आयु.माणिकराव खोब्रागडे यांचा ७५ वर्षपूर्ती सत्कार समारंभ उत्साहात साजरा
-------शब्दशिल्प/नागपूर-------------
'घरो पे नाम थे, नाम के साथ ओहदे थे
बहुत ढूंढा मगर आदमी ना मिला'
असा बशीर बद्र यांच्या शेराचा दाखला देत प्रा.जावेद पाशा कुरेशी म्हणाले आज समाजात असेच बघायला मिळते पण आमच्या या ज्येष्ट कवी, लेखक, समीक्षकाच्या घरासमोर कुठल्याही मोठ्या ओहद्याची पाटी नसताना मी त्यांच्या सारखा दिलदार माणूस पाहिला नाही. ते कृषी अधिकारी अश्या मोठ्या पदावरून निवृत्त झाले असले तरी ते सामान्यात सामन्य माणसासारखे राहतात. त्यांच्याकडे तुम्ही कुठल्याही सामाजिक,साहित्यिक कामाच्या निमित्ताने जा. ते आपल्याला सढळ हाताने मदत करतात. त्यांना अजून पंचेवीस वर्ष आयुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करुन ते म्हणाले की,
इस बरस हमने,जमीं मे धुवाँ बोया है
अब फल नही आयेगें शाखों पे निकल आयेगें बम
आयु.माणिकराव खोब्रागडे अमृत महोत्सव समिती द्वारा आयोजित माणिकराव खोब्रागडे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभात ते बोलत होते.
राजगृह वाचनालय सभागृह, धम्मकिर्ती नगर, दत्तवाडी, नागपूर २३ या ठिकाणी आयु.माणिकराव खोब्रागडे अमृत महोत्सव समिती द्वारा माणिकरावांचा सत्कार समारंभ रवि.दि. ७ सप्टेंबर ला दुपारी ३-३० वाजता पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.वामन नील ज्येष्ठ कवी हे होते. मुख्य अतिथी प्रा.जावेद पाशा कुरेशी परखड वक्ता, नरेंद्र माटे माजी नगरसेवक वाडी, राजेंद्र कांबळे सचिव राजगृह वाचनालय, कवी मनोहर गजभिये, कवी लोकनाथ यशवंत हे होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला पाहुण्यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले व आयु.माणिकराव खोब्रागडे अमृत महोत्सव समिती तर्फे मा.माणिकराव खोब्रागडे यांना शॉल, पंचशील दुपट्टा, स्मृतीचिन्ह, कप व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करतांना प्रकाश बावनगडे यांनी समितीच्या वर्षभराच्या कार्याचा आढावा घेतला. प्रसिध्द कवी लोकनाथ यशवंत म्हणाले जगात काय सुरु आहे याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आपल्या वयाकडे आपण पाहू नये.प्रा. ह्रुदय चक्रधर म्हणाले कि माणिकराव सर्वांना मदत करणारे व्यक्ती आहेत. याप्रसंगी नरेंद्र माटे, मनोहर गजभिये, राजेंद्र कांबळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. आपले मनोगत मांडताना सत्कारमूर्ती माणिकराव खोब्रागडे यांनी सांगीतले की माझे ओरीजनल नाव माणिक नसून ' पत्र्या ' आहे. माझी आई मला याच नावाने हाक मारायची पण माझे वडील मला माणिक म्हणायचे. पुढे ते म्हणाले प्रत्येक माणसाने पंचशील व २२ प्रतिज्ञांचे पालन करावे समाजात वावरतांना प्रत्येकाशी प्रेमाने व माणुसकीने वागायला पाहिजे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.वामन नील म्हणाले माणिकरावांसारखा दानशूर व्यक्ती आजकाल पहायला मिळत नाही त्यांचा अभ्यास दांडगा आहे मी त्यांच्या दिर्घायुष्यासाठी मंगलकामना करतो याप्रसंगी डॉ.भोला सरवर यांनी आपली एक गझल सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
कविता आणि शेर आपल्या अदाकारीने पेश करत संजय गोडघाटे यांनी सुत्रसंचालन केले.कार्यक्रमाचे समन्वयक जगदीश राऊत आणि संजय सायरे होते आभार रंगराज गोस्वामी यांनी व्यक्त केले याप्रसंगी प्रा.जावेद पाशा,ताहीरा पाशा, रोशनी गणवीर, रजनी संबोधी यांनी माणिकरावांचा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि दत्तवाडीतील अनेक मान्यवर लोकांनी माणिकराव खोब्रागडे यांचा पुष्प गुच्छ देऊन माणिकरावांचे अभिंनंदन केले. कार्यक्रमाला हेमंत खोब्रागडे, प्रीती हेमंत खोब्रागडे, अर्नव खोब्रागडे, तीशा खोब्रागडे, ज्ञानेश्वर गोलाईत, राजेंद्र पाटील, ऋषीकांत लोखंडे, दादाराव कापसे, हरिदास कोसारे,चंद्रकांत सनकाळे, धनराज खोब्रागडे, दादाराव गणेर, पुंडलिक कापसे,रविशंकर रंगारी सह अनेक नागरिकांची उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा