मंगळवार, २१ एप्रिल, २०२६

मी "वसुंधरा" माझी एकच हाक "सुंदर पर्यावरणाचा" धरा ध्यास


     सूर्यमालेतील सर्वात सुंदर ग्रह म्हणजे आपली पृथ्वी. निळ्याशार रंगानी नटलेली, सजलेली वसुंधरा. पृथ्वीवर जिवसृष्टी सजीव संभव आहे. पृथ्वीला अनेकशा सुंदर नावांनी संबोधल्या जाते. पृथ्वी, अवनी, वसुंधरा, वसुधा ई. मनुष्य जीवन जगण्यासाठी पृथ्वीवर पर्याप्त सर्व साधनांची पुरेपूर उपलब्धता आहे. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. आपणा सर्वांची हीं जबाबदारी आहे की आपण पृथ्वीची काळजी घेतली पाहिजे. 

आणि पृथ्वीला सर्वतोपरी सुरक्षित ठेवले पाहिजे. 

     जोपर्यंत मोठ्या प्रमाणात झाडे लावणार नाही तोपर्यंत वसुंधरा हिरवा शालू नेसलेली दिसणार नाही. झाडे आपल्याला ऑक्सिजन म्हणजे मोफत  श्वासरुपी जगणे देत असतात. अगदी विनामूल्य. आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरात आपल्या घराच्या सभोवताली झाडे लावावी. जेणेकरून आपल्याला शुद्ध हवा मिळू शकेल. जर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असेल तर वसुंधरेच्या संरक्षणाची व संवर्धनाची समस्याही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून सुंदर आणि स्वच्छ पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी आपणच वसुंधरेच्या संरक्षणाची व संवर्धनाची जबाबदारी घेतली पाहिजे. 



     समुद्र किनारी केला जाणारा कचरा, मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, घाण, हे सर्व दूषित घटक पाण्याला आणि परिसराला दूषित करण्याचे काम करीत आहेत. म्हणून मोठ्या प्रमाणात जमा होणारा कचरा विशिष्ट ठिकाणी जमा करुन त्याची योग्य ती व्हिलेवाट लावणे महत्वाचे आहे. जेणेकरून हवा, परिसर, पर्यावरण दूषित होणार नाही. प्रदूषण रोखून वसुंधरेचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. प्रदूषणामुळे जीवनमानावर वाईट परिणाम होताना दिसून येत आहेत. 

     22 एप्रिल या दिवशी "जागतिक वसुंधरा दिन" साजरा केला जातो. याचे कारण, या दिवसाचे महत्व लोकांना कळावे आणि सर्व प्रकारची अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवून "वसुंधरा संवर्धन व संरक्षण" याचे महत्व पटवून सांगून जनजागृती केली जाते. पण, तरीही आज माणुस आपले राहणीमान, पैसा, नोकरी यातच गुरफटलेला आहे. यात मानवाने हे मात्र नक्कीच विसरत आहे की, "वसुंधरेचे संवर्धन आणि संरक्षण" ही माझी स्व-जबाबदारी आहे. खरे तर मानवाने सृष्टीचे रुपच बदलून टाकले आहे. 

     मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रदूषणाचा फास वसुंधरेच्या गळ्याभोवती आवळताना दिसतो आहे. त्याच बरोबर दूषित पाणी, प्रदुषणामुळे दूषित हवा, दूषित हवेमुळे, पाण्यामुळे रोगराई, आजार या सर्व गोष्टी अन्न साखळीसारख्या एकमेकांवर अवलंबून आहेत. या सर्व गोष्टींचा एक एक थर जर आपण नष्ट केला तर वसुंधरेचे संरक्षण व संवर्धन होण्यास वा करण्यास नक्कीच लाख मोलाची मदत होईल. 

     वसुंधरेचा ऱ्हास ही येणाऱ्या काळाची जीवघेणी समस्या ठरायला किंचितही वेळ लागणार नाही. हे आपण विसरता कामा नये. म्हणून मोठ्या प्रमाणात झाडे लावुन सुंदर वसुंधरेचे संरक्षण करणे ही सर्वस्वी आपली (मनुष्याची) जबाबदारी आहे. पर्यावरण विषयक समस्यांबद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण करण्यासाठी 22 एप्रिल रोजी "जागतिक वसुंधरा दिन" साजरा केला जातो. वसुंधरा संवर्धन या संदर्भात ज्या ज्या संस्था कार्यरत आहेत त्या संस्थांना पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवून पृथ्वीचे संवर्धन या महत्वाच्या विषयावर लक्ष केंद्रीत करुन प्रोत्साहीत केले जाते. वाढते प्रदूषण, वृक्षतोड, दूषित हवामान या गोष्टींना वेळीच आवर घालून पृथ्वीचे नैसर्गिक सौन्दर्य टिकवून ठेवणे ही सर्वस्वी मानवाचीच जबाबदारी आहे. 



सौ. मनीषा सोन्नेकर/सोनकांबळे 

देगलूर. 9960028899

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...