मंगळवार, ५ मे, २०२६

प्रीती जगझाप बल्लारपूर यांच्या एकनाथ आव्हाड यांच्या बालकविता आस्वाद आणि अभ्यास या ग्रंथास शिवांजली साहित्यपीठ 2026 चा शिवांजली बालसाहित्य सन्मान पुरस्कार.

 


      शब्दशिल्प /बल्लारपूर- शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद,शाखा चाळकवाडी-पिंपळवंडी-जुन्नर यांचे तर्फे दिनांक 1 मे 2026 ते 3 मे 2026 रोजी आयोजित केलेल्या 33 व्या राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सवा मधे बल्लारपूर येथील सौ.प्रीती विलास जगझाप लिखीत बालसाहित्य समिक्षा ग्रंथ,"एकनाथ आव्हाड यांच्या बालकविता:आस्वाद आणि अभ्यास या बालसमिक्षा ग्रंथास(विभागून) डॉ . लक्ष्मण इंगळे पुरस्कृत शिवांजली बालसाहित्य सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. 

सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व रोख रक्कम १७००₹ असे शिवांजली साहित्य सन्मानाचे स्वरूप असून हा सन्मान दिनांक ३ मे २०२६ रोजी पद्मश्री नारायण सुर्वे सभागृह -राष्ट्रसंत गाडगेबाबा साहित्यनगरी शिवांजली शैक्षणिक संकुल, चाळकवाडी येथे संपन्न झाला.या महोत्सवाचे आयोजन सन्माननीय शिवाजी चाळक साहेब प्रवर्तक शिवांजली परिवार यांनी केले असून या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.डॉ.पंडीत विद्यासागर मा.कुलगुरू ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हे होते. प्रा.मा.रा.लामखडे,प्रा.द.स. काकडे, मा.शिवाजी चाळक साहेब,प्रा.साईनाथ पाचारणे,मा.संदिप वाघोले या मान्यवरांच्या हस्ते बहुसंख्य साहित्यिकांच्या उपस्थित सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला या सन्मानासाठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...