*वृक्ष*
वृक्ष माझा सांगाती
जणू माय माऊली
वृक्ष माझा मित्र
करी शांत जीवाची काहिली ll 1ll
वृक्षाशी माझी दोस्ती
वृक्ष माझा सोबती
देई प्राणवायू सजीवासी
म्हणूनच श्वास चाले दिन राती ll 2ll
वृक्ष माझा आसरा
वृक्ष माझा रखवाला
लाकूड फाटा देऊन
मदत करी घर बांधण्याला ll 3ll
वृक्ष माझा पोशीन्दा
वृक्ष माझा अन्नदाता
देई पाने- फुले फळे
पोषण करी जशी माता ll 4ll
वृक्ष माझा सोयरा
वृक्ष माझा सगा
अमृतजल संजीवन
जगवी मानवी जगा ll 5ll
वृक्ष माझ्या जन्माचा सारथी
वृक्ष माझा अंतीचा सोबती
निद्रा घेतो मी शेवटची
त्याच्याच तिरडी वरती ll 6ll
कवयित्री *अस्मिता राहुल बागडे नागपूर*
9422492383
≠==≠=========
*चिऊची व्यथा*
एकवेळ चिऊताई
भितभीतच वदली
तक्रारीच्या आवाजात
तिची गाथाच मांडली...ll१ll
घर तुमचं सुंदर
अंगणही किती छान
वृक्ष नाही डौलदार
छायेचा पडला वान..ll२ll
इवलसं बाळ माझं
आता कुठे राहणार
घरासाठी जागा नाही
त्याला कसं कळणार ..ll ३ll
एक झाड डेरेदार
लाव तुझ्या अंगणात
माझंही घर होईल
राहील मी गं आनंदात...ll ४ll
ऐकना ग माझे ताई
अंगणी भरव शाळा
मलाही पाहिजे बाई
मैत्रिणीचा जरा लळा..ll५ll
पाहुनी तुझा संसार
मलाही वाटतो हेवा
चिऊकाऊ हितासाठी
जीवनी असूदे ठेवा...ll६ll
सौ.अल्का फुलझेले
नागपूर
___________
सहा "क" कार तिच्यासाठीच का?
ती घरदार सांभाळते
ती नाती सांभाळते
ती जबाबदारी पार पाडते
ती कर्तव्य बजावते
तरीही उसणे बोल
का बोलावे तिला
ती चुकते आहे
असे का म्हणावे तिला
घराचा उंबरठा ओलांडून
ती नोकरी करते
बाहेरच्या जगात वावरताना
स्वतःसाठी मर्यादेची रेषा आखते
पण तिच्या अस्तित्वार
बोट का दाखवतात
घरातील लोकच
तिच्या चारित्र्यावर
शिंतोडे का उडवीतात
कुठे गेली होती, कुठे होती
सोबत कोण होतं, काय करत होती
संशयाची ही गलिच्छ प्रश्नशृंखला
गुंफली तिच्या अस्तित्वाभोवती
गुदमरते आहे ती प्रश्नांमध्ये
का? अडकवले तिला
सहा "क" कारात
जगूद्या तिलाही स्वछंदीपणे
संशयाची लाट नका उसळवू
तिच्या मनात
सौ. मनीषा सोन्नेकर / सोनकांबळे
9960028899
देगलूर. जि. नांदेड
_______
भोंदू बाबा
हाच ना भोंदू बाबा
यांच्या नादी नका लागू
बिचारा भोळ्याभाबड्या
नका विचारी बागू---१
मंत्र तंत्रांचा अड्डा
त्याचा खोल गेला
महिला युवतीला
आपल्या जाळ्यात केला---२
नको लपूस आता तु
कारणामे बाहेर येतीलच
धावून येतील कायदे
शरण तू जाशीलच---३
देव अंगात तुझ्या येतो
कोंबडे बकरे खातो
मग तू भोळ्या लोकांची
भिक कारे घेतो--४
गुज गोष्टीत अडकवून
अंगारे धुपारे अंगासी
तुझा खेळ चालू असे
त्या वेड्या जीवाशी--५
जीवाला काठीने झोडणे
वाकडे तुझे बोलणे
स्वप्न दाखवी विश्वाचे
तुझे थैया थैया नाचणे--६
शुभा थुलकर
रामटेक जिल्हा नागपूर
____________

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा