शब्दशिल्प/पुणे_आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून, महाराष्ट्र श्रम कामगार संघटना (रजि.) आणि भारत श्री कार्य गौरव सोहळा समितीच्या वतीने पत्रकार भवन पुण्यात रविवारी एका दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रांतील गुणवंतांना मानाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. 'कार्य सन्मान... राष्ट्राचा अभिमान!' हे ब्रीद घेऊन नवी पेठ येथील पत्रकार भवन, गांजवे चौक येथे पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमात, यवतमाळच्या सुप्रसिद्ध प्राध्यापिका, लेखिका व पत्रकार मा. मनिषा कांबळे यांना त्यांच्या अहोरात्र चालणाऱ्या शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्याची तळमळ लक्षात घेऊन 'भारत समाज गौरव पुरस्कार' देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. तसेच महाराष्ट्र प्रेरणा जन सेवा संस्थान सोहळा कराड सातारा तर्फे स्टार हिरकणी कर्तृत्व साहित्य पुरस्कार हे दोन्हीही पुरस्कार प्रदान करण्यात आले
भव्य मानचिन्ह, आकर्षक सन्मानपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या सोहळ्याचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रा. मनीषा कांबळे यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांना पुस्तके भेट देऊन एक नवा आणि कौतुकास्पद आदर्श घालून दिला.
या सोहळ्याला चित्रपट सृष्टीतील आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची प्रमुख उपस्थिती होती. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष, प्रसिद्ध अभिनेते व निर्माते मा. मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते आणि 'साधी माणसं' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते नितीश घारे, लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढवली. तसेच सातारा येथून खास शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रा. प्रतिभा गजरमल यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून विजेत्यांचे कौतुक केले. प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक डॉ.बी. एन .खरात यांनी मनीषा कांबळे यांना साहित्य क्षेत्रातील उगवता तारा या शब्दात त्यांच्या गौरव केला. तसेच त्यांच्या सूर्याचा सूर्य या काव्यसंग्रहाचे कौतुक करताना त्यांनी म्हटले की वयाच्या चौदाव्या वर्षापासून आपल्या साहित्य लिखाणाला सुरुवात करून मनीषा कांबळेनी येणाऱ्या नव्या भावी पिढीसाठी नवा आदर्श व नवी दिशा दिलेली आहे. त्यांच्या कवितेची शैली ही अतिशय दर्जेदार आणि उत्कृष्ट असून सकारात्मक बदल घडून आणणारी आहे. त्यांच्या 22 वर्षाच्या योगदानाचा उल्लेख करताना ते म्हणाले येणाऱ्या नव्या युगाचा "नवा सूर्य "हे मनिषा कांबळे आहे
या प्रसंगी पत्रकार व साहित्यिक मा. राहुल खरात, सरांनी सुद्धा त्यांच्या कार्याचे आणि लिखाणांचे विशेष कौतुक केले. अल्पवयामध्ये घेतलेली गरुडझेप येणाऱ्या नवीन काळात नक्कीच अनोखी क्रांती करेल आणि समता न्याय बंधुतेचा जागर करेल या शब्दात गौरवउद्गार केला.
आयएसओ (ISO 9001:2015) मानांकित असलेल्या महाराष्ट्र श्रम कामगार संघटनेचे अध्यक्ष अमोदक आणि कार्य प्रमुख समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे अत्यंत नेटके आणि वेळेचे अचूक नियोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्त्यांनी मोजक्या शब्दांत सर्वांचे कौतुक केल्यामुळे हा भव्य कार्यक्रम अगदी वेळेत आटोपशीर पार पडला. कष्ट, समर्पण आणि ज्ञानदानाच्या भावनेचा गौरव करणाऱ्या या सोहळ्यात कवियत्री मनीषा कांबळे यांचा सन्मान झाल्याबद्दल संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून आणि साहित्यिक वर्तुळातून त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे.
पुरस्काराबाबत मनीषा कांबळे यांची प्रतिक्रिया:
"आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून भारत श्री साहित्यिक गौरव पुरस्कार , तसेच स्टार हिरकणी कर्तृत्व साहित्य पुरस्कार देऊन माझ्या आजवर केलेल्या कार्याचा, कष्टाचा आणि समर्पणाचा जो गौरव पुण्यात झाला, तो खरोखरच भारावून टाकणारा आहे. समाजप्रबोधन करणाऱ्या इतर सर्व गुणवंतांसोबत एकाच मंचावर सन्मानित होताना मनाला प्रचंड आनंद होत आहे. 'कार्य सन्मान... राष्ट्राचा अभिमान!' हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या महाराष्ट्र श्रम कामगार संघटनेने या सोहळ्याचे अतिशय नेटके नियोजन केले. हे दोन्ही पुरस्कार माझ्या सामाजिक आणि साहित्यिक प्रवासाला अधिक बळ देणारा असून, भविष्यातही हे कार्य अधिक जोमाने सुरू राहील. वैचारिक देवाणघेवाण वाढावी म्हणूनच मी या प्रसंगी मान्यवरांना पुस्तके भेट दिली."



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा