शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५

अमर आहे-शफी बोल्डेकर

 अमर आहे.






भेदभाव या भूमीवरती 

खोटे धर्म धूर्ताची चलती 

सागरावरूनी अरबी घोडे 

दौडत आली भारताकडे 

समतेची प्रिय लहर आहे 

मुसलमान समर आहे


खोटा धर्म सोडा रे आता 

खर्‍या धर्माच्या मारू बाता 

कुराण दिले सर्वांच्या हाती 

देव भेटला फुगली छाती 

अल्ला तो एक ईश्वर आहे 

मुसलमान अमर आहे


दिल्लीची तखते सजवली

 चळवळ सुफीची हिंदवली 

गोरगरिबाला दिला न्याय

इस्लाम ठरला दुधाची साय

खवय्याला आता  बहर आहे

मुसलमान समर आहे


चोहीकडे हिंदुस्थान नाव 

इंग्रजाचा ओळखला डाव 

बोला इन्कलाब जिंदाबाद 

देश केला आम्ही आझाद 

शहिदांचा हा गजर आहे

मुसलमान अमर आहे


लोकशाही संविधानासाठी 

सर्वदा उभा सत्याच्या पाठी

मुस्लिमांचे भलेपण पहा 

तत्पर संकटमोचक हा

हिरवळीला का मर आहे !

मुसलमान अमर आहे 

मुसलमान समर आहे


   शफी बोल्डेकर, 

संस्थापक, ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था.

 बोलडा, ता.कळमनुरी, जि.हिंगोली.

मोबाईल ७७९८९६७७९३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...