शुक्रवार, १६ जानेवारी, २०२६

संक्रांतीचा सण_प्रतिभा सुनील मावलकर

संक्रांतीचा सण आला की 'तिळ गुळ घ्या आणि गोडगोड बोला' मग सुहासिनीची हळदी कुंकवाची जय्यत तयारी सुरू होते.

वस्तु काय आणायच्या, कोणाकोणाला बोलवायचं ग्रुपमध्ये करायचं का .या सर्वोची लिस्ट तयार व्हायची आणि प्रत्येक सखी आपापले मत मांडायची  एक म्हणते ही वस्तु ,दुसरी सखी म्हणायची देवाच्या पोथ्या वाटल्या तर ! तिसरी म्हणाली नाही ग,बाई,! 

पहिल्या सारख्या बायका वाचन कुठे करतात.आता तर त्या टि.व्हि.सीरीयल, व्हाट्अप मध्ये येवढ्या व्यस्त असतात की आता त्यांना पोथ्या, पुराणे वाचायला वेळच मिळत नाही.बर, जाऊं दे सर्व मिळून एकच वस्तु आणायची कि जी स्वयंपाकघरात उपयुक्त पडेल.ठरल,तर मग या एकमेकींच्या चर्चा, चर्चो, संवाद, हळदी कुंकवाचे आयोजन हे सर्व संक्रांतीचा सण आला की......असाच  कल्होळ "आशा" च्याही मनात चालू असायचा तिची सुध्दा धावपड सुरू व्हायची.

घराची साफसफाई डेकोरेशन तर अगदी उत्कृष्ट करायची.तिने टाकलेल्या रांगोळीने तर दरवाजा ऊठुन दिसायचा.तिचे उखाणे तर एक- एक यमक जुळवून तयार असायचे.

आजीच्या काळातील मोठं मोठे उखाणे तर आशाच्या तोंड पाठ असायचे.उखाणे स्पर्धांमधील प्रथम क्रमांक तिचा ठरलेलाच असायचा आजुबाजूच्या मैत्रीणी म्हणायच्या, 

काय, बाई! तू तर उखाणे घेण्यात पटाईत आहे.. तुझ्यासारखे आम्हाला थोडी काही सांगता येणार.

 आशा बिचारी काही न बोलता फक्त हसत असायची.पण म्हणतात ना,   "सटवीच अक्षर आणि ब्रम्हाची रेख"कधीच चुकत नाही. दैव काही वेगळेच घेऊन आले. त्या वर्षाचा संक्रांतीचा सण तिच्या करीता काळ ठरला. अगदी संक्रांतीच्या सणाच्या दिवशीच तीच्या कपाळाचे कुंकु पुसल्या गेले.आशाच्या आनंदाचे दुःखात रूपांतर झाले. आता तिच्या जीवनातील पेटलेला वणवा न विझणारा होता.जुन्या आठवणी, प्रसंग आठवले की तीला असह्य वेदना व्हायच्या. असा आशाचा चेहरा बघून आपोआप मुखातून ओळी बाहेर पडायच्या 

   " माझ्या काळजाची तार आज शिणली 

      कशी नशीबाने थट्टा आज मांडली "!

नशीबाने झालेल्या विडंबनात्मक किंवा भावनिक चढउतारामुळे आशाच्या जीवनात  आलेल्या दुःखाने मन व्याकूळ होते आणि निशब्द अवस्थेत............. मनातील भावना व्यक्त होतात 

   " आशा सारख्या निरागस स्त्रीलाच का

दुःख .... परमेश्वरा हाच का तुझा न्याय!!

                         प्रतिभा सुनील मावलकर 

                           अकोला.       

                          9604157094

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...