शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५

गीतकार हसरत जयपुरी - कलाम अहमद खान

 गीतकार हसरत जयपुरी

(१८ सप्टे. : जयंती विशेष )



स्वभावाने प्रेमळ,मनमिळावू, मितभाषी अशा हसरतजींना सुंदर तरुण मुली खूपच आवडायच्या. बसमध्ये ते तिकीट वाटताना सुंदर ललनांवर भाळून जायचे-फिदा व्हायचे. पण त्यांची दृष्टी आंबटशौकिनांसारखी अपवित्र नव्हतीच तर सौंदयान्वेषी गीतकाराची होती. कित्येकदा हसरतजी बसमधील सुंदर महिला प्रवाशांकडून  तिकिटांचे पैसे घेत नसत. याबद्दल ते मनमोकळेपणाने सांगत की ‘या सुंदर नवयौवनांमुळेच मला रोमॅन्टीक गीत लिहण्याची प्रेरणा मिळते. या गीताचे मूल्य तिकिटांच्या पैशापेक्षा लाखपटीने जास्त आहे!

‘चोरी चोरी’ चित्रपटातील ‘पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में, आजा सनम मधुर चांदनी में हम,‘संगम’ चित्रपटातील ‘बोल राधा बोल संगम होगा के नही’,‘ये मेरा प्रेम पत्र पढकर तुम नाराज ना होना’ ‘गीत’ चित्रपटातील   ‘जिसके सपने हमें रोज आते रहे’ आणि ‘हरियाली और रास्ता चित्रपटातील ‘अल्ला जाने क्या होगा आगे’ अशी एकापेक्षा एक सरस, सुश्राव्य रोमॅन्टीक गीत लिहणारे हसरत जयपुरी आर्त हृदयातून निघालेल्या भावनांना शब्दबद्ध करणारी उत्कट गीते लिहतात. शंकर-जयकिशन यांनी संगीत दिलेल्या ‘मेरे हुजूर’ मधील ‘गम उठाने के लिए मै तो जिए जाऊंगा, गर तुम भुला ना दोगे(यकीन),उनके खयाल आए तो आते चले गए (लाल पथ्थर),तकदीर का फसाना जाकर किसे सुनाए (सेहरा), ये आसू मेरे दिल की जुबान है     (हमराही) ही सारी गीते अशीच भावपूर्ण व अविस्मरणीय आहेत. त्याचप्रमाणे ‘श्री ४२०’ चित्रपटातील ‘ईचक दाना बिचक दाना दाने उपर दाना’ हे खट्याळ बालगीतही अवतरले ते हसरतजींच्याच लेखणीतून. 

अशा या गीतकाराचा जन्म जयपूर येथे १५ एप्रिल १९२२ रोजी झाला. हसरत जयपुरीचें नाव इकबाल हुसेन. १९४० च्या जवळपास हसरत मुंबईला आले आणि संघर्ष करता करता बस कन्डक्टर म्हणून नोकरीला लागले. स्वभावाने प्रेमळ,मनमिळावू, मितभाषी अशा हसरतजींना सुंदर तरुण मुली खूपच आवडायच्या. बसमध्ये ते तिकीट वाटताना सुंदर ललनांवर भाळून जायचे-फिदा व्हायचे. पण त्यांची दृष्टी आंबटशौकिनांसारखी अपवित्र नव्हतीच तर सौंदयान्वेषी गीतकाराची होती. कित्येकदा हसरतजी बसमधील सुंदर महिला प्रवाशांकडून तिकिटांचे पैसे घेत नसत. याबद्दल ते मनमोकळेपणाने सांगत की ‘या सुंदर नवयौवनांमुळेच मला रोमॅन्टीक गीत लिहण्याची प्रेरणा मिळते. या गीताचे मूल्य तिकिटांच्या पैशापेक्षा लाखपटीने जास्त आहे! त्या मला गीत लिहण्याची प्रेरणा देतात म्हणून मी त्यांचे तिकिटांचे पैसे त्यांच्यावरून ओवाळून टाकतो. 

हसरतजींचे चित्रपट क्षेत्रातील आगमनही मोठे मजेदार, आश्चर्यजनक आहे. एकदा हसरतजींनी एका कविसंमेलनात ‘मजदूर की लाश’ ही कविता सादर केली. ही कविता श्रोत्यांसोबतच कविसंमेलनाचे प्रमुख अतिथी पृथ्विराज कपूर यांनी   तन्मयतेने श्रवण केली. या कवितेने ते फारच प्रभावित झाले आणि संमेलनानंतर हसरतजींशी स्वत: भेटून त्यांनी त्यांचे पुत्र राज कपूरशी भेटायला सांगीतले. राजकपूर त्यावेळी ‘बरसात’चित्रपटाच्या निर्मितीत व्यस्त होते. ‘पृथ्वी थिएटर’ मधील कॅन्टीनमध्ये राजने नवोदित   संगीतकार शंकर-जयकिशन यांच्याशी हसरतजींची भेट घालून दिली. परिचयाची औपचारिकता पूर्ण झाल्यावर त्यांच्या आग्रहाखातर हसरतजींनी जयपूर येथील तरुणीवर लिहिलेल्या कवितारुपी पत्राच्या काही ओळी ऐकविल्या...‘ये मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज ना होना...’ या काव्यपंक्ती ऐकल्याबरोबरच राजने हसरतजींना विनंती केली की हे गीत बनवून कुणासही देऊ नका. हे गीत मी माझ्या आगामी चित्रपटासाठी उपयोगात आणणार आहे...(पुढे राजकपूर यांनी हे गीत १९६३ मध्ये प्रदर्शित ‘संगम’ चित्रपटात राजेंद्रकुमारवर चित्रीत केले.) 

गावची सुंदर प्रेयसी शहरी प्रियकराच्या प्रतिक्षेत त्याच्या मिलनाकरिता आतूर आहे. या दृश्यावर चित्रीत ‘जिया बेकरार है छायी बहार है आजा मोरे बालमा तेरा इंतजार है’ हे गीत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केले. हे गीत फारच लोकप्रिय ठरले. हेच गीत हसरजींचे चित्रपट जीवनातील पहिले गीत होय. 

त्यानंतर राजकपूरने पुन्हा ‘चित्रपटाचा नायक फारच दु:खी आहे आणि आपल्या भावना तो गीताच्या माध्यमाने व्यक्त करू इच्छितो. या दृश्यावर दुसरे गीत लिहायला सांगीतले. हसरतजींनी आव्हान स्वीकारून अथक  परिश्रमाने ‘मै जिंदगी में हरदम रोता ही रहा हूं’  हे गीत लिहिले. या दोनही गीतांनी राजकपूर फारच खूष झाले. हसरतजींना त्यांनी आर. के. फिल्म कंपनीमध्ये स्थायी गीतकार म्हणून नियुक्त केले. त्यावेळी शंकर जयकिशन यांना ५०० रु. तर हसरतजींना ३०० रु. मासिक मानधन मिळत असे. हसरत जयपुरी यांनी कधीही कृत्रीम वाटावी अशी गीतरचना केली नाही. त्यांनी रचलेले गीत त्यांनी अनुभवलेल्या वास्तवातूनच अवतरले आहेत. हसरतजी प्रभावशाली गीतकार तर होतेच पण संवेदनशील कवीसुद्धा होते. हसरतजींना मुशायरा पेक्षा कविसंमेलनात सहभागी होणे आवडायचे. कारण मुशायरात एकमेकांवर ताशेरे ओढले जातात. शायरीच्या माध्यमाने एकमेंकांची टिंगलटवाळी करतात हेच हसरतजींना आवडत नसे.

कविसंमेलनात हा प्रकार नसतोच. हसरतजींनी भारताबाहेर कराची,लाहोर,मॅन्चेस्टर, लंडन,दोहबा,कतारसह अनेक देशातील महानगरात आपल्या लेखनीच्या बळाव्ार रसिकांची मने जिंकली. 

हसरतजी पुरस्कारांना जास्त महत्त्व देत नसत. कारण त्यांचे असे मत आहे की,‘पुरस्काराने माणूस कधीही मोठा होत नाही. पुरस्काराने कधी इतिहास घडत नसतो. इतिहास घडतो तो रसिकांच्या खर्‍या रसिकत्वाने,   स्नेहाने. रसिकांचे कलाकाराप्रति प्रेम हाच मोठा पुरस्कार होय. कारण यात घोटाळे किंवा फसवणुकीची संभावना नसतेच. रसिकांचे कलाकाराप्रति प्रेम निर्मळ-निस्वार्थ असते.’ 

हसरत जयपुरी यांना १९८८ मध्ये डॉक्टरेट पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. १९८९ मध्ये दिल्ली येथे ‘जोश मलिहाबादी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. बी. बी. सी. द्वारा १९५०ते ६० च्या दशकातील फक्त शायर मंडळींवर चित्रीत करण्यात आलेल्या वृत्तचित्रामध्ये भारतातून एकमात्र शायर हसरत जयपुरी यांनाच निवडण्यात आले. १५ एप्रिल ही हसरतजींची ८७ वी जयंती. त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली. 


- कलाम अहमद खान

२५डी,आदर्शन नगर,उमरेड मार्ग,

नागपूर

(मो. : ९६५७३४७६८८)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...