======================= महाराष्ट्र ही साधुसंताची भूमी म्हणून ओळखली जाते.अनेक संतानी या पवित्र मातीत अवतार घेतले आहेत. संत तुकाराम, एकनाथ, ज्ञानेश्वर, गाडगेबाबा या संताप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज थोर संत होऊन गेले. तुकडोजी महाराजांचा जन्म ३० एप्रिल १९०९ ला यावली जि. अमरावती येथे झाला. वडील बंडोजी इंगळे व आई मंजुळाबाई .तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे.अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी अनेक कीर्तन व भजनांचा उपयोग केला. मराठी व हिंदी भाषेत काव्यलेखन केले. आत्मसंयमी विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. तुकडोजी महाराजांनी इ. स. १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली खंजिरी भजन प्रकारच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. तुकडोजी महाराज महान समाज सुधारक, स्वातंत्र्य सेनानी, कवी, गायक होते. तुकडोजी महाराजांचे गुरू आडकोजी महाराज होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता, अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी साहित्य रचना केली. अंधश्रद्धा व जातिव्यवस्था निर्मूलन करण्यासाठी कार्य केले. अंधश्रद्धा व जातिभेद समाजाला लागलेला कलंक आहे.तो कलंक धुवून काढण्यासाठी गावोगावी जाऊन समाज प्रबोधन करीत. आधुनिक काळातील एक महान संत म्हणून तुकडोजी महाराज यांची ओळख आहे. विदर्भ जरी जन्मभूमि असली तरी महाराष्ट्रभर फिरून समाज जागृती केली. राज्यचं नव्हे तर संपूर्ण देशभर प्रवास करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले. जपान देशात जाऊन सर्वांना विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. सन १९४२ भारत छोडो आंदोलनात त्यांना अटक झाली.
"आते है नाथ हमारे "
हे त्यांचे पद स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती देणारे गीत होते. भारत हा खेड्यांचा देश आहे. खेडे म्हणजे ग्राम किंवा ग्रामीण भागातील लोकांचा विकास झाला पाहिजे. ग्रामीण विकास झाला की राष्ट्रीय विकास होतो. समाजातील सर्व प्रकारच्या लोकांचा विकास कसा करता येईल. त्यांचा उद्धार करण्यासाठी अहोरात्र योगदान दिले.ग्रामोन्नती, ग्रामकल्याण त्यांच्या विचार सरणीचा केंद्रबिंदू होता. संपूर्ण भारत देशातील खेड्यांची दैयनिय स्थितीचा विचार केला. खेडे गाव सुधारल्याशिवाय देश सुधारू शकत नाही. ही भावना मनात घर करून होती. खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याबद्दल उपाय योजना तयार करीत. देवाबद्दल भोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात. सर्वधर्म समभाव हे राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचे विचार विश्वाचे वैशिष्ट्य होते. सामुदायिक प्रार्थना महाराजांना आवडत होती. तुकडोजी महाराज एकेश्वरवादाचे पुरस्कार करते होते. विवेकनिष्ठ जीवनदृष्टीवादी होते, धार्मिक कर्मकांडाला कडाडून विरोध केला. महिला उन्नती व्हावी म्हणून सतत कुटुंब, समाज, राष्ट्र व्यवस्था ही स्त्रीयांवर कशी अवलंबून असते हे कीर्तनातून जनसामान्यांना सांगत. स्त्रीला अज्ञानात, गुलामगिरीत ठेवणे अन्यायकारक आहे. देशाची युवा पिढी ही राष्ट्राची संपत्ती आहे. तरुण हे बलाची उपासना करणारे असावे. राष्ट्राचे रक्षण करण्याची जबाबदारी तरूण पिढीवर आहे. बल किंवा ताकदवान युवा शक्ती राष्ट्रीय मनोबल वाढवते. समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करून नीतिमान व सुसंस्कृत जनता कशी होईल ते महत्त्वाचे आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झोपडीत सुद्धा सर्व सुख मिळते हे सांगतात.
*"राजा सजी महाली,सौख्ये कधी मिळाली.|*
*ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या.||*
*भूमिवरी पडावे,ता-याकडे पहावे|*
*प्रभू नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या.||*
*येता तरी सुखी या ,जाता तरी सुखी जा|*
*कोणावरी ना बोझा या झोपडीत माझ्या||*
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
=======================
*रत्नाकर बाबुराव पाटील*
{पर्यवेक्षक}
विद्यानिकेतन माध्यमिक
आश्रमशाळा शिंगोली
ता.जि. धाराशिव
मो. ९४०३३९४८१८.
_____
2
खंजिरी भजनातून प्रबोधन: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
======================= महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, स्वातंत्र्यसेनानी, कवि, गायक, महान प्रबोधनकार, संत तुकडोजी महाराजांच्या अनमोल कार्याचा उजाळा देण्याचा माझा प्रयत्न. माणिक बंडोजी इंगळे हे मुळचे नाव असणारे "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज" म्हणून ओळखले जातात. खंजिरी भजन व कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृती करण्याचे अनमोल कार्य केले.
खंजिरी हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एक छोटे से चर्मवाद्य आहे.गाताना ठेका धरण्यासाठी व रंजकता आणण्यासाठी हे वाद्य वापरले जाते.लाकडी किंवा धातूच्या वर्तुळाकार पट्टीमध्ये ठराविक अंतरावर धातूच्या पातळ गोलाकार चकत्या बसवलेल्या असतात.या चकत्या एकमेकावर आपटून नाद निर्माण होतो. खंजिरी एका हातात धरून दुसऱ्या हाताने आघात करून वाजवली जाते.लोकसंगीतात खंजिरीचा नियमित वापर केला जातो. खंजिरी हे वाद्य तुकडोजी महाराज त्यांच्या भजनात वाजवीत असत. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिव्यवस्था दूर करण्यासाठी भजन व कीर्तनाचा प्रभावी वापर केला. ज्यांनी आत्मसंयमी विचार ग्रामगीता या काव्यातून मांडले. मराठी व हिंदी भाषेत अनेक काव्यरचना केल्या. तुकडोजी महाराजांनी इ. स. १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार समाज प्रबोधन करण्यासाठी निवडला. तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू होते. गुरू आडकोजी महाराजांनी त्यांचे मूळचे नाव माणिक हे बदलून तुकडोजी ठेवले. विदर्भ, संपूर्ण महाराष्ट्रात व देशभर पर्यटन करून आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले. जपान सारख्या प्रगत देशात जाऊन सर्वांना विश्वबंधूत्वाची शिकवण दिली. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात तुकडोजी महाराजांना अटक झाली.
*"आते है नाथ हमारे|"*
हे त्यांचे पद स्वातंत्र्य चळवळीत स्फूर्ती गीत ठरले. भारत हा खेड्यांचा देश आहे. ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होतो. हीच भावना व श्रद्धा तुकडोजी महाराजांची होती. समाजातील सर्वच लोकांचा उद्धार कसा होईल या विचारसरणीमूळे चिंता वाटत होती. ग्रामोन्नती व ग्रामीण कल्याण हेच त्यांचे लक्ष होते. भारतीय खेड्यांचा त्यांना चांगला अभ्यास होता.
ग्रामीण विकासाच्या विविध समस्यांवर मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात याबद्दल उपाय योजना सांगीतल्या.अमरावतीजवळ मोझरी च्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील लक्षणीय कार्य आहे. ग्रामगीतेचे लेखन त्यांच्या जीवन कार्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याबद्दल विविध उपाय योजना सुचविली. ग्राम सुशिक्षित, सुसंस्कृत, संपन्न व्हावेत. देशाच्या गरजा गावांनी भागवाव्यात. ग्रामउद्योगांना प्रोत्साहन मिळावे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे. गावातील देवभोळेपणा, जुनाट अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात.
सर्वधर्मसमभाव यासाठी सामुदायिक सर्वधर्म प्रार्थनेचा पुरस्कार केला. तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ दृष्टीने एकेश्वरवादाचा पुरस्कार करणारे होते. अनावश्यक कर्मकांडाला विरोध केला.
खंजिरी भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. अखिल भारतीय पातळीवर साधु संघटनेची स्थापना केली. महिला उन्नती व्हावी यासाठी अनमोल योगदान दिले. कुटुंब, समाज, राष्ट्रव्यवस्था स्त्रीवर अवलंबून असते.
देशाचे तरूण हीच राष्ट्रीय संपत्ती असते. तरूणाने बलाची उपासना करावी. समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करावे. तरुण पिढी व्यसनमुक्त असावी. व्यसन हे राष्ट्राला लागलेला कलंक आहे. ऐहिक व पारलौकिक गोष्टींचा सुरेख संगम तुकडोजी महाराजांच्या साहित्यात सापडतो. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती भवनात तुकडोजी महाराजांचे खंजिरी भजन ऐकले व प्रसन्न होऊन राष्ट्रसंत ही उपाधी बहाल केली.
तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण अश्विनी कृष्ण पंचमी ३१ ऑक्टोबर १९६८ रोजी झाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता, अनुभव सागर, भजनावली,
सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली अशा अनेक साहित्य रचना लिहिल्या.अशा महान परम पूज्य राष्ट्रसंतांच्या चरणी कोटी कोटी वंदन.
=======================
रत्नाकर बाबुराव पाटील
{सहशिक्षक}
विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,
शिंगोली ता.जि. धाराशिव



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा