" स्पंदन " वार्षिकांकाचे प्रकाशन
शब्दशिल्प/कुही :- येथील राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालयात वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 117 वी जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विद्यार्थी प्रतिभेची ओळख असलेल्या " स्पंदन " या वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले.
मंचावर अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री गजानन मांडेकर होते डाॅ.मिनाक्षी झाडे डाॅ.गायत्री कुकडे श्री राहूल बोरकर यांचे संपादनात अंक निर्मीती करण्यात आली.
ऊपस्थीतांनी अंकाबद्दल आनंद व्यक्त करतांना विद्यार्थ्यांच्या लेखनगुणाचे कौतुक केले.
या वेळी डाॅ.लामखाडे, डाॅ.चव्हाण, डाॅ. दिपक केने श्री दिनेश घाटोळ, डाॅ.करंभे , प्रा.मनिषा पडोळे,प्रा.खेडीेकर, प्रा.सोमकुवर, मनिषा धवड यांची ऊपस्थीती होती.
तप्त ऊन्हात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ऊपस्थीत होते.यावेळी हर्षदा क्षीरसागर या विद्यार्थ्यीनीने राष्ट्रसंताची " ही का भक्ती खरी " ही रचना सादर केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम मनकवडे, विजय देशमुख, संजय टेकाम, भरत वानखेडे, टेकेश्वर देशमुख यांनी परीश्रम घेतले.
संचलन कु.स्नेहा भिवगडे तर आभारप्रदर्शन कु.साक्षी लांजेवार या विद्यार्थीनीने केले.
कु.प्रणाली पडोळे हिने गायलेल्या राष्ट्रसंताच्या " तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा " या राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा