*मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार २०२४ साठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन*
शब्दशिल्प/कोल्हापुर_मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर यांच्यामार्फत दरवर्षी पुस्तकांसाठी बालसाहित्य पुरस्कार दिले जातात. याही वर्षी पुरस्कारासाठी बालसाहित्य मागविण्यात येत आहे. खालील *पाच* साहित्य प्रकारातील पुस्तके पात्र असतील.
१) बाल कथासंग्रह
२) बालकविता संग्रह
३) बालनाटिका/एकांकिका/ नाट्यछटा
४) बालकादंबरी
५) संकीर्ण बालासाहित्य
६) उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार (या पुरस्कारासाठी सदर वर्षातील बालसाहित्यातील एकूण प्रकाशित पुस्तके पाठवावीत. संख्या व गुणवत्ता या निकषांवर निवड केली जाईल.)
१ जानेवारी, २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ या कालावधीत पुस्तके प्रकाशित झालेली असावीत. पुस्तकाची पहिली आवृत्ती असावी, पुस्तकाच्या वर्सो पेजवर (दोन नंबरचे पान) तारीख, नाव अथवा इतर मजकुरात खाडाखोड नसावी. माहिती चिकटवलेली नसावी.
*पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे राहील*.
तरी *महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र बाहेरील मराठी बालसाहित्यिकांनी* या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आपल्या साहित्यकृतीच्या २ प्रती,अल्पपरिचय आणि पासपोर्ट आकारातील फोटो पाठविण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच निकालाविषयी वारंवार चौकशी करू नये. निकाल जाहीर होताच सन्माननीय साहित्यिकांना व्हॅटसप ग्रुप द्वारे कळवले जाईल.
पुस्तके पाठवण्याची अंतिम तारीख-३१ ऑक्टोबर, २०२५
*पुस्तके पाठवण्याचा पत्ता : - कार्याध्यक्ष सौ. नसीम जमादार*
*2386, डी वाॅर्ड*
*तोरस्कर चौक, जुना बुधवार पेठ, नावेच्या कारखान्याजवळ कोल्हापूर*
*पिन-416002*
*मोबा. 8275918769*
*8459876007*
पुस्तके वरील पत्त्यावर फक्त पोस्टानेच पाठवावीत
*१) अध्यक्ष - डॉ. श्रीकांत पाटील 9834342124*
*२)उपाध्यक्ष : - श्री. परशराम आंबी 9421203732*
*३)कार्यवाह - श्री.संजय कळके 888873738*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा