( कला, साहित्य , सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल )
शब्दशिल्प/छत्रपती संभाजीनगर_किल्ले टुरिझम फेस्टिव्हल फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित “स्टार ग्लोबल पुरस्कार वितरण २०२६” हा भव्य आणि दिमाखदार पुरस्कार
सोहळा मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी विभाग या सभागृहात छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडला.
समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्याला मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या सोहळ्यात प्रा. डॉ. बी. एन. खरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. सुनील गायकवाड (माजी खासदार, लातूर) यांची उपस्थिती लाभली. तसेच मा. कृष्णकुमार दडके, सुप्रसिद्ध टीव्ही चित्रपट अभिनेत्री मा. लीना पंडित, हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेते मा. रमेश अग्रवाल,( जयदेव फेम )ज्येष्ठ अभिनेते व निर्माते मा. दिलीप घेवंदे, तसेच ज्येष्ठ साहित्यिका मा. डॉ. मंगल पांचाळ यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या प्रतिष्ठित सोहळ्यात यवतमाळ येथील सुप्रसिद्ध कवयित्री, साहित्यिक, समीक्षक लेखिका, सूत्रसंचालक, नाट्य कलाकार मनिषा आनंदराव कांबळे यांना त्यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी “स्टार ग्लोबल सोशल अवॉर्ड” प्रदान करण्यात आला.
मनिषा कांबळे यांनी २००४ पासून आपल्या लिखाणाला सुरुवात केली असून आपल्या लेखणीतून समाजातील वेदना, वास्तव आणि परिवर्तनाचा संदेश प्रभावीपणे मांडला आहे. त्यांच्या लिखाणामध्ये, तसेच कवितांमध्ये फुले- शाहू- आंबेडकर विचारसरणीचा प्रभाव दिसून येतो, ज्यातून समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो. समता न्याय बंधुता या मूल्यांचा जतन करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर त्यांनी अनेक वर्तमानपत्रातून परिवर्तनशील लिखाण करून तसेच राज्य नाट्यातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांचा "सूर्याचा सूर्य "हा काव्यसंग्रह प्रकाशित असून "जगत आहोत" हे त्यांचे आगामी प्रकाशन आहे
कार्यक्रमात राज्यभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणारे १०० मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते. संपूर्ण सोहळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या सन्मानामुळे मनिषा कांबळे यांच्या कार्याला नवी उभारी मिळणार असून, भविष्यात त्या साहित्य, संस्कृती आणि समाजकार्यात अधिक मोठे योगदान देतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. आणि त्यांचे कौतुक केले या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांच्याकडे अभिनंदनचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या यशांची श्रेय आपल्या परिवाराला देतात...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा