मंगळवार, ५ मे, २०२६

सोजाई आदिवासी महिला विकास फांऊडेशन आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व काव्य मैफिल सोहळा संपन्न

शब्दशिल्प/पुणे - अशोका व्हेज रेजन्सी, पुणे- आळंदी रोड, बालाजी मंदिरा जवळ, वडमुखवाडी, चन्होली बुद्रुक
, येथे सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशन "डॉ.बाबासाहेब आंबेडकर" राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व "विचारांचा वारसा" राज्यस्तरीय काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गीतकार सिने अभिनेते लोककवी सिताराम नरके ( राष्ट्रपती पदक पोलीस मानकरी ) उद्घाटक मा.प्रमोद वाघ वरिष्ठ पोलीस निरीक्षक (दिघी पोलीस स्टेशन )प्रमुख पाहुणे अतुल गुंजाळ (सेलिब्रिटी ज्यूरी,अभिनेते )ज्येष्ठ साहित्यिक सुप्रसिद्ध निवेदक रानकवी जगदीप वनशिव, संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत चव्हाण,डॉ.ओमकार चव्हाण (उपाध्यक्ष ), अँड.जयश्री सोनवणे (सचिव) द्रोपदी सोनवणे (खजिनदार ) यांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व राष्ट्रीय ग्रंथ संविधान यांचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव अँड.जयश्री सोनवणे यांनी केले.संस्थेचे विविध उपक्रम,सामाजिक सेवेत सहभाग, संघर्षातून प्रगतीकडे,अन्यायाविरुद्ध वाचा फोडणे,आरोग्य शिबिर भरवणे,शैक्षणिक आरोग्य सवलती मिळवून देणे असे अनेक उपक्रम संस्था राबवते.विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.समाज प्रबोधनाची कास हाच आमचा ध्यास महाराष्ट्रातील नवोदित साहित्यिकांना विचारपीठ मिळून देण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत. पुस्तक प्रकाशन,नृत्य कला स्पर्धा,महिलांसाठी विविध उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो असे त्यांनी सांगितले.

उद्घाटन प्रसंगी प्रशांत वाघ साहेब म्हणाले कवींचे विविध विषय नेहमीच असतात. पण चालू घडामोडीवर जनजागृती झाली पाहिजे.अत्याचार भ्रष्टाचार क्राईम अशा गोष्टींना आळा बसण्यासाठी साहित्यिकांनी लिहितं झालं पाहिजे.असे परखड  लिहिले तर समाजात प्रबोधन होईल. बाबासाहेबांच्या संविधानामुळे आपल्या सगळ्यांना समान अधिकार मिळाला असे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष लोककवी सीताराम नरके राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी म्हणाले आई बापांची सेवा करणतो तोच खरा या जगात भाग्यवंत आहे. त्यांच्या वारकरी बाप माझा गळा तुळशीची माळ या कवितेने सर्वांना भाऊकं केले.गैरवर्तन सोडून या देशात परिवर्तन झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

पहिल्या सत्रात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांना यावर्षीचा "जीवनगौरव पुरस्कार"  देऊन सन्मानित करण्यात आले.मानपत्र शाल,पुष्पगुच्छ,स्मृतीचिन्ह असे पुरस्कार स्वरूप होते. सेवा, शिक्षण, उद्योग, कला, आरोग्य, सामाजिक व इतर सर्व क्षेत्रांतील उत्कृष्ट व उल्लेखनीय योगदानासाठी कार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.या उद्घाटन पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन गजानन उफाडे यांनी. 

दुसऱ्या सत्रामध्ये मध्ये निमंत्रित कवींची "विचारांचा वारसा"काव्य मैफिल आयोजित केली होती.या काव्य मैफिलीचे  अध्यक्ष गझलकार रज्जाक शेख हे होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आनंदा भारमल,आनंदा साळवे,गजानन उफाडे हे उपस्थित होते. 

यावेळी तीस पेक्षा अधिक कविंनी आपल्या भारदार रचना सादर करून रसिकांची मने जिंकली.या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध निवेदक रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या बहारदार शैलीत रंगतदार काव्य मैफिल रंगवली. हा कार्यक्रम आळंदी रोड येथील बालाजी मंदिरा जवळ असलेले अशोका बँकेट हॉल येथे संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...