तिस तारखेचा l हा जन्मदिवस l
आला उदयास l तुकडोजी l l
शिंप्याच्या घरात l मंजुळा मातेच्या l
उदरी रत्नाचा l जन्म झाला l l
अमरावतीत l यावली गावात l
आले राष्ट्रसंत l भुईवरी l l
अत्यंत हलाखी l परिस्थिती त्यांची l
माणिक जन्माची l ही जयंती l l
भक्तीत जीवन l अर्पण केलेत l
ध्यानस्थ झालेत l खंजरीत l l
तेव्हाआडकोजी l महाराजांनाच l
साक्षात्कारच l झाला होता l l
ते नतमस्तक l गुरु चरणात l
तल्लीन झालेत l खंजरीत l l
खंजरीचा साद l निघे शब्दमुखी l
प्रवचन लोकी l जागृतीचे l l
माणूस द्या मज माणूस द्या अरे
भीक मागतो रे l जनासाठी l l
या सामुदायिक l प्रार्थने मधून l
केले अभियान l स्वच्छतेचे l l
विडा उचलला l बाल संस्काराचा
परिवर्तनाचा l नाद होता l l
लोकांना भजन l कीर्तन मार्गाने
भक्ती माध्यमाने l जनसेवा l l
विठ्ठल चरणी l गेले भजनाला l
निरोप घेतला l पंढरीत l l
गुरुदेव सेवा l मंडळी जमली l
घरोघरी गेली l ग्रामगीता l l
जीवन खोब्रागडे
टेक्नो रेसिडेन्सी, नागपूर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा