शब्दशिल्प/कुही - येथील राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालयातील कु.मानसी शेंडे या विद्यार्थीनीची राज्य स्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीराकरीता रा.तु.म.ना.वि.नागपूरचे राष्ट्रीय सेवा योजना पथकात निवड झाली असून दि. 17 /1/26 ते दि. 24/1/26 या कालावधीत प्रस्तुत आयोजन डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे संपन्न होत आहे.
महाराष्ट्रातील चोवीस विद्यापीठातील एकूण सहाशे विद्यार्थी स्वयंसेवकांचा यात सहभाग असणार आहे.
रा.तु.म.ना.वि.ना.चे ग्रामीण विभागातील महाविद्यालयातून मानसीची निवड झाल्याने संस्थेचे सचिव श्री जी.एन.धवड ,अध्यक्ष श्री एच. जी.नागमोते, प्राचार्य गजानन मांडेकर यांचेसह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी,कार्यालयीन कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा