शब्दशिल्प/वर्धा_ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दूरगडा वर्ग पाचवीचा निरोप समारंभ संपन्न झाला.
अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दूरगडाचे मुख्याध्यापक प्रशांत ढोले होते.
जिल्हा परिषद दुरगडा शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत ढोले आपल्या भाषणात त्यांनी उदगार काढले... "विद्यार्थी यांनी आपली ऊर्जा भारत राष्ट्र निर्माण करण्यासाठी वापरावी. विद्यार्थी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श ठेऊन त्यांचे प्रमाणे अभ्यास करावा. आपले ध्येय गाठावे ".
वर्षभर झालेल्या स्पर्धेत हस्ताक्षर स्पर्धा यात प्रथम क्रमांक समृद्धी अमित मून,दुसरा क्रमांक दीपाली दिनेश तिवाडे, तिसरा क्रमांक अनन्या लक्ष्मण नखाते, जिज्ञासा सुशील वानखेडे, तसेच सामान्य ज्ञान स्पर्धा यात प्रथम क्रमांक आयुष नितेश मून, दुसरा क्रमांक नैतिक अरुण रागीट, तिसरा क्रमांक अनमोल रितेश वानखेडे, आईशा रुपेश मून यांनी पटकाविला. सामान्य ज्ञान स्पर्धा (गट मोठा )प्रथम क्रमांक समृद्धी अमित मून, दुसरा क्रमांक आरुषी रोमहर्ष भटकर, तिसरा क्रमांक तेजस्विनी संदेश मरघाडे, वर्ग चौथा प्रथम क्रमांक समय किशोर तेलंगे, दुसरा क्रमांक आयुष प्रफुल्ल मेश्राम तिसरा क्रमांक कपिल प्रमोद चिकराम यांनी यश संपादन केले.
नवोदय विद्यालय परीक्षेत प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल समृद्धी अमित मून, आईशा रुपेश मून यांचा सम्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. वर्ग पाचवीचे विद्यार्थी यांना भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.आईशा मून, समृद्धी मून, तेजस्विनी मरघाडे या विद्यार्थीनीनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन शाळेतील सहायक शिक्षिका पद्मा नाखले मॅडम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमा मून, सुभद्रा मून, पंचाबाई येलेगामा यांनी मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा