" अय बाल्या कुठ चाल्ला बे!"
" माया हातात काय हाय सुभ्या?"
" टमरेट."
" मंग मी कुठ चाल्लो असनं सांग."
" परसाकळे."
" तरी भैताळबेलन्या मले पुसत कुठ चाल्ला म्हनून. वाह! बे वाह! लेका."
" मी येवू काय?"
" आली असनं त ये... पन् पानी नाह्यी पूरनं गांडगोटा करा लागनं."
" गोटे दुपारी लै गरम होतेत लेका. तुले मालूम नाही काय आपल्या व-हाडात सूर्य किती आग ओकते त."
" मंग बाभूयीचा पाला घे."
" बाभूय काहाले काटा घुसाले. पयसाचे पानं घेयेनं ना ऊन्हायातही थंन्डेगार लागतेत."
" त्वाली मर्जी लेका. चल मंग पटपट पाय ऊचलं मले नेटावर आली."
दोघही लवनात जावून बसतात.
" बाल्या एक ईचारू काय रे."
" एक काहाले दोन ईचार. गोदरी काहाले असते त अथिसा जे ईचार आचार आदान परदान होतेत तसे ईचार संसदेतही होत नसतीन लेका. बरं बोल काय ईचारत होता त."
" काबे बाल्या लेका तमाशा काहाले म्हनतेत बे."
" कामून रे.पाहाले गेल्ता काय?"
" म्या त कवा लेका पाह्यलाच नाही कसा असते त.. म्हनूनत तुले ईचारून राह्यलो न लेका."
" बरं ठिक हाय आईक मंग
तमाशा म्हन्जे कला-लोककला. तमाशा म्हण्जे कलेवर जगणारी गरीब पोटं. तमाशा म्हन्जे नाची, नाचा,मावशी,तुणतुणे वाजवणारा, ढोलकी वाजवनारा, कढ - हलगी वाजवनारा... तमाशात गण, गौळण, लावनी,बतावनी अन वग अशा पाच परकारच्या अंगानं तमाशा पूरा होते .सतराव्या शतकात तमाशा हे लोककला ऊदयास आली. तमाशाच्या आंधी मुरळी- वाघ्या, गोंधळ,जागरण,बळीराजा, महासुभा, जोतीबा, दशावतार, पोतराज,बहुरूपी, वासूदेवाची गानी असे लोककला परकार लैच गाजत होते."
"बरं मले सांग तमाशात नेमक काय चालते."
" तमाशाचे फड असतेत. त्या फडात नाची,नाच्या, ढोलकी, तुणतुणे,कढे ,झांझ, हलगी अन नाचीच्या पायात घुंगरचाळ सर्वात आंधी गन म्हतल्या जाते म्हनजे गनपतीच गानं, मंग गवळन म्हतल्या जाते, मंग लावनीवर नाची पायात घुंगरचाळ बांधून बेभान होवून नाचते. तीचे डोयाचे ईशारे, मंग मानीचे कंबरीचे लचके पडतात लोक पागल होतेत फेट्यासह पैसे ऊळोतात. मंग हजरजबाबी बतावनी अन् आखरीले वग म्हनून तमाशाची शेवट केला जाते."
" तमाशा कोन्च्या गावात भरते."
"महाराष्ट्रात बंबाट तमाशा फड हायेत काळू-बाळूचा तमाशा फड,रघूविर खेडकर, मंगला बनसोडे, दत्ता महाडिक, चंद्रकांत ढवळीपूरकर ययचे फड लयच नावाजेल हायेत. यात्रेत कनाती, पर्दे बांधून टिकट ईकरी करून ययचा हा तमाशा चालते अन् पेटभरो गुजरान चालते. शायर बशीर मोमीन ययन बंबाट लेखन केल हाय लावण्या,वग-नाटक,गण,गौळणी,सवाल - जबाब अन लोकगीत तयार करून महाराष्ट्रातल्या ब-याच फडाले आपलं साहित्य पुरवल... असे तमाशे महाराष्ट्रभर गाजत होते."
" काबे बाल्या महाराष्ट्रात हे तमाशे कुठसा असतात."
" नारायनगाव, पुणे, सातारा, सांगली, संगमनेर अथिसा जादा परमानात दिसून येतेत. "
" जे नाची असते तीले नाचाची तालीम कशी भेटते."
" ययच जीवन लयच हलाखीच असते. लानपनीच ययले नाचाले शिकवले जाते. ययले शिक्शन बिक्शन नसते. जवान अन साजरी असतात तेयचा तमाशा पाहाले लोक बंबाट गरदी करतेत पन जवा ह्या नाच्या बाया म्हता-या होतेत तव्हा मातर ययले गरीबीत जीवन जगा लागते. अन् जे मावशी असते. मावशी म्हन्जे बाप्या थो मानूसच असते पन् बाई सारखा बाना असते. अवाज जरा किन्नरा सारखा थो काहाळते. त्याच्यावर मानसाच्या खराब नजरा फिरतात, थ्याले हिळसवाळस केल जाते. तुनतुन वाजोनारा, ढोलकी वाजोनारा, कळ वाजोनारा अन हलगी वाजोना-याले तेयच्या घरात ईज्जत नसते. ययच म्हतारपन लयच बेकार असते लेका. सरकारन ययले मासिक मानधन द्याले पाह्यजे. असा असते लेका सुभ्या तमाशा."
" लय ऊपकार झाले बाल्या लेका त्वाले. लयच साज-या शबदाईत त्वा मले सांगल. धन्यवाद."
" ऊपकार नोको मानू झाली असन त चल धूवून घे अन चल."
" पाला घेतो ना."
" अरध टमरेट ठुयल तुले. चल धूय पटालकन अन् चल. नाहीत बाता हानत अथिसाच रात करशीन."
लेखक
सु.पुं.अढाऊकर
अकोला
९७६९२०२५९७


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा