शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५

जाग मायदेशा- कृष्णा कुंभारे


 

 जाग मायदेशा

मायदेशी  गरिबांचा
आज समर्पणी भाव
स्वदेशीचे बोके बुवा 
मारे लोण्यावरी ताव !

मतदानी शिंक्यावरी
नाही उरला भरोसा 
प्रामाणिक मतदाता
तारे मोजतो दिवसा !

गरिबांच्या छातीवरी
बार बंदुकीचा फुटे
आसनात  बसलेले 
मस्त स्वराज्याले लुटे!

स्वदेशीच्या घामावरी
यांना सुरक्षेचा ताफा
फक्त ओठातून काढी
सदा चहाच्या तो वाफा!

जनतेच्या  करांवरी
चाक स्वदेशाचे फिरे 
लोकशाही शिरावरी 
वाटे लोक नेता मिरे!

मायदेशा मतदानी 
लावू चोरट्यांची वाट
धर्म जाती पेटवून \
वाहे रूधिरांचे पाट!

आज बेगडी सेवक
चाटे श्रीमंतीचे पाय
नाही जनतेची चिंता 
देशी अंधारी सकाळ!

- कृष्णा कुंभारे
वरुड, जि. अमरावती
----------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...