शब्दशिल्प/वाई_पुस्तकांमधूनच माणसाला ज्ञान, विचार आणि जगण्याची नवी दिशा मिळते .गावगाडा साहित्य पुरस्काराचे कौतुक करताना त्यांनी सांगितलं की, हा कार्यक्रम फक्त साहित्यिकांचा गौरव करणारा नसून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही सन्मानित करणारा आहे. त्यामुळे या उपक्रमाचं वेगळेपण अधिक उठून दिसतं. असे गौरवउदगार अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी काढले
वडशिव ता करमाळा जि सोलापूर येशीलविश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने पुणे येथील अक्षरवेल सभागृहात १६ व्या राज्यस्तरीय गावगाडा पुरस्कार वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या.अध्यक्षा स्थानी अभिनेते प्रा डॉ संजय चौधरी होते
मा. मोनिका सिंह आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की त्यांच्या संपूर्ण जीवनावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची विशेष छाप असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. आपल्या भाषणात त्यांनी अत्यंत प्रभावी शब्दांत म्हटलं....
“अंधेरे के साथ मैं दिन-रात लड़ती हूँ…
माँ हूँ… अफसर हूँ…
मैं सावित्री की बेटी हूँ…”
तसेच त्या अभिमानाने म्हणाल्या की, “मला सावित्रीची लेक म्हणवून घ्यायला अतिशय अभिमान वाटतो.”
राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्कार वितरण अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह, प्रा डॉ संजय चौधरी, यांच्या हस्ते झाले
यावेळी गावगाडा पुरस्कार कमिटी चेअध्यक्ष सोमनाथ टाकले ,डॉ जनार्दन भोसले, श्री दत्तात्रय पिसाळ, बाबुराव इंगळे, रवींद्र रायकर, सोनाली गरुड उपस्थित होते.
राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्काराचे वितरण खालील प्रमाणे
आकुबा आणि इतर कथा. लेखक आयु विलास खरात यांच्या कथा संग्रहास
तसेच
भालचंद्र नेमाडे साहित्य विचार आणि कादंबऱ्या
डॉ.देवानंद सोनटक्के यांच्या समक्षी ग्रंथासाठी
मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कार
आतली कवाडं, कवी. मिथुन चंद्र चौधरी यांच्या कविता संग्रह
तसेच
पुसट सावल्या गडद काळ ,
कवयित्री संध्या लगड यांच्या कविता संग्रह
मातोश्री.रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृती पुरस्कार
पीळ, लेखक दिवाकर कृष्ण आचार्य यांच्या कादंबरीस
तसेच
नाथ मंदिरांतील दिवस, लेखक मुकूंदराज कुलकर्णी.याच्या ललितलेखनास
आणि
सणोत्सव, कवी विलास सिदंगीकर
याच्या बालकविता संग्रहास
लव इज लव, लेखिका आशा नेगी पुणे यांच्या कादंबरीस
मातोश्री चांगुणा बाई सिद्राम इंगळे स्मृती पुरस्कार
आस्वाद साहित्याचा, लेखक प्रा.भास्कर बंगाळे.पंढरपुर यांच्या समीक्षा ग्रंथास
तसेच
संपादन ग्रंथ हा पुरस्कार विभागून दिला जात आहे
सोलापूरची काव्यप्रभा, लेखिका वंदना कुलकर्णी.सोलापूर
ढोर. समाज आणि समाजाचे शिल्पकार, लेखक रमाकांत नारायणे. मुंबई
या पुरस्काराचे स्वरूप शाल स्मृतिचिन्ह ग्रंथ रोख रक्कम असे होते.
यावेळी गावगाडा पुरस्कार कमिटी चेअध्यक्ष सोमनाथ टाकले ,डॉ जनार्दन भोसले, श्री दत्तात्रय पिसाळ, बाबुराव इंगळे, रवींद्र रायकर, सोनाली गरुड, योगीराज वाघमारे. सुहास घुमरे प्रा. डॉ. संजय चौधरी . प्रा डॉ मच्छिंद्र नांगरे . प्रा डॉ संतोष साळुंखे. श्रीकृष्ण जगदाळे .प्रा हरिश्चंद्र साळुंके.प्रज्ञा दीक्षित .लक्ष्मण जगदाळे गुरुजी राहुल खरात व त्यांची टिम सुरुवातीला गझल कार्यक्रम झाला
प्रास्ताविक सोमनाथ टकले यांनी केले तर सूत्रसंचालन सुहास घुमरे आणि स्मिता कुलकर्णी यांनी केले आभार योगीराज वाघमारे यांनी मानले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातून साहिती,वाचक, पुरस्कारती उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा