमीन ययन बंबाट लेखन केल हाय लावण्या,वग-नाटक,गण,गौळणी,सवाल - जबाब अन लोकगीत तयार करून महाराष्ट्रातल्या ब-याच फडाले आपलं साहित्य पुरवल... असे तमाशे महाराष्ट्रभर गाजत होते."

" काबे बाल्या महाराष्ट्रात हे तमाशे कुठसा असतात."

" नारायनगाव, पुणे,  सातारा, सांगली,  संगमनेर अथिसा जादा परमानात दिसून येतेत. "

" जे नाची असते तीले नाचाची तालीम कशी भेटते."

" ययच जीवन लयच हलाखीच असते. लानपनीच ययले नाचाले शिकवले जाते. ययले शिक्शन बिक्शन नसते. जवान अन साजरी  असतात तेयचा तमाशा पाहाले लोक बंबाट गरदी करतेत पन जवा ह्या नाच्या  बाया म्हता-या होतेत तव्हा मातर ययले गरीबीत जीवन जगा लागते. अन् जे मावशी असते. मावशी म्हन्जे बाप्या थो मानूसच असते पन् बाई सारखा बाना असते. अवाज जरा किन्नरा सारखा थो काहाळते. त्याच्यावर मानसाच्या खराब नजरा फिरतात, थ्याले हिळसवाळस केल जाते. तुनतुन वाजोनारा, ढोलकी वाजोनारा, कळ वाजोनारा अन हलगी वाजोना-याले तेयच्या घरात ईज्जत नसते. ययच म्हतारपन लयच बेकार असते लेका. सरकारन ययले मासिक मानधन द्याले पाह्यजे. असा असते लेका सुभ्या तमाशा."

" लय ऊपकार झाले बाल्या लेका त्वाले. लयच साज-या शबदाईत त्वा मले सांगल. धन्यवाद."

" ऊपकार नोको मानू झाली असन त चल धूवून घे अन चल."

" पाला घेतो ना."

" अरध टमरेट ठुयल तुले. चल धूय पटालकन अन् चल. नाहीत बाता हानत अथिसाच रात करशीन."


लेखक 

सु.पुं.अढाऊकर 

अकोला 

९७६९२०२५९७

"जिद्द पेरताना" सामाजिक दायित्व सांभाळणारी कादंबरी

  अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा येथील राजेश चौरे यांनी " जिद्द पेरताना "  ही सामाजिक, भावनिक, गुंतागुंतीची व तरु...