सोमवार, १८ मे, २०२६

केंद्रीय विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष गिरीश गांधी यांचा आज नागरी सत्कार

शब्दशिल्प/अमरावती_अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. व परिवर्तन प्रबोधिनी, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष गिरीश गांधी यांचा नागरी सत्कार समारंभ मंगळवार १९ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता अभिनंदन सभागृह, ‘अभिनंदन हाईट्स’, कॅम्प रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनंदन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय बोथरा राहणार आहेत. स्वागताध्यक्ष  म्हणून भारतीय जैन संघटनाचे विश्वस्त   सुदर्शनजी गांग (जैन) उपस्थित राहतील.प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गोविंद कासट तसेच ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य डॉ. सुभाष गवई करणार आहेत.नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन परिवर्तन प्रबोधिनीच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. शोभा रोकडे व अभिनंदन बँक परिवाराचे सीईओ शिवाजी देठे यांनी केले आहे. 

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विविध सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक संस्थांचा समन्वय समितीमध्ये अविनाश दुधे, नितीन पवित्रकार, प्रा. रेखा बेलसरे, संजय देशमुख, रामेश्वर अभ्यंकर, रेवण पुसतकर, वैभव दलाल, प्रदीप जैन, प्रभा आवारे, संजीवनी काळे, इंजि. दीपक दारव्हेकर, अ‍ॅड. डॉ. सुरेश चापोरकर, रजनीदिदी राठी, अ‍ॅड. नीता कचवे,नयना दापूरकर,शीतल राऊत, छाया राऊत, राजेश बहाळे, डॉ. दिनेश राऊत, डॉ. राजेंद्र राऊत, डॉ. शुभांगी इंगोले, शिवा प्रधान आणि डॉ. गोविंद तिरमरवार,डॉ.बाळ जाधव,डॉ.विकास अडलोक आदींचा समावेश आहे.या उपक्रमात अभिनंदन को-ऑप बँक, परिवर्तन प्रबोधिनी, युवा संवाद मंच,विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन, स्व. सोमेश्वर पुसतकर स्मृती प्रतिष्ठान, आम्ही सारे फाऊंडेशन, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ, संवेदना फाऊंडेशन, सृजन साहित्य संघ, बांधिलकी फाऊंडेशन, सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, विदर्भ राज्य आंदोलन समिती, स्त्री संवेदना मंच, ज्ञानपथ पब्लिकेशन ,पायगुण प्रकाशन, मेधा पब्लिशिंग हाऊस, अक्षरशिल्प प्रकाशन, पालवी फाऊंडेशन, आयएएस अकादमी आणि आदिशक्ती बहुउद्देशीय संस्था आदी संस्थांचा सहभाग लाभला असून समन्वय समितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे....सौ. मनीषा विशाल सोन्नेकर

      मनुष्य हा देखील एक प्राणीच. मात्र, इतर प्राण्यांपेक्षा अतिशय हुशार व तर्कबुद्धी असलेला आणि चांगल्या विचारविनिमयाची कास धरणारा प्राणी. ...