शब्दशिल्प/पुणे-तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार. बी. गुजर प्रशालेतील वाणिज्य विभागाचे प्रा. कुंडलिक कदम यांनी पुस्तक वाचनाचा एक वेगळा छंद जोपासला आहे. ते पुस्तक वाचल्यावर प्रत्येक पुस्तकाचा पन्नास ओळीत परिचय लिहित असतात.
तो परिचय ते फेसबुक वरील वाचनसाखळी या समूहावर टाकत असतात. वाचनचळवळ वाढावी यासाठी तो समूह चालवला जातो. विशेष म्हणजे या समूहाची सभासद संख्या अठरा हजार इतकी आहे.
या समूहाच्या मुख्य संयोजिका प्रतिभा लोखंडे (नागपूर ) येथील आहेत.
या समूहावर लिहलेला पुस्तक परिचय प्रत्येक महिन्याला वाचला जातो. त्यातून तीन उत्कृष्ट परिचय निवडले जातात. उत्कृष्ट परिचय करून दिलेल्या वाचकाला दर महिन्याला एक प्रमाणपत्र व पुस्तक भेट दिले जाते. विशेष म्हणजे पुस्तक परिचय वाचून त्या पोस्टवर चांगली कॉमेंटस लिहणाऱ्या व्यक्तीलाही एक प्रमाणपत्र आणि पुस्तक भेट दिले जाते..
या समूहावर शंभर पुस्तके वाचून त्याचा किमान पन्नास ओळीत परिचय करून दिल्यावर त्या वाचकाला वाचनयात्री पुरस्कार, दोनशे पुस्तक परिचय लिहिल्यावर वाचनश्री पुरस्कार दिला जातो.
प्रा कुंडलिक कदम यांना हे दोन्ही पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी आतापर्यंत २६७ पुस्तकांचे परिचय लेखन केले आहे.
कथा, कादंबरी, ललित, काव्य, आत्मचरित्र् , बाल साहित्य ,माहितीपर , अनुवादित , समीक्षा अशा वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन त्यांनी केले आहे.
प्रा. कुंडलिक कदम हे स्वतः लेखक आहे वाचकही आहेत. त्यांची शिदोरी, लग्नाचा बार, समासातल्या नोंदी ही पुस्तके प्रकाशित आहेत.
साहित्यचळवळ याविषयी त्यांना खूप आपुलकी आहे.
या दोनशे २६७ पुस्तक परिचयात नव्या जुन्या पुस्तकांचे वाचन केले आहे.
विशेषता त्यांनी नवीन लेखन करणाऱ्या अनेक लेखकांच्या पुस्तकाबद्दल यात लिहले आहे. महाराष्ट्र राज्यातून अनेक नवोदित लेखक आवर्जून त्यांच्याकडे पुस्तक परिचय करण्यासाठी पाठवत आहेत. वाचनसाखळी समूहाचे अठरा हजार सभासद असल्याने नवीन लेखकांचे पुस्तक अनेक वाचकांपर्यंत सहजपणे पोहचत असते.
पुस्तक परिचय लिहताना पुस्तकातील सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी यावर ते प्रामुख्याने लिहतात.
नवीन लेखकांना प्रेरणा मिळावी, लिहिते हात अधिक लिहिते व्हावे यासाठी ते आनंदाने हे काम करत आहेत.
प्रा. कदम नवीन लेखकांनी जे लिहले आहे, त्यातल्या चांगल्या बाबी काढून त्याबद्दल आपल्या पुस्तक परिचयात लिहीत असतात.
त्यांना अधिक लेखणासाठी प्रोत्साहन देतात.
या समूहामुळे त्यांचे वाचन तर वाढले आहेच त्याचबरोबर ते महाराष्ट्रातील अनेक लेखक, कवी यांच्याशी जोडले गेले आहेत.
नवोदित लेखकांच्या पुस्तकांचा परिचय केल्यावर त्यांना होणारा आनंद खूप वेगळा असतो. त्यांना लिखाणाला अधिक ऊर्जा मिळत असते.
त्त्यांची पुस्तक परिचय लिहण्याची एक वेगळी शैली असल्याने त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहण्याची संधी मिळाली आहे.त्यांनी अनेक नवोदित लेखकांना लिहण्याची प्रेरणा दिली आहे. त्यांच्या प्रेरणेमुळे अनेक लिहिते हात निर्माण झाले आहे.
त्यांच्या एका विध्यार्थिनीचा एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.
प्रा. कदम हे महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण या संस्थेचे माजी कार्याध्यक्ष आहेत. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शिरूर या संस्थेचे ते कार्यकारणी सदस्य आहेत.
त्या माध्यमातून साहित्यविषयक कार्यक्रम घेण्यात ते नेहमी अग्रेसर असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कार मिळाले आहेत. वाचनसाखळी समूहाचे ते उपाध्यक्ष आहेत.
दरवर्षी ते जागतिक पुस्तक दिनानिमित्त समाजातील एका आगळ्या वेगळ्या वाचकाचा( व्यावसायिक, शेतकरी, कामगार, शेतमजूर )सन्मान करत असतात. समाजात वाचनसंस्कृती रुजावी यासाठी गेली दहा वर्षे ते हा उपक्रम राबवित आहेत.
समाजात वाचनसंस्कृती वाढावी यासाठी ते नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमात पुस्तक भेट देत असतात. आतापर्यंत त्यांनी जवळपास सहाशे पुस्तके भेट दिली आहेत.
वाचनसंस्कृतीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपल्या गाडीच्या पाठीमागील काचेच्या भागावर जीवनातील अंधकार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे वाचन.. स्वामी विवेकानंद यांचे विचार लिहिले आहे.
मोबाईलसंस्कृती यामुळे लोक पुस्तकापासून दूर जात आहेत. पुस्तक वाचन यामुळे आपल्या अनुभवाच्या कार्यकक्षा वाढतात, समाजाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होत असतो.यासाठी वाचन गरजेचे आहे असं त्यांना वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा