शुक्रवार, ५ जून, २०२६

डॉ. भास्कर गणवीर यांच्या दोन पुस्तकांचे आज प्रकाशन

शब्दशिल्प/नागपूर_ देशातील ख्यातनाम विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्राद्योगिक संस्था नागपूर येथील कुलसचिव पदावरून सेवानिवृत्त झालेले डॉ. भास्कर गणवीर यांच्या ' मागे वळून पाहता ' हे स्वकथन आणि    'आंतरराष्ट्रीय पर्यटन व बोधिपथ ' हे प्रवासवर्णन, या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आज शुक्रवार दिनांक 5 जून 2026 ला सायंकाळी नागपूरच्या त्रिमूर्ती नगर परिसरात आयोजित केलेला आहे.या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी एम. एस. ई. डी.सी. एल. चे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक मनोहर बागडे असतील. उपरोक्त दोन्ही पुस्तकाचे प्रकाशन आकाशवाणी सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते होईल व या दोन्ही पुस्तकावर ज्येष्ठ लेखिका सुजाता लोखंडे विशेष भाष्य करतील. या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ.रेशमी मूनघाटे करणार आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...