शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

रंजनासह संस्कारमुल्ये रूजविणारा ‘छान छान गाणी-साहेबराव मोरे



काव्यसंग्रह: बालमित्रांची छान छान गाणी 

कवी:प्रदीप पिंपळनेर कर

प्रकाशन: हृदय प्रकाशन, कोल्हापूर 

किंमत:१६० रु.

 रंजनासह संस्कारमुल्ये रूजविणारा ‘छान छान गाणी-साहेबराव मोरे 

प्रदिपगुरूजी पिंपळनेरकर यांनी 'बालमित्रांची छान छान गाणी' हा काव्यसंग्रह स्वतः पोहच केला. कवी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत म्हणून अध्यापनातून   बालकांच्या मनाचा वेध घेणे सहजी जमले आहे, हे सर्वच शिक्षकांना साध्य होत नाही त्यासाठी बालमनाच्या तळाशी जाऊन त्यांचे भावविश्व अलगत उलगडून फुलपाखरू होऊन बागडावं? लागत  ही? बालसुलभ किमया कवी प्रदीपगुरुजी यांच्याकडे आहे.

इ ५वी पर्यंतचे बालमन निरागस व कमालीचे चंचल असते.त्यांची  निरागसता ही निकोप, निर्मोही असते म्हणूनच 'उद् ग्े ूप ग्स्aुा दf ग्हहदमहू म्प्ग्त््' असे म्हटले जाते, हि निष्पापता ज्यांच्या ठायी असते तो विधाता म्हणजे बालक.बालमन, बालपण, समृद्ध व संपन्न करण्यास काम बालकाव्य ताकदीने करते, मात्र तेवढी कुवत व  प्रगल्भ प्रतिभेचा परमोच्च आविष्कार बिंदू साधण्याचं कसब कवीत असावं लागतं अलीकडे बालसाहित्यावर अनेक साहित्यिक लिहिताहेत तरीही बालकवी ठोंबरे नंतर हे धनुष्य कुणालाही पेलता आलेले नाही हे निर्विवाद सत्य नाकारता येणार नाही.

सदर बालकाव्य संग्रहाचे शीर्षक 'बालमित्रांची छान छान गाणी 'असा आहे.समवयस्क बालगोपालांचा गोतावळा, मैत्री  हा बालपणाचा सर्वात मोठा ठेवा असतो. मूलासोबत मूल होण अतिशय अवघड असतं, त्याच्या आकलन पातळीवर जाणं त्याहूनही कठीण.

कवी प्रदीपगुरूजींनी ही बालमित्राची भुमिका समर्थपणे साकारल्याची  अनुभूती वाचक वर्गास वाचताना येईलच .बालकांचे मन? वेधून घेणार्‍या ,बालमनाला भुरळ घालणार्‍या ६२ विविध विषयांवरील कवितांचा समावेश संग्रहात आहे.

   गाण्यातून मनोरंजन व ज्ञानातून आनंद मिळावा ह्या हेतूने प्रेरीत होउन काव्यसंग्रह प्रकाशित केला असल्याचा निर्वाळा गुरूजींनी मनोगतातून दिलेला आहे. 'पाखरांची शाळा' ही अशीच एक कविता,

'कबूतराने लिहिले 

चोचीने धडे

वाद्यांच्या तालावर 

गात होता  पाढे'

ह्या काव्यपंक्ती कल्पकतेच्या भरारीची साक्ष देतात.बालकाची जिज्ञासू वृत्ती किती प्रबळ असते हे 'खरं खरं सांगशिल कां?' ह्या  कवितेत दिसते. 

'सांग सांग सूर्योबा,

रात्रीला प्रकाश...

कधी देशील का?'

हा प्रश्न जाणकारांनाही  अचंबित करून जातो.आज ज्ञानप्रपोस्टामुळे लागणार्‍या अनेक शोधातून माणूस सूखाशीन होत चाललाय.'रोबोट' कवितेतील ओळी हेच अधोरेखित करतात,

'अवकाशात जायला

मंगळावर फिरायला 

ग्रहतारे मोजायला 

नवनवीन शोध लावायला आला नवीन माणूस 

नाव त्यांचे रोबोट'

तंत्रज्ञानाची पुसटशी ओळख करून देणार्‍या कवीच्या  हेतूची प्रशंसा अटळ ठरते.बालकवितेची भाषाशैली महत्त्वाची असते बालकांचे भावविश्व, बाल मानसशास्त्र लक्षात घेऊन बालकाव्य लिहिले तरच ते? पचनी पडते. ओढून ताणून रचलेली यमकरचना फसते. प्रदीपगुरूजींची  भाषा शब्दजंजाळात न? अडकणारी आहे.भारत सातपुते यांनी सहज सोप्या व दैनदिन  व्यवहारातील शब्द सामर्थ्याचे उचित महत्व  प्रस्तावनेत सांगितले आहे,'आईच्या कुशीत बाळ खेळावे तसे हे शब्द आहेत'.

पहिल्या काव्यसंग्रहाच्या मर्यादा नजरे आड करता येणार नाहीत. आकलनशक्तीच्या व आवाक्याबाहेरच्या दीर्घ गद्यकाव्य सदृश रचना टाळता  आल्या असत्या.   बडबड गीताचा गेयता हा मूलाधार असतो. अशा गीतांतील गेयता असणारी गाणी संग्रहाची शोभा वाढवतात.'नियम' हे गाणं आनंद देऊन संस्कार रूजविते,

'वागणूक नम्र ठेऊ या 

घराची स्वच्छता राखू या

मोठ्यांचा आदर सन्मान करू या 

नियम माझे पाळू या'

'पाणी' हे पाण्याचे महत्त्व विशद करणारे मनवेधी चाल असलेले बडबड गीतं,

'थेंब थेंब पाणी 

गोल गाऊ गाणी!

वाहत जात पाणी 

अडवू त्याला राणी!'

मोबाईलचा अतिरेकी वापर बालकांच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग बनला आहे,इडियट बॉक्सची 'स्क्रीन' समोर असल्याशिवाय ९०टक्के मुलं जेवत नाहीत. बालकांचा मोबाईल हटविणे ही पालकांची मोठी डोकेदुखी ठरली आहे.याविषयीचे वास्तव चित्रण 'मोबाईल'मध्ये ठाशीवपणे आले आहे,

'असा आमुचा नवा पाहुणा 

त्याच्याशिवाय करमत नाही 

तो संगतीला असल्याबिगर 

घरात कुणी जेवत नाही'

बालकांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी मैदानी खेळासाठी प्रवृत्त करणे हा एक प्रभावी उपाय  आहे. खेळात रूची निर्माण होईल अशा कवितांना जाणीव पूर्वक संग्रहात समाविष्ट केले आहे.

'फुलपाखरू,मी गेम खेळतो, चॅम्पियन ट्रॉफी, फू बाई, ह्या काही लक्षवेधी कवितांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त ठरते. 

'फू बाई फू झिम्मा फू

खेळतेस कां ग बॅटमिंटन

 तू....

बाई  बॅटमिंटन तू..'

अशा रंजक कविता बालमनाशी जोडल्या जातात.अलीकडचा टक्केवारीधिष्टीत बोजड बालमन कुंठित करणारा अभ्यासक्रम बालकांना पुस्तकांपासून दूर नेत आहे.याचाही विचार प्रदीपगुरूजींच्या काव्य निर्मितीत दिसून येतो.'खारुताई 'व 'बागेतील मजा'  ह्या कविता बालकांचे भावविश्व समृद्ध करणार्या आहेत.मैत्री बालमनाचा स्थायी भाव असतो सवंगडी, सांघिक खेळ, सणांच्या निमित्ताने एकत्र येणे हे दूरापास्त झाले आहे पर्याप्त एकटेपणामुळे मूलं आत्मकेंद्री बनली आहेत.

'खारुताई 'कवितेतील ही खंत मन विषण्ण करणारी आहे,'

'खारुताई खारुताई ये ना खाली 

माझ्याशी खेळायला कुणी नाही वाली!'

मनोरंजनाबरोबरच संस्कार मूल्ये रूजविणारा हा काव्यसंग्रह नक्कीच बालसाहित्य विश्वात्ा आगळीवेगळी मोहोर उमटवणारा आहे.'बाळा  जरा जपून' ही संस्कार शिदोरी असणारी कसदार कविता याची पुष्टी देणारी आहे. 

'शाळेतून आल्यावर 

हातपाय धुवून

सांजवात लावून 

अभ्यास करीत जा.'

देशभक्ती, समानता, भूतदया, स्नेहभाव, बंधुता, मैत्री, श्रमप्रतिष्ठा ही जीवनमूल्ये सर्व कवितांमधून जाणवतात.

प्रदीपगुरूजींनी मानवता बूक फाऊंडेशन च्या  वतीने जि. प. शाळेला विनामूल्य पुस्तक भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवून आदर्श शिक्षकांचे कर्तव्य चोख बजावले आहे ,त्यामुळे ते जीवन गौरवास  पात्र ठरले आहेत .त्यांचे हार्दिक अभिनंदन!!!

यापुढील गुरुजींची बालकेंद्री लेखणी बालसाहित्यात  दखलपात्र ठरेल याची  खात्री बाळगतो.चिन्मय ग्राफिक्स व कव्हर डिझाईन ने बोलके व मनोहर मुखपृष्ठ साकारले आहे.हृद्य प्रकाशनाने अतिशय सुंदर, सुबक व देखणा संग्राह्य काव्यसंग्रह प्रकाशित केला असून बालसुलभ बोल्ड टाईप छपाई,कवितानुकूल लक्षवेधी आशयवृद्धि करणारी चित्रांची सुसंगत मांडणी हे काव्यसंग्रहाचे आकर्षण व गुणवैशिष्ट्ये म्हणणे संयुक्तिक? होईल.

कवी प्रदीपगुरूजी पिंपळनेरकर यांना पुढील साहित्यिक वाटचालीसाठी   आभाळभर शुभेच्छा व पुरजोर पाठराखण!!!




-विद्रोही कवी 

साहेबराव मोरे 

संवाद : ९४०४०४८६०१


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...