शब्दशिल्प/नागपूर_ सुप्रसिद्ध कवयित्री व लेखिका डॅा.शील बागडे यांच्या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मोठ्या थाटात पार पडले. नाशीक येथील कुसुमाग्रज सभागृहात हिरकणी बहुउद्देशीय संस्था, जालना यांनी आयोजित केलेल्या संमेलनात बाल साहित्य ॲकेडमी विजेते मा.एकनाथ आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ साहित्यिक मा.चंद्रकांत वानखेडे यांच्या हस्ते त्यांच्या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे “ अनुशील काव्यवाट “ या अष्टाक्षरीत लिहिलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मा. वनमालाताई पाटील या हिरकणी महाराष्ट्र गौरव समूहाच्या अध्यक्ष यावेळी उपस्थित होत्या. मा.लक्ष्मण सावजी ( कुशल वक्ते ),मा.एस. के.भामरे ( ज्येष्ठ साहित्यिक), मा.अजय दादा बिहारी ( गझलकार तथा सिनेक्षेत्र ), मा. सौ.कविता पाटील, हे मान्यवर उपस्थित होते.
प्रा.जागृती निखारे( पुणे ) ,प्रा.लतिका चौधरी ( धुळे ), सौ.प्रिया राजेंद्र माळी ( लातूर) या ज्येष्ठ साहित्यिका ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या. डॅा.शील बागडे ह्यांना प्रमुख पाहुणे म्हणून मा.वनमाला पाटील यांनी आमंत्रित केले होते.
काव्यसंग्रहाला प्रस्तावना मा. वनमालाताई पाटील यांची आहे. शुभेच्छा सुप्रसिद्ध लेखिका व कवयित्री मा.प्रा.विजयाताई मारोतकर व डॅा. स्मिताताई मेहेत्रे यांच्या लाभल्या आहेत. ब्लर्ब सुप्रसिद्ध लेखिका व कवयित्री मा. डॅा.लीनाताई निकम यांचा आहे.
पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल मा.विजयाताई मारोतकर, मा.संध्याताई राजुरकर, मा.डॅा. स्मिताताई मेहेत्रे , मा.लीनाताई निकम , मा.उषाताई राऊत , मा. प्रणोतीताई कळमकर , मा. डॅा. राजेश काळे, मा. डॅा.अरविंद बुटले , मा. अपर्णा कल्लावार, मा. रेखाताई सोनारे , मा.प्रतिभा सहारे यांनी अभिनंदन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा