मंगळवार, ९ सप्टेंबर, २०२५

आनंदी जीवन जगण्याकरिता मेंदूशी मैत्री करणे अत्यंत आवश्यक - डॉक्टर श्रुती पानसे



शब्दशिल्प/पुणे-दलित स्वयंसेवक संघ व अण्णा भाऊ साठे स्मारक संस्था यांचे संयुक्त विद्यमाने व्याख्यानमालेचे 422 वे पुष्प साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे ग्रंथालय के ब्लॉक नेहरू स्टेडियम पुणे सारसबागे समोर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. मेंदूशी मैत्री या विषयावर डॉक्टर श्रुती पानसे यांनी फार सुंदर वैचारिक मांडणी केली.

त्या म्हणाल्या "मेंदूशी मैत्री करण्यासाठी ताण टाळला पाहिजे. ताणामुळे विविध आजार होतात. ताण हलका करण्यासाठीही शरीराच्या हालचाली आवश्यक ठरतात. जास्त काळासाठी मोबाईल फोनचा वापर करणे, घातक आहे. शालेय वयातल्या, अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी तर अतिशय वाईट आहे."

कार्यक्रमाची सुरुवात शाहीर सदाशिव भिसे यांच्या प्रबोधन गीतांनी झाली. प्रस्ताविक शौर्य अकॅडमीचे हरिदास भिसे यांनी केले. अध्यक्षस्थान दलित  स्वयंसेवक संघाचे माजी संघप्रमुख दादासाहेब सोनवणे हे होते. समारोपा चे  भाषण करताना ते म्हणाले "डॉक्टर श्रुती  पानसे यांनी मेंदू या विषयावर  पी.एच.डी. केलेली आहे. लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत जास्त वेळ एकाच ठिकाणी न बसता सातत्याने हालचाल करणे आवश्यक आहे. त्यातूनच मेंदूशी मैत्री जोडली जाते."

आभार युक्रांचे संदीप बर्वे यांनी मानले. सदर कार्यक्रमास जेजुरीचे दिलीप दोडके,चाकणचे रामराव कांबळे,राजगुरुनगर चे नवनाथ लोंढे.प्रतिभावंत लेखिका सुभा आत्माराम लोंढे, लेखक बाळासाहेब भारस्कर,बर्वे ताई,इब्राहिम खान,लाल सलाम वाले काका, श्री व सौ दीपक घोलप, ज्ञानेश्वर पाटोळे आणि कवी विनोद अष्टुळ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...