शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५

अभिषेक- कलाम अहमद खान



अभिषेक


नसावे उजाळ वाळवंट 

अशा तुझ्या कपाळावर 

पेरली आहेत काटेरी झुडपं.


डोळे आसवे गाळतात या आशेने 

अश्रुंची फुले होतील 

टवटवीत गालांनाही वाटतं 

ते ओठ ही फुले टिपतील. 

तुझ्या हातांचं नशीब-

खरकटी उरकताना जख्माळतील 

त्यांच्या हातांचं नशीब-

तुझ्या छातीवर  पहाड फोडतील. 


अवसप्यालेल्या तुझ्या आभाळावर 

कुंकवाचा चंद्र त्यांनी उगवूच दिला नाही 

कुंवारपणाचा अभिषेक करून 

त्यांनी तुला गर्भार केलं 

हे सांगशील काय याच गर्भाला 

परतीच्या वाटा न विसरता 

पिसाटांचे चक्रव्यूह भेदणार्‍या अभिमन्यूला.


अशी रडत बसू नकोस

सीता-द्रोपदीसारखी

तू फुलन होऊन दाखव

किंवा हो तस्लिमा नसरीन

नराधमांच्या लिंगांना छाटणारी संगीन!


- कलाम अहमद खान,नागपूर

मो.९६५७३४७६८८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...