रमजानुल मुबारक 2026
रोजा नंबर 01
गुरुवार दिनांक 19-02-2026
" इस्लाम समजून घेताना "
विषय :- रोजा :- अशा रोजा ठेवणाऱ्या ची आम्हाला गरज नाही
"
छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना आदेश देतात, " मुसलमान धर्म ग्रंथ हा अस्मानी आहेत, लढतांना ज्याला सापडेल त्यांनी मस्जिदी मध्ये आणुन ठेवणं "
चंद्रकोर अर्थातच " चांदरात " म्हणजे अमावस्या च्या दुसऱ्या दिवशी बारीक - अंधुक शी आकाशात चंद्र कोर पडते त्याला चांदरात चे महत्व बघुन दुसऱ्या दिवशी रोज्या ( उपवास )ला सुरुवात झाली.
प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात, " शाबान हा माझा आवडता महिना व रमजान महिना हा अल्लाह( परमेश्वरा )चा आवडता महिना ".
प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात की, " तुम्ही चंद्रदर्शन करूनच रमजान मुबारक रोजेला सुरुवात करा व चंद्र दर्शन करूनच रोजा ची सांगता करावी. "( हादिस :- सहीह बुखारी 1906).
आजचा योगायोग म्हणजे, रयतेचे राजे छत्रपती रा. रा. शिवाजी राजे भोसले महाराज यांचा तारखे प्रमाणे जन्मदिवस.. 19 फेब्रुवारी 1630, (महाराष्ट्र शासन जन्मदिवस ) शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ माँ साहेब व शहाजी राजे भोसले या आई वडिलांच्या प्रेरणादायी आशिर्वादामुळे रायते चे राज्य स्वराज्य निर्माण केलं , छत्रपती शिवाजी महाराजा चा जन्मदिन त्यांना मानणारे मावळे दोन प्रकारे साजरा करतात, तारखे प्रमाणे व तिथीनुसार,ग्रोगेरिअन कालगनना हीं इसवी सन, जानेवारी ते डिसेंबर प्रमाणे बारा महिन्याची असते त्यालाच तारखे प्रमाणे म्हणून संबोधतात व तिथीनुसार जसे आपण कालच पहिले की, सौर आणि चंद्र वर्ष या कालगनना. या सूर्य व चंद्र वेळेच्या फरकानुसार असतात, सूर्य व चंद्र कालगन्णा वर्षामध्ये जवळ 10-11 दिवसांचा फरक होत असतो. हिंदू मधील सौर कालगनणे तील जो 10-11 दिवसाचा फरक होत असतो ती तफावत भरून काढण्यासाठी भारतीय पंचांग तज्ञान्नी त्यामध्ये संशोधन करून प्रत्येक तीन (3) वर्षात "अधिक " मासाची योजना केली आहेत : ,त्याला खेडुत भाषेत" पित्तरपाठ महिना " संबोधित करतात. हिंदू कालगनणा नुसार नवीन वर्ष हें गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्त वर म्हणजेच चैत्र शुद्ध 1, ला सुरू होतं.
आज इसवी तारीख 19 - फेब्रुवारी 2026 व हिंदू तारखे प्रमाणे फाल्गुनी श- 02 आहेत, व इस्लामी तारखे प्रमाणे 9 वा महिना शव्वाल 1447 चा पहिला दिवस अर्थात बोली भाषेत पहिला रमजान..उपवासाचा महिना.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जन्मदिन हा फाल्गुनी वदय तृतीया शके 1551 आहेत, मावळे दोन्हीही तारखेनुसार मोठया उत्साहनें साजरा करतात. ते एक महान रायते चे राजे युगपुरुष होतें, छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रेमा पोटी त्यांना मानणारे अनुयायी आप आपल्या पद्धतीने त्यांचा जन्मदिवस" शिव जयंती " म्हणून साजरी करत असतात.
छत्रपती शिवाजी महाराजानी आपल्या मावळेनां फर्मान काढले होतें की," युद्ध करतांना अगर कोणाला मुसलमान धर्माचे ग्रंथ कुरआन सापडले तर मस्जिदी मध्ये आणुन द्या.. कुरआन हें ईश्वरी ग्रंथ आहे" म्हणून खास सांगितले.
रायते चे राजे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या सैनिका मध्ये अठरा पगड जातींचे मावळे होतें.. त्यामध्ये खास विशेष सैनिकांत मुस्लिम मावळे हीं होतें.
शाहीर -महाकावी वामनदादा कर्डक यांनी आपल्या एका पोवाडा मध्ये, " शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण!
आनंदाने नांदत होतें हिंदू मुसलमानं!! धृ!!.
काळ्या रात्रीं तळपत होतं जिंच्या रूपाच उन,
अशी देखणी होती एका मुसलमानाची सुनं,
त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवानं !! 1!!.
बांधित होता मस्जिद इथे आन तिथे मंदिर,
त्या शिवरायाच्या चरणी झुकते सदैव माझे शरीर,
अशा नराच्या पुतळ्या पाशी आजून झुकते मान!! 2 !!,
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक किल्ल्यावर मुस्लिम मावळ्यांना प्रार्थना करण्यासाठी मस्जिदी बांधून दिल्या.
यावरूनच महाकावी वामनदादा नीं किती हृदयातुन हा पोवाडा रचला असेल... ते पुन्हा सांगतात की,
असाच माझा शिवबा होता माणुसकीची खान !! 3 !!.
प्रेषित मुहम्मद स्व. यांचे मित्र ( सहाबा ) अब्दुल्लाह बिन उमर रजि. सांगतात की, आम्हाला प्रेषितानी सांगितलं की, तुम्ही चंद्रदर्शन( चंद्रकोर )बघूनच दुसऱ्या दिवशी रोजा ( उपवास ) ठेवा, ( सहीह बुखारी 1906).
चंद्रकोर दर्शन करून त्याची सत्यता पडताळून मनोभावे
दुसऱ्या दिवशी " रोजा ", बोली भाषेत' उपवास " म्हणतात. प्रत्येक धर्मात उपवास ठेवण्याची प्रथा आहेत, पद्धती वेगवेगळ्या आहेत, हिंदूत प्रत्येक महिन्यात येणारे " एकादशी, द्वादशी, चतुर्थी, शिवरात्र यामध्ये हिंदू बंधू- बघीनी उपवास ठेवतात, जैन धर्मात" पर्युषन पर्व " म्हणून फारच कडक उपवास असतात तसेच ख्रिस्थन मध्ये ही चाळीस दिवसाचे उपवास असतात परुंतु उपवास ठेवणे व त्याचीच सांगता करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या. जगात एक ही धर्म असा बाकी नाहीं की उपवास नाहींत.
रमजान तील '' रम्ज " या शब्दाचा सरळ अर्थ हा " जळणं "होतो. असंच संपूर्ण महिन्यात रमजान च्या रोजा हा आपल्या शारीरिक -मानसिक - व्यवसायिक - वैचारिक गोष्टी ला मनापासून जळणं यालाच रोजा म्हणतात..
या रमजान पर्वात रोज सकाळी भोर पहाटे 5:00 वाजता उठून अन्न ग्रहण ( सेहरी ) करून दिवस भर अन्न पाण्या शिवाय निरंकार राहून संध्याकाळी 6:41 मिनिटापर्यंत( इफ्तार )उपाशी राहनं म्हणजेच रोजा ठेवणं, धरणं, पकडणं.
फक्त्त उपाशीच राहणं नव्व्हे, आपल्या सर्व वाईट सवयी,भावना, विचार, आचार, विकृती, शिवी शाप, शपथ, हो आपल्या व्यसनांना आवर घालणे सुद्धा, या सर्व गोष्टीना आवर घालणे व आपल्या मनातील सर्व वाईट गोष्टीच्या विचारांना जाळून टाकणं, आपल्या मनातील राग, मत्सर, अतिशय क्रोध, लोभ जाळून टाकणे. चोरी करणं, दुसऱ्याला त्रास होईल असे कृत करणं, शिव्या शाप देणे, कोणी लज्जीत होईल अशी कृत्य करणं,
सिगारेट, दारू, अफू, चरस, गांजा ची व्यसणं रोजा च्या माद्यमातून सोडवणं, आपल्या प्रत्येक वाईट सवयी विकृती, तसेच मनातील सर्व भावना जळमट या रामजानुल मुबारक च्या पवित्र राजा च्या सुवर्ण संधीचा फायदा उचलून चांगल्या सवयी मध्ये संगोपन, संवर्धन करणं याला च रोजा ठेवणं, तरच रोजा ठेवण्याला अर्थ. तसेच रोजा ठेवून दगाबाजी,चोरी करणं, खोटे बोलणं, हें अल्लाह ( परमेश्वर )ला मान्यच नाहीं. म्हणून,
पवित्र कुर आन मध्ये अल्लाह सांगतात, "फक्त्त उपाशी राहणं अल्लाहला पसंत च नाहीं " (सुरह नं. 02 अल - बकराह ).
प्रेषित मुहम्मद स्व. चे मित्र सहाबा अबू हुरेरा रजि. सांगतात, आम्हाला प्रेषित मुहम्मद स्व. नीं सांगितलं की, " जो रोजे ठेवून खोटे बोलेल, दगाबाजी करतात,अशा रोजा ठेवणाऱ्यांची आम्हाला अजिबात गरज नाहीं ( सहीह बुखारी 2903).
( मित्रांनो लेख आवडल्यास आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा व आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा )
लेखक :- डॉ. सलीम साईदा सिकंदर शेख
बैतुशशिफा मल्टिस्पेशालिटी दवाखाना.
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर
Mobile no. 9271640015
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा