शब्दशिल्प/नागपूर_जवाहर योग साधना व आरोग्य केंद्र नंदनवन 58 वर्धापन दिन व योग तज्ञ डॉ विठ्ठलराव जीभकाटे यांच्या 98 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या योग संस्कार शिबिराचा समारोप कार्यक्रम
स्थानिक नंदनवन नागपूर येथे जवाहर योग साधना व आरोग्य केंद्र नंदनवनच 26 वा वर्धापन दिन व योग तज्ञ डॉ विठ्ठलराव जीभकाटे यांच्या 98 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सात दिवसीय योग संस्कार शिबिराचे उद्घाटन माननीय शेखरजी सावरबांधे अध्यक्ष जवाहर विद्यार्थी गृह तथा माजी महापौर नागपूर यांच्या हस्ते तसेच ॲड .जनार्दन गायधने यांच्या अध्यक्षतेखाली व योग तज्ञ डॉ.विठ्ठलराव जीभकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले .
सात दिवसीय योग शिबिरात दररोज विविध विषयांवर डॉक्टर व योग तज्ञांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक क्रिया करून घेतल्या. यामध्ये प्रा. मीना देशमुख ,योग शिक्षक पंकज बांते ,डॉ. पियुष नाशिककर, डॉ. संजय खोंडे ,डॉ. जीवेश पंचभाई, योगाचार्य गंगाधर पोडल्लीवार ,डॉ. स्वप्नील कळमकर ,डॉ मिताली कळमकर ,डॉ. धनंजय शेंद्रे यांनी तणावमुक्त जीवनात शरीराने मनाने स्वस्त जीवन जगण्यासाठी योगाभ्यास प्राणायाम ध्यान मुद्रा शुद्धिक्रिया करून घेतल्यात.
समारोपीय कार्यक्रमात 26 व्या वर्धापन दिनाचा अहवाल वाचन माननीय कमलाकर हटवार यांनी केले. ॲड गायधने यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र दिन, कामगार दिन ,बौद्ध पौर्णिमा लक्षात घेऊन या सर्व विषया वर प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉ रमेश पिसे ,विश्वस्त जवाहर विद्यार्थी गृह यांनी मार्गदर्शन केले व या कार्यक्रमाला पतंजली योग समिती महाराष्ट्र राज्याचे प्रसार प्रमुख डॉ जीवेश पंचभाई ,डॉ. अविनाश कोकाटे ,अध्यक्ष भारत स्वाभिमान, श्री लोकेश भुरे साहेब ,विश्वस्त जवाहर विद्यार्थी गृह ,कोरडे साहेब ,वर्षभर योग सेवा रुजू करणारे योगशिक्षक शंकर ढबाले ,भरत मुंडले, विनायक गोरले ,सोमराज बोपचे, चंद्रकांत हेडाऊ ,रजनी वंजारी यांनी तन मन धनाने उत्तम सहकार्य केले .तसेच कार्यक्रमाला श्री कावडे ,पटकोटवार, वासमवार ,कपिल नारनवरे ,येळणे साहेब, सौ मार्कंडे ताई ,राठोड ताई, मोटघरे मॅडम ,डॉ. चंदनखेडे ,श्री वसंत शेंणवरे व सर्व योग बंधू भगिनींनी उत्तम सहकार्य केले
या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन घनश्याम कातोरे गुरुजी योग मार्गदर्शक, आणि आभार प्रदर्शन विजय लांबट यांनी केले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या राष्ट्र गानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा