बुधवार, १० जून, २०२६

०५ वे राज्यस्तरीय मिरग नक्षत्र मराठी साहित्य संमेलन वाई.. मध्ये लक्षवेधी ठरले कथालेखक बाळासाहेब देशमुख यांचे कथाकथन..

 

शब्दशिल्प/अहिल्यानगर:- के.एस.आय पब्लिकेशन व.विद्यानिकेतन शैक्षणिक संस्था आयोजजि राज्यस्तरीय मिरगे नक्षत्र मराठी साहित्य संमेलन,वाई येथे ०७ जून रोजी संपन्न झाले. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ डोलारे पालघर हे होते.

संमेलनमध्ये कथाकथन, कवी संमेलन ,विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सन्मान ,असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. 

मिरग नक्षत्र संमेलनमध्ये कथालेखक बाळासाहेब देशमुख अहिल्यानगर, 

यांनी 'हरवलेला संवाद' ही कथा सादर केली. आजी आजोबांचा शेवटचा मित्र म्हणजे त्यांची नातवंडे. तर नातवंडांचा पहिला मित्र म्हणजे आजी आजोबा. यांच्या भावविश्वावर भाष्य करणारी कथा बाळासाहेब देशमुख यांनी सादर केली. सकस कथाक, देहबोली, आवाजातील चढ उतार, उत्कृष्ट शब्द फेक याद्वारे कथा , संमेलन मध्ये लक्षवेधी ठरली. त्या प्रसंगी सारे सभागृह मंत्रमुग्ध झाले होते. आजी आजोबांच्या सहवासात, नातवंडांवरती जे जे संस्कार होतात. त्यातून एक सकस, राष्ट्राला तारणारी पिढी तयार होते. हल्लीची मुले, हुशार, चाणाक्ष व जिज्ञासू आहेत. आजी आजोबांच्या सुसंस्काराने चांगली जडणघडण करत, आपले आयुष्य घडवतात. हा लक्षवेधी संदेश रसिकांना मिळाला. 

कथाकथन कार्यक्रम प्रसंगी राज्यातून आलेले हजारो साहित्यिक उपस्थित होते.संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक नागनाथ डोलारे यांच्या शुभहस्ते देशमुखांना सन्मानित करण्यात आले. जेष्ट साहित्यिक विलास पाटील यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...