जागतिक पुस्तक दिन
पुस्तकाच्या दिनी । 'हार्दिक शुभेच्छा ।।
मनस्वी सदिच्छा । सर्वांनाच ।।
रिते न होणारे । शब्दांचे मंडार ।।
ज्ञानाचा सागर । पुस्तकच ।।
पेन तलवार । पुस्तक ही ढाल ।।
उंचावते भाल । मानवाचे ।।
पुस्तक करिते । सर्वांचा आदर ।।
जीवन उद्धार । क्षणोक्षणी ।।
खरेदी करू या । थोरांचे पुस्तक ।।
घडवू मस्तक । प्रज्ञाशील ।।
पुस्तक चंदन । सुगंधाची खाण ।।
कशाची ना वाण । वाचकाला ।।
पुस्तकात मोती । वेचती वाचक ।।
मोत्याची चमक । मस्तकात ।।
पुस्तक सामर्थ्य । करिते समर्थ ।।
जीवनाला अर्थ । नवा येई ।।
जगता जीवन । वाचावे पुस्तक ।।
वाढते मस्तक । वाचकांचे ।।
पुस्तकाचा दिन । करू नका दीन ।।
वाचा रात्रं दिन । मनोमावे ।।
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, अमरावती : 8087748609
( डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार प्राप्त साहित्यिक )
________
पुस्तकाचे दुःख
एक पुस्तक दिसले
होते अश्रू नयनात
खोलू लागताच पाने
धूळ साचलेली आत
काट मोडलेला ठेवी
वृद्ध वाचत राबती
दुमडून तसा आहे
नसे म्हातारा सोबती
कोणी वाचेना मजला
राही अलमारी बंद
बाल गोपाळा कळेना
जपतात काय छंद
संगणक मिळताच
माझी झालीय दुर्दशा
लाभे क्षणात उत्तर
अती वापराने दशा
येई सुज डोळे लाल
सुके पाणी होई आग
लागे नंबरचा चष्मा
पालकांना नसे जाग
भीमराव वाचे ग्रंथ
ग्रंथालय मोठे घरी
लिहिलेय संविधान
मिटविण्या जात दरी
जणू लेखणी कुंचला
बाबा लिही भरभर
तास अठरा वाचन
ध्येय गाठे सरसर
भाषा कोणतीही असो
पुस्तकांना करा मित्र
ज्ञान साठवा वाचून
थोरा मोठ्यांचे चरीत्र
रोज साजरा करूया
सारे पुस्तकांचा दिन
बुक वाचून वाचाल
अशिक्षित किंवा दीन
डॅा.शील बागडे
२२/४/२०२६
नागपूर
____________________

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा