सोमवार, ४ मे, २०२६

अजिंक्य आई



क्रूज बारगी बुडता 

बाळ मिठीत झोपला

घट्ट बिलगली आई 

कसा निसर्ग कोपला


जबलपूरला सारे 

गेले सुट्ट्याना लागता

पर्यटन थंड स्थळी

मृत्यू मिळे न मागता


हार अमान्य मातेला

वाटे जिंकलाय काळ 

सैल मातृत्व सुटेना

झाली दुर्घटना काल


मरणाच्या दारी तिज

चिंता पोटच्या गोळ्याची

डोळे मिटले पाण्यात 

नाळ तुटली भोळ्याची


प्रेम जननीचे खरे 

पुन्हा सिद्ध झाले आता

चिमुकला विसावला

स्वर्गसुख कुशी जाता


प्रित निर्मळ निःस्वार्थी

माय देई सुख छत्री

श्वास देण्यास लेकरा

जगण्याला लावी कात्री 


गोताखोर अश्रू वाहे

दिसे माऊलीची माया

म्हणे जणू ओढू नका

कोमलच शिशु काया


पडे नदित मैरीना 

उभे अकाली मरण 

पिल्लू जहान छातीशी

गेली मृत्यूला शरण 


    ©डॅा.शील बागडे

       नागपूर

       ४/४/२०२६

          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...