शब्दशिल्प/मालेगाव_दि. 30-4-2026 गुरुवार मालेगाव येथील जेष्ठ नागरिक संस्थे तर्फे कवी संजय मुकुंदराव निकम यांच्या मराठी आणि हिंदी काव्य वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात कवी संजय निकम यांनी कवी आणि कवितेचे महत्व विषद केले. प्राचीन ते आधुनिक का ळातील काव्य परंपरेचा आढावा घेतला.
इंद्रायणी, छत्रपती शिवराय, परिवर्तन, पाण्यात नभ, प्रेम पत्र, भगवान न्हावी, सैनिक, लोकशाही विकली, तहान, रान सजले,रान वेडेपिसे, गोदाकाठ, या मराठी कविता सादर करून रसिक श्रोत्यांचे मन जिंकून घेतले. गोदाकाठ या कविता संग्रहास स्व.निसर्ग कवी ना. धो. महानोर यांची प्रस्तावना लाभली असल्याचे नमूद केले. त्यानंतर राष्ट्रीय कवी संजय मुकुंदराव निकम यांनी मेरा भारत या हिंदी काव्य संग्रहतील मेरा भारत, तिरंगा, गीत नया गाता हूँl शंभूराजा, सुपरस्टार, महानायक, नेताजी, शास्त्रीजी, नरेंद्र मोदी, हम भी कभी जवान थे, झलक, साई का दरबार, इंदिरा गांधी, आदि हिंदी कविता सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष निंबा भागाजी निकम सर यांनी संजय निकम यांना काव्यवाचानासाठी आमंत्रित केले. श्री जगदीश निकम यांनी प्रमुख पाहुणे कवी संजय निकम यांचा श्रोत्यांना परिचय करून दिला.अध्यक्ष निंबा भागा निकम आणि सहकारी सदस्य यांनी कवी संजय मुकुंदराव निकम यांचा शाल, गुलाब पुष्प आणि पुस्तकं देऊन सत्कार केला. मालेगाव मराठी साहित्या संघाचे अध्यक्ष रमेश जी उचित, संजय पांडे हे ही कार्यक्रमांस उपस्थित होते. तसेच परिसरातील जेष्ठ नागरिक व रसिक श्रोते कार्यक्रमास उपस्थित होते. श्री रमेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. हा काव्य वाचन कार्यक्रम जेष्ठ नागरिक संस्था, सभागृह मालेगाव, कॅम्प येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा