शनिवार, ६ सप्टेंबर, २०२५

विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवावा


 विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवावा

शृती तलवारे यांनी केले आवाहन 

राणी इंदिराईबाई भोसले महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा


शब्दशिल्प/कुही(नागपूर)-दि. ६ सप्टेंबर रोजी राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालय कुही येथे शिक्षक दिन मोठया उत्साहात  साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन    यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मांडेकर सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून  विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यासोबतच शिक्षक दिनानिमित्त प्राचार्य स्थान भूषविणारी श्रुती तलवारे- B.Com.-3 हिने तिच्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी प्रत्येक कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा दर्शवली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून दिपाली भोयर B.com.हिने भाषणाच्या माध्यमातून व संजना मेश्राम B.A.-3 हिने गीताच्या माध्यमातून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक दिनानिमित्त उत्कृष्टपणे शिक्षकांची भूमिका निभावणार्‍या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. कटमुसरे सर, डॉ. लामखडे सर, डॉ.केणे सर,डॉ. चव्हाण सर, घाटोळ सर, डॉ कुकडे मॅडम, डॉ. झाडें मॅडम, डॉ. करंभे सर,सोमकुवर सर, मनकवडे सर व महाविद्यालयातील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...